पिंपरी :महापालिकेची स्थायी समिती सभा सोमवारी (दि.१६) झाली. यात सत्ताधाऱ्यांकडून उपसूचनांचा पाऊस पाडला. विविध निर्णयांना मंजुरी देण्यात आली. शहरविकास, पायाभूत सुविधा आणि नामांतरासह अनेक महत्त्वाच्या विषयांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. चिंचवड येथील सिटी सेंटरसाठी राखीव जागेत ‘अजित पवार आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ’ उभारण्याची उपसूचना मंजूर करण्यात आली. सायन्स पार्कसमोरील या जागेवर व्यापारी संकुल उभारण्याचा प्रस्ताव दरवर्षी होत असला, तरी तो अद्याप प्रत्यक्षात आलेला नाही. त्यामुळे नव्या प्रस्तावाची चर्चा रंगली. सांगवी-बोपोडी पुलासाठी ६० कोटींहून अधिक खर्च करूनही अंतर्गत रस्ते अरुंद असल्याने वापर मर्यादित राहिला आहे. त्यामुळे या पुलाला जोडणारे रस्ते १८ मीटर रुंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. याचबरोबर, पवनानगर, काळेवाडी येथील उद्यान आरक्षण रद्द करून ते निवासी क्षेत्रात समाविष्ट करण्यास मंजुरी देण्यात आली. महापालिकेच्या ८ क्षेत्रीय कार्यालयांची संख्या वाढवून १० करण्याचा निर्णय घेत, त्यांना किल्ल्यांची नावे देण्याचा प्रस्तावही मंजूर झाला. याशिवाय यशवंतराव चव्हाण स्मारकासाठी १ कोटींचे अनुदान, कनिष्ठ अभियंता पद भरतीतील बदल, रस्ते विकासासाठी नुकसानभरपाई, तसेच विविध चौक व पूल नामकरणाचे प्रस्तावही सभेत मंजूर करण्यात आले. दरम्यान, उपसूचनांचा भडिमार करत महत्त्वाचे निर्णय मंजूर करण्यात आले असले, तरी नियोजन आणि प्राधान्यक्रमांबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
शहर विकासासाठीच्या प्रमुख प्रस्तावांना पिंप्री महानगरपालिकेची मंजुरी
Lokmat•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.