वर्ल्डकपपूर्वी त्याचा फॉर्म फारसा चांगला नव्हता. त्यामुळं त्याला पहिले काही सामने बेंचवर बसावं लागलं. मात्र तो सुपर ८ फेरीत त्याला खेळण्याची संधी मिळाली. त्यानं या संधीचं सोनं केलं. सलग तीन मोठी अर्धशतके ठोकली. वेस्ट इंडीज विरूद्ध नाबाद ९७ धावा, सेमी फायनलमध्ये इंग्लंडविरूद्ध ८९ धावांची खेळी आणि फायनलमध्ये न्यूझीलंडविरूद्ध ८९ धावा करून त्याने भारताच्या वर्ल्डकप विजयात मोलाचा वाटा उचलला. संजू सॅमसनने फक्त ५ डावात ३२१ धावा ठोकल्या. त्याने एका टी २० वर्ल्डपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादी विराट कोहलीच्या ३१९ धावांच्या विक्रमाला मागे टाकले. तसेच त्याने एका वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम देखील सेट केला. त्यानं टी २० वर्ल्डकप २०२६ मध्ये तब्बल २४ षटकार मारले.
संजू सॅमसनने टी-20 विश्वचषकात प्रभावी कामगिरी करत विक्रम मोडले
Pudhari•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.