सांगली: इनामधामणी रोडवर स्पोर्ट बाइक आणि कारच्याअपघातअपघातातरोहित सुनील खांडेकर (वय २१, रा. संभाजीनगर, शिरोळ) हा तरुण जागीच ठार झाला. हा अपघात मंगळवारी (दि. १७) सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास झाला. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत विश्रामबाग पोलिसात नोंद करण्याचे काम सुरू होते.याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, मृत रोहित खांडेकर हा आपल्या कुटुंबीयांसह कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळमध्ये राहत होता.सांगलीतीलविजयनगर परिसरात असलेल्या एका ट्रान्सपोर्ट ऑफिसमध्ये काम करत होता. मंगळवारी सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास रोहित हा त्याची स्पोर्ट बाइक (क्र. एमएच १०-डीसी ०६६५) वरून घरी जाण्यासाठी निघाला. १०० फुटी रोड, मैत्रीबन चौक ते इनामधामणी रस्त्यावरून तो निघाला असता, त्याच्या दुचाकीच्या आडवे अचानक एक गाढव आले.या गाढवाला धडक देऊन त्याची दुचाकी समोरून येणाऱ्या कारला (क्र. एमएच ०९-एफजी ३७११) चालकाच्या बाजूला जोराची धडक दिली. या अपघातात रोहित हा रस्त्यावर पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचामृत्यूझाला.घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिस ठाण्याचे कर्मचारी तुषार पाटील यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले असता, त्याचामृत्यूझाल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी अपघातातील दोनही वाहने ताब्यात घेतली असून, या घटनेची नोंद करण्याचे काम विश्रामबाग पोलिसात रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
सांगलीमध्ये स्पोर्ट्स बाईक-कार अपघातात तरुणाचा मृत्यू
Lokmat•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.