Achira News Logo
Achira News
Lokmat logo
Lokmat
Feb 4, 2026, 04:16 AM
महाराष्ट्र राज्य सरकारने कृषी मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांचा अधिकार रद्द केला

महाराष्ट्र राज्य सरकारने कृषी मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांचा अधिकार रद्द केला

पुणे: राज्यसरकारनेबिगरशेतीपरवानगी देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार काढून घेतले आहेत. आता हे अधिकार स्थानिक नियोजन प्राधिकरणाकडे दिले आहेत. त्यासाठी राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. मात्र, यातील अनेक मुद्द्यांवर स्पष्टता नसून बिगरशेतीचीपरवानगी देताना शासकीय नजराणा, थकबाकी वसुली, सातबारा उताऱ्याची तपासणी तसेच अधिकार अभिलेखांमधील नोंद महसूल विभाग अर्थात जिल्हा प्रशासन करणार की स्थानिक प्राधिकरणाचे अधिकारी करणार? याबाबत अद्याप शासकीय पातळीवर संभ्रम आहे. त्यामुळे अधिकच गोंधळ उडून न्यायालयीन वाद उद्भवू शकतात, अशी भीती अधिकारी व्यक्त करत आहेत. राज्यसरकारनेशहरांभोवतीच्या गावांमधील विकासकामांना चालना देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार आता बिगरशेती परवानगीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीची गरज नाही. त्यासाठी महाराष्ट्र महसूल अधिनियम १९६६ मधील ४१ ते ४७ आणि १०८ ते १२० ही कलमेच रद्द करण्यात आली आहेत. त्यासंदर्भातराज्य सरकारनेराजपत्र प्रसिद्ध केले आहे. मात्र, यातील ४२ व्या कलमात दुरुस्ती करण्यात आली आहे. आता ही परवानगी स्थानिक नियोजन प्राधिकरणाकडे देण्यात आली आहे. यातून स्थानिकांना जिल्हाधिकारी कार्यालयात चकरा माराव्या लागणार नाहीत. मात्र, हे बदल करताना अनेक बाबींमध्येराज्य सरकारकडूनस्पष्टता नसल्याने प्रशासकीय पातळीवर गोंधळ उडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ही परवानगी देताना भोगवटा वर्ग १ जमिनींबाबत कोणतीही अडचण नसेल. मात्र, परवानगी देताना त्याची बिगर शेतीत नोंद करताना गाव नमुना २ मध्ये करायची की नाही, ती कोण करणार, नोंद होणार नसल्यास हा गाव नमुना बंद करायचा का? अशी कोणतीही स्पष्टता जिल्हा प्रशासनाला देण्यात आलेली नाही. तसेच इतर हक्कांमधील दावेदारांना विश्वासात न घेता परस्पर परवानगी देऊन त्यावर बांधकाम केल्यास त्यानंतर उ‌द्भवणाऱ्या न्यायालयीन वादांबाबत नेमकी कोणती कार्यवाही करावी, याचेही निर्देश देण्यात आलेले नाहीत. स्पष्टता नाही◼️ भोगवटा वर्ग २ च्या जमिनींबाबत परवानगी दिल्यास सातबारा उताऱ्यावरील इनाम, कुळ, वतन प्रकाराची तपासणी करण्याचे अधिकार महसूल विभागाला आहेत. ही तपासणी करण्याचीही स्पष्टता नाही.◼️ ही तपासणी परवानगी पूर्वी करावी की त्यानंतर करावी, हेही सांगण्यात आलेले नाही.◼️ यासाठी शासकीय नजराणा भरावा लागतो. तो स्थानिक प्राधिकरण घेईल की माफ करेल, हेही स्पष्ट नाही. हेलपाटे वाचणार◼️ आता बिगरशेती अधिमूल्य एकदाच भरावा लागेल. त्यामुळे दरवर्षी अधिमूल्य भरण्यासाठीचे हेलपाटे वाचणार आहेत.◼️ मात्र, हे अधिमूल्य रहिवास, व्यापारी तसेच औद्योगिक वापरासाठी एकच ठेवले आहे.◼️ यापूर्वी तिन्ही प्रयोजनांसाठी वेगवेगळे अधिमूल्य लावले जात होते. त्यामुळे सरकारचा महसूल बुडणार आहे.◼️ एका वापरासाठीची परवानगी दिल्यानंतर गैरवापर झाल्यास दंड आकारून नियमित होणार नाही. क्लिष्टता होऊ शकते◼️ बिगर शेतीची नोंद झाल्यानंतर महसूल अभिलेख अद्ययावत करण्याचे काम जिल्हा प्रशासन करते.◼️ मात्र, त्यापूर्वीच महसूल विभागाचा अभिप्राय न घेता परवानगी दिल्यास कायदेशीर क्लिष्टता निर्माण होऊ शकते, असेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.◼️ राज्य सरकारच्या या राजपत्राच्या प्रसिद्धीनंतर १ जानेवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. अधिक वाचा:भूसंपादन मोबदल्यासाठी शेतकऱ्यांची पायपीट आता थांबणार; राज्य सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय
20 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Feb 4, 2026, 03:05 AM
भारत-अमेरिका व्यापार करारः शुल्कात कपात करण्याच्या बदल्यात रशियाच्या तेल मर्यादांवर निर्बंध

भारत-अमेरिका व्यापार करारः शुल्कात कपात करण्याच्या बदल्यात रशियाच्या तेल मर्यादांवर निर्बंध

India America Trade Deal: अमेरिकेसोबत झालेल्या व्यापार करारांतर्गत भारत आता रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी मर्यादित करणार आहे. या निर्णयाच्या बदल्यातअमेरिकाभारतीय वस्तूंवरील व्यापार शुल्क कमी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. नायरा एनर्जीसारख्या रिफायनरी, ज्यांच्याकडे दुसरा कोणताही पर्यायी स्रोत नाही, त्या सध्या आयात सुरू ठेवतील. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षडोनाल्ड ट्रम्पयांनी जाहीर केलं की, या द्विपक्षीय करारामुळे भारतीय वस्तूंच्या आयातीवरील रेसिप्रोकल शुल्क २५ टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत खाली येईल. राष्ट्राध्यक्षांनी स्पष्ट केलं की, भारतानं रशियन तेल खरेदी बंद करणं, अमेरिकेविरुद्धचं टॅरिफ आणि नॉन-टॅरिफ अडथळे कमी करणं आणि ५०० अब्ज डॉलर्सची अतिरिक्त अमेरिकन ऊर्जा, तंत्रज्ञान आणि कृषी उत्पादनं खरेदी करण्याची कटिबद्धता दर्शवल्यामुळे ही सवलत दिली आहे. रशियन तेल खरेदी बंद करण्याच्या निर्णयामुळे आधी लादलेलं अतिरिक्त २५ टक्के शुल्क हटवलं जाईल, ज्यामुळे भारतीय निर्यातीवरील प्रभावी अमेरिकन टॅरिफ दर ५० टक्क्यांवरून थेट १८ टक्क्यांवर येईल. रशिया-युक्रेन युद्धानंतर पाश्चात्य देशांनी मॉस्कोवर निर्बंध लादले होते, परंतु सवलतीच्या दरामुळे भारतीय रिफायनरीज रशियन तेलाच्या मोठ्या ग्राहक बनल्या होत्या. ताज्या घडामोडींनुसार, भारतीय रिफायनरीज जुन्या करारांनुसार व्यवहार पूर्ण करतील, परंतु आता नवीन ऑर्डर देणार नाहीत. भारतीय निर्यातदारांसाठी ही एक मोठी दिलासादायक बातमी आहे. हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL), मॅंगलोर रिफायनरी (MRPL) आणि एचपीसीएल-मित्तल एनर्जी (HMEL) यांसारख्या रिफायनरींनी गेल्या वर्षीच रशियाकडून तेल खरेदी बंद केली होती. इंडियन ऑईल (IOCL) आणि भारत पेट्रोलियम (BPCL) या कंपन्या देखील आपली खरेदी हळूहळू कमी करतील. रिलायन्स इंडस्ट्रीजने गेल्या वर्षाच्या अखेरीस रशियन तेल कंपन्यांवरील अमेरिकन निर्बंधांनंतर खरेदी थांबवली होती. या नियमाला 'नायरा एनर्जी' ही एकमेव अपवाद असू शकते. रशियाशी असलेल्या संबंधांमुळे नायरा आधीच युरोपियन युनियन आणि ब्रिटनच्या निर्बंधांना सामोरं जात आहे. यामुळे इतर कोणतेही पुरवठादार कंपनीशी व्यवहार करण्यास तयार नाहीत. परिणामी, कंपनीला रशियन तेल खरेदी करणे भाग पडत आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेत रिफायनरीच्या या अनोख्या स्थितीबद्दल माहिती देण्यात आली असून, नायराला या धोरणातून सूट दिली जाऊ शकते किंवा त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था केली जाऊ शकते. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी जाहीर केलं आहे की, भारतावर लागू असलेलं २५ टक्के शुल्क आता तत्काळ प्रभावानं १८ टक्के असेल. हे शुल्क सिंगापूर वगळता इतर आसियान अर्थव्यवस्था (१९%) आणि बांगलादेश (२०%) यांच्यापेक्षा कमी आहे. रशियन तेलाशी संबंधित अतिरिक्त २५ टक्के शुल्क देखील हटवलं जाईल, कारण भारताने रशियन तेल खरेदी बंद करण्यास संमती दर्शवली आहे.
28 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Feb 4, 2026, 01:52 AM
आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर कर्ज अर्जांमध्ये महामंडळाला विलंब आणि नकारांना सामोरे जावे लागत आहे

आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर कर्ज अर्जांमध्ये महामंडळाला विलंब आणि नकारांना सामोरे जावे लागत आहे

विनोद सावंत कोल्हापूर :अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळांतर्गत सुरू असणाऱ्या योजनेतील व्याज परतावा वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. महामंडळाकडून कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याचे कारण पुढे केले जात आहे. दुसरीकडे, आचारसंहितेमुळे दीड महिन्यापासून सुमारे दीड हजार नवीन कर्ज मागणीचे अर्ज रिजेक्ट केले आहेत. आचारसंहितेनंतर पुन्हा अर्ज करा, असे त्यांना सांगितले जात आहे. ‌‘जुन्या कर्जदारांना व्याज परताव्यासाठी प्रतीक्षा आणि नवीन अर्जदारांना कर्ज मिळेना,‌’ अशी स्थिती झाली आहे.
38 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Feb 4, 2026, 01:19 AM
कोल्हापूरच्या विस्ताराला विलंबः पायाभूत सुविधांच्या विकासावर भर

कोल्हापूरच्या विस्ताराला विलंबः पायाभूत सुविधांच्या विकासावर भर

सुविधांच्या जोरावर हद्दवाढीचा मार्ग सुकर कोल्हापूरची हद्दवाढ रखडण्यामागे नागरी सुविधांचा अभाव हे प्रमुख तांत्रिक कारण राहिले आहे. नव्या योजनेनुसार, केंद्राचा निधी हा केवळ ‌‘प्रकल्प‌’ म्हणून न मिळता ‌‘शहर आर्थिक क्षेत्र‌’ विकसित करण्यासाठी मिळणार आहे. जर या निधीतून सध्याच्या हद्दीत आणि लगतच्या क्षेत्रात उच्च दर्जाच्या पायाभूत सोयी (उदा. भुयारी गटार योजना, पाणीपुरवठा) निर्माण झाल्या, तर हद्दीबाहेरील गावांचा समावेश करण्याचा प्रशासकीय आणि राजकीय मार्ग सुकर होईल, असा धोरणात्मक निष्कर्ष नागरी विकास तज्ज्ञांनी काढला आहे.
51 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Feb 4, 2026, 12:11 AM
भारताने भांडवली नफा कर वाढ आणि डेरिव्हेटिव्ह शुल्कात वाढ केली

