Achira News Logo
Achira News

संरक्षक भिंतींमुळे समुद्रकिनार्यावरील घरटे बंद झाल्यामुळे समुद्री कासवांना अडथळ्यांचा सामना करावा लागतो

Pudhari
संरक्षक भिंतींमुळे समुद्रकिनार्यावरील घरटे बंद झाल्यामुळे समुद्री कासवांना अडथळ्यांचा सामना करावा लागतो
Full News
Share:

रत्नागिरी तालुक्यातील भाट्ये, नेवरे आणि आडे यांसारख्या महत्त्वाच्या किनाऱ्यांवर संरक्षक भिंती बांधल्या जात आहेत. मात्र, या बांधकामासाठी वापरण्यात येणारे मोठे खडक आणि अनियोजित स्वरूपामुळे सागरी कासवांना अंडी घालण्यासाठी वाळूत जागा मिळत नव्हती. त्यातच बंधाऱ्याच्या कामामुळे जेसीबी, डंपर यांची ये-जा सुरू राहिल्यामुळे निर्माण होणाऱ्या कंपनामुळे अनेक कासवे अंडी न घालताच समुद्रात परत जात असल्याचे समोर आल्यानंतर कांदळवन कक्षाने तज्ज्ञांची एक समिती नेमून या प्रकरणाची चौकशी केली. या समितीने प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर बंधाऱ्यांच्या कामामुळे कासवांच्या अंडी घालण्याच्या प्रक्रियेवर विपरीत परिणाम होत असल्याचा अहवाल सादर केला. या अहवालानंतर तातडीने उपाययोजना करण्यात आल्या. आडे किनाऱ्यावरील बांधकाम थांबवून तिथले अडथळा ठरणारे खडक हटवण्यात आले, ज्यानंतर कासवांनी पुन्हा तिथे अंडी घालण्यास सुरुवात केली.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

संरक्षक भिंतींमुळे समुद्रकिनार्यावरील घरटे बंद झाल्यामुळे समुद्री कासवांना अडथळ्यांचा सामना करावा लागतो | Achira News