Achira News Logo
Achira News

सनी देओलची प्रमुख भूमिका असलेला'बॉर्डर 2'हा चित्रपट 20 मार्च रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

Lokmat
सनी देओलची प्रमुख भूमिका असलेला'बॉर्डर 2'हा चित्रपट 20 मार्च रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
Full News
Share:

Border 2 OTT Release :सनी देओलच्याचाहत्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. २०२६ च्या सुरुवातीला बॉक्स ऑफिसवर त्सुनामी आणणारा 'बॉर्डर २' आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. चित्रपटगृहात यशस्वी घौडदौड केल्यानंतर, निर्मात्यांनी या चित्रपटाच्या ऑनलाइन स्ट्रीमिंगची अधिकृत घोषणा केली आहे. २३ जानेवारी २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या 'बॉर्डर २' ने प्रेक्षकांना २९ वर्षांपूर्वीच्या 'बॉर्डर'च्या आठवणी ताज्या करून दिल्या. आता, हा देशभक्तीपर चित्रपट शुक्रवार, २० मार्च रोजीनेटफ्लिक्स(Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. ज्या प्रेक्षकांनी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहिला नाही किंवा ज्यांना तो पुन्हा अनुभवायचा आहे, त्यांच्यासाठी आता अवघ्या २४ तासांत हा चित्रपट उपलब्ध होणार आहे. अनुराग सिंग यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटातसनी देओलसोबतचवरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चौघांच्या जुगलबंदीने आणि प्रभावी कथेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या चित्रपटाने केवळ भारतातच नव्हे, तर जागतिक स्तरावरही आपला ठसा उमटवला आहे. बॉक्स ऑफिसवर 'बॉर्डर २' ची ऐतिहासिक कमाई'गदर २' च्या यशानंतर सनी देओलचा करिश्मा आजही कायम असल्याचे 'बॉर्डर २' ने सिद्ध केले आहे. या चित्रपटाच्या कमाईचे आकडे थक्क करणारे आहेत. या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर ३४१ कोटी रुपये, तर जागतिक बॉक्स ऑफिसवर ४६४ कोटींहून अधिक रुपये कमाई केली आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

सनी देओलची प्रमुख भूमिका असलेला'बॉर्डर 2'हा चित्रपट 20 मार्च रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. | Achira News