भारताने भांडवली नफा कर वाढ आणि डेरिव्हेटिव्ह शुल्कात वाढ केली

कंपन्यांकडून भागधारकांच्या शेअर्सच्या पुनर्खरेदीवर आता भांडवली नफा कर देय ठरणार आहे. डेरीव्हेटिव्जच्या फ्युचर्स आणि ऑप्शन्सच्या व्यवहारांवर शुल्कात वाढ केली आहे. ही वाढ फ्यूचर्स, ऑप्शन्स प्रीमियम्स आणि ऑप्शन्स एक्ससाईजमध्ये अनुक्रमे 0.02 टक्यावरून 0.05 टक्के, 0.10 टक्के वरून 0.15 टक्के आणि 0.12 टक्यावरून 0.15 टक्के झाली आहे. अर्थात, हे आवश्यक होते. या डेरीव्हेटिव्जच्या व्यवहारात अनेक छोट्या गुंतवणूकदारांचे पैसे मातिमोल झाले आहेत. त्यामुळे हे व्यवहार थोडे महाग करून नवगुंतवणूकदारांना इशारा दिला आहे. सार्वभौम सुवर्णरोख्यांची खरेदी दुय्यम रोखे बाजारातून केल्यास आता भांडवली नफ्यावरील करमुक्ततेचा लाभ मिळणार नाही. यातून रोखे गुंतवणूकदारांना प्रदीर्घ अवधीत गुंतवणूक ठेवण्यासाठी प्रवृत्त केले आहे. कंपन्यांच्या लाभांशातून मूळ स्रोतातून होणारी आयकर कपात टाळण्यासाठी करपात्र उत्पन्न नसणाऱ्या बहुसंख्य ज्येष्ठ नागरिक आणि शेअर होल्डर्सना आता प्रत्येक कंपनीकडे 15 एच किंवा 15 जी हे अर्ज भरून पाठवावे लागत होते. डिमॅट खाते जिथे आहे तिथेच एकदाच हा 15 एच किंवा 15 जी अर्ज भरून दिल्यास कोणत्याही कंपनीच्या लाभांशातून आयकर कपात होणार नसल्याने दरवर्षीचा सोपस्कार अधिक सुलभ होणार आहे. करविवाद कमी करण्यासाठी चांगली पावले उचलली आहेत.
55 shares
😐
Loksatta logo
Loksatta
Feb 3, 2026, 07:30 PM
अमेरिका-भारत संबंधः सरकारी व्यवहारांमध्ये पारदर्शकतेचे आवाहन

अमेरिका-भारत संबंधः सरकारी व्यवहारांमध्ये पारदर्शकतेचे आवाहन

परिस्थिती अधिक चिघळण्याआधीच, ट्रम्प यांच्या कोणकोणत्या मागण्या आपण मान्य केल्या आणि कोणत्या अमान्य आहेत याचा तपशील आपल्याच सरकारने जाहीर करावा… अमेरिकेबरोबरचा आपला दुरावा संपुष्टात येण्याची गरज किती होती हे डोनाल्ड ट्रम्प-नरेंद्र मोदी यांच्यातील समेट वृत्ताने उसळलेल्या बाजार निर्देशांकावरून समजेल. ट्रम्प आणि मोदी यांच्यात तुटलेला संवाद पुन्हा सुरू झाला आणि त्यातून अमेरिकेने भारतावर लादलेले अतिरिक्त आयातशुल्क मागे घेतल्याची घोषणा झाली. त्यामुळे बाजारात आनंदाचे वातावरण पसरले. घसरता रुपयाही सावरला. कोणी कितीही, काहीही आणि कसेही म्हटले तरी अमेरिकेशी संबंध सुधारणे ही आपली आर्थिक आणि राजनैतिक गरज होती. ती लक्षात घेऊन पंतप्रधानांनी अखेर पावले उचलली आणि हा तिढा सुटला. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. अमेरिकेबरोबरचे संबंध सौहार्दाचे राहावेत यासाठी पंतप्रधान मोदी यांनी अध्यक्ष ट्रम्प यांची खास व्हाइट हाऊसमध्ये भेट घेतली त्यास १२ फेब्रुवारीस एक वर्ष होईल. ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर वाकडी वाट करून त्यांना भेटण्यास गेलेले मोदी हे पहिले बड्या देशाचे प्रमुख. पण या भेटीचा हवा तितका फायदा झाला नाही. ट्रम्प यांनी भारतास चार हात दूर ठेवले आणि त्यात ‘पहलगाम’ घडल्यानंतर हे अंतर आणखीच वाढले. ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख न करता, भारत-पाकिस्तान युद्ध आपणच मिटवले असे विधान ट्रम्प यांनी किमान ३० वेळा तरी केले. वर, त्या युद्धात ट्रम्प यांनी घेतलेल्या भूमिकेसाठी आपण त्यांचे आभार मानले नाहीत म्हणून तर ते भारतावर आणखीच रागावले. त्यांचे आभार न मानण्याची ही गल्लत पंतप्रधान मोदी यांनी या वेळी केली नाही. समाजमाध्यमांतून त्यांनी या कोंडीमुक्ततेसाठी ट्रम्प यांस मन:पूर्वक धन्यवाद दिले. हेही चांगलेच झाले. वैयक्तिक मानापमानापेक्षा राष्ट्रीय हित केव्हाही महत्त्वाचे अशी भूमिका पंतप्रधान नेहमीच घेतात. या भूमिकेस साजेशी कृती त्यांनी केली म्हणूनही ते अभिनंदनास पात्र ठरतात. आता या करारातील तपशिलाविषयी. तो अर्थातच संपूर्णपणे अद्याप प्रसृत झालेला नाही. त्याचा जो काही तपशील मिळतो तो केवळ ट्रम्प यांच्याकडून. आपल्या सरकारने या विषयावर स्वागतापलीकडे अधिक काही भाष्य केलेले नाही. त्यामुळे याबाबत संशयाची पाल चुकचुकण्याची शक्यता दाट. विशेषत: ट्रम्प आणि त्यांच्या काही मंत्री सहकार्‍यांनी याबाबत केलेले दावे आपणासाठी स्वागतार्ह मानता येणे अवघड. उदाहरणार्थ खुद्द ट्रम्प यांचा रशियन तेलाबाबतचा दावा. रशिया आपला जुना मित्र. त्याच्या गरजेचा आणि आपल्या स्वस्त तेल दराच्या स्वार्थाचा भाग म्हणून आपण रशियाकडून तेल खरेदी करतो. युक्रेन युद्धामुळे रशियावर आर्थिक निर्बंध असल्याने त्या देशाची कोंडी झालेली आहे. आपल्या तेल खरेदीने ती काही अंशी सुटते. त्यामुळे रशियाने तेलदरात आपणास प्रसंगी प्रति बॅरल २० डॉलरपर्यंत सूट दिली. आपल्यासाठीही ही बाब अतिशय महत्त्वाची. कारण वाढत्या वयात ज्याप्रमाणे आरोग्यदायी खुराकाची गरज शरीरास असते त्याप्रमाणे वाढत्या अर्थदरकाळात मुबलक इंधन आवश्यक असते. ते स्वस्तात मिळत असेल तर उत्तम. सद्य:स्थितीत दररोज ५५-५८ लाख बॅरल्स खनिज तेल आपण फस्त करतो आणि त्यापैकी ८२ टक्के इतके तेल हे परदेशांतून आलेले असते. या आपल्या तेलातील ३५ टक्के तेल फक्त रशियाकडून येते. याचा अर्थ आपली जवळपास एकतृतीयांश इतकी तेल-तहान रशिया भागवतो. म्हणजे ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार आपण आता या तेलावर पाणी सोडणार. त्यांच्या या दाव्यावर आपल्याकडून काही भाष्य हवे. नपेक्षा ट्रम्प याचा दावा खरा मानला जाईल. तसे होऊ देण्यात दुसरी अडचण अशी की ट्रम्प तेथेच थांबत नाहीत. भारताने यापुढे व्हेनेझुएलाकडून अधिकाधिक तेल खरेदी करण्याची घोषणाही करून ते मोकळे होतात. भारतासारख्या सार्वभौम देशाच्या स्वाभिमानी पंतप्रधानांस ट्रम्प यांच्या प्रत्येक मुद्द्यास असा होकार देता येणे अवघड. ही अवघड परिस्थिती अधिक चिघळायच्या आत आपण ट्रम्प यांच्या कोणकोणत्या मागण्या मान्य केल्या आणि कोणत्या आपणास अमान्य आहेत याचा अधिकृत तपशील आपल्याच सरकारने जाहीर करावा. त्यामुळे ट्रम्प यांच्या असत्यावर भाष्य करावे लागणार नाही. तसे करण्यामागील आणखी एक कारण म्हणजे ब्रुक रोलीन्स यांचे जाहीर निवेदन. या ब्रुकबाई डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारात कृषिमंत्री आहेत. म्हणजे त्यांनी प्रसृत केलेल्या निवेदनास शासकीय आधार आहे. भारताशी झालेल्या समझोत्याबाबत या ब्रुकबाईंनी अध्यक्ष ट्रम्प यांच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला असून पुढे जात यामुळे अमेरिकी शेतकर्‍यांना भारताची विशाल बाजारपेठ कशी उपलब्ध होणार आहे हेही नमूद केले आहे. ‘‘भारत-अमेरिका यांच्यातील या नव्या करारामुळे अमेरिकी शेतकर्‍यांचा भरघोस फायदा होणार असून त्यांच्या शेतमालास चांगला दर मिळेल आणि परिणामी त्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होईल’’, असे या ब्रुकबाई म्हणतात. ‘‘या दोन देशांत कृषी माल व्यापारातील तूट २०२४ साली १३० कोटी डॉलर होती. भारताची वाढती लोकसंख्या लक्षात घेता अमेरिकी शेतमालास भारतीय बाजारपेठ मिळणार असल्याने ही तूट आता कमी होईल’’ असे म्हणत या ब्रुकबाई हा करार म्हणजे ट्रम्प हे ‘अमेरिका फर्स्ट’ ही आपली घोषणा कशी प्रत्यक्षात आणतात त्याचा नमुना ठरते, अशा अर्थाचे त्यांचे विधान करतात. ते खरे असेल तर ही आपल्या शेतकर्‍यांसाठी मोठी धोक्याची घंटा ठरते. अमेरिकी दुग्धजन्य उत्पादने हा आपल्यासाठी टोकाच्या नकाराचा विषय. अमेरिकेत गायींच्या पोषणात अभक्ष्यही असते. असे अनेकांस निषेधार्ह पदार्थांवर पोसलेल्या गायींचे दूध आणि त्या दुधापासून बनलेले पदार्थ भारतासाठी अब्रह्मण्यम. तसेच मका आणि जनुकीय वाणांतून उगवलेला शेतमाल हा भारतीय शेतकर्‍यांच्या मुळावर येणारा असून त्याचे पीक आपल्याकडे वळवले जाणार असेल तर येथील शेतकर्‍यांच्या उत्पादनांचे काय हा प्रश्न निर्माण होतो. भारत आता ५० हजार कोटी डॉलर्सची उत्पादने अमेरिकेकडून खरेदी करेल असे ट्रम्प म्हणतात. यातून खनिज तेल, कोळसा, शेतमाल, तंत्रज्ञान आणि ‘अन्य अनेक’ उत्पादनांना भारतात वाव मिळेल असा तपशील ट्रम्प यांनीच दिलेला आहे. भारताने या सगळ्यास मान्यता दिलेली असल्याने भारतीय उत्पादनांवर अमेरिकेत आता ‘फक्त १८ टक्के’ आयातशुल्क आकारले जाईल असे सांगत अमेरिका यापुढे भारताकडून शून्य कराची अपेक्षा करते अशा अर्थाचे विधानही ट्रम्प महाशय करतात. त्यामुळे आता या कराराची भारतीय अंगे उघड करण्याची जबाबदारी आपली. जे झाले त्याचे स्वागत. ते करताना माजी पंतप्रधानमनमोहन सिंगयांच्या काळात झालेल्या अमेरिका कराराचा दाखला देणे समयोचित ठरावे. अमेरिकेशी बहुप्रतीक्षित अणुकरार करत असताना माजी अध्यक्ष जॉर्ज बुश यांना नकोसे असलेल्या इराणकडून तेल खरेदी करणे थांबवण्याची अट त्या वेळी आपण मान्य केली. मनमोहन सिंग यांची ही कृती अमेरिकाशरणता दर्शवते अशी टीका त्यावेळच्या विरोधकांनी पंतप्रधानांवर केली होती. मनमोहन हे कसे देशाच्या हिताशी तडजोड करीत आहेत असे बोलही त्यांना लावले गेले. मनमोहन सरकार नंतरच्या निवडणुकांत गेले. पण म्हणून तो करार काही नंतर आलेल्या सरकारने रद्द केला नाही. उलट आता बुश यांचे पक्षानुयायी असलेल्या ट्रम्प यांचा रशियन तेल सोडा हा जाहीर आग्रह विद्यमान सरकारने मान्य केला, असे अमेरिकेचे अध्यक्ष म्हणतात. खरेखोटे कळेलच. पण तरीही व्यापारउदीमास चालना देणारा कोणताही करार स्वागतार्हच.
8 shares
😢
Loksatta logo
Loksatta
Feb 3, 2026, 02:53 PM
भारत-अमेरिका व्यापार करारः विरोधकांच्या टीकेला वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची प्रतिक्रिया

