Achira News Logo
Achira News

साजिद नाडियाडवाला आणि विशाल भारद्वाज यांच्या'ओ रोमियो "या चित्रपटात शाहिद कपूर आणि तृप्ती डिमरी झळकणार

Loksatta
साजिद नाडियाडवाला आणि विशाल भारद्वाज यांच्या'ओ रोमियो "या चित्रपटात शाहिद कपूर आणि तृप्ती डिमरी झळकणार
Full News
Share:

अरिजीत सिंगच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. काही दिवसांपूर्वी पार्श्वगायनातून निवृत्ती जाहीर करणाऱ्या अरिजीत सिंगचं नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. त्यामुळे चाहत्यांना अरिजीतच्या आवाजातलं आणखी एक गाणं ऐकता येणार आहे. या गाण्याचं नाव काय, ते जाणून घेऊयात. बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री तृप्ती डिमरी लवकरच साजिद नाडियाडवाला आणि विशाल भारद्वाज यांच्या ‘ओ रोमियो’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. त्यांचा चित्रपट १३ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. ही उत्सुकता कायम ठेवण्यासाठी निर्मात्यांनी आता चित्रपटातील ‘इश्क का फिव्हर’ हे एक नवीन गाणं रिलीज केलं आहे. पाच दिवसांपूर्वीच अरिजीतने पार्श्वगायनातून निवृत्ती जाहीर केली आणि आता त्याच्या आवाजातील नवीन गाणं रिलीज झालं आहे. हे गाणं ऐकून अरिजीतच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. अरिजीतने गायलेलं हे गाणं विशाल भारद्वाज यांनी संगीतबद्ध केलंय. ‘ओ रोमियो’ चित्रपटातील दोन गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. ‘हम तो तेरे ही लिए थे’ व दुसरं ‘आशिकों की कॉलोनी’ आणि आता या सिनेमातील तिसरं गाण ‘इश्क का फिव्हर’ रिलीज झालं आहे. हे गाणं अरिजीत सिंगने गायलं असून ते गुलजार यांनी लिहिलं आहे. या गाण्यात शाहिद कपूर व तृप्ती डिमरी यांची केमिस्ट्री पाहायला मिळतेय. हे गाणं ऐकल्यानंतर चाहते भावुक झाले आहेत. अनेकांनी अरिजीत सिंगला निवृत्ती न घेण्याची विनंती केली आहे. काहींनी त्याला ‘किंग ऑफर प्लेबॅक सिंगिंग’ असं म्हटलंय. एकूणच चाहते अरिजीत सिंगच्या या गाण्यावर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. हुसैन जैदी यांच्या ‘माफिया क्वीन्स ऑफमुंबई’ या पुस्तकावर आधारित ओ रोमियो १३ फेब्रुवारी २०२६ रोजी रिलीज होईल. या चित्रपटात शाहिद कपूर, तृप्ती डिमरी, नाना पाटेकर, अविनाश तिवारी, तमन्ना भाटिया,दिशा पटानी,फरीदा जलाल व विक्रांत मॅस्सी हे कलाकार आहेत.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Loksatta

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

साजिद नाडियाडवाला आणि विशाल भारद्वाज यांच्या'ओ रोमियो "या चित्रपटात शाहिद कपूर आणि तृप्ती डिमरी झळकणार | Achira News