काल लागलेल्या पाच राज्यांमधील विधानसभांच्या निवडणुकीच्या निकालांमागच्या काही अजब कहाण्या आता समोर आल्या आहेत. त्याततामिळनाडूमध्येअभिनेता विजय याच्या पक्षाने फिल्मी स्टाईलमध्ये मिळवलेलं यश चर्चेचा विषय ठरलेलं आहेत. याचतामिळनाडूतीलएका कुटुंबातील तीन सदस्यांनी तीन वेगवेगळ्या पक्षातून निवडणूक लढवून विजय मिळवला आहे. हे तिघेही जण लॉटरी किंग सँटियागो मार्टिन यांच्या कुटुंबातील सदस्य आहेत. विजयी झालेल्यांमध्ये मार्टिन यांची पत्नी, मुलगा आणि जावयाचा समावेश आहे. यापैकी दोघे तामिळनाडूतून तर एक जण पाँडेचेरीतून विजयी झाला आहे. लॉटरी किंग आणि इलेक्टोरल बॉण्डच्या माध्यमातून मोठ्या राजकीय देणग्या देणारे तामिळनाडूमधील चर्चित राजकीय देणगीदार असलेले सँटियागो मार्टिन यांच्या कुटुंबातील तीन सदस्यांनी तीन वेगवेगळ्या पक्षांकडून निवडणूक लढवली होती. त्यामध्ये सँटियागो मार्टिन यांच्या पत्नी लिमारोज मार्टिन यांनी तामिळनाडूतील लालगुडी येथून एआयएडीएमके पक्षाकडून निवडणूक लढवत विजय मिळवला. तर विक्कीवाक्कम येथून जावई आधव अर्जुन याने अभिनेता विजय याच्या टीव्हीके पक्षाकडून निवडणूक जिंकली. टीव्हीकेचा सरसिटणीस असलेल्या आधव अर्जुन याने डीएमकेच्या कार्तिक मोहन यांचा १७ हजार ३०२ मतांनी पराभव केला. तसेच सँटियागो मार्टिन यांचा मुलगा जोस चार्ल्स मार्टिन याने पाँडेचेरीमधील कामराज नाहर येथून निवडणूक लढवून विजय मिळवला. जोस चार्ल्स मार्टिन याने लचिया जननायक काची (एलजेके) पक्षाकडून निवडणूक लढवली होती. त्याने काँग्रेस आणि टीव्हीकेच्या उमेदवारांचा पराभव केला.
सॅंटियागो मार्टिनच्या कुटुंबातील सदस्यांनी तामिळनाडू आणि पाँडिचेरीमध्ये निवडणुका जिंकल्या
Lokmat•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.