आटपाडी : तालुक्यातील विभुतवाडी येथे निवडणूक प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या प्रचार वाहनावर दगडफेक करून काचा फोडण्यात आल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी आटपाडीपोलिसठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबतपोलिसांनीदिलेली अधिक माहिती अशी की, १ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास विभुतवाडी बसस्थानकाजवळ ही घटना घडली. याबाबत हेमंत तुकाराम मोटे (वय २५, व्यवसाय नोकरी, रा. विभुतवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हेमंत मोटे हे सदर ठिकाणी उभे असताना शिंदेसेनेच्या वतीने प्रचारासाठी वापरण्यात येणारे वाहन तेथे उभे होते. संबंधित वाहनाचा चालक जवळच चहा पिण्यासाठी गेला होता. त्याचवेळी काही अंतरावर भाजप पक्षाच्या वतीने प्रचार सुरू होता. याचदरम्यान एक अनोळखी इसम फिर्यादीजवळ येऊन शिंदेसेनेच्या प्रचार वाहनाच्या स्पीकरचा आवाज कमी करण्यास सांगू लागला. त्यावर फिर्यादीने वाहन चालक चहा पिण्यास गेला असल्याचे सांगितले. यानंतर अचानकपणे त्याठिकाणी दोन वाहने आली. या वाहनांतून ३ ते ४ अनोळखी व्यक्ती उतरल्या. त्या व्यक्तींनी शिवसेनेच्या प्रचार वाहनावर दगडफेक करत वाहनाच्या काचा फोडल्या. या दगडफेकीत प्रचार वाहनाचे अंदाजे १५ हजार रुपयांचे नुकसान झाले. या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला.दरम्यान, घडत असलेली घटना फिर्यादी हेमंत मोटे हे आपल्या मोबाइलमध्ये शूट करत असताना, त्यातील दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या हाताला धरून त्यांना बाजूला ओढले व धक्काबुक्की केली. त्यावेळी शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांनी तत्काळ हस्तक्षेप करत फिर्यादीला सुरक्षित ठिकाणी नेले. या घटनेनंतर शिंदेसेना कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून, निवडणूक प्रचारादरम्यान अशा प्रकारच्या हिंसक घटनांचा तीव्र निषेध केला आहे. निवडणूक काळात शांतता राखणे आवश्यक असताना अशा प्रकारची दगडफेक व धक्काबुक्की ही लोकशाहीला काळिमा फासणारी असल्याची प्रतिक्रिया शिंदेसेना पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
विधुतवाडीत निवडणूक प्रचारादरम्यान शिंदे यांच्या वाहनावर हल्ला
Lokmat•
Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.