Achira News Logo
Achira News

सोन्याचे दरः किंमती आणखी घसरतील का? चढउतारांदरम्यान अनिश्चितता कायम

Maharashtra Times
सोन्याचे दरः किंमती आणखी घसरतील का? चढउतारांदरम्यान अनिश्चितता कायम
Full News
Share:

Gold Rate:सोन्याची किंमत आणखी घसरणार की वाढणार? भविष्यात सोन्याच्या किमती काय असतील? या वर्षअखेरपर्यंत सोन्याचा दर किती वाढेल? हेच प्रश्न सध्या सोनेप्रेमींना सतावत आहेत. सध्याच्या अनिश्चित वातावरणात सोन्याच्या किमतींवरील एकाधक्कादायक अहवालाने खळबळउडाली आहे.सोन्यात ऐतिहासिक घसरणसोन्याच्या दरातील सततच्या चढ-उतारांनी खरेदी करणारे आणि गुंतवणूक केलेल्यांची धाकधूक वाढली आहे. गगनाला भिडणाऱ्या सोन्याच्या किमतीने आधीच हैराण झालेले सोनेप्रेमी अलीकडच्या प्रचंड घसरणीनेही तितकेच हैराण झाले आहेत. केवळ चारच दिवसांत सोन्याच्या दरात ऐतिहासिक घसरण झाली 31000 रुपयांनी भाव खाली उतरला.सोन्याबाबत अमेरिकेतून आला मोठा संकेत​गेल्या काही दिवसातील घसरण पाहणारे सोनेप्रेमी सोन्याच्या किमती आणखी कमी होतील का? की त्यांनी आताच सोने खरेदी करावे? यावर चर्चा करत आहेत. पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे का? ग्लोबल इन्व्हेस्टमेंट बँक, जेपी मॉर्गन, ने आपल्या अलीकडच्या अहवालाने सराफा बाजारात खळबळ उडाली. सध्या जागतिक बाजारात सोन्याची किंमत $5,500 वरून $4,700 वर घसरली असून काही दिवसांतच $700 पेक्षा जास्त कमी झाली. त्याचवेळी, भारतीय बाजारात सोन्याची किंमत 1.40 लाखांपर्यंत कमी झाली होती.सोन्यातील गुंतवणूकदारांसाठी दिलासादायक बातमीजेपी मॉर्गनचा अहवाल सोन्यातील गुंतवणूकदारांसाठी दिलासादायक ठरू शकतो. जागतिक इन्व्हेस्टमेंट बँकेने या वर्षाच्या अखेरीस सोन्याचा भाव 6,300 डॉलरपर्यंत उसळी घेण्याचा अंदाज वर्तवला आहे. म्हणजे सध्याच्या पातळीवर सोन्याचा भाव 32% वाढायचा अंडज असून अशाप्रकारे, भारतीय बाजारात सोन्याची किंमत 2 लाखांचा उंबरठ्यावर ओलांडू शकते. मध्यवर्ती बँका आणि गुंतवणूकदारांकडून मागणी वाढल्याने सोन्याच्या किमती वाढतील, असा जेपी मॉर्गनचा अंदाज आहे.मध्यवर्ती बँका 800 टन सोने खरेदीचा अंदाजप्लास्टिक मालमत्तेच्या तुलनेत वास्तविक मालमत्तेच्या कामगिरीबद्दल जेपी मॉर्गन चेस अँड कंपनीने म्हटले आहे की, ‘आधीच स्पष्ट, संरचनात्मक आणि सातत्यपूर्ण विविधीकरण स्थापित केल्यामुळे मध्यम कालावधीत सोन्यासाठी मजबूत सकारात्मक वाढीचा कल दिसत आहे, जे आणखी विकसित करायची गरज आहे.’ जगभरातील मध्यवर्ती बँका 2026 मध्ये तब्बल 800 टन सोने खरेदी करायचा जेपी मॉर्गनचा अंदाज आहे.चांदीची किंमत घसरत राहणार की वाढणार?दुसरीकडे, जेपी मॉर्गनने चांदीबद्दल म्हटले की गेल्या वर्षी डिसेंबरपासून चांदीची किंमत 80 डॉलरच्या वर उसळल्या असून चांदीतील दरवाढीचे कारण ओळखणे किंवा त्यांचे अचूक मूल्यांकन करणे कठीण झाले आहे आणि सावधगिरी बाळगली पाहिजे. एकेकाळी 120 डॉलर्सपेक्षा जास्त महागलेली चांदीची किंमत आता 80 डॉलर्सपर्यंत घसरली आणि सध्या 81 डॉलरच्या आसपास ट्रेड करत आहे.भविष्यात ​चांदीच्या दरवाढीचा अंदाजयाशिवाय जेपी मॉर्गनने येत्या आठवड्यात सोने-चांदीचे प्रमाण आणखी वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे, कारण मध्यवर्ती बँका सोन्याइतकेच चांदीचे खरेदीदार नाहीत. ‘सोन्याच्या तुलनेत चांदी लक्षणीयरीत्या महागली आहे, पण पूर्णपणे किंमत कमी होण्याची शक्यता नाही,’ जेपी मॉर्गन म्हणाले आणि सध्या चांदीसाठी सरासरी अप्पर सपोर्ट $75 ते $80 प्रति औंसच्या मागील अपेक्षेपेक्षा जास्त अंदाज वर्तवला आहे.(Disclaimer: वरील माहिती फक्त वाचकांच्या माहितीसाठी आहे. येथे सादर केलेले किमती, विश्लेषणे आणि अंदाज जेपी मॉर्गन सारख्या कंपन्यांच्या बाजार परिस्थितीवर आधारित आहेत. सोने आणि चांदीच्या किमतीतील चढ-उतार आंतरराष्ट्रीय घडामोडी, चलनवाढ आणि मध्यवर्ती बँकेच्या निर्णयांवर अवलंबून असतात. म्हणून, सोने किंवा चांदीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी, तुम्ही तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा आणि स्वतःचे माहितीपूर्ण निर्णय घ्या.)

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

सोन्याचे दरः किंमती आणखी घसरतील का? चढउतारांदरम्यान अनिश्चितता कायम | Achira News