वॉशिंग्टन:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत ावर लादलेले 50 टक्के आयात शुल्क (टॅरिफ) आता 18 टक्क्यांपर्यंत कमी करण्याची घोषणा केली आहे. भारताचा अमेरिकेशी व्यापार करारही झाला आहे. यामुळे दोन्ही देशांमधील गेल्या एका वर्षांपासून सुरू असलेला तणाव कमी होण्याची चिन्हे दिसत आहेत. या सगळ्या घडामोडींमध्ये, भारत आणि अमेरिका यांच्यातील मैत्री दृढ होण्याची शक्यता आहे. याचे श्रेय अमेरिकेचे नवे राजदूत सर्गियो गोर यांना दिले जात आहे. सर्गियो गोर हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे अत्यंत जवळचे मानले जातात. सर्गियो गोर यांनी 'क्वाड' (QUAD) या गटाबद्दल असे काही विधान केले आहे, ज्यामुळे चीनला थेट इशारा मिळाला आहे.चीनची दादागिरी रोखणार'क्वाड'च्या भविष्याबद्दल उपस्थित केल्या जाणाऱ्या प्रश्नांवर इंडिया टुडेला दिलेल्या एका मुलाखतीत सर्गियो गोर म्हणाले की, हा गट (क्वाड) कुठेही जाणार नाही. त्यांनी सांगितले की,अमेरिकेचेपरराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच 'क्वाड' देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक घेतली होती. गोर यांनी पुढे सांगितले की, आमच्या अनेक योजना आहेत, ज्यांची घोषणा मी आत्ताच करणार नाही. 'क्वाड' हा गट चीनची हिंद-प्रशांत महासागर क्षेत्रात वाढती दादागिरी रोखण्यासाठी तयार करण्यात आला आहे. या 'क्वाड' गटात भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया हे सदस्य देश आहेत.चीनची दहशत अन् क्वाडचं महत्त्वविशेष म्हणजे, 2025 मध्ये 'क्वाड' देशांच्या सर्वोच्च नेत्यांची बैठक भारतात होणार होती, पण ती होऊ शकली नाही. आता व्यापार करार (ट्रेड डील) झाल्यानंतर सर्गियो गोर यांच्या विधानामुळे अशी आशा आहे की, लवकरच 'क्वाड'ची शिखर बैठकभारतातहोऊ शकते. भारतीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर सध्या अमेरिकेत आहेत आणि असे मानले जात आहे की, 'क्वाड'बद्दल त्यांची अमेरिकेतील नेत्यांशी चर्चा होईल. चीन ज्या पद्धतीने हिंद-प्रशांत क्षेत्रातील देशांना दहशतीखाली ठेवण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळे 'क्वाड'ला अधिक मजबूत करण्याची मागणी जोर धरत आहे.ट्रम्प याचं धोरण बदललं पण आता...जेव्हा डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आले, तेव्हा अमेरिकेने चीनसोबतची जवळीक वाढवली. नवीन राष्ट्रीय संरक्षण धोरणात अमेरिकेने स्पष्ट संकेत दिले आहेत की, ते आपल्या सुरक्षेवर आणि पश्चिम गोलार्धावर अधिक लक्ष केंद्रित करेल. यात असे म्हटले आहे की, चीन अजूनही त्यांची मुख्य चिंतेची बाब आहे, पण चीनबद्दल कोणतेही स्पष्ट विधान केलेले नाही. त्याऐवजी, तणाव कमी करण्यावर जोर देण्यात आला आहे. पण आता क्वाडला महत्त्व मिळू लागल्यास जपान ते तैवानपर्यंत असणाऱ्या चीनच्या दहशतीच्या प्रयत्नांना धक्का बसणार आहे.
व्यापारातील तणावाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी शुल्कात कपात केल्याने अमेरिका-भारत संबंध दृढ झाले
Maharashtra Times•
Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.