लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी:देशातील अलीकडील निवडणुकांचे निकाल गोव्यासाठी महत्त्वाचे धडे देणारे ठरत आहे. यात पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालाचाही समावेश असल्याचे मतगोवाफॉरवर्ड पक्षाचे नेते विजय सरदेसाई यांनी व्यक्त केले. पश्चिम बंगालमध्ये अपेक्षित निकाल लागला नाही. सत्ताधारी पक्ष सत्तेत राहण्यासाठी कुठल्या पातळीपर्यंत जाऊ शकतात, हे या निकालातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे गोव्यातील जनतेने सतर्क राहून अशा प्रकारच्या डावपेचांना बळी पडू नये, असे आवाहन सरदेसाई यांनी केले. सरदेसाई म्हणाले, की गोव्यात सत्ताधारी सरकारविरोधात नाराजी असून विरोधकांच्या बाजूने जनतेची लाट दिसून येत आहे. या चित्रामध्ये कुठलाही बदल होता कामा नये. केरळमधील निकाल अपेक्षेप्रमाणेच लागला आहे. तामिळनाडूमध्ये विजय थलपती यांच्या पक्षाचा उदय झाला आहे. स्थानिक प्रश्नांवर आधारित, धाडसी आणि नवीनराजकारणालालोकांचा वाढता पाठिंबा मिळत असल्याचे यावरून दिसून येते. हीच विचारसरणीगोवाफॉरवर्ड पक्षाची असून, भविष्यात गोव्यातही अशाराजकारणालाबळ मिळेल.
विजय सरदेसाई यांनी गोव्याच्या नुकत्याच झालेल्या भारतीय निवडणुकांमधून धडे घेतले
Lokmat•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.