गुरुग्राम :लग्नानंतर अवघ्या चार महिन्यातच नवविवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हरियाणातील गुरुग्राम येथील गढी हरसरु भागात हा प्रकार घडला. मयत विवाहिता व्यवसायाने नर्स होती. पतीनेच विषारी इंजेक्शन देऊन तिचा जीव घेतल्याचा आरोप महिलेच्या भावाने केला आहे. तक्रारीनुसार पोलिसांनी तिच्या पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.काय आहे प्रकरण?उत्तर प्रदेशातील कानपूर येथील मूळ रहिवासी असलेली २३ वर्षीय तरुणी काजल कुटुंबासह हरियाणातील गढी हरसारु येथे वास्तव्यास आहे. काजल एका खाजगी रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत होती. तिथेच तिची ओळख अरुणशी झाली. अरुण त्या रुग्णालयाच्या एक्स-रे विभागात काम करत असे. दोघांनी चार महिन्यांपूर्वी विवाह केला. त्यानंतर ते बसई परिसरातील एका भाड्याच्या घरात राहू लागले.Pune Mumbai E-Way Accident : रात्रभर सिनेमे पाहिले, पहाटे लोणावळ्याला सूर्योदय पाहायला गेलो; तिघा तरुणांचा अपघाती अंत, मित्रांनी सांगितला घटनाक्रमवादानंतर नवऱ्याने तळ मजल्यावर नेलंहोळीनिमित्त काजल पती अरुणसोबतगढी हरसारुयेथील आपल्या माहेरी गेली होती. अरुणला अमली पदार्थांचे व्यसन असून त्याने सध्या आपली नोकरीही सोडल्याची माहिती आहे. बुधवारी सकाळी दोघा पती-पत्नीमध्ये काही कारणावरुन वाद झाला. त्यानंतर अरुणने काजलला काहीतरी बोलायचं असल्याचं निमित्त करुन घराच्या पहिल्या मजल्यावरुन तळ मजल्यावर बोलावून घेतलं, असा आरोप काजलच्या भावाने केला आहे.गुढीपाडव्यानिमित्त मुख्यमंत्री फडणवीसांच्या शुभेच्छा; नागपूर शोभयात्रेत सहभागी होत लुटला आनंददहा मिनिटात प्रकृती बिघडलीअवघ्या दहा मिनिटांतच काजलची प्रकृती खालावू लागली आणि तिच्यानाकातून रक्तयेऊ लागलं. तिच्या कुटुंबीयांनी तिला तातडीने एका खाजगी रुग्णालयात दाखल केलं. तिथून तिला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारांसाठी पाठवण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी काजलचं निधन झाल्याचं त्यांना सांगितलं. या संपूर्ण प्रकरणाचा पोलिसांनी तपास सुरु केला आहे.Indore Fire : काळ सर्वकाही हिरावून घेईल; स्टेटस ठेवून झोपले, मध्यरात्री आगीने गिळलं, सासरे-सुनेचा मृत्यू, मायलेक जखमीबाथरुममध्ये इंजेक्शन सापडलंकुटुंबीयांनी असा आरोप केला आहे की, त्यांना घरातीलबाथरुममध्ये एक इंजेक्शनसापडलं. पतीने काजलला विषारी इंजेक्शन दिल्यामुळे तिचा मृत्यू झाला, असा आरोप करण्यात आला आहे. सेक्टर-९३ चौकी आणि सेक्टर-१० पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. बॉडी शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आली असून अहवाल प्राप्त झाल्यानंतरच तिच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल, असं पोलिसांनी म्हटलं आहे.
हरियाणातील तरुण परिचारिकेचे जीवनः प्रेमकथा उलगडते
Maharashtra Times•
Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.