काही लोकांचा स्वभाव फारच हट्टी असतो. त्यांना कितीही समजावलं तरी ते आपला हट्ट काही सोडत नाहीत. किंबहुना अशी मंडळी प्रत्येक गोष्ट आपल्या ईगोवर घेतात आणि मग पुढे त्यांचं काय होतं हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही.अशाच एका हट्टी महिलेचा व्हिडिओ समोर आला आहे. तिनं आपल्या घरात टीव्ही लावताना तो थेट AC च्या खाली लावला. वास्तविक, टीव्ही आणि AC एकाखाली एक कधीच लावू नयेत. कारण काही वेळा AC मधून पाणी येतं आणि ते थेट टीव्हीवर पडून टीव्ही खराब होऊ शकतो.पण टेक्निशियनच्या सांगण्यावरूनही ती महिला काही ऐकली नाही. अखेर आपली नोकरी वाचवण्यासाठी टेक्निशियनने काय जुगाड केला आहे, हे आता तुम्हीच पाहा. हा व्हिडिओ पाहून अख्खं इंटरनेट आता या महिलेची फिरकी घेत आहे.नेमकं घडलं तरी काय?हा व्हिडिओ @ChapraZila या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ही घटना बिहारमधील छपरा जिल्हा येथे घडल्याचं म्हटलं जात आहे.व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका महिलेनं जबरदस्तीने टेक्निशियनला AC च्या अगदी खाली टीव्ही लावायला सांगितलं. टेक्निशियनने तिला संभाव्य समस्या स्पष्टपणे सांगितल्या होत्या, पण ती काही ऐकायला तयार नव्हती.अखेर त्याने तिचा हट्ट पूर्ण केला आणि सोबतच आपली नोकरी वाचवण्यासाठी एक व्हिडिओ शूट केला, ज्यामध्ये संपूर्ण घटना स्पष्ट करून सांगितली. गंमत म्हणजे व्हिडिओमध्ये महिलेनं स्वतःच्या सांगण्यावरूनच AC आणि टीव्ही एकाखाली एक लावल्याचं मान्य केलं.(फोटो सौजन्य - Raymond Aquila/pexels.com)टेक्निकल समस्या काय आहे?AC चालू असताना आतमध्ये थंड हवा तयार होते आणि पाण्याचे थेंबही तयार होतात. हे पाणी पाईपद्वारे बाहेर टाकलं जातं. पण जर पाईप जाम झाला किंवा AC मध्ये काही तांत्रिक बिघाड झाला, तर पाणी बाहेर जाण्याऐवजी आतूनच गळू लागतं. अशा वेळी खाली टीव्ही असेल, तर हे पाणी थेट त्यावर पडून टीव्हीमध्ये बिघाड होऊ शकतो.म्हणूनच टीव्ही आणि AC वेगवेगळ्या भिंतींवर लावण्याचा सल्ला दिला जातो. हा व्हिडिओ ४ लाख ३३ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे आणि नेटकऱ्यांनी तिची चांगलीच फिरकी घेतली आहे.(महत्वाची टीप - या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता maharashtratimes.com ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)
हट्टी महिलेचे टीव्ही-सेव्हिंग तंत्र बिहारमध्ये व्हायरल
Maharashtra Times•
Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.