Solapur Government Polytechnic New Engineering Courses:आज, मंगळवारी (५ मे) रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शिक्षणविषयक आणि आदिवासी विकास विभाग अंतर्गत असे एकूण तीन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामध्ये आदिवासी मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठीचा महत्त्वाचा निर्णय, तसेच सोलापूर शासकीय तंत्रनिकेतनमध्ये नवीन तीन अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरू करणे, श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय महाराष्ट्र शासनास हस्तांतरित करण्याचा निर्णय झाला आहे. चला तर हे महत्त्वाचे निर्णय सविस्तरपणे जाणून घेऊयात.आश्रमाशाळांची श्रेणीवाढआदिवासी बांधवांच्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. स्वयंसेवी संस्थाच्या पाच प्राथमिक व १९ माध्यमिक अनुदानित आश्रमाशाळांची श्रेणीवाढ करण्यात आली आहे. प्राथमिकमधून माध्यमिक आणि माध्यमिकमधून कनिष्ठ महाविद्यालय अशी श्रेणीवाढ करण्यात आली आहे. त्यासाठी आवश्यक पदनिर्मिती व आवश्यक खर्चाच्या तरतूदीस मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे डोंगराळ, दुर्गम भागातील आदिवासी बांधवांच्या मुलांचे शिक्षण गतीमान होण्याची आशा व्यक्त केली जात आहे. हा निर्णय आदिवासी विकास विभाग अंतर्गत घेण्यात आला आहे.सोलापुरकरांसाठी आनंदाची बातमी!सोलापुरच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये या शैक्षणिक वर्षापासून (सन २०२६-२७) पदवीस्तराचे तीन अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरु करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. सोलापूर आणि आजुबाजुच्या परिसरातील अभियांत्रिकी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या होतकरूंच्या दृष्टीने हिताचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येकी साठ प्रवेश क्षमतेचे एआय अँण्ड मशिन लर्निंग, कॉम्प्युटर सायन्स अँण्ड इंजिनियरींग, इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड टेलिकम्युनिकेशन असे तीन नवे अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. हा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभाग अंतर्गत घेण्यात आला आहे.पोलीस भरतीत 'कॉपी-पेस्ट'चा कळस! सराव संचातील ८५ प्रश्न जसेच्या तसे; पेपर फुटल्याचाही संशयधाराशिव जिल्ह्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे हस्तांतरणधाराशिव जिल्हयातील तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या माध्यमातून चालविण्यात येणारे श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय महाराष्ट्र शासनास हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. हस्तांतरण केल्यानंतर महाविद्यालयाचे सक्षमीकरण होणार आहे. तसेच महाविद्यालयातील अद्ययावत शैक्षणिक सोयी-सुविधांमुळे या परिसरातील होतकरूंना दर्जेदार अभियांत्रिकी शिक्षण उपलब्ध होण्याची संधी उपलब्ध होणार आहे. हा निर्णय महाराष्ट्र सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभाग अंतर्गत घेण्यात आला आहे.
सोलापूर शासकीय पॉलिटेक्निकने नवीन अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरू केले, महाविद्यालय महाराष्ट्र सरकारकडे हस्तांतरित केले
Maharashtra Times•
Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.