Achira News Logo
Achira News

वादातून महिलेची चोरी करून तिची हत्या केल्याप्रकरणी दोघांना अटक

Pudhari
वादातून महिलेची चोरी करून तिची हत्या केल्याप्रकरणी दोघांना अटक
Full News
Share:

अखेर गोपनीय माहिती व तपासाच्या आधारे त्यांना जेरबंद करण्यात आले. खेड पोलिस ठाण्यात आरोपींवर गुन्हा दाखल होता. या प्रकरणातील फिर्यादी फातिमा इसाक सुर्वे (रा. सवनस, ता. खेड, जि. रत्नागिरी) आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जुहूर अब्दुल रज्जाक सुर्वे व गुफरान अब्दुल रज्जाक सुर्वे (दोघेही रा. सवणस, ता. खेड) यांनी २००५ मध्ये मयत आबिदा मियांसो सुर्वे (७५) यांच्या घरातून १० हजार रुपये चोरी केले होते. त्यापैकी ५ हजार रुपये परत केले होते. मात्र उर्वरित रकमेच्या मागणीवरून वाद वाढल्याने आरोपींनी आबिदा सुर्वे यांचा खून करून पुरावा नष्ट केला व तेथून फरार झाले होते. दरम्यान, आरोपींनी आपली ओळख लपवण्यासाठी नावे व पत्ते बदलले होते. ते अनुक्रमे राजू गजानन तांबे व संदीप गजानन तांबे या नावाने मोहो, चिखले (ता. पनवेल, जि. रायगड) येथे राहत होते.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

वादातून महिलेची चोरी करून तिची हत्या केल्याप्रकरणी दोघांना अटक | Achira News