भारत-अमेरिका व्यापार करारः विरोधकांच्या टीकेला वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची प्रतिक्रिया

Piyush Goyal on Trade Deal: भारत-अमेरिकेमध्ये व्यापार करार झाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या कराराची घोषणा एकतर्फी करून टाकली. या प्रकारामुळे विरोधकांनी केंद्र सरकारविरोधात टीकेची झोड उठवल्यानंतर आता वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी यावर उत्तर दिले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेले आयातशुल्क मागे घेतल्यामुळे त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून याची माहिती दिली, असे गोयल म्हणाले. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल म्हणाले की, भारतावरचे आयातशुल्क त्यांच्याकडून लादले गेले होते. त्यामुळे साहजिकच याची माहिती त्यांनीच जगाला करून देणे अपेक्षित होते. तसेच पंतप्रधाननरेंद्र मोदीयांच्या नेतृत्वात आतापर्यंतची भारत आणि अमेरिका यांच्यातील सर्वात चांगला व्यापार करार झाला आहे. भारत आणि अमेरिका लवकरच व्यापार करारावर संयुक्त निवेदन प्रसिद्ध करतील, असेही गोयल म्हणाले. करारावर अंतिम संमती झाल्यानंतर आणि तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्याबद्दलचा तपशील जाहीर केला जाईल, असेही ते म्हणाले. लोकसभेत आज या विषयावर चर्चा होत असताना विरोधकांनी गोंधळ घातल्याबद्दल गोयल यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, विरोधक आजवर विचारत होते की, अमेरिका आणि भारतामधील व्यापार करार कधी होणार, असा प्रश्न विरोधक विचारत होते. पंतप्रधान मोदींनी आतापर्यंतचा सर्वात चांगला करार केला आहे. पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्यातील मैत्रीमुळेच हा करार पुर्णत्वास जाण्यास मदत झाली. पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी असलेल्या चांगल्या आणि विश्वासाच्या संबंधाच्या जोरावर व्यापार करार केला आहे. या करारामुळे शेतकरी, एमएसएमई क्षेत्र आणि उद्योग जगताला मोठा लाभ मिळेल. तसेच अर्थव्यवस्थेला बळकटी आणण्यात आणि रोजगाराच्या संधी वाढविण्यातही या कराराचा उपयोग होणार आहे, असेही पियुष गोयल म्हणाले.
54 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Feb 3, 2026, 01:05 PM
जमीन गहाणः कृषी कर्जासाठी आवश्यक विचार

जमीन गहाणः कृषी कर्जासाठी आवश्यक विचार

Land Mortgage :शेतीसाठीकिंवा कोणतेही लोन घेताना जमीन गहाण ठेवताना खालील महत्वाच्या गोष्टींची दक्षता घ्यावी, अन्यथा भविष्यात मालमत्तेवर संकट येऊ शकते. फक्त गरज असल्यासच लोन घ्या. कर्जाचा वापर कुठे आणि किती करणार हे स्पष्ट असावे. व्याजदर, परतफेडीची मुदत आणि एकूण रक्कम स्पष्ट समजून घ्या. कर्ज कोणत्या प्रकारचे आहे ते समजून घ्याशेतीकर्ज, वैयक्तिक कर्ज, गृहकर्ज, व्यवसाय कर्ज - प्रत्येक प्रकारचे नियम वेगळे असतात. शेतीसाठी कर्ज घेत असल्यास बँकेच्या कृषी विभागातून माहिती घ्या. जमीन गहाण ठेवण्यासाठी कायदेशीर अटीजमीन तुमच्या नावावर असावी कोणताही तंटा नसलेली व वादमुक्त जमीन असावी.संमती संयुक्त जमीन असल्यास सर्व मालकांची संमती आवश्यककोणतेही बंधन नसावे उदाहरण : कुळकायद्यानुसार कुळाने अडथळा आणू शकतो. कर्ज न फेडल्यास काय होऊ शकते?बँक तुम्हाला कर्ज थकबाकीदार घोषित करू शकते.कायद्यानुसार जमिनीचा लिलाव होऊ शकतो. अधिक माहितीसाठी जवळच्या कृषी कार्यालयात किंवा बँकेत जाऊन भेट द्या.
8 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Feb 3, 2026, 12:14 PM
भंडारा जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाचा मैलाचा दगडः वन संवर्धनासह विकासाचा समतोल साधणे

भंडारा जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाचा मैलाचा दगडः वन संवर्धनासह विकासाचा समतोल साधणे

भंडारा जिल्ह्याचा वनसंपदेसोबतच समतोल औद्योगिक विकास साधण्याच्या दृष्टीने हा निर्णय मैलाचा दगड ठरणार आहे. आता अंतिम निर्णयाकडे आणि त्यानंतर येणाऱ्या गुंतवणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
94 shares
😊
Lokmat logo
Lokmat
Feb 3, 2026, 11:46 AM
ट्रम्प यांनी शुल्कावरील भूमिका नरम केल्याने भारतीय बाजारात तेजी

ट्रम्प यांनी शुल्कावरील भूमिका नरम केल्याने भारतीय बाजारात तेजी

India-America Trade Deal:अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावरडोनाल्ड ट्रम्पयांनी नरम भूमिका घेतल्यानंतरभारतीयशेअर बाजारातजबरदस्त तेजी पाहायला मिळाली. मंगळवारच्या व्यवहारात सेन्सेक्समध्ये 4,200 पेक्षा अधिक अंकांची वाढ नोंदवली गेली. याचा थेट फायदा देशातील आघाडीच्या कंपन्यांना झाला असून, टॉप-10 कंपन्यांच्या एकत्रित बाजार भांडवलात 5.40 लाख कोटी रुपयांहून अधिक वाढ झाली आहे. रिलायन्स आणि एचडीएफसी बँक आघाडीवर रिलायन्स इंडस्ट्रीज: शेअरमध्ये 7% पेक्षा अधिक वाढमार्केट कॅप ₹1,33,768.49 कोटींनी वाढून ₹20,14,985.17 कोटी एचडीएफसी बँक: सुमारे 7% तेजीमार्केट कॅप ₹96,488.38 कोटींनी वाढून ₹15,23,500.64 कोटी आयटी क्षेत्रातही दमदार कामगिरी इन्फोसिस: सुमारे 6% वाढमार्केट कॅप ₹41,068.96 कोटींनी वाढून ₹7,17,865.49 कोटी टीसीएस: 5.28% वाढमार्केट कॅप ₹60,563.02 कोटींनी वाढून ₹12,07,172.33 कोटी बँकिंग आणि वित्त क्षेत्र चमकले आयसीआयसीआय बँक: 4.72% वाढमार्केट कॅप ₹45,637.64 कोटींनी वाढून ₹10,12,898.08 कोटी एसबीआय: सुमारे 6% तेजीमार्केट कॅप ₹56,803.76 कोटींनी वाढून ₹10,05,948.20 कोटी बजाज फायनान्स: 7.76% वाढमार्केट कॅप ₹43,681.84 कोटींनी वाढून ₹6,06,412.23 कोटी इतर प्रमुख कंपन्यांची कामगिरी हिंदुस्तान युनिलिव्हर: सुमारे 2% वाढमार्केट कॅप ₹10,291.21 कोटींनी वाढून ₹5,63,807.91 कोटी एलआयसी: 4.87% वाढमार्केट कॅप ₹24,762.37 कोटींनी वाढून ₹5,33,134.05 कोटी एलअँडटी (L&T): सुमारे 5% वाढमार्केट कॅप ₹27,229.62 कोटींनी वाढून ₹5,66,732.44 कोटी गुंतवणूकदारांमध्ये उत्साह जागतिक पातळीवर व्यापार तणाव कमी होण्याच्या संकेतांमुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढल्याचे दिसून येत आहे. टॅरिफ सवलतींच्या अपेक्षेमुळे आयटी, बँकिंग, ऊर्जा आणि वित्तीय क्षेत्रातील शेअर्समध्ये व्यापक खरेदी झाली. (टीप-शेअर बाजारातकोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक तज्ञांचा सल्ला घ्या.)
42 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Feb 3, 2026, 10:45 AM
भारत-अमेरिका व्यापार करारामुळे भारतीय शेअर बाजारात तेजी, एका दिवसात निर्देशांक आणि निफ्टीत 2 टक्क्यांहून अधिक वाढ

भारत-अमेरिका व्यापार करारामुळे भारतीय शेअर बाजारात तेजी, एका दिवसात निर्देशांक आणि निफ्टीत 2 टक्क्यांहून अधिक वाढ

India-US Trade Deal :भारत आणि अमेरिका यांच्यातील ऐतिहासिक व्यापारी कराराने भारतीयशेअर बाजारातआज अक्षरशः चैतन्य फुंकले. मागील अनेक महिन्यांची मरगळ झटकून काढत सेन्सेक्स आणिनिफ्टीने२ टक्क्यांहून अधिक मोठी झेप घेतली. १२ मे २०२५ नंतरची ही एका दिवसातील सर्वात मोठी वाढ ठरली असून, मुंबईशेअर बाजारातीलसूचीबद्ध कंपन्यांच्या बाजार भांडवलात १२ लाख कोटी रुपयांची प्रचंड भर पडली आहे. प्रमुखनिर्देशांकांचीकामगिरी व्यापारी कराराचे 'हे' सेक्टर ठरले मानकरीअमेरिकेशी झालेल्या करारामुळे ज्या क्षेत्रांचा थेट व्यापार अमेरिकेशी निगडित आहे, अशा शेअर्समध्ये आज २० टक्क्यांपर्यंतची तेजी पाहायला मिळाली. कापड उद्योग आणि झींगा निर्यातीतील कंपन्यांना लॉटरी लागली. गोकलदास एक्सपोर्ट्स, फेझ थ्री, अवंती फीड्स आणि वेल्सपन लिव्हिंग यांसारखे शेअर्स २० टक्क्यांच्या 'अप्पर सर्किट'ला धडकले. दागिने क्षेत्रातील गोल्डियम इंटरनॅशनल आणि राजेश एक्सपोर्ट्समध्येही २० टक्क्यांची तुफानी तेजी नोंदवण्यात आली. केमिकल आणि फायनान्स क्षेत्रात UPL ६ टक्क्यांनी वधारला, तर मॅनेजमेंटच्या सकारात्मक कॉमेंट्रीमुळे चोलामंडलम फायनान्स ७ टक्क्यांनी वधारला. मिडकॅपचा 'जोश' आणि निकाल फॅक्टरमिडकॅप इंडेक्समध्येही आज १६४० अंकांची मोठी वाढ झाली. नव्या युगातील कंपन्यांपैकी एथर एनर्जी आणि मोबीक्वीकचे शेअर्स त्यांच्या तिसऱ्या तिमाहीच्या दमदार निकालानंतर २० टक्क्यांनी वधारले. वाचा -वेदांताचे अनिल अग्रवाल ७५% संपत्ती 'या' क्षेत्रासाठी करणार दान; मुलाच्या स्मरणार्थ घेतला निर्णय तेजीतही 'या' शेअर्सना उतरती कळापीबी फिनटेक : आंतरराष्ट्रीय अधिग्रहणासाठी फंड उभारण्याच्या बातमीमुळे हा शेअर ६ टक्क्यांनी घसरला.वरुण बेवरेजेस : तिसऱ्या तिमाहीचे निकाल अपेक्षेपेक्षा कमकुवत लागल्याने हा शेअर उच्चांकी पातळीवरून ९ टक्क्यांनी कोसळला.
7 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Feb 3, 2026, 10:25 AM
सुवर्ण संधीः त्र्यंबक विद्यामंदिर येथे तरुण उद्योजकांसाठी स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण

