Achira News Logo
Achira News

सागरिका घाटगे आणि झहीर खान यांनी कुटुंब आणि मित्रांसमवेत गुढीपाडवा साजरा केला

Maharashtra Times
सागरिका घाटगे आणि झहीर खान यांनी कुटुंब आणि मित्रांसमवेत गुढीपाडवा साजरा केला
Full News
Share:

अभिनेत्री सागरिका घाटगे आणि माजी क्रिकेटपटू झहीर खान यांनी गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा केला. त्याच्या या सेलिब्रेशनचे खास फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये त्यांच्या घरातील सणाची सजावट विशेष लक्ष वेधून घेणारी आहे. दरवाज्याला बांधलेले झेंडूच्या फुलांचे तोरण, गुढी उभारलेली पारंपरिक मांडणी आणि घरभर पसरलेला सणाचा आनंद या सगळ्यामुळे वातावरण अगदी उत्साहपूर्ण दिसत आहे.प्रवेशद्वाराजवळ केलेली रांगोळी आणि लावलेला दिवा यामुळे सणाची शोभा अधिकच खुलून आली आहे.या सुंदर दिवशी सागरिका घाटगेने यावेळी लाल रंगाची सुंदर साडी परिधान केली होती. सोनेरी काठ असलेल्या या साडीमध्ये तिचा लूक अत्यंत मोहक दिसत होता. हलका मेकअप, पारंपरिक दागिने आणि साधी हेअरस्टाइल यामुळे तिच्या सौंदर्यात भर पडली होती. तिच्या या लूकने चाहत्यांचे विशेष लक्ष वेधले असून, सोशल मीडियावर तिच्या स्टाइलचे भरभरून कौतुक होत आहे. (फोटो सौजन्य :- @sagarikaghatge)लाल रंगाच्या साडीत सागरिका घाटगेलाल रंगाच्या साडीत सागरिका घाटगे अत्यंत सुंदर दिसत होती. तिच्या या लूकमध्ये पारंपरिकतेसोबतच एक खास एलिगन्सही पाहायला मिळाला. सोनेरी काठ असलेल्या लाल साडीने तिच्या सौंदर्यात चारचाँद लावले होते. साधा मेकअप, नाजूक दागिने आणि नीट बांधलेली हेअरस्टाइल यामुळे तिचा संपूर्ण लूक अधिकच उठून दिसत होता.सागरिकाने अतिशय साधेपणातही ग्लॅमरस लुक दाखवली.मोत्याच्या दागिन्यांनी पूर्ण केला लुकलाल रंगाच्या साडीसोबत सागरिका घाटगे हिने मोत्यांच्या दागिन्यांची निवड करत आपला लूक अतिशय देखणा आणि उठावदार केला. गळ्यातील नाजूक मोत्यांची माळ, कानातले साधे पण एलिगंट इयररिंग्स आणि हातातील मिनिमल अॅक्सेसरीज या सगळ्यामुळे तिच्या पारंपरिक लूकला एक क्लासिक टच मिळाला.मोत्यांचे दागिने नेहमीच सोज्वळतेचे प्रतीक मानले जातात आणि सागरिकाने ते अगदी परफेक्ट पद्धतीने कॅरी केले. लाल साडी आणि पांढऱ्या मोत्यांचा कॉम्बिनेशन तिच्या सौंदर्याला अधिकच खुलवणारा ठरला.हेअर बनने दिला हटके लुकलाल साडी आणि मोत्यांच्या दागिन्यांनंतर सागरिका घाटगे हिच्या हेअरस्टाइलने तिच्या संपूर्ण लूकला एक वेगळाच हटके टच दिला. तिने केलेला साधा पण नीटनेटका हेअर बन तिच्या पारंपरिक अवताराला अधिकच एलिगंट बनवणारा ठरला.या हेअर बनने तिच्या चेहऱ्याची वैशिष्ट्ये अधिक उठून दिसली, तसेच संपूर्ण लूकमध्ये एक क्लासी आणि ग्रेसफुल फील आला. विशेष म्हणजे, गोंडस आणि व्यवस्थित बांधलेला हा जुडा तिच्या साडी आणि दागिन्यांसोबत परफेक्ट मॅच झाला.स्लिव्हलेस ब्लाऊजने दिला हटके लुकलाल साडी, मोत्यांचे दागिने आणि एलिगंट हेअर बननंतर सागरिका घाटगे हिच्या स्लिव्हलेस ब्लाऊजने तिच्या संपूर्ण लूकला एक हटके आणि मॉडर्न टच दिला. पारंपरिक साडीला आधुनिकतेची जोड देत तिने हा लूक अतिशय कॉन्फिडंटपणे कॅरी केला.साध्या पण फिटिंग असलेल्या स्लिव्हलेस ब्लाऊजमुळे तिचा लूक अधिक स्टायलिश आणि ट्रेंडी दिसत होता.चाहत्यांनी दिल्या शुभेच्छासागरिका घाटगे आणि झहीर खान यांनी शेअर केलेल्या गुढीपाडव्याच्या फोटोंवर चाहत्यांनी भरभरून प्रेमाचा वर्षाव केला आहे. त्यांच्या या पारंपरिक आणि साध्या सेलिब्रेशनने अनेकांच्या मनाला स्पर्श केला असून, कमेंट्समध्ये शुभेच्छांचा अक्षरशः वर्षाव पाहायला मिळत आहे.अनेक चाहत्यांनी “गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा” देत त्यांच्या आनंदी आणि कौटुंबिक क्षणांचे कौतुक केले. काहींनी सागरिकाच्या सुंदर लूकचे विशेष कौतुक करत तिच्या लाल साडीतील मराठमोळ्या अंदाजाला दाद दिली, तर काहींनी या जोडीच्या साधेपणाचे आणि संस्कृतीप्रेमाचेही अभिनंदन केले.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

सागरिका घाटगे आणि झहीर खान यांनी कुटुंब आणि मित्रांसमवेत गुढीपाडवा साजरा केला | Achira News