अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षडोनाल्ड ट्रम्पपुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. संयुक्त अरब अमिरातीच्या एका बड्या नेत्याने ट्रम्प यांना १,६८६ कोटी रुपये (१८७ दशलक्ष डॉलर्स) दिले आणि त्या बदल्यात अमेरिकेचे अत्यंत संवेदनशील संरक्षण तंत्रज्ञान पदरात पाडून घेतले, असा खळबळजनक आरोप अमेरिकन सिनेटर ख्रिस मर्फी यांनी केला आहे. या व्यवहारामुळे अमेरिकेच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाल्याचा दावा केला जात असून, अमेरिकन राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. आरोपांनुसार, ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेण्यापूर्वी अवघे चार दिवस आधी एक गुप्त 'क्रिप्टोकरन्सी डिल' केली होती. ही डिल ५०० दशलक्ष डॉलर्सची होती. यामध्ये ट्रम्प यांच्या कौटुंबिक मालकीच्या 'वर्ल्ड लिबर्टी फायनान्शियल' या क्रिप्टो कंपनीतील ४९% हिस्सेदारी युएईच्या एका कंपनीने विकत घेतली. या व्यवहारातून ट्रम्प परिवाराला सुमारे १,६८६ कोटी रुपये, तर त्यांचे मध्यपूर्वेतील दूत स्टीव्ह विटकॉफ यांना ३१ दशलक्ष डॉलर्स मिळाल्याचा दावा सिनेटर मर्फी यांनी केला आहे. ज्या व्यक्तीने ही गुंतवणूक केली आहे, तो दुसरा तिसरा कोणी नसून युएईच्या राष्ट्राध्यक्षांचा भाऊ आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शेख तहन्नून बिन जायद अल नहयान आहे. त्यांना 'स्पाय शेख' म्हणून ओळखले जाते, कारण ते युएईच्या गुप्तचर आणि सुरक्षा यंत्रणांचे सर्वेसर्वा आहेत. सुमारे १.३ ट्रिलियन डॉलर्सच्या संपत्तीवर त्यांचे नियंत्रण असून ते जगातील सर्वात शक्तिशाली गुंतवणूकदारांपैकी एक मानले जातात. HUGE welcome by President Donald J. Trump 🇺🇸 for HH Sheikh Tahnoon bin Zayed Al Nahyan 🇦🇪 and his team at the White House.Thank you@realDonaldTrumpfor having us 🙏🏼pic.twitter.com/sWDSHfhdLJ जो बायडेन प्रशासनाने युएईला आधुनिक 'AI चिप्स' देण्यास नकार दिला होता. मात्र, ट्रम्प सत्तेत येताच चित्र बदलले. शेख तहन्नून यांनी व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प आणि विटकॉफ यांच्याशी अनेक गुप्त बैठका घेतल्या. या बैठकांनंतर ट्रम्प प्रशासनाने युएईला दरवर्षी ५ लाख आधुनिक AI चिप्स पुरवण्यास मंजुरी दिली. या चिप्सच्या मदतीने जगातील सर्वात मोठे डेटा सेंटर नेटवर्क उभारले जाऊ शकते, जे लष्करी आणि तांत्रिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील मानले जाते. सिनेटर मर्फी यांनी या प्रकरणाला खुला भ्रष्टाचार असे संबोधले आहे. "ट्रम्प यांनी स्वतःच्या फायद्यासाठी अमेरिकेचे गुपित तंत्रज्ञान परकीय शक्तीला विकले आहे. या व्यवहाराची सखोल चौकशी झाल्यास संबंधित व्यक्तींना तुरुंगाची हवाही खावी लागू शकते," असा इशारा त्यांनी दिला आहे. या गंभीर आरोपामुळे ट्रम्प यांच्या कार्यकाळावर आता संशयाचे ढग गडद झाले असून, विरोधकांनी या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी लावून धरली आहे.
संरक्षण तंत्रज्ञानाच्या बदल्यात यु. ए. ई. कडून $187 दशलक्ष रक्कम मिळाल्याचा ट्रम्प यांच्यावर आरोप
Lokmat•
Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.