सुवर्ण संधीः त्र्यंबक विद्यामंदिर येथे तरुण उद्योजकांसाठी स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण

Agriculture News :होतकरू युवक- युवतींसाठी स्वरोजगाराभिमुख प्रशिक्षणाची सुवर्णसंधी भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय अंतर्गतखादीआणि ग्रामोद्योग आयोग, त्र्यंबक विद्यामंदिर नाशिक येथील पुरस्कार प्राप्त प्रशिक्षण केंद्रात उपलब्ध करून देण्यात येत आहे. खालील स्वयंरोजगाराभिमुख प्रशिक्षणाकरिता संपर्क साधून आपला प्रवेश आजच निश्चित करा. प्रत्येक बॅचकरिता मर्यादित २० प्रशिक्षणार्थी संख्या त्यामुळे प्रथम आलेल्या प्रशिक्षणार्थ्यांस प्राधान्य दिले जाईल. कोर्स रजिस्ट्रेशन फोनवर अथवा ईमेलवर करता येईल. छात्रवृत्ती / स्टायपेंड आधारित अभ्यासक्रम संपर्कासाठी मोबाईल नंबरदूरध्वनी क्र. 0253-2970071 (स. १० ते सायं. ५ पर्यंत) प्रत्येक रविवार तसेच २ ऱ्या व ४ थ्या शनिवारी प्रशिक्षण केंद्रास सुट्टी राहील.
14 shares
😊
Lokmat logo
Lokmat
Feb 3, 2026, 08:26 AM
भारतीय सर्वोच्च न्यायालयाने गोपनीयतेच्या अधिकाराचे समर्थन केले, कंपन्यांना शोषणाविरूद्ध इशारा दिला

भारतीय सर्वोच्च न्यायालयाने गोपनीयतेच्या अधिकाराचे समर्थन केले, कंपन्यांना शोषणाविरूद्ध इशारा दिला

नवी दिल्ली - कुठलीही कंपनी डेटा शेअरिंगच्या नावाखाली देशातील जनतेच्या खासगी अधिकाराशी खेळू शकत नाही. जर भारतातील नियम तुम्हाला पाळायचे नसतील तर तुम्ही देश सोडून जा अशा शब्दात सुप्रीम कोर्टाने WhatsApp आणिमेटालाफटकारले आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर आज महत्त्वाची सुनावणी पार पडली. ज्यातमेटाआणि व्हॉट्सअप यांनी कॉम्प्टीशन कमिशन ऑफ इंडियाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. ज्यात त्यांच्यावर २१३.१४ कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्या. जयमाला बागची, न्या. विपुल एम पंचोली यांच्या खंडपीठाने म्हटलं की, ९ फेब्रुवारीला या प्रकरणात अंतिम आदेश पारित केले जातील. भारतातील नागरिकांच्या गोपनीयतेचा अधिकार काटेकोरपणे संरक्षित केला जातो. तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांनी गोपनीयता धोरणे इतक्या हुशारीने तयार केली आहेत की सामान्य नागरिक त्यांना समजू शकणार नाहीत, ज्यामुळे या कंपन्या त्यांचा डेटा चोरत राहू शकतील. तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांना ज्या ग्राहकांशी त्यांनी करार केले आहेत त्यांचा डेटा शेअर करण्याची परवानगी दिली जाणार नाही असं कोर्टाने स्पष्ट केले आहे. ऑप्ट आऊटचा पर्याय कुठे आहे? सुप्रीम कोर्टाने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला व्हॉट्सअप आणि मेटाने दाखल केलेल्या याचिकांमध्ये पक्षकार बनवले आणि ९ फेब्रुवारी रोजी अंतरिम आदेश जारी करणार असल्याचे सांगितले. सुप्रीम कोर्टाने विचारले की, ऑप्ट आऊटचा पर्याय कुठे आहे?. जर ग्राहकांना त्यांचा डेटा शेअर करायचा नसेल तर त्यांना बाहेर पडण्याचा पर्याय असावा. तंत्रज्ञान कंपन्यांना अशा प्रकारे डेटा शेअर करण्याची परवानगी दिली जाणार नाही. त्यावर प्लॅटफॉर्मच्या धोरणातून बाहेर पडण्याचा पर्याय आहे असं व्हॉट्सअपची बाजू मांडणारे वरिष्ठ वकील अखिल सिब्बल यांनी सांगितले.काय आहे संपूर्ण प्रकरण? भारतीय स्पर्धा आयोगाने (CCI) नोव्हेंबर २०२४ मध्ये एक आदेश पारित केला. व्हॉट्सअॅपच्या २०२१ च्या गोपनीयता धोरणाची तपासणी करण्यात आली आणि त्यात मान्य असेल तर ठीक अन्य सोडून द्या असं धोरण ग्राहकांवर लादण्यात आले हे आढळले. ग्राहकांना बाहेर पडण्याचा पर्याय देण्यात आला नाही. ही स्पर्धा कायदा २००२ चे उल्लंघन करते. या आधारावर कंपनीला ₹२१३.१४ कोटी दंड ठोठावण्यात आला होता. त्याला सुप्रीम कोर्टात कंपनीने आव्हान दिले.
56 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Feb 3, 2026, 07:38 AM
भारताचा अर्थसंकल्पः केवळ आकडे नव्हे, तर विकासाचे साधन

भारताचा अर्थसंकल्पः केवळ आकडे नव्हे, तर विकासाचे साधन

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली: देशाचा अर्थसंकल्प हा केवळ आकड्यांचा खेळ नसून गुंतवणुकीला प्राधान्य देऊन देशाच्या विकासाला गती देणारे साधन आहे, असा ठाम विश्वास केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी व्यक्त केला. फ्युचर्स अँड ऑप्शन्स व्यवहारांवरील करात वाढ करून सरकारने सट्टेबाजीला लगाम घालण्याचा प्रयत्न केला आहे, असेही त्या म्हणाल्या. २०२६-२७ या वित्त वर्षाचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सीतारामन यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्याप्रसंगी त्यांनी हे वक्तव्य केले. वित्तीय तूट, सोन्याचे दर आणि शेअर बाजारातील सट्टेबाजीवर त्यांनी यावेळी महत्त्वपूर्ण भाष्य केले. सीतारामन यांनी सांगितले की, सरकारने वित्तीय तूट ४.३ टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. आमचे प्राधान्य विकासाला आहे. दरवर्षीच्या आर्थिक परिस्थितीनुसार तुटीचे लक्ष्य ठरवले जाते. सध्याच्या घडीला ठरविण्यात आलेले ४.३ टक्के हे लक्ष्य विकासकामांसाठी पोषक आहे. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या निर्गुंतवणुकीचा वेग कायम राहील असे सांगत सीतारामन यांनी म्हटले की, आयडीबीआय बँकेच्या खासगीकरणाची प्रक्रिया योग्य मार्गावर आहे. संभाव्य खरेदीदारांना गृहमंत्रालयाकडून सेक्युरिटी क्लिअरन्स देण्यात आला आहे. जीएसटी दर कपात आणि आयकरातील सवलतीमुळेवाढलेला उपभोग आगामी काळातही कायम राहील. सोन्याच्या वाढत्या किमतींबद्दल बोलताना सीतारामन म्हणाल्या की, जागतिक अनिश्चिततेमुळे जगभरातील मध्यवर्ती बँका सोन्यात गुंतवणूक करत आहेत. गुंतवणूकदारांचा कोणत्याही एका चलनावर पूर्ण विश्वास उरलेला नाही, म्हणूनच सोन्याची मागणी आणि भाव वाढत आहेत. देशातील बँकिंग आणि उद्योग क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले 'दिवाळखोरी आणि ऋण शोधन अक्षमता संहिता' (आयबीसी) दुरुस्ती विधेयक, २०२५ केंद्र सरकार अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात सादर करणार आहे. दिवाळखोरीशी संबंधित अर्जांना मंजुरी मिळवण्यासाठी लागणारा वेळ कमी करणे हे या दुरुस्तीचे मुख्य उद्दिष्ट आहे. २०१६ मध्ये लागू झालेल्या मूळ आयबीसी कायद्यातील ही सातवी दुरुस्ती असेल. सीतारामन यांनी सांगितले की, शेअर बाजारातील 'फ्युचर्स अँड ऑप्शन्स'मधील (एफअँडओ) वाढत्या सट्टेबाजी रोखण्यासाठी सरकारने कठोर पाऊल उचलले आहे. त्यासाठी या व्यवहारांवरील सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्समध्ये (एसटीटी) वाढ करण्यात आली आहे. अनेक पालकांचे फोन येतात की त्यांची मुले या व्यवहारात पैसे गमावत आहेत. तरुणांना या सट्टेबाजीच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी आणि त्यांना परावृत्त करण्यासाठी हा कर वाढवण्यात आला आहे.
59 shares
😐
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Feb 3, 2026, 07:30 AM
क्लास ऍक्शन खटल्यात वॉट्सअपचे एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन आगीच्या भक्ष्यस्थानी

क्लास ऍक्शन खटल्यात वॉट्सअपचे एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन आगीच्या भक्ष्यस्थानी

