Suryakumar Yadav Kieron Pollard IPL 2026 CSK vs MI:मुंबई इंडियन्ससाठीसातत्याने धावांचा पाऊस पाडणारासूर्यकुमार यादवयंदाच्या हंगामात फारसा चमकू शकला नाही. आतापर्यंत झालेल्या ९ सामन्यांत सूर्यकुमारच्या बॅटमधून एकही दमदार खेळी आलेली नाही. पण असे असूनहीसूर्यकुमार यादवच्याशिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. आयपीएल २०२६ मधील चेन्नईविरूद्धच्या २१ धावांच्या खेळीच्या जोरावर सूर्याने एक मोठी झेप घेतली आहे. Stood tall under pressure 👏pic.twitter.com/ZogeoHdGI7 सूर्यकुमार यादवनेकिरॉन पोलार्डलाटाकलं मागे मुंबई इंडियन्सचा'फिनिशर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्याकिरॉन पोलार्डनेमुंबई इंडियन्स संघासाठी ३,९१५ धावा केल्या होत्या. सूर्यकुमारने आता हा टप्पा ओलांडला आहे. तो मुंबईसाठी सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. या यादीत मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा अजूनही अव्वलस्थानी आहे. रोहितच्या नावावर मुंबईसाठी ५००० हून अधिक धावांची नोंद आहे. सूर्या आता रोहितच्या विक्रमाचा पाठलाग करत आहे. Team spirit 🆙🧿💙💪🏽pic.twitter.com/3qRygoERQV कमी डावांमध्ये केला मोठा पराक्रम सूर्याने अत्यंत कमी डावांमध्ये धावा काढल्या आहेत. त्याची सरासरी आणि स्ट्राईक रेट पाहता, तो मुंबई इंडियन्सच्या इतिहासातील सर्वात प्रभावी फलंदाज असल्याचे सिद्ध होते. सूर्यकुमार यादवने ज्या वेगाने या धावा केल्या आहेत, ते पाहता आगामी काळात तो रोहित शर्माच्या विक्रमालाही आव्हान देऊ शकतो. पण या चालू हंगामातही सूर्याला आपल्या फलंदाजीने फारसा प्रभाव पाडता आलेला नाही.
सूर्यकुमार यादवने किरॉन पोलार्डला मागे टाकत मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू बनला आहे.
Lokmat•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.