Achira News Logo
Achira News

सातारा जिल्ह्यातील स्थानिकांना बिनशर्त पाठिंब्याचा भाजपचा निर्धार

Lokmat
सातारा जिल्ह्यातील स्थानिकांना बिनशर्त पाठिंब्याचा भाजपचा निर्धार
Full News
Share:

तांबवे : ‘सातारा जिल्ह्यात लोकांना कोणी वाली नाही, असं वाटत असेल तर भाजप त्यांच्या पाठीशी उभा आहे. त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री कोणीही असू दे फरक पडत नाही,’ असा इशारा तांबवे येथील सभेत ग्रामविकासमंत्रीजयकुमार गोरेयांनी दिला.तांबवे, ता. कराड येथील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत भाजप उमेदवारांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुल भोसले, सत्यजित पाटणकर, माजी आमदार आनंदराव पाटील, तांबवे जिल्हा परिषद गटातील उमेदवार धनंजय ताटे, पंचायत समितीचे तानाजी देवकर, स्नेहलता पाटील यांची उपस्थिती होती.मंत्रीजयकुमार गोरेम्हणाले, ‘पाटण विधानसभा मतदारसंघातील सत्यजित पाटणकर हेच या ठिकाणचे पालकमंत्री आहेत. या निवडणुकीत जनता विरोधकांना धडा शिकवेल,’ असा विश्वास व्यक्त केला. पाटण मतदारसंघात छोट्या-छोट्या कार्यकर्त्यांना आणून दम दिला असल्याचा आरोप पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर जयकुमार गोरे यांनी केला.आमदार अतुल भोसले म्हणाले, ‘सध्या सर्वत्र भाजपचे वारे घोंगावत आहे. यामुळे विरोधक काहीही बोलत आहेत.’ यावेळी विजय चव्हाण, आनंदराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

सातारा जिल्ह्यातील स्थानिकांना बिनशर्त पाठिंब्याचा भाजपचा निर्धार | Achira News