Achira News Logo
Achira News

शिरळा तालुक्यातील पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी आघाडी आणि भाजप महायुतीचा विजय

Lokmat
शिरळा तालुक्यातील पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी आघाडी आणि भाजप महायुतीचा विजय
Full News
Share:

विकास शहाशिराळा : शिराळा तालुक्यातजिल्हा परिषदव पंचायत समिती निवडणुकीत मोठी मुसंडी मारून पंचायत समितीवर झेंडा फडकवला.जिल्हा परिषदगटासाठी राष्ट्रवादी आघाडी ३ तर भाजप महायुती १ उमेदवार विजयी झाले आहेत. जिल्हा परिषदेत माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील यांनी पुन्हा एकदा करेक्ट कार्यक्रम केला आहे. त्यामुळे शिराळा तालुक्यातील विराज नाईक की राजेश्वरी नाईक यांना सभापतीपद मिळण्याची खात्री झाली आहे. जिल्हा परिषद गटासाठी विराज नाईक हे सर्वात जास्त मताधिक्याने निवडून आले आहेत.यावेळी माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक व माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी केली होती. यामुळे या निवडणुकीत मोठे यश मिळाले होते. तालुक्याला आतापर्यंत जिल्हा परिषदमध्ये माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांना अध्यक्ष व सभापतीपद, आमदार सत्यजित देशमुख यांना उपाध्यक्ष व सभापतीपद तसेच लोकनेते माजी विधानपरिषद सभापती शिवाजीराव देशमुख, दिवंगत नेते उदयसिंगराव नाईक, वैशाली नाईक यांना सभापतीपद मिळाले होते.जिल्हा परिषदमध्ये पहिल्यापासून शिराळा तालुक्याचे वर्चस्व आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून राजेश्वरी नाईक किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्याकडून विराज नाईक यांना सभापतीपद मिळण्याची शक्यता आहे. यादृष्टीने राजकीय समीकरणे करण्यात येत आहेत.मांगले गटात विराज नाईक सर्वाधिक मतांनी निवडून आले आहेत तर वाकुर्डे बुद्रुक गटात राजेश्वरी नाईक यांनी मोठा विजय मिळवला आहे. तसेच या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी आघाडीने आपली सत्ता टिकवून ठेवली आहे. पंचायत समितीमध्ये माजी आमदार मानसिंगराव नाईक व माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांनी ६ जागांवर विजय मिळवला आहे. शिराळा पंचायत समिती सभापती सम्राटसिंह नाईक, शिराळा नगराध्यक्ष पृथ्वीसिंग नाईक तसेच आता जिल्हा परिषद सभापतिपदी कोणत्या नाईक यांची वर्णी लागणार याचीच तालुक्यात चर्चा सुरू झाली आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

शिरळा तालुक्यातील पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी आघाडी आणि भाजप महायुतीचा विजय | Achira News