WhatsApp ची सर्वात मोठी ओळख मानल्या जाणाऱ्या एंड-टू-एंड एन्क्रिप्शनबाबत आता गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. US फेडरल कोर्टात दाखल केलेल्या क्लास अ‍ॅक्शन खटल्यात असा आरोप करण्यात आला आहे की WhatsApp आणि त्याची मूळ कंपनी मेटाला युजर्सच्या मेसेजमध्ये थेट प्रवेश आहे, तर कंपनी जाहीरपणे दावा करीत आहे की ते मेसेज वाचू शकत नाहीत.US District Court , Northern District of California मध्ये 23 जानेवारी रोजी हा खटला दाखल करण्यात आला होता. यात भारतातील अलका गौरसह भारतासह अनेक देशांतील फिर्यादींचा समावेश आहे. हे प्रकरण एप्रिल 2016 नंतर सर्वWhatsApp युजर्सचे प्रतिनिधित्व करण्याचाप्रयत्न करीत आहे, जरी अमेरिका, कॅनडा आणि युरोपमधील युजर्सना वगळण्यात आले आहे.काय आहेत आरोप?या खटल्यात असा दावा करण्यात आला आहे की, WhatsApp आणि मेटा युजर्सचे 'प्रायव्हेट' मेसेज स्टोरेज, अ‍ॅनालिसिस आणि अ‍ॅक्सेस करू शकतात. तक्रारीनुसार, मेटाने 'क्लेप्टोग्राफिक बॅकडोर' लागू केला आहे जो कंपनीच्या कर्मचाऱ्यांना अंतर्गत सिस्टमद्वारे युजर्स मेसेज पाहण्याची परवानगी देतो.फिर्यादींचा असा दावा आहे की हा प्रवेश केवळ मेटाडेटापुरता मर्यादित नाही, तर रिअल-टाईम मेसेज कंटेंटमध्ये देखील प्रवेश केला जाऊ शकतो. हा दावा कथित व्हिसलब्लोअर्सच्या माहितीवर आधारित आहे.मेटाच्या ट्रॅक रेकॉर्डवरही प्रश्नचिन्हया खटल्यात मेटाच्या जुन्या गोपनीयता विवादांचा देखील उल्लेख केला आहे, जसे कीCambridge Analytica स्कँडल, ज्यासाठी कंपनीला 2019 मध्ये 5 अब्ज डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला होता. युरोपमधील GDPR उल्लंघनासाठी 1.2 अब्ज डॉलर दंड देखील समाविष्ट आहे.WhatsApp चे प्रमुख Will Cathcart यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले की, WhatsApp मेसेज वाचू शकत नाही कारण Encryption Keys युजरच्या फोनमध्ये असते, कंपनीकडे नाही. त्यांनी या खटल्याचे वर्णन "निराधार आणि मथळे पकडणारे" असे केले.भारतासाठी हे प्रकरण महत्त्वाचे का आहे?हे प्रकरण भारतातील WhatsApp चा युक्तिवाद कमकुवत करू शकते, ज्यामध्ये कंपनीने आयटी नियम 2021 ला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले होते, असे म्हटले होते की संदेश ट्रेसिंग करणे एन्क्रिप्शन तोडण्यासारखे आहे. जर अमेरिकेच्या न्यायालयात हे आरोप खरे ठरले तर WhatsApp च्या या युक्तिवादावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते.याव्यतिरिक्त, जर मेटा संमतीशिवाय मेसेज कंटेंट हाताळत असल्याचे आढळून आले, तर त्याला डिजिटल वैयक्तिक Digital Personal Data Protection Act, 2023 अंतर्गत भरमसाठ दंड भरावा लागू शकतो.
85 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Feb 3, 2026, 06:57 AM
बाजारातील अस्थिरतेदरम्यान मोतीलाल ओसवाल यांनी 2026 साठी टॉप 5 स्टॉक निवडी उघड केल्या

बाजारातील अस्थिरतेदरम्यान मोतीलाल ओसवाल यांनी 2026 साठी टॉप 5 स्टॉक निवडी उघड केल्या

Top Stock Picks 2026 :शेअर बाजारातीलचढ-उतारांच्या पार्श्वभूमीवर, दिग्गज ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनीगुंतवणूकदारांसाठी५ दर्जेदार शेअर्सची निवड केली आहे. उत्तम तिमाही निकाल, वाढती मागणी आणि व्यवसायाचा विस्तार पाहता टाटा स्टील, एल अँड टी आणि बीईएल यांसारख्या शेअर्समध्ये येत्या काळात मोठी तेजी अपेक्षित आहे. १. टाटा स्टील : युरोपमधील सुधारणेचा फायदाटार्गेट प्राईस : २२० रुपयेदेशांतर्गत स्टीलची वाढती मागणी आणि युरोपमधील व्यवसायातील सुधारणा यामुळे टाटा स्टील 'मजबूत' स्थितीत आहे. ब्रिटनमधील ऑपरेशन्स २०२६ च्या चौथ्या तिमाहीपर्यंत नफ्यात येण्याची शक्यता आहे. ऑटोमोटिव्ह ग्रेड स्टीलच्या उत्पादनामुळे नफ्याचा टक्का वाढेल. २. लार्सन अँड टुब्रो (L&T) : पायाभूत सुविधांचा विस्तारटार्गेट प्राईस : ४,६०० रुपयेएल अँड टी कडे सध्या ५.९ लाख कोटी रुपयांची प्रचंड 'ऑर्डर बुक' आहे. हायड्रोकार्बन, रिन्युएबल एनर्जी आणि डेटा सेंटर्समधील संधी पाहता कंपनीच्या महसुलात २२% वाढीचा अंदाज आहे. अणू ऊर्जा क्षेत्रातील संधींवरही कंपनीचे लक्ष आहे. ३. भारत इलेक्ट्रॉनिक्स (BEL) : संरक्षण क्षेत्रातील 'वर्चस्व'टार्गेट प्राईस : ५२० रुपये७३,००० कोटी रुपयांच्या ऑर्डर्स हाती असल्याने संरक्षण क्षेत्रातील ही कंपनी तेजीत आहे. आकाश क्षेपणास्त्र प्रणाली आणि नौदलाच्या नव्या ऑर्डर्समुळे कंपनीचा नफा १६% दराने वाढण्याची शक्यता आहे. सेमीकंडक्टर टंचाईचा कोणताही परिणाम कंपनीवर झालेला नाही. ४. डेल्लीवरी (Delhivery) : लॉजिस्टिक क्षेत्रातील 'किंग'टार्गेट प्राईस : ५७० रुपये'इकॉम एक्सप्रेस'च्या संपादनानंतर दिल्लीवरीचा बाजारपेठेतील हिस्सा वाढला आहे. तिसऱ्या तिमाहीत कंपनीने ७.४% एबिटा मार्जिन नोंदवून सर्वांना चकित केले. 'दिल्लीवरी डायरेक्ट' आणि 'रॅपिड' यांसारख्या नव्या सेवांमुळे नफ्यात ५४% वाढ अपेक्षित आहे. ५. होम फर्स्ट फायनान्स : परवडणाऱ्या घरांचे स्वप्नटार्गेट प्राईस : १,३७० रुपयेपरवडणाऱ्या घरांच्या कर्ज क्षेत्रात ही कंपनी आघाडीवर आहे. कंपनीच्या कर्जाचा विस्तार २५% दराने होण्याची शक्यता असून, शाखा विस्ताराचा फायदा नफा वाढवण्यासाठी होईल. मोतीलाल ओसवाल यांच्या मते, या पाचही कंपन्यांचे व्यवसायाचे मॉडेल भक्कम असून आगामी दोन ते तीन वर्षे हे शेअर्स पोर्टफोलिओला मोठी ताकद देऊ शकतात. विशेषतः पायाभूत सुविधा आणि उत्पादन क्षेत्रातील सरकारी धोरणांचा या कंपन्यांना थेट लाभ मिळत आहे.वाचा -कर्ज स्वस्त होणार की प्रतीक्षा वाढणार? आरबीआयच्या पतधोरण समितीच्या बैठकीकडे सर्वांचे डोळे (टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हागुंतवणूकीचासल्ला नाही.शेअर बाजारातीलगुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
100 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Feb 3, 2026, 06:06 AM
आरबीआय एम. पी. सी. ची बैठकः सरकारने वित्तीय तुटीवर लक्ष केंद्रित केल्यामुळे रेपो दरात कपात होण्याची शक्यता नाही

आरबीआय एम. पी. सी. ची बैठकः सरकारने वित्तीय तुटीवर लक्ष केंद्रित केल्यामुळे रेपो दरात कपात होण्याची शक्यता नाही

RBI MPC Meeting :भारतीय रिझर्व्हबँकेच्यापतधोरण समितीची अत्यंत महत्त्वाची बैठक उद्या, ४ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. ६ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या तीन दिवसीय बैठकीत रेपो रेट आणि देशाच्या आर्थिक स्थितीबाबत मोठे निर्णय घेतले जाणार आहेत. मागील वर्षभरात रेपो रेटमध्ये झालेल्या मोठ्या कपातीनंतर, आता नवीन वर्षाच्या या पहिल्या तिमाहीत आरबीआय काय पवित्रा घेते, याकडे सर्वसामान्यांपासून कॉर्पोरेट जगताचे लक्ष लागले आहे. यंदा कपातीची शक्यता धूसर!बहुतेक तज्ज्ञ आणि अर्थतज्ज्ञांच्या मते, आरबीआय या वेळी रेपो रेटमध्ये कोणतीही कपात करण्याची शक्यता कमी आहे. डीबीएसबँकेच्यावरिष्ठ अर्थतज्ज्ञ राधिका राव यांच्या मते, सरकार सध्या राजकोषीय तूट कमी करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. अशा स्थितीत आरबीआय तूर्तास मौद्रिक धोरणात मोठा बदल करण्याऐवजी 'वेट अँड वॉच'ची भूमिका घेऊ शकते. जर रेपो रेट आहे तसाच राहिला, तर गृहकर्ज किंवा वाहन कर्ज घेणाऱ्यांना ईएमआयमध्ये सध्या कोणतीही सवलत मिळणार नाही. रेपो रेटमधील घसरणीचे वर्ष२०२५ हे वर्ष कर्जदारांसाठी अतिशय दिलासादायक ठरले होते. या वर्षभरात आरबीआयने एकूण चार वेळा रेपो रेटमध्ये कपात केली होती.फेब्रुवारी आणि एप्रिल २०२५ : प्रत्येकी २५ बेसिस पॉईंटची कपात करण्यात आली.जून २०२५ : आरबीआयने आक्रमक पवित्रा घेत थेट ५० बेसिस पॉईंटची मोठी कपात केली.डिसेंबर २०२५ : वर्षाच्या अखेरीस पुन्हा २५ बेसिस पॉईंटची कपात झाल्याने रेपो रेट ५.२५ टक्क्यांवर स्थिर झाला.ऑगस्ट आणि ऑक्टोबर २०२५ च्या बैठकीत आरबीआयने कोणताही बदल केला नव्हता. रेपो रेटचा प्रवास एका नजरेत (२०२५-२६) वाचा -सलग ३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक! चांदीत १८ हजारांची वाढ; तर सोन्यातही मोठी उसळी गव्हर्नरसंजय मल्होत्राकाय भूमिका घेणार?६ फेब्रुवारी रोजी आरबीआयचे गव्हर्नरसंजय मल्होत्राबैठकीचे निकाल जाहीर करतील. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर लगेच ही बैठक होत असल्याने, महागाई नियंत्रण आणि विकासदर यांच्यातील समतोल राखण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असेल. अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हचे निर्णय आणि जागतिक परिस्थितीचाही या निर्णयावर परिणाम होऊ शकतो.
39 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Feb 3, 2026, 05:20 AM
नैसर्गिक आपत्तीदरम्यान धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी फळबाग योजनेच्या माध्यमातून भरभराटीला आले

नैसर्गिक आपत्तीदरम्यान धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी फळबाग योजनेच्या माध्यमातून भरभराटीला आले

बाळासाहेब माने निसर्गाचा लहरीपणा आणि सततच्या दुष्काळामुळेधाराशिवजिल्ह्यातील बहुतांशशेतकरीआता फळबाग लागवडीकडे वळले आहेत. 'भाऊसाहेब फुंडकर योजने' अंतर्गत गत चार वर्षात १ हजार ७७७ शेतकऱ्यांनी १ हजार १२२ हेक्टरवर आंबा, पेरू यासह इतर १६ फळांची लागवड केली आहे. शासनाच्या १०० टक्के अनुदानामुळे जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला शाश्वत आधार मिळत आहे. महा डीबीटी पोर्टलद्वारे ऑनलाइन अर्ज करून शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला असून, यामुळेशेतीउत्पादनात मोठी वाढ होत आहे. गत काही वर्षांपासूनधाराशिवजिल्ह्याला निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका बसला आहे. कथी ओला दुष्काळ, तर कधी अवकाळी पाऊस यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे. यामुळे जिल्ह्यातीलशेतकरीआर्थिक संकटात सापडला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी कृषी विभागाने भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना राबवली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून २०२२-२३ ते २०२५ २६ या आर्थिक वर्षात तब्बल १ हजार ७७७ शेतकऱ्यांनी १ हजार १२२ हेक्टरवर फळबाग योजनेतून आपलीशेतीफुलवली आहे. पारंपरिक सोयाबीन, कापूस आणि ऊस या पिकांपलीकडे जाऊन फळबाग लागवडीला प्राधान्य दिले जात असून, आंबा, पेरू आणि सीताफळ यांसह इतर फळझाडांची लागवड केली आहे. यामध्ये २०२३-२४ मध्ये सर्वाधिक ९७१ शेतकऱ्यांनी ६४४ हेक्टरवर विविध फळबागांची लागवड केली आहे. तालुकानिहाय चार वर्षांतील फळबाग लागवड क्षेत्र (हेक्टर) लागवडीसाठी १०० टक्के मिळतेय अनुदान • शासनाच्या 'भाऊसाहेब फुंडकर योजने' अंतर्गत आंबा, पेरू, संत्रा यासह १६ फळपिकांसाठी १०० टक्के अनुदान दिले जाते. यात खड्डे खोदणे व रोपे खरेदीसाठी ३ वर्षांत ५०:३०:२० या टप्प्यात • रक्कम थेट खात्यात जमा होते. इच्छुक शेतकऱ्यांनी 'महा डीबीटी' पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करून उत्पन्न वाढीच्या या संधीचा लाभघेतला आहे. शेतकऱ्यांनी बाजारपेठेची मागणी ओळखून उत्पादन घेतले पाहिजे. कृषी विभागातील फळबागांच्या लागवडीसाठी उपलब्ध केलेल्या योजनेचा लाभ घेऊन समृद्धी साधावी. नगदी पिकाकडे वळल्यास अधिक नफा मिळवता येतो.-राजकुमार मोरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, धाराशिव. हेही वाचा : मंदीच्या लाटेत देखील 'हा' शेतकरी म्हणतोय मेथीची एक जुडी देतेय ५० रुपयांचे उत्पन्न; वाचा सविस्तर
70 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Feb 3, 2026, 04:26 AM
भारत-अमेरिका व्यापार कराराने दरांमध्ये मोठी कपात आणि नवीन तेल आयात समीकरणासह विक्रम मोडले

