आयपीएलमध्ये काल रात्री झालेल्या लढतीतदिल्ली कॅपिटल्सनेजबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्याराजस्थान रॉयल्सवरआरामात विजय मिळवला. दरम्यान, या लढतीतवैभव सूर्यवंशीआणि यशस्वी जयस्वाल हे राजस्थानचे विस्फोटक सलामीवीर झटपट बाद झाले होते. त्यापैकीवैभव सूर्यवंशीलाबाद केल्यानंतर दिल्लीचा गोलंदाज कायल जेमिसन यांने जोरदार आणि आक्रमक अविर्भावात सेलिब्रेशन केलं होतं. मात्र या कृतीमुळे आता जेमिसन अडचणीत सापडला असून, बीसीसीआयने त्याता सक्त ताकिद देत त्याच्यावर कारवाई केली आहे. या लढतीत राजस्थानच्या डावाला सुरुवात झाल्यावर काइल जेमिसनने विस्फोटक अंदाजात खेळणाऱ्या वैभव सूर्यवंशील केवळ १४ धावांवर त्रिफळाचीत केलं होतं. त्यानंतर जेमिसनने वैभवसमोर जात आक्रमकपणे सेलीब्रेशन केलं होतं. जेमिसनची ही कृती वैभवला भडकवणारी होती. दरम्यान, जेमिनसने केलेल्या या कृतीची बीसीसीआयने गंभीर दखल घेतली आहे. तसेच जेमिसनने केलेल्या या कृत्यामुळे आयपीएलमधील कोड ऑफ कंडक्टच्या कलम २.५ चं उल्लंघन झालं असल्याचा ठपका ठेवत सामनाधिकाऱ्यांनी त्याला एक डिमेरिट पॉईंट दिला आहे. तसेच त्याला असे कृत्य न करण्याबाबत सक्त ताकीद देण्यात आली आहे. An in-swinging yorker 😲🔥🎥 Kyle Jamieson gets Vaibhav Sooryavanshi early 👊Wait for the celebration 👀Updates ▶️https://t.co/6OOjzHtZiD#TATAIPL|#KhelBindaas|#RRvDC|@DelhiCapitalspic.twitter.com/6vxJ5ahlb3 काय आहे नियमआयपीएलच्या कोड ऑफ कंडक्टमधील कलम २.५ हे मैदानावर वादविवाद होऊ शकतात अशी भाषा आणि कृती करण्यावर मर्यादा आणते. दरम्यान, जेमिसनच्या या कृतीमुळे या नियमाचा भंग झाल्याचे सांगत सामनाधिकारी राजीव सेठी यांनी त्याला शिक्षा सुनावली आहे. जेमिसननेही आपली चूक मान्य केली असून, दिलेल्या शिक्षेचा स्वीकार केला आहे. सामन्याचा निकाल काय लागला?दरम्यान,राजस्थान रॉयल्सआणिदिल्ली कॅपिटल्सयांच्या जयपूरमधील सवाई मानसिंह स्टेडियममध्ये झालेल्या लढतीत राजस्थानने रियान पराग आणि फरेराच्या आक्रमक खेळाच्या जोरावर २० षटकांमध्ये २२५ धावा फटकावल्या होत्या. मात्र लोकेश राहुल आणि पथुम निसंका यांनी दिलेल्या शतकी सलामीच्या जोरावर दिल्लीने हे लक्ष्य सहज गाठले.
वैभव सूर्यवंशीला बडतर्फ केल्यानंतर आक्रमकपणे जल्लोष केल्याबद्दल काईल जेमीसनला दंड आणि इशारा
Lokmat•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.