सध्या लगीनघाईचा काळ सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठीसह हिंदी आणि दाक्षिणात्य मनोरंजन विश्वात अनेक कलाकारांची लग्न झाली. अशातच मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध गायिका लवकरच लग्न करणार आहे. या गायिकेला बॉयफ्रेंडने अत्यंत खास अंदाजात प्रपोज केलं आहे. इंग्रजीत ज्याला Dreamy Proposal म्हणतात अशा स्वप्नवत अंदाजात गायिकेच्या बॉयफ्रेंडने गायिकेला प्रपोज केलंय. ही गायिका आहे शरयू दाते.'आनंदी गोपाळ' सिनेमातील गाण्यांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली गायिका शरयू दातेने सोशल मीडियावर फोटो शेअर करुन ही आनंदाची बातमी शेअर केली. शरयूच्या बॉयफ्रेंडचं नाव आहे विभास वाटवे. विभासने गुडघ्यावर बसून निसर्गरम्य वातावरणात शरयूला लग्नाची मागणी घातली. विशेष म्हणजेकेनियातीलमसाई मारा या प्रसिद्ध ठिकाणी शरयूच्या बॉयफ्रेंडने तिला प्रपोज केलंय. शरयूला अचानक हे सरप्राईज मिळाल्याने तिच्या आनंदाला उधाण आलं होतं. शरयूने बॉयफ्रेंडने दिलेली अंगठी दाखवून सर्वांना ही आनंदाची बातमी दिली.
शरयू डेटचा स्वप्नवत प्रस्तावः गायक केनियामध्ये प्रियकर विभास वातावेशी साखरपुडा करतो
Lokmat•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.