'फूल नको, पुस्तक देऊया', असा संदेश देणारे शिक्षक जावेद तांबोळी यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाचे औचित्य साधून चौकुळ नं. ४ मराठीवाडी शाळेचे शिक्षक जावेद तांबोळी यांनी आपल्या घरी पारंपरिक गुढीप्रमाणेच पुस्तके सजवून ही ज्ञानाची गुढी उभारली. सण-उत्सवांच्या माध्यमातून ज्ञानाचा वारसा पुढे जावा, हा उदात्त हेतू यामागे आहे. सलग तीन वर्ष तांबोळी गुरुजींनी हा उपक्रम सातत्याने सुरू ठेवून वाचन चळवळीला बळ दिले आहे. मोबाईलमध्ये व्यग्र असलेल्या तरुण पिढीला पुन्हा पुस्तकांकडे वळवण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.
शिक्षकांच्या'नो फ्लॉवर्स, लेट्स गिव्ह बुक्स'उपक्रमामुळे भारतातील साक्षरतेस चालना मिळाली
Pudhari•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.