Sunny Deol Cinema:बॉलिवूडअभिनेतासनी देओल'बॉर्डर २' हासिनेमासध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो आहे. जवळपास २८ वर्षानंतर आलेल्या बॉर्डरसिनेमाच्याया सीक्वलला प्रेक्षकांची तितकीच पसंती मिळताना दिसतेय.सनी देओलचेप्रत्येक सिनेमे हे प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी असतात. अशातच एकीकडे प्रेक्षकांमध्ये क्रेझ असताना सनी देओलच्या एका गाजलेल्या सिनेमाबद्दल सिनेविश्वात चर्चा रंगली आहे. बॉलिवूडहंगामाच्या रिपोर्टनुसार, दिग्दर्शर राजकुमार संतोषी लवकरच घातक सिनेमाचा सीक्वल आणण्याच्या तयारीत आहेत. या आगामी प्रोजेक्टबद्दल त्यांनी सनी देओलसोबत या प्रोजेक्टसंदर्भात चर्चा केल्याची माहिती मिळते आहे. इतकंच नाहीतर सनी देओलला ही कल्पना आवडली असून आणि राजकुमार संतोषी अभिनेत्याच्या भेटीसाठी मनालीला गेले आहेत.त्यामुळे आता प्रेक्षकांमध्ये उत्सकता निर्माण झाली आहे. याआधी सनी देओलच्या गदर आणि बॉर्डर सिनेमांच्या सीक्वलला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. मात्र,सनी देओलने या प्रोजेक्टसाठी होकार दिलाय की नाही याबद्दलची माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे आता सनी देओल या चित्रपटाबाबत काय निर्णय घेतो, याकडे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान, घातक हा ब्लॉकबस्टर सिनेमा १९९६ साली सिनेमा प्रदर्शित झाला. जवळपास ३० वर्षानंतरही हा सिनेमा प्रेक्षक मोठ्या आवडीने पाहतात. 'घातक'मधील काशीच्या भूमिकेतून सनी देओलने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. दरम्यान,गेल्या वर्षी २१ मार्चला 'घातक' चित्रपटगृहात पुन्हा प्रदर्शित झाला होता.
सनी देओलच्या'घटक'सिक्वेलचे काम सुरूः चाहत्यांसाठी मनोरंजनाची नवी लाट
Lokmat•
Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.