Achira News Logo
Achira News

व्होडाफोन-आयडियाने आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी किफायतशीर हायब्रिड प्रीपेड पॅकचे अनावरण केले

Maharashtra Times
व्होडाफोन-आयडियाने आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी किफायतशीर हायब्रिड प्रीपेड पॅकचे अनावरण केले
Full News
Share:

आज आम्ही तुम्हाला व्होडाफोन-आयडिया च्या नव्या प्लॅनची माहिती देणार आहोत. या नवीन हाइब्रिड प्लॅनची वैधता पूर्ण 365 दिवस म्हणजेच एक वर्ष इतकी आहे. यामध्ये युजर्सना भारतात असताना अमर्यादित कॉलिंग आणि डेटा मिळतोच, पण परदेश प्रवासातही ठराविक आउटगोइंग कॉल्स आणि डेटाची सुविधा दिली जाते. आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी वेगळा महागडा रोमिंग पॅक घेण्याची गरज नसल्याने हा प्लॅन प्रवाशांसाठी अतिशय फायदेशीर आणि किफायतशीर ठरत आहे.व्होडाफोन आयडियाने (Vi) एक नवीन हायब्रिड प्रीपेड पॅक लाँच केला आहे. टेलिकॉम कंपनीचा हा प्रीपेड पॅक भारत आणि परदेशातील युजर्सना अखंड कनेक्टिव्हिटी देईल. या प्लानची किंमत 4,997 रुपये आहे. एअरटेलच्या ग्लोबल आयआर पॅकनंतर व्होडाफोन आयडियाने हायब्रिड पॅक लाँच केला आहे. या प्लानमध्ये युजर्संना एक वर्षाच्या वैधतेसह डेटा आणि अनेक आंतरराष्ट्रीयफायदे मिळत आहेत. चला तर मग जाणून घेऊया सविस्तर.Vi चा हायब्रीड प्लॅनVi च्या या हायब्रिड प्लॅनची किंमत 4,997 रुपये आहे. या प्लानमध्ये युजर्संना दररोज 1.5 GB डेटा मिळतो. तसेच या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि 100 फ्री SMS मिळतात.या पॅकमध्ये 100 मिनिटांचे आउटगोइंग कॉल आणि आंतरराष्ट्रीय वापरासाठी इनकमिंग कॉलचा समावेश आहे. हे फीचर सेट 1 साठी आहेत, ज्यात 59 देशांचा समावेश आहे. तर 65 देशांसाठी सेट 2 मध्ये युजर्सला 50 मिनिटांचे आउटगोइंग कॉल मिळत आहेत. मिनिट संपल्यानंतर आउटगोइंग आणि इनकमिंग कॉल दोन्हीसाठी प्रति मिनिट 10 रुपये शुल्क आकारले जाते.याव्यतिरिक्त, हा प्लॅन सेट 1 च्या देशांमध्ये 5GB आंतरराष्ट्रीय डेटा आणि सेट2 च्या देशांमध्ये 1GB डेटादेतो. रोमिंग दरम्यान आउटगोइंग SMS साठी प्रत्येक मेसेजसाठी 15 रुपये शुल्क आकारले जाते. युएईसाठी, आंतरराष्ट्रीय रोमिंग फायद्यांमध्ये 25 मिनिटांच्या आउटगोइंग आणि इनकमिंग कॉलचा समावेश आहे, कोणताही डेटा नाही.हा पॅक त्यांच्यासाठी खूप उपयुक्त आहे जे बऱ्याचदा भारताबाहेर जातात आणि ते अशी योजना शोधत असतात जी भारत तसेच इतर देशांमध्ये कार्य करते.एअरटेलसोबत स्पर्धाVi चा हा प्लॅन एअरटेलच्या नुकत्याच लाँच झालेल्या ग्लोबल आयआर पॅकशी थेट स्पर्धा करताना दिसत आहे. टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये कंपन्या आता आंतरराष्ट्रीय युजर्सना डोळ्यासमोर ठेवून तयार केलेल्या प्लॅन्सवर लक्ष केंद्रित करत आहेत. व्यवसाय, प्रवास किंवा इतर कारणांसाठी वारंवार परदेशात प्रवास करणाऱ्यांसाठी हा प्लॅन प्लॅन विशेष उपयुक्त आहे. एकाच रिचार्जमध्ये भारत आणि परदेशात कनेक्टिव्हिटी मिळणे हे विशेष बनवते. अशा युजर्ससाठी हा प्लॅन सोयीस्कर आणि दीर्घकालीन पर्याय ठरू शकतो.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

व्होडाफोन-आयडियाने आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी किफायतशीर हायब्रिड प्रीपेड पॅकचे अनावरण केले | Achira News