Achira News Logo
Achira News

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांनी केप टाऊनमध्ये'किंग'चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे.

Lokmat
शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांनी केप टाऊनमध्ये'किंग'चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे.
Full News
Share:

शाहरुख खानआणिदीपिका पादुकोण'किंग' सिनेमामुळे सध्या चर्चेत आहेत. प्रेग्नंट असतानाही दीपिका सिनेमाचं शूटिंग करत आहे. या सिनेमातील एका गाण्याच्या शूटिंगचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये शाहरुख आणि दीपिका रोमान्स करताना दिसत आहेत. 'किंग' सिनेमाच्या शूटिंगचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 'किंग' सिनेमाच्या शूटिंगसाठी शाहरुख आणि दीपिका सध्या केपटाऊनमध्ये आहेत. तेथीलच एका बीचवर सिनेमातील रोमँटिक गाण्याचं शूटिंग झालं. ज्यामध्ये पुन्हा एकदा शाहरुख आणि दीपिका रोमान्स करताना दिसणार आहेत. या व्हिडीओत समुद्रकिनारी ते दोघे पोझ देताना दिसत आहेत. दोन-तीन वेळा ते गाण्याची सेमच स्टेप करत असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. 'किंग' सिनेमातील गाण्याच्या या शूटिंगचा व्हिडीओ पाहून चाहत्यांना 'बेशरम रंग'ची आठवण झाली आहे. याआधी पठाण सिनेमातील 'बेशरम रंग' गाण्यात दीपिका-शाहरुखची केमिस्ट्री पाहायला मिळाला होता. ज्याची खूप चर्चाही झाली होती. #Kingchartbuster song loading ⏳pic.twitter.com/VpiatxdbBG 'किंग' सिनेमाच्या सेटवरील शाहरुखचे सीन शूट करतानाचे काही फोटोही व्हायरल झाले आहेत. शाहरुख-दीपिकाचा 'किंग' हा सिनेमा २०२६च्या शेवटी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २४ डिसेंबर रोजी हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित केला जाणार आहे. सिद्धार्थ आनंद यांनी सिनेमाची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांनी केप टाऊनमध्ये'किंग'चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. | Achira News