स्मार्ट वीज मीटरमुळे ग्राहकास फटका मालवण धुरीवाडा येथील स्नेहल मेथर यांनी आपल्या घरी बसविण्यात आलेल्या स्मार्ट वीज मीटरबाबत तक्रार मांडताना मागील महिन्याचे वीज बिल भरलेले असतानाही या महिन्यात अचानक २३३ रुपये भरावयाचे आहेत, असा मॅसेज मोबाईलवरून येऊन तात्काळ वीज पुरवठा खंडित करण्यात आला, या महिन्याची वीज बिल देयक तारीख २० मार्च असतानाही त्यापूर्वीच चुकीच्या पद्धतीने वीज पुरवठा खंडित करण्यात आला, असे सांगत या प्रकारबाबत तीव्र संताप व्यक्त केला. याबाबत नितीन बाळके व इतर ग्राहकांनीही आवाज उठवत मेथर यांचा वीज पुरवठा तत्काळ सुरू करावा, अशी मागणी केली. यावर अभियंता श्री. म्हेत्रे यांनी याविषयी स्मार्ट वीज मीटरबाबतच्या आयटी विभागाशी संपर्क करून वीज पुरवठा सुरू करण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले. दरम्यान, बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना नितीन वाळके म्हणाले, महाराष्ट्र ग्राहक पंचायतीच्या प्रयत्नातून दर महिन्याच्या तिसऱ्या बुधवारी ऊर्जा मित्र बैठक आयोजित केली जात असून वीज ग्राहकांनी आपल्या वीज समस्या ग्राहक पंचायतीकडे मांडव्यात, जेणेकरून बैठकीत त्यावर चर्चा करून वीज प्रश्न मार्गी लावता येतील, असे सांगितले.
स्मार्ट मीटरच्या बिघाडामुळे मालवण धुडीवाडा येथील ग्राहकांसाठी अनपेक्षित वीजपुरवठा खंडित
Pudhari•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.