Achira News Logo
Achira News

सूर्यकुमार यादवने जिंकला टी-20 विश्वचषकः प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालशी विशेष संबंध

Lokmat
सूर्यकुमार यादवने जिंकला टी-20 विश्वचषकः प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालशी विशेष संबंध
Full News
Share:

भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाजसूर्यकुमार यादवआज जगातील अव्वल खेळाडूंपैकी एक आहे.सूर्यकुमार यादवच्यानेतृत्वाखालील भारतीय संघाने विक्रमी तिसऱ्यांदा टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली. खूप उशीरानं टीम इंडियात संधी मिळालेल्या सूर्यानं फलंदाजीसह नेतृत्वाची खास छाप सोडली आहे. तर दुसरीकडे, आपल्या मधुर आवाजाने कोट्यवधींच्या हृदयावर राज्य करणारीश्रेया घोषालसंगीताच्या दुनियेतील सर्वोच्च शिखरावर आहे. ही दोन्ही व्यक्तिमत्त्वे आपापल्या क्षेत्रात दिग्गज आहेत, पण या दोघांमध्ये एक असं खास कनेक्शन आहे जे फार कमी लोकांना ठाऊक आहे. सूर्यकुमार यादव आणिश्रेया घोषालयांचा थेट संबंध नसला तरी, त्यांच्यातील कनेक्शन हे श्रेयाचा भाऊ सोम्यदीप घोषाल हा आहे. सूर्यकुमार आणि सोम्यदीप हे बालपणीचे मित्र आहेत. मुंबईतील अनुशक्ती नगर कॉलनीच्या मैदानावर हे दोघेही एकत्र क्रिकेट खेळायचे. श्रेया आणि सूर्या एकाच कॉलनीमध्ये लहानाचे मोठे झाले असल्याने त्यांचे कौटुंबिक ऋणानुबंध जुने आहेत. जेव्हा सूर्यकुमार यादवने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या फलंदाजीने जग जिंकले, तेव्हा श्रेया घोषालने सोशल मीडियावर त्याचे खास अभिनंदन केले होते. तिने जुन्या आठवणींना उजाळा देत म्हटले होते की, "सूर्यकुमार आणि माझा भाऊ बालपणी एकत्र क्रिकेट खेळायचे. ते दिवस अजूनही संस्मरणीय आहेत". दोन वेगवेगळ्या जगातील दोन 'किंग'श्रेया घोषालने भारतीय चित्रपटसृष्टीत हजारो गाणी गाऊन अनेक राष्ट्रीय आणि फिल्मफेअर पुरस्कार पटकावले आहेत. तर सूर्यकुमार यादवने आपल्या 'मिस्टर ३६०' शैलीने टी-२० क्रिकेटमध्ये भारताला विश्वविजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

सूर्यकुमार यादवने जिंकला टी-20 विश्वचषकः प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालशी विशेष संबंध | Achira News