भारत-अमेरिका व्यापार कराराने दरांमध्ये मोठी कपात आणि नवीन तेल आयात समीकरणासह विक्रम मोडले

India-US Trade Deal :भारत आणि अमेरिका यांच्यातील ऐतिहासिक व्यापारी करारामुळे आज भारतीयशेअर बाजारानेसर्व विक्रम मोडीत काढले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय उत्पादनांवरील आयात शुल्क ५० टक्क्यांवरून थेट १८ टक्क्यांपर्यंत कमी करण्याची घोषणा करताचगुंतवणूकदारांनीबाजारात खरेदीचा अक्षरशः पाऊस पाडला. बाजार उघडताच अवघ्या काही मिनिटांत मुंबईशेअर बाजारातीलसूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल १३.३७ लाख कोटी रुपयांनी वाढले असून,निफ्टीनेएकाच दिवसात १००० अंकांच्या ऐतिहासिक वाढीकडे कूच केली आहे. काय आहे ही 'महा-डील'?पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील चर्चेनंतर या करारावर शिक्कामोर्तब झाले.१. टॅरिफमध्ये मोठी कपात : अमेरिकेने भारतीय वस्तूंवर लादलेले ५०% टॅरिफ आता केवळ १८% असेल. यामुळे भारतीय कंपन्यांची निर्यात स्वस्त होऊन नफ्यात मोठी वाढ होणार आहे.२. तेल आयातीचे नवे समीकरण : भारताने रशियाकडून तेल खरेदी कमी करून अमेरिका आणि व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करण्यास सहमती दर्शवली आहे. या धोरणात्मक बदलामुळे जागतिक राजकारणात भारताचे वजन वाढले आहे. बाजारातील 'सुनामी' आकडेवारी वाचा -बँकिंग क्षेत्रात 'FDI'चा धमाका! सरकारी बँकांमध्ये ४९% परकीय गुंतवणुकीचा प्रस्ताव; अर्थमंत्रालयाचे मोठे पाऊल गुंतवणूकदारमालामाल!सोमवारी (२ फेब्रुवारी) बीएसईवर नोंदणीकृत कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप ४५५.०३ लाख कोटी रुपये होते. आज (३ फेब्रुवारी) बाजार उघडताच ते ४६८.४० लाख कोटी रुपयांवर पोहोचले. म्हणजेच एकाच दिवसात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत १३,३७,०९१ कोटी रुपयांची भर पडली आहे. विशेष म्हणजे 'गिफ्ट निफ्टी' २६,१५० च्या पार गेल्याने आज बाजार विक्रमी पातळीवर बंद होण्याची दाट शक्यता आहे.
87 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Feb 3, 2026, 02:16 AM
डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी भारताच्या अर्थसंकल्पात 2,000 कोटी रुपयांच्या अनुदानाची तरतूद

डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी भारताच्या अर्थसंकल्पात 2,000 कोटी रुपयांच्या अनुदानाची तरतूद

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली: डिजिटल इंडियाचा कणा असलेल्या 'यूपीआय'वर कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात यूपीआय आणि रुपे डेबिट कार्डला प्रोत्साहन देण्यासाठी २,००० कोटी रुपयांच्या सबसिडीची घोषणा केली असून, यामुळे युपीआय व्यवहार मोफतच राहतील, अशी ग्वाही वित्तीय सेवा सचिव एम. नागराजू यांनी सोमवारी दिली. केंद्रीय अर्थमंत्रीनिर्मला सीतारामनयांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात डिजिटल पेमेंटसाठी भरीव तरतूद केली आहे. या पार्श्वभूमीवर नागराजू यांनी डिजिटल व्यवहार, बँकिंग सुधारणा आणि सायबर सुरक्षेबाबत महत्त्वाची माहिती दिली. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची स्थिती मजबूत करण्यासाठी सरकार एक मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. सरकारी बँकांमधील थेट परकीय गुंतवणुकीची (एफडीआय) मर्यादा सध्याच्या २० टक्क्यांवरून वाढवून ४९ टक्के करण्याचा विचार अर्थ मंत्रालय करत आहे. याबाबत विविध मंत्रालयांमध्ये चर्चा सुरू असून, यामुळे बँकांचा भांडवली पाया अधिक भक्कम होण्यास मदत होईल, असे नागराजू यांनी स्पष्ट केले.
9 shares
😐
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Feb 3, 2026, 12:30 AM
भारताच्या अर्थसंकल्पातील बदलांमुळे उत्पादन खर्च कमी झाल्याने आयफोन स्वस्त होऊ शकतात

भारताच्या अर्थसंकल्पातील बदलांमुळे उत्पादन खर्च कमी झाल्याने आयफोन स्वस्त होऊ शकतात

अर्थसंकल्पातील काही बदलांमुळे तुम्हाल देखील वाटत असेल की आयफोन स्वस्त मिळणार की नाही, चला तर मग या प्रश्नाचे उत्तर आज जाणून घेऊया. 2026 च्या अर्थसंकल्पात सरकारने कर बदल केला आहे, ज्यामुळे भारतात आयफोन उत्पादनाला गती मिळू शकते.नव्या नियमानुसार, परदेशी कंपन्या आता अतिरिक्त कर जोखीम न घेता त्यांच्या कंत्राटी उत्पादकांना मशीन उपलब्ध करून देऊ शकतील. अ‍ॅपल आणि त्याचे भागीदार फॉक्सकॉन आणि टाटा यांच्यासाठी हे पाऊल थेट फायदेशीर मानले जात आहे.भारताला इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाचे प्रमुख निर्यात केंद्र बनविणे हे सरकारचे उद्दीष्ट आहे.अशा परिस्थितीत भारतात आयफोनचीमॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट कमी होऊ शकते आणि त्याचा परिणाम त्याच्या किंमतीवरही दिसून येईल.यंत्रसामग्रीवरील कराचा धोका दूर झालासरकारने स्पष्ट केले आहे की, जर एखादी परदेशी कंपनी भारतात आपल्या कंत्राटी उत्पादकांना यंत्रसामग्री किंवा उपकरणे पुरवत असेल तर केवळ मालकी आहे म्हणून त्यावर कर आकारला जाणार नाही. यापूर्वी अ‍ॅपलला भीती वाटत होती की, मशीनच्या मालकीवर त्याच्या नफ्याला बिझनेस कनेक्शन म्हणून मानून कर आकारला जाऊ शकतो. या कारणास्तव, आतापर्यंत फॉक्सकॉन आणि टाटासारख्या भागीदारांना स्वत: मशीनवर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी लागत होती. नवीन नियमामुळे हा अडथळा दूर करण्यात आला आहे. यामुळे उत्पादन सेटअप करणे सोपे आणि वेगवान होईल.कस्टम बॉन्डेड क्षेत्रातील कारखान्यांना मिळणार लाभही कर सवलत केवळ त्या कारखान्यांना लागू होईल जेकस्टम बॉन्डेड क्षेत्रात उभारलेले आहेत. हे भाग तांत्रिकदृष्ट्या भारताच्या सीमाशुल्क सीमेबाहेर मानले जातात. जर येथे तयार होणारी उत्पादने भारतात विकली जातात तर त्यांच्यावर आयात कर आकारला जाईल. म्हणूनच, निर्यातभिमुख उत्पादनासाठी हे मॉडेल विशेष फायदेशीर आहे. भारताकडून जागतिक पुरवठा वाढवण्यावर सरकारचे लक्ष स्पष्ट आहे. यामुळे इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीला बळकटी मिळेल.इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनावर सरकारचे मोठे लक्षस्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन वाढविणे हा सरकारच्या प्रमुख औद्योगिक अजेंड्याचा एक भाग आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून अ‍ॅपलने कर कायद्यात बदल करण्याची मागणी केली होती. सध्याच्या नियमांचा भविष्यातील गुंतवणूकीवर परिणाम होऊ शकतो, अशी भीती कंपनीला होती. 2026 च्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेला हा बदल 2030-31 च्या कर वर्षापर्यंत लागू असेल. यामुळे जागतिक कंपन्यांचा आत्मविश्वास वाढेल, असा विश्वास टॅक्स तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. मोठ्या प्रमाणात उच्च दर्जाच्या उत्पादनासाठी भारत हा एक आकर्षक पर्याय असेल.भारत अ‍ॅपलचे नवीन उत्पादन केंद्र बनत आहेअ‍ॅपल चीनच्या बाहेर आपली पुरवठा साखळी वाढविण्याचे काम करत आहे आणि भारत त्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. रिसर्च फर्म काउंटरपॉइंटच्या मते, 2022 नंतर भारतातील आयफोनचा मार्केट शेअर दुप्पट होऊन 8 टक्के झाला आहे. जागतिक आयफोन शिपमेंटमध्ये भारताचा वाटा देखील वेगाने वाढला आहे. जिथे पूर्वी सर्वाधिक उत्पादन चीनमध्ये होत असे, तिथे आता भारताचे योगदान सातत्याने वाढत आहे. नवीन कर नियम या प्रवृत्तीला आणखी बळकटी देऊ शकतात. यामुळे जागतिक आयफोन उत्पादनाच्या नकाशावर भारताची भूमिका आणखी मोठी होईल.
50 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Feb 3, 2026, 12:27 AM
आत्मनिर्भर भारत उपक्रमामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला चालना मिळाली

आत्मनिर्भर भारत उपक्रमामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला चालना मिळाली

मंत्री राणे म्हणाले, अमेरीकेने जो टॅरीफ लादला, त्यानंतर पंतप्रधानांनी आत्मनिर्भर भारतच्या माध्यमातून देशाची अर्थव्यवस्था गतीमान करण्यासाठी बुस्टर डोस दिला आहे. आम्ही लोकसभेमध्ये आग्रह करत होतो की आपल्याला एक ताकदीचा लोकप्रतिनिधी निवडून द्यायचा आहे. त्यानुसार आपण माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना निवडून दिले. त्याचा मोठा फायदा आपल्याला केंद्र सरकारच्या माध्यमातून झाला आहे. आता पुढची चार वर्षे आम्हाला हे सगळ्याच्या अंमलबजावणी करण्यासाठी भरपूर वेळ आहे. येणाऱ्या चार वर्षांमध्ये कोकणचा कायापालट झालेला निश्चित दिसेल असेही मंत्री राणे म्हणाले.
63 shares
😊
Pudhari logo
Pudhari
Feb 3, 2026, 12:07 AM
कोकण अर्थव्यवस्थेला चालना-मच्छीमार आणि स्थानिक उद्योगांसाठी मोदी सरकारचे सकारात्मक निर्णय

