चंदिगढ: चंदिगढ विमानतळावर मंगळवारी एकच गोंधळ उडाला. हैदराबादहून आलेल्या एका विमानातील प्रवाशाच्या पॉवर बँकेला अचानक आग लागली. त्यामुळे विमानात एकच खळबळ उडाली. एअरलाईन्सननं दिलेल्या माहितीनुसार, फ्लाईट 6E-108 लँडिंगनंतर धावपट्टीवर उभं होतं. तितक्यात एका प्रवाशाच्या पॉवर बँकेनं पेट घेतला. सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता प्रवाशांना विमानातून तातडीनं बाहेर काढण्यात आलं. सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे टर्मिनलपर्यंत पोहोचवण्यात आलं.प्रवाशाच्या पॉवर बँकचा स्फोट झाल्यानंतर विमानात सर्वत्र धूर पसरला. त्यामुळे अन्य प्रवासी घाबरले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात प्रवासी धावपट्टीवर उतरताना दिसत आहेत. 'सर्व प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य देण्यात आलं. विमानानं पुन्हा उड्डाण करण्याआधी त्याची पूर्ण तपासणी केली जाईल,' अशी माहिती एअरलाईन्सकडून देण्यात आली.नागरी उड्डाण महासंचलनालयाच्या २०२६ च्या नियमांनुसार, विमानात पॉवर बँक नेण्याची परवानगी केवळ कॅरी ऑन सामानतच असते. प्रवाशांना फ्लाईटमध्ये फोन आणि अन्य डिव्हाईस चार्ज करण्यासाठी पॉवर बँकचा उपयोग करण्याची परवानगी आहे. पॉवर बँक आणि अतिरिक्त बॅटरी सारख्या वस्तू फ्लाईटमध्ये असलेल्या वरील कंपार्टमेंट ठेवण्याची परवानगी नाही. कारण अशा ठिकाणी आग लागल्यास ती विझवणं अधिक अवघड असतं.
हैदराबादहून चंदीगडला जाणाऱ्या विमानात पॉवर बँक अग्निशमन दलाकडून आपत्कालीन सुटका
Maharashtra Times•
Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.