सनी देओलचा'बॉर्डर २' सिनेमा बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवसापासूनच दमदार कमाई करत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या मुहुर्तावर २३ जानेवारीला प्रदर्शित झालेला सिनेमा बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे. प्रदर्शनाच्या दिवसापासूनच 'बॉर्डर २'चे शो हाऊसफूल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. हा सिनेमा १० दिवसांतच ३०० कोटींकडे वाटचाल करण्याच्या तयारीत आहे. 'बॉर्डर २'ने पहिल्याच दिवशी ३० कोटींचा बिजनेस केला. त्यानंतर पहिल्या वीकेंडला सिनेमाने ९० कोटींपर्यंत कमाई केली होती. मंडे टेस्टमध्येही सिनेमा पास झाला होता. सोमवारी या सिनेमाने ५९ कोटींचा गल्ला जमवला होता. त्यानंतर मात्र सिनेमाच्या कमाईत घट झाल्याचं दिसत होतं. असं असलं तरी आत्तापर्यंत सिनेमाने २५२ कोटींचा बिजनेस केला आहे. आता रविवारी सिनेमा किती कमाई करतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. 'बॉर्डर २'च्या अॅडव्हान्स बुकिंगलाही प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. या सिनेमातसनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ, अहान शेट्टी, मोना सिंग यांच्या मुख्य भूमिका आहेत. ९०च्या दशकात गाजलेल्या 'बॉर्डर' या सिनेमाचा हा सीक्वल आहे. या सिनेमातील गाण्यांनाही प्रेक्षकांनी प्रेम दिलं आहे. 'बॉर्डर २' नंतर मेकर्सने सिनेमाच्या पुढच्या भागाबाबतही हिंट दिली आहे.
सनी देओलच्या'बॉर्डर 2'ने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे.
Lokmat•
Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.