Achira News Logo
Achira News

संजय परांजपे हत्या प्रकरणः कुंडल वेसमध्ये एज्युकेशन सोसायटीचे संचालक मृतावस्थेत आढळले

Lokmat
संजय परांजपे हत्या प्रकरणः कुंडल वेसमध्ये एज्युकेशन सोसायटीचे संचालक मृतावस्थेत आढळले
Full News
Share:

पलूस : शहरातील पंडित विष्णू दिगंबर शिक्षण संस्थेचे विद्यमान संचालक संजय प्रभाकर परांजपे (रा. कुंडलवेस पलूस, वय ६०) यांची अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना बुधवारी रात्री ८.३० च्या सुमारास घडली. हत्या करून आरोपी फरार झाला. या घटनेची माहिती पलूसपोलिसांनामिळताचपोलिसांनीधाव घेतली. या घटनेचा पंचनामा रात्री उशिरापर्यंत सुरू होता.घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, संजय परांजपे हे कुंडल वेस येथील अपार्टमेंटमध्ये रहात होते. ते कुटुंबासमवेत घरी बसले होते. ते अचानक उठून बिल्डिंगच्या खाली मंदिरात गेले होते. काही वेळानंतर परांजपे घरी आले नाहीत म्हणून कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला.बिल्डिंगच्या खाली येऊन पहाताच त्यांचा अडगळीच्या जागेत त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पलूस पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. संजय परांजपे हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. तात्काळ त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी घोषित केले.आरोपीने त्यांच्या डोक्यावर, मानेवर कानाजवळ व डोळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वर्मी घाव केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे बोलले जाते. पोलिस या घटनेचा रात्री उशिरापर्यंत पंचनामा करण्याचे काम सुरू होते. मृतदेह पुढील तपासासाठी पाठविला असून हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. संजय परांजपे हे पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर शिक्षण संस्थेचे संचालक म्हणून कार्यरत होते. उदय परांजपे हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत. कुटुंबाला सामाजिक, शैक्षणिक वारसापलूसमध्ये परांजपे कुटुंबाला सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील समृद्ध परंपरेचा वारसा आहे. आजोबा माधवराव परांजपे व वडील प्रभाकर परांजपे यांचा वारसा या कुटुंबाने आजवर पुढे नेला आहे. अशा कुटुंबातील व्यक्तीच्या हत्येने शहरात एकच खळबळ उडाली आहे. पलूस शहरात घडलेली घटना ही अतिशय दुर्दैवी आहे. पोलिस आरोपीला लवकरात लवकर पकडतील. नागरिकांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये. रात्री उशिरा पंचनामा करून अज्ञातावर गुन्हा दाखल करून शोधमोहीम सुरू करू. -सिद्धेश्वर जंगम, पोलिस निरीक्षक, पलूस.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

संजय परांजपे हत्या प्रकरणः कुंडल वेसमध्ये एज्युकेशन सोसायटीचे संचालक मृतावस्थेत आढळले | Achira News