हिंदू धर्मात प्रदोष व्रताला अत्यंत महत्व आहे. हे व्रत भगवान शंकराला समर्पित असतात. जो व्यक्ती या दिवशी नियमाने व्रत करून महादेवाची मनोभावे पूजा करतो त्यांच्या मनोकामना भगवान शिव पूर्ण करतात अशी मान्यता आहे. हे व्रत यंदा अतिशय खास आहे कारण येणारा प्रदोष व्रत हा शनिवारी असल्याने त्याला शनी प्रदोष म्हणतात. शनी प्रदोष महत्वाचा यामुळे असतो कारण यादिवशी महादेवासोबतच शनिदेवाची कृपा देखील मिळते. यामुळे ज्या व्यक्तींवर साडेसाती किंवा शनीची कुदृष्टी आहे त्यांनी यादिवशी व्रत करून शनिदेवाची देखील पूजा करावी असे सांगितले जाते. पाहुयात मग वर्षातील पहिला शनिप्रदोष केव्हा आहे .शनिप्रदोष तारीखपंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी १४ फेब्रुवारी शनिवारी सायंकाळी ४ वाजून २ मिनिटांनी सुरु होईल. ही तिथी दुसऱ्या दिवशी म्हणजेच २ फेब्रुवारी रविवारी सायंकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी समाप्त होईल. त्यामुळे उदय तिथीनुसार प्रदोष व्रत हे १४ तारखेलाच केले जातील.शनिप्रदोष मुहूर्तवर्षातील पहिले प्रदोष व्रत हेशनिप्रदोषआहे. हे व्रत १४ फेब्रुवारी रोजी केले जातील. यादिवशी प्रदोषकाळात पूजा करणे सर्वोत्तम मानले जाईल. प्रदोषकाळाची वेळ ही १४ फेब्रुवारी सायंकाळी ५ वाजून २५ मिनिटे ते ६ वाजून ५५ मिनिटांपर्यंत असेल. त्यामुळे या शुभ मुहूर्तावर तुम्ही भगवान शिवाची पूजा मांडून सर्व विधी करू शकता.प्रदोष पूजा विधीशनिप्रदोषच्या दिवशी सकाळी लवकर उठावे स्नान झाल्यानंतर पांढरे वस्त्र घालावे. आपल्या देवघरातील देवांची पूजा करावी. मग महादेवाच्या पूजेसाठी एक चौरंग घ्यावा त्यावर पांढरे वस्त्र अंथरून महादेवाचे शिवलिंग ठेवावे. शिवलिंगाचा अभिषेक करावा त्यानंतर भस्म लावावे व बेलपत्र पांढरी फुले वाहावीत. धूप दीप अगरबत्ती लावावी. चुर्म्याचा नैवेद्य दाखवावा. देवी पार्वतीला शृंगाराचे सामान अर्पण करावे. मग प्रदोषव्रताची कथा वाचावी. आरती करून प्रसाद वाटावा.शनिप्रदोषच्या दिवशी पूजा कशी करावीहे व्रत शनिवारी आल्याने याला शनिप्रदोष असे म्हणतात. त्यामुळे यादिवशीमहादेवासोबतचभगवान शनिदेवाची पूजा करणे देखील महत्वाचे मानले जाते. महादेवाची पूजा झाल्यानंतर शनिदेवाचे स्मरण करावे. शनी स्तोत्र व शनीचालीसा पठण करावी. त्यानंतर सायंकाळी पिंपळाच्या झाडाला पाणी घालावे व दिवा लावावा . शनी मंदिरात जाऊन शनिदेवाला तेल अर्पण करावे. यामुळे शनिदोष नाहीसा होतो असे मानतात.
हिंदू धर्मातील शनि प्रदोष व्रताचे महत्त्व आणि त्याची शुभ वेळ
Maharashtra Times•
Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.