Achira News Logo
Achira News

संभाजीनगर पालिकेच्या शाळेतील अनधिकृत बांधकामामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला धोका

Pudhari
संभाजीनगर पालिकेच्या शाळेतील अनधिकृत बांधकामामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला धोका
Full News
Share:

Sambhajinagar News: Encroachment near the municipal school destroyed छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :महापालिकेच्या कांचनवाडी येथील शाळेत ३०० हून अधिक विद्यार्थी असून, या शाळेच्या संरक्षण भींतीला लागून एकाने अनधिकृत बांधकाम सुरू केले आहे. या बांधकामामुळे शाळेची भिंत धोकादायक बनली असून, बुधवारी (दि. १८) महापालिका अतिक्रमण हटाव विभागाला माहिती मिळताच पथकाने अनधिकृत बांधकामासह शेड जमीनदोस्त केले. त्यासोबतच मालकी हक्काची जागा नसताना बांधकाम केल्यामुळे गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली. परिसरात कांचनवाडी महापालिकेची शाळा आहे. या शाळेजवळ शेख अक्रम व काही लोकांनी मिळून २० हजार चौरस फूट जागेवर अतिक्रमण केले होते. या जागेवर मातीचा भराव टाकण्यात आला. त्यामुळे मनपा शाळेच्या भिंतीला अगोदर तडे गेले. हळूहळू भिंत कोसळू लागली. शाळेची तीन बाजूची भिंत कोसळली. शाळेतील मुलांच्या अंगावर ही भिंत को सळली नाही, ही सुदैवाची बाब आहे. याघटनेची माहिती मिळताच अतिक्रमण हटाव विभागाचे सनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांनी पाहणी केली. अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीला अगोदर मालकी हक्काची कागदपत्रे सादर करण्यास सांगितले. त्यांनी कागदपत्रे नसल्याची सांगितले. मातीचा भराव टाकून वॉचमनसाठी एक रूमही तयार केली होती. ही रूम मनपाच्या पथकाने जमीनदोस्त केली. अतिक्रमण करणाऱ्यांवर सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती वाहुळे यांनी दिली. यावेळी वॉर्ड अधिकारी अर्चना राजपूत, उपअभियंता जावेद काझी, इमारत निरीक्षक मुकेश खडसे आदी उपस्थित होते.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

संभाजीनगर पालिकेच्या शाळेतील अनधिकृत बांधकामामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला धोका | Achira News