Achira News Logo
Achira News

लहान मुलांच्या हल्ल्यात पुण्यातील तरुणाचा मृत्यू

Maharashtra Times
लहान मुलांच्या हल्ल्यात पुण्यातील तरुणाचा मृत्यू
Full News
Share:

स्नेहल निमगिरे, पुणे :पुण्यात पुन्हा एकदा कोयत्याच्या दहशतीने शहर हादरून गेलं आहे. आंबेगाव पठार परिसरात घडलेली ही घटना इतकी थरारक आहे की ऐकणाऱ्यांच्या अंगावर काटा येतो. किरकोळ कारणावरून एका १८ वर्षीय तरुणाचा भररस्त्यात अत्यंत निर्घृण खून करण्यात आला. रविवारी रात्री सुमारे ९.१५ वाजता निलगिरी चौक परिसरात नयन सचिन जाधव (वय १८) हा तरुण नेहमीप्रमाणे परिसरात उभा होता. काही दिवसांपूर्वी त्याचा काही मुलांशी छोटासा वाद झाला होता. तो वाद तिथेच मिटेल असं वाटत असतानाच त्या वादाने भयंकर रूप घेतलं.“शिवी का दिलीस?”त्या रात्री अचानक चार ते पाच मुलांचा गट तिथे आला. सुरुवातीला बघण्यावरून पुन्हा चकमक झाली. “काय बघतोस?”, “शिवी का दिलीस?” अशा क्षुल्लक कारणांवरून वाद पेटला. काही क्षणांतच वातावरण तापलं आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. आरोपींनी अचानक कोयता आणि सिमेंट ब्लॉक हातात घेतले. नयन काही समजायच्या आतच त्याच्यावर हल्ला सुरू झाला. डोक्यावर जोरदार वार करण्यात आले. तो खाली कोसळला, पण हल्ला थांबला नाही. वारांवर वार होत राहिले आणि परिसरात भीतीचं वातावरण पसरलं.लोक ओरडत बाहेर आले, पण तोपर्यंत सगळं संपलं होतं. नयन रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. हल्लेखोर अंधाराचा फायदा घेत पळून गेले. काही क्षणात शांत परिसरात किंकाळ्या आणि गोंधळ सुरू झाला.Pune Crime : मार्कशीटवर खाडाखोड अन् बापाचं डोकं फिरलं; 9 वर्षांच्या पोटच्या मुलीला निर्घृणपणे संपवून घराला आग लावलीसापळा कारवाई आणि गुन्ह्याची कबुलीघटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. परिसर सील करण्यात आला. तपास सुरू झाला आणि काही तासांतच पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली. आरोपी सातारा रोडवरील वेळू परिसरात लपल्याची खात्री झाली. पोलिसांनी तातडीने सापळा रचला आणि धाड टाकून चारही विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असल्याचे समोर आले आहे.रागाने तरुणाचा जीव गेलापोलिस तपासात धक्कादायक बाब समोर आली आहे की, हा खून कोणत्याही मोठ्या कारणामुळे नव्हे तर केवळ “चापट मारली” आणि “शिवी दिली” या किरकोळ कारणावरून झाला आहे. क्षणिक रागाने एकातरुणाचा जीवघेतला गेला.या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण असून नागरिकांमध्ये संताप आहे. अल्पवयीन मुलांमध्ये वाढणारी हिंसक प्रवृत्ती आणि कोयत्याचा वाढता वापर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित करत आहे. पोलिसांकडूनपुढील तपास सुरू आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

लहान मुलांच्या हल्ल्यात पुण्यातील तरुणाचा मृत्यू | Achira News