Achira News Logo
Achira News

सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपची'ऑपरेशन लोटस'यशस्वी

Lokmat
सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपची'ऑपरेशन लोटस'यशस्वी
Full News
Share:

सातारा:जिल्हा परिषदअध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीत भाजपचे तोडफोडीचे राजकारण व 'ऑपरेशन लोटस' यशस्वी झाले. राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि शिंदेसेनेचे ३५ चे बहुमत असतानाहीभाजपाच्याफोडाफोडीच्या राजकारणाने त्यांचा पराभव झाला. साताराजिल्हा परिषदअध्यक्षपदी भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष प्रिया शिंदे यांची आणि उपाध्यक्षपदी राजू भोसले यांची निवड झाली. विशेष म्हणजे प्रिया शिंदे या शिंदेसेनेचे कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी मिळाली आहे. गेल्या महिनाभरापासून प्रतीक्षेत असलेल्या सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांच्या निवडी गुरुवारी होणार असल्याने जिल्हा परिषद परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला. सर्व सदस्यांना कडक सुरक्षा व्यवस्थेत जिल्हा परिषदेत आणण्यात आले. यावेळी संपूर्ण परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. सातारा जिल्हा परिषद सत्तेसाठी भाजपने शेवटच्या क्षणापर्यंत जोरदार फील्डिंग लावली होती. तर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिंदे गटाची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आपापसातील समन्वय कायम ठेवण्याचा प्रयत्न केला होता. पण, यामध्येभाजपानेमोठे यश मिळवले आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपची'ऑपरेशन लोटस'यशस्वी | Achira News