Achira News Logo
Achira News

सुनेत्रा पवार यांनी घेतली अजित पवारांची काळजीवाहू मंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली

Lokmat
सुनेत्रा पवार यांनी घेतली अजित पवारांची काळजीवाहू मंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली
Full News
Share:

अजित पवारयांच्या निधनानंतर त्यांच्याकडे असलेल्या जबाबदाऱ्या हळूहळू उपमुख्यमंत्रीसुनेत्रा पवारयांच्याकडे सोपवल्या जात आहेत. मंगळवारी (३ जानेवारी) सरकारने बीड आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारीसुनेत्रा पवारांकडेसोपवली. सरकारच्या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) प्रदेशाध्यक्षसुनील तटकरेयांनी खास पोस्ट शेअर करत त्यांच्या धैर्याचे कौतुक केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या अजित पवार यांचा २८ जानेवारी रोजी विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. या घटनेनंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली. अजित पवारांच्या निधनानंतर चौथ्या दिवशी त्यांचा शपथविधी पार पडला. दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना सुनेत्रा पवारांनी पक्षाकडून दिलेली जबाबदारी स्वीकारली. "अजित पवारांनी अत्यंत मायेने, आपुलकीने पुणे व बीड जिल्ह्यांचे..." उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे बीड आणि पुणे जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आल्यानंतर प्रदेशाध्यक्षसुनील तटकरेयांनी एक पोस्ट शेअर केली. तटकरे म्हणाले, "सुनेत्रावहिनी... आपल्या या धैर्याचं शब्दांत वर्णन करणं अशक्य... आपले सर्वांचे नेते, आपले प्रेरणास्थान आदरणीय अजितदादा पवार यांनी अत्यंत मायेने, आपुलकीने पुणे व बीड या दोन्ही जिल्ह्यांचे पालकत्व केले." "दादांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली, पुणे व बीड या दोन्ही जिल्ह्यांमध्ये पोरकेपणाची भावना निर्माण झाली... दादांच्या पश्चात आपण उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी घेऊन महाराष्ट्राला आधार दिला. त्यापुढे जात आपण आज पुणे व बीड जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारत आहात. आभाळाएवढे दुःख बाजूला सारून आपण महाराष्ट्राला सावरण्यासाठी जे धैर्य दाखवत आहात, ते शब्दांच्या पलीकडले आहे", अशा भावना सुनील तटकरेंनी व्यक्त केल्या. "आपल्या प्रत्येक निर्णयात, प्रत्येक प्रवासात माझ्यासह संपूर्ण राष्ट्रवादी परिवार आपल्यासोबत ठामपणे उभा आहे. आपले नेतृत्व महाराष्ट्राला क्षणोक्षणी अजितदादांच्या नेतृत्वाची आठवण करून देणारे ठरेल हा मला विश्वास आहे. आपणांस पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा", असे म्हणत तटकरेंनी या जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

सुनेत्रा पवार यांनी घेतली अजित पवारांची काळजीवाहू मंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली | Achira News