लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणा :वारंवार दार ठोठावून तसेच फोन करून भाऊ प्रतिसाद देत नसल्याने भेटायला आलेल्या बहिणीने शेजाऱ्यांच्या मदतीने पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली असता, बहिणीला तिचा भाऊ छताला लटकलेल्या अवस्थेत दिसला. भाऊ मौदा तहसील कार्यालयात नायब तहसीलदारपदी कार्यरत होता तसेच त्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. ही घटना एमआयडीसी (हिंगणा) पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वानाडोंगरी येथे रविवारी (दि. ३) रात्री ७ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. वैभव रामेश्वर राठोड (४२, रा. ग्रीन फिल्ड सोसायटी, वानाडोंगरी, ता. हिंगणा) असे मृताचे नाव आहे. ते मागील काही महिन्यांपासून मौदा तहसील कार्यालयात नायब तहसीलदारपदी कार्यरत होते. ते पत्नी, मुलगा व मुलीसोबत वानाडोंगरी येथील ग्रीन फिल्ड सोसायटीतील फ्लॅटमध्ये राहायचे. त्यांच्या मेव्हण्याकडे विवाह सोहळा असल्याने पत्नी, मुलगा व मुली लग्नासाठी गेल्याने तसेच रविवारी सुटी असल्याने ते घरी एकटेच होते. दरम्यान, कळमनुरी (जिल्हा हिंगोली) येथे राहणारी त्यांची बहीण रविवारी रात्री त्यांना भेटण्यासाठी आली होती. फ्लॅटचे दार आतून बंद असल्याने तिने दार ठोठावले प्रतिसाद न मिळाल्याने तिने त्यांच्या मोबाइल फोनवर वारंवार कॉल केले. ते प्रतिसाद देत नसल्याने तिने शेवटी शेजाऱ्यांच्या मदतीने पोलिसांना कळविले. पोलिसांनी दार उघडून बघितले असता, ते बेडरूममध्ये छताला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांनी आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होताच पोलिसांनी पाहणी व पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला.
वनडोंगरीमध्ये नायब तहसीलदार घरात लटकलेला आढळला
Lokmat•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.