Achira News Logo
Achira News

वडापावच्या मुलीने चंद्रिका दीक्षितने पतीवर केला फसवणुकीचा आरोप

Maharashtra Times
वडापावच्या मुलीने चंद्रिका दीक्षितने पतीवर केला फसवणुकीचा आरोप
Full News
Share:

दिल्लीत रस्त्यांवर मुंबईचा स्पेशल वडा पाव विकून फेमस झालेली तसेच "बिग बॉस ओटीटी" सारख्या प्लॅटफॉर्मवर पोहोचलेली चंद्रिका दीक्षित जगभरात "वडा पाव गर्ल" म्हणून ओळखली जाते. तिच्या वडापावच्या गाडीचे व्हिडिओ खूप व्हायरल होतात. तिने बनवलेले वडापाव महाग असूनही लोक ते खाण्यासाठी नेहमीच गर्दी करतात.मात्र सध्या चंद्रिका तिच्या वैयक्तिक आयुष्यात एका कठीण टप्प्यातून जात आहे. सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असलेल्या चंद्रिकाने एक व्हिडिओ शेअर केला आहे. तो पाहून तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. चंद्रिकाने तिचा पती युगम गेरा यांच्यावरविवाहबाह्य संबंध आणि फसवणूकीचे गंभीर आरोपकेले आहेत. व्हिडिओमध्ये तिने तिच्या पतीसोबतचे फोटो आणि चॅट देखील शेअर केले आहेत.बॉलिवूडवर राज्य करायची ही मराठी अभिनेत्री, पण दिग्दर्शकाच्या प्रेमाच्या जाळ्यात फसली! पत्नीचा खाल्ला मार अन् करियरही पाण्यातइंस्टाग्रामवर शेअर केलेल्या दीड मिनिटांच्या व्हिडिओमध्ये चंद्रिका खूप रडत आहे. नवऱ्याबद्दलची तक्रार सांगताना ती म्हणाली की, गेल्या दोन महिन्यांपासून तिच्या घरातील वातावरण खूप कलूशीत झालं आहे. व्हिडिओमध्ये चंद्रिका म्हणते, " जगाला काय दाखवायचे आहे? आपले भांडण? मी दोन महिने गप्प बसले होते, काहीही बोलत नव्हते. मी काम करत आहे, घराची आणि मुलाची काळजी घेत आहे आणि तुम्ही हे सर्व करताय? ती मुलगी जी दिवसरात्र तुमच्या मागे पुढे करते तिचं काय? माझ्या प्रेमाचे काय? माझ्या मेंदूतील नसा फुटत आहेत."View this post on InstagramA post shared by Chandrika Gera (@chandrika.dixit)पुराव्यांनिशी आरोपचंद्रिकाने व्हिडिओमध्ये रडून आपले दुःख व्यक्त केले आणि आपल्या पतीला खुले आव्हानही दिले. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, "माझ्याकडे पुरावे देखील आहेत." या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. चंद्रिकाकडे तिच्या पतीविरुद्ध कोणते ठोस पुरावे आहेत याची तिच्या चाहत्यांना उत्सुकता आहे. ते पुरावे ती योग्य वेळ आल्यावर सादर करेल असे देखील म्हणाली आहे.'तू बोल अजून बोल ,अजून टीका कर...' राधा पाटीलच्या टोमण्यांवर Gautami Patil चं सडेतोड उत्तर, कुठून सुरू झालेला वाद?नवऱ्याचे मौनसोशल मीडियावर लोक चंद्रिकाने दाकवलेल्या बहादूरपणाचे कौतुक करत आहेत आणि तिला प्रोत्साहन देत असताना. पण तिचा पती युगम गेराने वडापाव गर्लच्या आरोपांवर अद्याप कोणतेही स्पष्टीकरण किंवा विधान केलेले नाही. चाहते युगमकडून सतत उत्तरे मागत आहेत. सुखासुखी चाललेल्या संसारात अचानक मिठाचा खडा कसा पडला हे सर्वांना जाणून घ्यायचे आहे.बिग बॉस मराठी ६चं नवं घर प्रेक्षकांसमोर अखेर आलंचसंघर्ष ते स्टारडम पर्यंतचा प्रवासचंद्रिका दीक्षित दिल्लीच्या रस्त्यांवर स्टायलिश पद्धतीने वडा पाव विकताना दिसलेली. तिचे काही व्हिडिओ व्हायरल झाले. त्यानंतंर तिच्या वडापावच्या गाडीवर खवय्यांची तसेच तिला पाहणाऱ्यांची गर्दी वाढू लागली. तिच्या लोकप्रियतेमुळे ती सलमान खानच्या "बिग बॉस ओटीटी" शोमध्ये गेली. कठिण परिस्थितीतून वर आलेल्या चंद्रिकाच्या संसारात वादळ आलेले पाहून चाहत्यांना तिच्याबद्दल सहानभूती वाटत आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

वडापावच्या मुलीने चंद्रिका दीक्षितने पतीवर केला फसवणुकीचा आरोप | Achira News