सूरत - ATM मधून कॅश काढताना अनेकदा अकाऊंटमधील पैसे कट होतात, परंतु कॅश काढताना त्रास होतो. या परिस्थितीत जर तुम्हीबँकेततक्रार केली तर तुमच्या खात्यातून गेलेली रक्कम पुन्हा परत केली जाते. गुजरातच्या सूरत येथे राहणाऱ्या व्यक्तीसोबत ९ वर्षापूर्वी असाच प्रकार घडला होता. काय आहे प्रकार? १८ फेब्रुवारी २०१७ रोजी घडलेला हा प्रकार आहे. सूरतच्या उधना येथे राहणारा एक व्यक्तीएटीएममधूनपैसे काढण्यासाठी गेला. हे एसबीआयचंएटीएमहोते आणि या व्यक्तीचेबँकखाते बँक ऑफ बडोदामधील होते. त्याला एटीएममधून १० हजारांची रोकड काढायची होती. त्याने पिन वैगेरे टाकला परंतु एटीएममधून कॅश आली नाही मात्र त्याच्या बँक खात्यातून १० हजार कापल्याचा मेसेज आला. संबंधित ग्राहकाने याबाबत त्याच्या बँकेत अनेकदा तक्रार केली परंतु कुणीही फारशी दखल घेतली नाही. त्यामुळे ही तक्रार करून काही फायदा झाला नाही. बँकेने आपले हात वर करत व्यवहार झाला असून ग्राहकाला पैसे मिळाल्याचा दावा केला. बँकेने वारंवार पैसे देण्यास नकार दिल्यानंतर जतिन पटेल या ग्राहकाने माहितीच्या अधिकाराचा वापर केला. त्याने एटीएमचे सीसीटीव्ही फुटेज आणि नोंदणी वही मागितली. फुटेजमधून एटीएममध्ये जतिनला कुठलीही कॅश मिळाली नसल्याचे स्पष्ट झाले. तरीही बँकेने पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर जतिनने ग्राहक न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. सूरतच्या ग्राहक तक्रार निवारण आयोगात हे प्रकरण दाखल झाले. सुनावणीनंतर कोर्टाने बँकेची चूक असल्याचे निदर्शनास आणले. बँकेने ग्राहकाच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले शिवाय पुरावे मिळूनही त्याला पैसे न दिल्याचा ठपका बँकेवर ठेवला. बँकेला चूक महागात पडली आरबीआयच्या नियमानुसार, एटीएममधील ट्रान्झक्शन अयशस्वी झाल्यास बँकेला ग्राहकाच्या तक्रारीनंतर ५ दिवसांत पैसे परत करणे बंधनकारक असते. पैसे परत न दिल्यास बँकेला प्रतिदिन १०० रूपये दंड आकारला जातो. हे प्रकरण ९ वर्षापूर्वीचे असल्याने तक्रारीपासून ३२८८ दिवस पूर्ण झाले. त्यामुळे बँकेला प्रतिदिन १०० रूपये या हिशोबाने ३२८८ दिवसांसाठी ३ लाख २८ हजार दंड बसला आहे. त्याशिवाय १० हजाराच्या रक्कमेवर वार्षिक ९ टक्के व्याजही बँकेला द्यावे लागणार आहे. सोबतच ग्राहकाला झालेला मानसिक त्रास आणि कायदेशीर लढाईसाठी ५ हजारांचा दंड बँकेला ठोठावण्यात आला आहे.
सुरत रहिवाशाचे ए. टी. एम. मधून पैसे काढण्याचे दुःस्वप्नः एक 9 वर्ष जुना निराकरण न झालेला मुद्दा
Lokmat•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.