कोकण अर्थव्यवस्थेला चालना-मच्छीमार आणि स्थानिक उद्योगांसाठी मोदी सरकारचे सकारात्मक निर्णय

येथील ‌‘ओमगणेश‌’ निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मंत्री राणे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने अर्थ संकल्पाच्या माध्यमातून कोकणसाठी, सिंधुदुर्गच्या विकासासाठी मोठी चालना दिली आहे. अर्थसंकल्पात प्रामुख्याने कोकणाच्या अर्थकारणाच्या दृष्टिकोनातून मच्छीमार, नारळ, काजू उत्पादनासाठी सकारात्मक निर्णय घेतले आहेत, ज्याच्यावर कोकणचे अर्थकारण अवलंबून आहे. या तिन्ही क्षेत्रांच्या माध्यमातून चालना देताना निधीची तरतूद ही कोकणच्या जनतेचे दरडोई उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय योग्य आहे. मच्छीमारांना प्रोत्साहन देण्यासाठी 500 नवीन तलावांची अर्थसंकल्पामध्ये तरतूद आहे. याचाच अर्थ मच्छिमारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीवरील मच्छिमारांना याचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे.
67 shares
😊
Pudhari logo
Pudhari
Feb 3, 2026, 12:06 AM
अमेरिकेचे दर आणि सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने पर्यायी व्यापार भागीदारांची मागणी केली

अमेरिकेचे दर आणि सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने पर्यायी व्यापार भागीदारांची मागणी केली

अमेरिकन शुल्क अन् चीनचा दबाव अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून आयात होणार्‍या बहुतांश वस्तूंवर 50 टक्के शुल्क लादल्यानंतर भारताला या बदलाची तीव्र जाणीव झाली. चीनकडून जागतिक बाजारपेठेत येणारा स्वस्त माल आणि सीमारेषेवरील तणाव यामुळे भारताला पर्यायी भागीदारांची नितांत गरज आहे. चीनकडे दुर्मिळ खनिजे किंवा सेमीकंडक्टरसारख्या पुरवठा साखळीतील ‘चोक पॉइंट्स’ असल्याने भारत तुलनेत कमकुवत ठरतो.
72 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Feb 2, 2026, 11:00 PM
भारताच्या पायाभूत सुविधा विकास योजनेचे उद्दिष्ट आर्थिक विकासाला चालना देणे

भारताच्या पायाभूत सुविधा विकास योजनेचे उद्दिष्ट आर्थिक विकासाला चालना देणे

यामुळे देशातील कारखानदारीत त्यांचा कच्चा माल वेगाने आणला जाईल आणि तयार माल त्याच गतीने बाजारात पाठवता येईल. निर्यातदारांच्या द़ृष्टीनेदेखील हे लाभदायक आहे. विकसित भारताचे लक्ष्य साध्य करण्यासाठी अर्थसंकल्पात 12 लाख 21 हजार कोटी रुपयांचा भांडवली खर्च करण्यात येणार आहे. यात इतर सहायक अनुदानांची भर टाकली, तर एकूण जीडीपीतील या खर्चाचे प्रमाण आता 4.4 टक्के इतके झाले आहे. 2017-18 मध्ये ते केवळ 2.7 टक्के होते. पायाभूत सुविधांसाठी एक रुपया खर्च केला, तर जीडीपीत अडीच ते साडेतीन रुपयांची वाढ होते, असे आर्थिक पाहणी अहवालातच म्हटलेले होते. खरे तर, कधी तेजी, तर कधी मंदी. कधी उत्साह, तर कधी नरमाई. कधी खरेदी, तर कधी विक्री. कधी गर्दी, तर कधी बाजार ओस, असे घडतच असते. गतवर्षीही अर्थसंकल्पानंतर घसरण झालीच होती. 1996 साली अशीच उतरण पाहण्यात आली होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी चीनसह अन्य देशांवर भरमसाट कर लावण्यास सुरुवात केल्यामुळे, व्यापारयुद्ध भडकले होते आणि त्याचे प्रतिबिंब भारतीय भांडवली बाजारातही पडले.
8 shares
😐
Loksatta logo
Loksatta
Feb 2, 2026, 03:35 PM
कोरेगाव पार्क जमीन घोटाळा प्रकरणात शीतल तेजवानी यांच्याविरोधात पुणे ई. ओ. डब्ल्यू. ने दाखल केले आरोपपत्र

कोरेगाव पार्क जमीन घोटाळा प्रकरणात शीतल तेजवानी यांच्याविरोधात पुणे ई. ओ. डब्ल्यू. ने दाखल केले आरोपपत्र

पुणे :कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवानीविरुद्ध एक हजार ८८६ पानाांचे आरोपपत्र आर्थिक गुन्हे शाखेकडून न्यायालयात सादर करण्यात आले. ‘या प्रकरणात अन्य आराेपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, लवकरच त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात येईल’, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले. कोरेगाव पार्क (मुंढवा ) जमीन गैरव्यवहार तेजवानी मुख्य आरोपी आहे. पार्थ पवार संचालक असलेल्या अमेडिया कंपनी, तसेच संचालक दि्ग्विजय पाटील, शीतल तेजवानी, निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले. हेमंत गवंडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘जमीन गैरव्यवहार प्रकरणात मुख्य सूत्रधार तेजवानीविरुद्ध पुरावे गोळा करण्यात आले. त्याअनुषंगाने पोलिसांनी जबाब नोंदविले. दरम्यान, या प्रकरणात दिग्विजय पाटील यांच्यसह अन्य आरोपींविरुद्ध पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. लवकरच त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात येईल’, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले. पोलीस निरीक्षक अजय वाघमारे आणि पथकाने न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहार प्रकरणात यापूर्वी दिग्विजय पाटील, शीतल तेजवानी, हेमंत गवंडे यांना नोटीस बजावून चौकशीसाठी बोलाविण्यात आले होते. गवंडे चौकशीसाठी उपस्थित राहिले होते. या प्रकरणात तेजवानीची पोलिसांनी सलग दोन दिवस चौकशी केली. तेजवानीने दिलेल्या जबाबाचे अवलोकन करण्यात आले. याप्रकरणात विविश शासकीय विभागांकडून कागदपत्रे मागविण्यात आली. या कागदपत्रांची केल्यानंतर गैरव्यवहार प्रकरणात तेजवानी सामील असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर तिला करण्यात आली. ‘अमेडिया’कंपनीने कोरेगाव पार्क भागातील ४० एकर जमीन अनियमितपणे खरेदी केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातंर्गत बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. मात्र, बोपोडीतील जमीन प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात शीतल तेजवानी आणि ‘अमेडिया’कंपनीचा संबंध नसल्याचेपुणेपोलिसांनी यापूर्वी स्पष्ट केले होते. कोरेगाव पार्क जमीन प्रकरणात तेजवानींचा जबाब नोंदविण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. कोरेगाव पार्क (मुंढवा) जमीन प्रकरणात २७५ वारसदार आहे. ही जमीन कुलमुख्यारपत्र करुन शीतल तेजवानी यांना संबंधित व्यक्तींनी दिली होती.
40 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Feb 2, 2026, 02:56 PM
भारताच्या विमान वाहतूक क्षेत्राला गतीः केंद्रीय आर्थिक ठराव 2026 कर सवलती देऊ करतो

भारताच्या विमान वाहतूक क्षेत्राला गतीः केंद्रीय आर्थिक ठराव 2026 कर सवलती देऊ करतो

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर:केंद्रीयअर्थसंकल्प २०२६मध्ये विमान क्षेत्रासाठी प्लास्टिक, कंपोझिट मटेरियल व अॅल्युमिनियम अलॉय, टेपिंग आदींच्या करात सवलत देण्यात आल्याने नागपुरात विमाने तयार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जाणकरांच्या मते, ही मोठी सूट असून विमानांचे स्पेअरपार्ट तयार करणारे व त्यांची देखभाल दुरुस्ती करणारे युनिट आता विमाने तयार करण्यासाठी संशोधन व विकासाचे काम करू शकणार आहेत. यामुळे 'मेक इन इंडिया'ला प्रोत्साहन मिळून नागपुरातील सर्वात मोठ्या दोन 'एमआरओ'ला फायदा होणार आहे. त्यासोबतच राफेल हे लढाऊ विमान तयार करणारी कंपनीही यामुळे सक्रिय होणार आहे. आतापर्यंत विमानांसाठी प्लास्टिक व कंपोझिट मटेरियलवर ३५ टक्के कर आणि अॅल्युमिनियम अलॉय, टेपिंग आदींसाठी ७.५ टक्के कस्टम ड्युटी आकारण्यात येत होती. मागील आणि या वर्षाच्या सुरुवातीलाच झालेल्या विमान अपघातानंतर हा एक मोठा पुढाकार असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे देशातील विमान क्षेत्राला नव्या पद्धतीने 'टेक ऑफ' करण्याची संधी मिळाली आहे. मिहान-सेझ क्षेत्रात विजेसह विविध सवलती मिळत आहेत. दरम्यान, कच्च्या मालावर लागणाऱ्या करात सूट मिळाल्याने नवे मॉडेल व नव्या तंत्रज्ञानाची विमाने तयार करण्यासाठी संशोधन करणे सुलभ झाले आहे. नागपुरात एक एआयईएसएलचे एमआरओ तसेच इंडामेट एव्हिएशन टेक्निक्स प्रा. लि.चे एमआरओ आहे. याशिवाय डीआरएएलचे एक युनिटही आहे. येथे राफेल लढाऊ विमाने तयार केली जात आहेत. संरक्षण क्षेत्रासाठी अशा उपाययोजनांद्वारे संरक्षण युनिट्सद्वारे देखभाल, दुरुस्ती आणि ओव्हरहॉलसह इतर गरजांसाठी वापरल्या जाणाऱ्या विमानांच्या सुट्या भागांच्या निर्मितीसाठी कच्च्या मालावर कस्टम ड्यूटीत सवलत मिळाल्यास उत्पादन प्रक्रियेला गती मिळणार आहे. हे आहेत महत्त्वाचे मुद्दे
6 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Feb 2, 2026, 02:52 PM
भारत सरकारने कच्च्या तंबाखूवरील केंद्रीय उत्पादन शुल्क रद्द केले

भारत सरकारने कच्च्या तंबाखूवरील केंद्रीय उत्पादन शुल्क रद्द केले

केंद्र सरकारने १ फेब्रुवारी २०२६ रोजी एक महत्त्वाची अधिसूचना जारी करून तंबाखू आणि तंबाखूच्या कचऱ्यावरील १८% केंद्रीय उत्पादन शुल्क पूर्णपणे हटवले आहे. या निर्णयामुळे असंघटित क्षेत्रातील तंबाखू उत्पादक आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी, शेअर बाजारातील दिग्गज तंबाखू कंपन्यांच्या गुंतवणूकदारांसाठी मात्र महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सरकारने उत्पादन शुल्काची रचना दोन श्रेणींमध्ये विभागली आहे. यामध्ये शून्य शुल्क (०%) जे तंबाखू उत्पादन ब्रँडेड नाही आणि किरकोळ विक्रीसाठी पॅक केलेले नाही, अशा कच्च्या तंबाखूवर आता कोणताही कर लागणार नाही. दुसरे ब्रँडेड तंबाखू किंवा किरकोळ विक्रीसाठी पॅक केलेल्या उत्पादनांवर १८% उत्पादन शुल्क पूर्वीप्रमाणेच लागू राहील. बड्या कंपन्यांच्या शेअर्सवर परिणाम होणार का?या निर्णयाचा ITC आणि गॉडफ्रे फिलिप्स सारख्या कंपन्यांच्या शेअर्सवर सकारात्मक परिणाम होणार नाही. या कंपन्या ब्रँडेड तंबाखूचा व्यापार करतात यामुळे सरकारचा हा निर्णय या कंपन्यांच्या उत्पादनांना लागू होणार नाही. हा निर्णय केवळ सुट्या तंबाखूवर लागू होणार आहे. या कंपन्यांच्या शेअर्सच्या कामगिरीवर या निर्णयाचा कोणताही थेट प्रभाव पडण्याची शक्यता कमी आहे. कच्च्या तंबाखुचा व्यापार करणारे छोटे व्यापारी आणि शेतकरी यांना थेट लाभ मिळणार आहे. अशा तंबाखू आणि उत्पादनांच्या आयातीवर लागणाऱ्या सीमा शुल्कातही कपात होणार आहे.
35 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Feb 2, 2026, 02:03 PM
भारताच्या आरोग्य व्यवस्थेला'2026-27'साठी ₹1,05,'530.42'कोटीची वाढ, दुर्गम भाग आणि विदर्भ विकासावर लक्ष केंद्रित

