Achira News Logo
Achira News

सारा अली खानचा आध्यात्मिक प्रश्न-देशभरातील प्रतिष्ठित मंदिरांना भेट देणे

Maharashtra Times
सारा अली खानचा आध्यात्मिक प्रश्न-देशभरातील प्रतिष्ठित मंदिरांना भेट देणे
Full News
Share:

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान अनेकदा देशातल्या प्रसिद्ध मंदिरांना भेटी देताना दिसते. तर उत्तराखंडमधील प्रसिद्ध असलेल्या बद्रीनाथ आणि केदारनाथ इथं अनेकदा जाऊन आली आहे. पण आता या मंदिरांसह राज्यातील इतर ४५ मंदिरांमध्ये प्रवेशाबाबत मंदिर समितीनं एक मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचं समोर आलंय. या नियमांनुसार साराला मंदिरात सहज प्रवेश मिळणार नाहीये.हिंदू नसलेल्या भाविकांना जर या मंदिरांमध्ये दर्शन घ्यायचं असल्यासआपलीसनातनधर्मावर श्रद्धा असल्याचं लेखी 'प्रतिज्ञापत्र' सादर करावं लागणार आहे. या नियमाच्या संदर्भात बद्री-केदार मंदिर समितीचे अध्यक्ष हेमंत द्विवेदी यांनी अभिनेत्री सारा अली खानचा विशेष उल्लेख केल्यानं राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू आणली आहे.शिक्षकांनी डस्टर फेकून मारताच खराब होणार होता Shashi Kapoor यांचा चेहरा, जिगरी यार धावलेला मदतीला, जो पुढे झाला भारताचा विकेटकिपरनेमका निर्णय काय आहे?बद्री-केदार मंदिर समितीने ( BKTC ) मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं की, मंदिराचं पावित्र्य आणि धार्मिक परंपरांचं रक्षण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. हेमंत द्विवेदी म्हणाले की, "जर एखाद्या व्यक्तीची सनातन धर्मावर श्रद्धा असेल, तर ती व्यक्ती प्रतिज्ञापत्र देऊन दर्शन घेऊ शकते. मग ती व्यक्ती कोणत्याही धर्माची किंवा पार्श्वभूमीची असो."या निर्णयानुसार, ज्यांना मंदिरात प्रवेश हवा आहे, त्यांना मी सनातनी आहे आणि माझा हिंदुत्वावर विश्वास आहे, अशा आशयाचं घोषणापत्र द्यावं लागेल. मंदिर समितीनें यासाठी एक विशिष्ट फॉर्म (Format) देखील तयार केला आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.Bollywood News : वर्सोवाला स्पॉट झाली सारा अली खानसारा अली खानचा उल्लेख का?सारा अली खानही केदारनाथ आणि बद्रीनाथ दर्शनासाठी जात असते. तिनं आतापर्यंत सहा ते सात वेळा केदारनाथ मंदिरात जात दर्शन घेतलंय. तिच्या 'केदारनाथ' या पदार्पणाच्या चित्रपटापासून तिचं या ठिकाणीशी, या मंदिराशी जवळचं नातं निर्माण झालं आहे. मात्र, तिच्या धर्मावरून सोशल मीडियावर अनेकदा तिला ट्रोल केलं जातं. साराच्या आगामी भेटींबद्दल विचारलं असता द्विवेदी म्हणाले, "जर सारा अली खानला मंदिरात दर्शन घ्यायचं असेल, तर तिलाही इतर बिगर-हिंदू भाविकांप्रमाणे सनातन धर्मात आस्था असल्याचं प्रतिज्ञापत्र द्यावे लागेल. त्यानंतरच तिला पूजेसाठी प्रवेश दिला जाईल."Lagnanantar Hoilch Prem : वजनामुळे येणार जीवा नंदिनीमध्ये दुरावा? लग्नासाठी काव्या रम्याच्या हात धुवून पाठी, पण पार्थसाठी वसूच्या लेकीची नवी रणनीतीदरम्यान, या नवीन नियमांमुळे आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

सारा अली खानचा आध्यात्मिक प्रश्न-देशभरातील प्रतिष्ठित मंदिरांना भेट देणे | Achira News