Achira News Logo
Achira News

हिंगोली जिल्ह्यातील रब्बी पिकांना वादळी वाऱ्याचा तडाखा

Lokmat
हिंगोली जिल्ह्यातील रब्बी पिकांना वादळी वाऱ्याचा तडाखा
Full News
Share:

हिंगोली : जिल्ह्यातील वसमत आणि कळमनुरी तालुक्यांत बुधवारी मध्यरात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने रब्बी पिकांना मोठा फटका बसला आहे. गव्हाचेपीकआडवे झाले असून, वसमत तालुक्यात फळबागांना सर्वाधिक फटका सहन करावा लागत आहे. जिल्ह्यात वादळी वाऱ्यासहपाऊसहोईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. १८ मार्चला रात्री १२ च्या सुमारास वसमत तालुक्यात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह दोन तासपाऊसझाला. यात केळीच्या बागा आणि काढणीला गव्हाचेपीकआडवे झाले. कळमनुरी तालुक्यात रात्री ११ वाजण्याच्या सुमारास वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. त्यामुळे भाजीपाला, गहू, हरभरा, करडई या पिकांना फटका बसला आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील येहळेगाव येथे रात्री गारपीट झाली असून, या भागातील पिकांचीही मोठी हानी झाली आहे. शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावलानरवेल (जि. बुलढाणा) : नरवेल परिसरात बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. गारपीट झाल्याने गहू, हरभरा, कांदा तसेच उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गुरांसाठी साठवून ठेवलेला चारा भिजल्याने पशुपालकांना ही फटका बसला आहे. काढणीला आलेली पीके जमीनदोस्त झाल्याने अवकाळीने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला आहे. नाशिकमध्ये गारपिटीसह अवकाळी पाऊसनाशिक : अनेक गावांत बुधवारी (दि. १८) दुपारी अवकाळीने हजेरी लावली. काही भागांत अल्पकाळ गारपीटही झाल्याने पिकांचे नुकसान होण्याच्या भीतीने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ओझरला तुरळक पाऊस झाला. या पावसामुळे काढणीला आलेल्या गहू, हरभरा आणि कांदा पिकांना फटका बसण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली. जळगाव जिल्ह्याला आज ‘ऑरेंज अलर्ट’जळगाव : जिल्ह्यावर अवकाळी पावसाचे संकट ओढावले आहे. हवामान विभागाने १९ मार्च रोजी जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जाहीर केला असून, वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या नैसर्गिक आपत्तीच्या इशाऱ्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता पसरली आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

हिंगोली जिल्ह्यातील रब्बी पिकांना वादळी वाऱ्याचा तडाखा | Achira News