Achira News Logo
Achira News

विवाह, गोंधळ आणि गैरसमजः'वेडिंग शॉट'अनपेक्षित नातेसंबंधांचा शोध घेतो

Maharashtra Times
विवाह, गोंधळ आणि गैरसमजः'वेडिंग शॉट'अनपेक्षित नातेसंबंधांचा शोध घेतो
Full News
Share:

वरद नंदगेमलग्नाचा शॉट 'च्या निमित्तानं तू पुन्हा एकदा मुख्य भूमिकेत दिसत आहेस; त्याविषयी सांग.'लग्नाचा शॉट' या सिनेमाची गोष्ट केवळ या दोन पात्रांभोवती फिरते. मराठीत अशा प्रकारच्या सिनेमाचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे 'मुंबई-पुणे-मुंबई. अशा धाटणीच्या सिनेमात काम करण्याची माझी मनापासून इच्छा होती. ती आता 'लग्नाचा शॉट'च्या निमित्तानं पूर्ण झाली. त्यातील मी आणि अभिजीत आमकर या आमच्या जोडीला आणि सिनेमाचा ट्रेलरला प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसादही खूप चांगला आहे, याचा मला विशेष आनंद वाटतो. लग्न म्हणजे आनंद, गडबड, नात्यांची गुंफण आणि अनेक अनपेक्षित क्षणांचा संगम, हाच संगम प्रेक्षकांना सिनेमात पाहायला मिळणार आहे. लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय असतो. पण कधी कधी या आनंदाच्या क्षणांमध्ये काही अनपेक्षित गोष्टी घडतात. 'लग्नाचा शॉट'ची कथा अशाच अनपेक्षित प्रसंगांमधून आकाराला आली आहे. या चित्रपटातून केवळ मनोरंजन होणार नसून नात्यांमधील गोंधळ, गैरसमज आणि त्या परिस्थितीतून चाहेर पडण्याचा प्रवास बघायला मिळणार आहे.व्यग्र वेळापत्रकामुळे 'तारखा नाहीत' असं अनेकदा सांगितलं जातं. कलाकार म्हणून तारखा मॅनेज करणं खरंच इतकं कठीण असतं का?खरं सांगायचं तर, अनेकदा बोलायचं म्हणून बोललं जातं. कधी कधी दिग्दर्शकांना भेटायला वेळ मिळत नाही; म्हणून 'तारीख नाही' असं सांगितलं जातं पण कधी कधी खरंच वेळ नसतो. सिनेमांचं प्रमोशन काही तासांचं असलं, तरी त्यात पूर्ण दिवस जातो. दोन माध्यमांमध्ये काम करत असल्यामुळे वेळेचा गोंधळ होतो. कधी महिनाभर काहीच नसतं, तर कधी सतत धावपळ असते; आज एका शहरात, तर उद्या दुसन्या शहरात. त्यामुळे कधी कधी चुकीच्या तारखा दिल्या जातात किंवा एकाच दिवशी दोन जणांना वेळ दिलेला असतो आणि मग अडचण निर्माण होते.'नाही' म्हणणं किती महत्त्वाचं आहे?नाही माणणं अनुभवातूनच शिकता येतं. सुरुवातीला आपण फक्त 'हो' म्हणत असतो; काम कुठलंही असो. पण कलाकार म्हणून जसजशी ओळख होते, तसतसं लक्षात येतं, की माझा प्रेक्षकवर्ग निराश होता कामा नये. त्यांना काहीतरी नवीन देण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. ज्या प्रेक्षकांनी माझं काम एकाच माध्यमात पाहिलं आहे, त्यांनाही वाटावं की 'हिचं काहीतरी वेगळं येतंय' असं काहीतरी वेगळं करून बघितलं पाहिजे. त्यासाठी 'नाही' म्हणणं गरजेचं आहे. ज्या गोष्टीवर स्वतःचा विश्वास नाही, ती गोष्ट करू नये, असं मला वाटतं.एआयमुळे कलाकारांचं भविष्य धोक्यात? अभिजीतने मांडलं सत्य तर प्रियदर्शिनी झाली व्यक्तRohit Shetty च्या घराबाहेरचे सीसीटीव्ही फुटेज समोर, गोळ्या झाडताना दिसतोय आरोपी; पाहा व्हिडिओ'एआय'च्या वाढत्या प्रभावाबद्दल काय वाटतं?मी डबिंगही करते, त्यामुळे त्या क्षेत्रात काम करणाऱ्यांमध्ये अशी भीती आहे, की काहीच वर्षांत काम मिळणं बंद होईल, पण मला वाटतं, की एआय म्हणजेच कृत्रिम प्रज्ञा माणसांना कधीच पूर्णपणे वगळू शकत नाही. नवीन काही आलं, जुनं संपणार असंच नेहमी वाटतं. सिनेमा आला तेव्हा नाटक बंद होईल असं वाटलं होतं, पण तसं झालं नाही, ओटीटी आलं, तेव्हा वाटलं सिनेमागृहं बंद होतील, पण आज उलट चित्र आहे. लोक पुन्हा सिनेमागृहात गर्दी करत आहेत. कारण शेवटी माणसाला माणसाचाच अनुभव हवा असतो.Tharala Tar Mag : सायली अर्जुनला छूपी मदत करणार प्रिया, रविराजने शोधला नागराजच्या खोटेपणाचा आणखी एक पुरावा, महिपतचे हात साक्षीमुळे दगडाखालीजुन्या पिढीकडून, मोठ्या कलाकारांकडून तुमच्या पिढीच्या अपेक्षा काय आहेत?आपल्या सिनेक्षेत्रातले ज्येष्ठ, अनुभवी कलाकार आमच्या कामावर नेहमी लक्ष ठेवून असतात. अनेकदा आमचं कौतुकही करतात. पण कोणत्याही वैयक्तिक गोष्टीकडे न पाहता फक्त काम विचारात घेत जिथे कान पकडण्याची गरज आहे, तिथे त्यांनी तेही केलं पाहिजे. त्यातील अनेकांना आमच्या पिढीसोबत काम करायचं आहे, आमची काम करण्याची पद्धत जाणून घ्यायची आहे. मराठी सिनेसृष्टीत चांगला सलोखा आहे. पण, फक्त कलाकारांनाच नाही, तर नवोदित दिग्दर्शक आणि निर्मात्यांनाही मदत केली पाहिजे. काय चुकतंय, काय करू नये, हे सांगणंसुद्धा आधीच्या पिढीतल्या कलाकारांनी केलं पाहिजे.** 'एआय' म्हणजेच कृत्रिम प्रज्ञा माणसांना कधीच पूर्णपणे वगळू शकत नाही. ओटीटी आलं, तेव्हा सिनेमागृहं बंद होतील वाटलं होतं, पण लोक पुन्हा सिनेमागृहात गर्दी करत आहेत. कारण शेवटी माणसाला माणसाचाच अनुभव हवा असतो

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

विवाह, गोंधळ आणि गैरसमजः'वेडिंग शॉट'अनपेक्षित नातेसंबंधांचा शोध घेतो | Achira News