मुंबई: गेल्या दोन-तीन वर्षात अनेक मराठी कौटुंबिक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले. हलकी फुलकी गोष्ट, ड्रामा , कॉमेडीचा तडका असलेला आणखी एक सिनेमा आता चर्चेत आलाय. सुपर डूपर असं या सिनेमाचं नाव आहे.यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये सहकुटुंब सहपरिवार बघता यावा अशा धमाल मनोरंजनाची मेजवानी असणाऱ्यासुपर डूपरया चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. नावाप्रमाणेच हा ट्रेलरही सुपर डुपर झाला असून यात एकमेकांवर कुरघोडी करणारे एकाहून एक मातब्बर कलाकार बघून हा चित्रपट पैसा वसूल करणारा ठरेल अशी प्रतिक्रिया प्रेक्षक देत आहेत.'त्यादिवशी भूतं असतात यावर मी विश्वास ठेवला'Akshay Kumar ने सांगितली घटना, जुहूच्या घरात मुलगा अदृश्य शक्तीशी मारायचा गप्पाकाय आहे ट्रेलरमध्ये?ट्रेलरमध्ये पाहायला मिळतंय की, एका घराभोवती फिरणारा गंमतीदार गोंधळ दिसत आहे. एका बाजूला परंपरा जपणारं गावाकडचं कुटुंब, तर दुसऱ्या बाजूला आधुनिक विचारांची कास धरणारं शहरातलं तरुण जोडपं. या दोन्ही कुटुंबांना एकाच फ्लॅटची विक्री होते आणि या घराच्या ताब्यावरून वादाची ठिणगी पडते. आता एकच घर आणि राहणारे दोन टोकाचे गट… दोघांची जीवनशैली, सवयी आणि विचार अगदी वेगळे असल्यामुळे एकत्र राहतानाची त्यांची मजेशीर जुगलबंदी मध्ये दिसतेय. कॉमेडी ,ड्रामा याच्यासोबत काही भावनिक संवादही या ट्रेलरमध्ये आहेत. ‘झाड उगायला माती आणि माणूस जगायला नाती लागतातच’ असा एक डायलॉगनिर्मिती सावंतयांच्या तोंडी आहे.इथे पाहा ट्रेलरया चित्रपटाचं लेखन व दिग्दर्शन समीर आशा पाटील यांनी केलं आहे. विजय शिंदे आणि नरेश बोर्डे हे या चित्रपटाचे निर्माते असून उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर प्रस्तुतकर्ते आहेत. तर छायांकन संजय जाधव यांनी केलं आहे.Aaradhna Talkies; ठाणेकरांना गुडन्यूज; 'आराधना चित्रपटगृह' नव्या स्वरूपात प्रेक्षकांच्या भेटीलाप्रार्थना बेहरे आणि निर्मिती सावंतची ‘ही’ सवय केदार शिंदेंना खटकतेकलाकारांची फौजनिर्मिती सावंत, शशांक शेंडे, हृषिकेश जोशी, नम्रता संभेराव, कुशल बद्रिके, प्रतीक्षा कोते यांच्यासह ललित प्रभाकर आणि विदुला चौगुले हे कलाकार या चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत.केव्हा प्रदर्शित होणार सिनेमा?झी स्टुडिओज प्रस्तुत, नाईंटी नाइन प्रॉडक्शन्स आणि सिद्धिविनायक प्रॉडक्शन्स निर्मित तथा समीर आशा पाटील दिग्दर्शित सुपर डुपर हा चित्रपट येत्या ३ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
'सुपर डुपर "या नव्या मराठी कौटुंबिक चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
Maharashtra Times•
Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.