भारताच्या आरोग्य व्यवस्थेला'2026-27'साठी ₹1,05,'530.42'कोटीची वाढ, दुर्गम भाग आणि विदर्भ विकासावर लक्ष केंद्रित

सुमेध वाघमारेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर:केंद्रीयअर्थसंकल्प २०२६-२७ मध्ये देशाच्या आरोग्य व्यवस्थेसाठी १,०५,५३०.४२ कोटींची तरतूद करण्यात आली असून मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे ८.९६ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. या वाढीव निधीमुळे दुर्गम भागांतील आरोग्यसेवा मजबूत करण्यावर भर देण्यात आला असून त्याचा सकारात्मक परिणाम विदर्भावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः 'प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजने'तून (पीएमएसएसवाय)नागपूरच्याअखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचा (एम्स) विस्तार होण्याची शक्यता बळावली आहे. दुर्गम जिल्हे, अपुरी सुपर स्पेशालिटी सुविधा आणि मोठ्या शहरांवर असलेले उपचारांचे अवलंबित्व ही विदर्भाची जुनी समस्या आहे. अशा परिस्थितीत 'पीएमएसएसवाय 'अंतर्गत वाढलेली तरतूद विदर्भात नुकत्याच स्थापन झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना अप्रत्यक्षपणे बळ देणारी ठरू शकते असा विश्वास व्यक्त केला जात आहे. नागपूर 'एम्स'साठी स्वतंत्र घोषणा नसली तरी 'पीएमएसएसवाय' अंतर्गत तरतुदीमुळे विस्तार व अपग्रेडेशनसाठी अनुकूल वातावरण तयार झाल्याचे मानले जात आहे. असे झाल्यास पायाभूत सुविधा, अत्याधुनिक उपकरणे, तज्ज्ञ डॉक्टर आणि विशेष उपचार विभाग वाढण्याची शक्यता तज्ज्ञाकडून व्यक्त केली जात आहे. रुग्णांची धावपळ कमी होण्याची अपेक्षा मुंबई किंवा दिल्लीपर्यंत उपचारासाठी जाण्याची वेळ अनेक रुग्णांवर येते. नागपूर एम्स आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे टप्याटप्प्याने होणारे अपग्रेडेशन यामुळे गंभीर आजारांवरील उपचार स्थानिक पातळीवर उपलब्ध होऊ शकतात, उपचाराचा खर्च आणि वेळ कमी होऊ शकतो, ग्रामीण भागातील रुग्णांना त्वरित सेवा मिळू शकते. वैद्यकीय शिक्षणालाही चालना आरोग्य क्षेत्रातील वाढीव गुंतवणुकीमुळे नवीन अभ्यासक्रम, संशोधनाच्या संधी, रेसिडेन्सी आणि सुपर-स्पेशालिटी प्रशिक्षण यांना गती मिळण्याची शक्यता आहे. यामुळे विदभातून बाहेर जाणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी होऊन स्थानिक आरोग्य व्यवस्थेत मनुष्यबळ वाढू शकते.
61 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Feb 2, 2026, 01:06 PM
ए. आय. डेटा सेंटरच्या आव्हानांदरम्यान ओरॅकल मोठ्या प्रमाणावर कामावरून काढून टाकण्याची तयारी करत आहे

ए. आय. डेटा सेंटरच्या आव्हानांदरम्यान ओरॅकल मोठ्या प्रमाणावर कामावरून काढून टाकण्याची तयारी करत आहे

Layoff News:आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी ओरेकल (Oracle) सुमारे 20 ते 30 हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्याच्या तयारीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अहवालानुसार, ही कपात कंपनीच्या AI डेटा सेंटर प्रकल्पांशी संबंधित पुनर्रचनेचा भाग असू शकते. CIO (Chief Information Officer) च्या अहवालानुसार, ओरेकल आपल्या काही मालमत्ता विकण्याचा विचार करत असून, यामागे अमेरिकन बँकांनी कंपनीच्या AI डेटा सेंटर प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्यास अनिच्छा दर्शवणे, हे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे. AI रिस्ट्रक्चरिंगच्या पार्श्वभूमीवर कपात काही दिवसांपूर्वीचअ‍ॅमेझॉनकडून16 हजार कर्मचाऱ्यांच्या कपातीची घोषणा करण्यात आली होती. त्या कपातीमागेही AI आधारित रिस्ट्रक्चरिंग प्लॅन असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे टेक सेक्टरमध्ये AI मुळे नोकऱ्यांवर वाढता ताण स्पष्टपणे दिसून येतोय. ओरेकलच्या आर्थिक क्षमतेवर गुंतवणूकदारांचा प्रश्नचिन्ह CIO च्या अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की, ओरेकलच्या इक्विटी आणि कर्ज देणाऱ्या गुंतवणूकदारांनी कंपनीच्या AI डेटा सेंटर उभारण्याच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. कंपनीची सध्याची आर्थिक स्थिती आणि ग्राहकांशी असलेले संबंध याचा परिणाम या निर्णयांवर होत असल्याचेही अहवालात नमूद आहे. ओरेकलने यापूर्वी OpenAI (सॅम ऑल्टमॅन यांच्या नेतृत्वाखालील) संस्थेसाठी डेटा सेंटर उभारण्याचा मोठा प्रकल्प हाती घेतला होता. या प्रकल्पासाठी सुमारे 156 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची कमिटमेंट होती. मात्र आता बँका या प्रकल्पासाठी कर्ज देण्यापासून मागे हटत असल्याचे सांगितले जात आहे. छाटणीचा संभाव्य आर्थिक फायदा अहवालानुसार, या मोठ्या प्रमाणावरील छाटणीमुळे ओरेकलला सुमारे 8 ते 10 अब्ज डॉलर्सचा कॅश फ्लो उपलब्ध होऊ शकतो. मात्र, या संपूर्ण प्रकरणावर ओरेकलकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. इतिहासातील सर्वात मोठी कपात जर 20–30 हजार कर्मचाऱ्यांची छाटणी प्रत्यक्षात झाली, तर ती ओरेकलच्या इतिहासातील सर्वात मोठी छाटणी ठरेल. याआधी 2025 मध्ये कंपनीने 10 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले होते, तेव्हा 1.6 अब्ज डॉलर्सच्या रिस्ट्रक्चरिंग प्लॅनचा हवाला देण्यात आला होता.
24 shares
😐
Loksatta logo
Loksatta
Feb 2, 2026, 12:01 PM
महसुली आव्हानांमध्ये सरकारच्या वित्तीय प्रयत्नांमध्ये घसरण सुरूच

महसुली आव्हानांमध्ये सरकारच्या वित्तीय प्रयत्नांमध्ये घसरण सुरूच

राथिन रॉयसरकारच्या एकूण खर्चाशी सकल राष्ट्रीय उत्पादनाचे (जीडीपी) प्रमाण किती, यावर सरकारच्या आर्थिक प्रयत्नांचा आकार ठरतो. हे प्रमाण सातत्याने घटते आहे. आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये ते १२.८ टक्के आणि २०१८-१९ मध्ये १२.२ टक्के होते. कोविडमुळे २०२०-२१ मध्ये ते १७.७ टक्क्यांवर गेले; पण पुन्हा ओहोटी लागून २०२३-२४ मध्ये ते १५ टक्के, २०२५-२६ मध्ये १३.९ टक्के होत येत्या आर्थिक वर्षात (२०२६-२७ ) १३.६ पर्यंत येईल. म्हणजे, २०१६ पेक्षा थोडेसेच अधिक. मिळणारा महसूल फारसा वाढत नसल्यामुळे सरकारी खर्चात घटतो. महसूलप्राप्तीची वाढ २०१६-१७ मध्ये ८.९३ टक्के होती आणि येत्या वर्षातही ती ८.९९ टक्के राहण्याचा अंदाज आहे. खासगीकरण, निर्गुंतवणूक यांतून मिळणारा महसूल आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये जीडीपीच्या ०.६ टक्के होता, तो येत्या आर्थिक वर्षात (२०२६-२७ मध्ये) तर ०.२ टक्केपर्यंत घसरला आहे. सरत्या आर्थिक वर्षात (मार्च २०२६ पर्यंत) सरकारने निर्गुंतवणुकीद्वारे ४७,००० कोटी रु. चे उद्दिष्ट ठेवले होते. केवळ ३४,००० कोटी रु. मिळाले. करांखेरीज अन्य स्रोतांकडून जास्त महसूल मिळत नाही, ही स्थिती २०१६-१७ मधील प्रमाण जीडीपीच्या १.७७ टक्के असल्याने होती. येत्या वर्षासाठीचा अंदाजही १.७ टक्के इतकाच आहे. थेट करांपैकी, कॉर्पोरेट करातून मिळणारा महसूल दहा वर्षांपूर्वी जीडीपीच्या ३.२ होता, तर त्याच (२०१६-१७) आर्थिक वर्षात वैयक्तिक उत्पन्नावरील करातून मिळालेला महसूल जीडीपीच्या २.३ टक्के होता. २०२६-२७ मध्ये हे प्रमाण कॉर्पोरेट करासाठी ३.१ टक्के, तर वैयक्तिक उत्पन्नावरील करासाठी ३.७ टक्केच प्रस्तावित आहे. योग्यरीत्या चालणार्‍या कोणत्याही देशाचे सरकार मध्यवर्ती बँकेच्या नफा आणि लाभांशावर महसुलासाठी अवलंबून राहात नाही. भारतात मात्र, आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये रिझर्व्ह बँकेने सरकारला दिलेल्या लाभांशाचा वाटा एकंदर करेतर महसुलापैकी २३ टक्के इतका होता तो येत्या आर्थिक वर्षात ४७ टक्के होणार असे सरकारच सांगते ! याचा अर्थ असा की, रिझर्व्ह बँकच सरकारला सार्वजनिक क्षेत्रातील नफादायी तेलकंपन्या वा वित्तीय संस्थांपेक्षाही- जास्त महसूल पुरवते आहे. हे आर्थिक शहाणपण नव्हेच. कर्जे काढून सरकार खर्चाचे प्रमाण वाढवू शकते. या बाबतीत मात्र सरकारला श्रेय दिलेच पाहिजे. त्याने कर्जे आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच, आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये राजकोषीय तूट जीडीपीच्या ३.५ टक्के होती ती कोविड-वर्षात (२०२०-२१ मध्ये) प्रचंड ९.२ टक्क्यांवर गेली तरीही, भारत सरकारने सरत्या आर्थिक वर्षात ती ४.४ टक्के केली आणि येत्या वर्षात तूट ४.३ टक्केच ठेवण्याचा निर्धारही व्यक्त केला. खर्च न वाढवताही दोन प्रकारे आगेकूच करता येते- पहिले म्हणजे गळके छप्पर आणि नळ दुरुस्त करणे; दुसरा प्रकार म्हणजे समष्टी अर्थशास्त्राला नवी दिशा देणे. यापैकी पहिला प्रकार सरकारने ‘नवे प्राप्तिकर नियम’ अखेर एकदाचे अमलात आणायचे ठरवण्यातून साधलेला आहे, तो अभिनंदनीयच. अर्थात, करप्रशासनच बदलण्यासाठी नोकरशाहीलाच सरळ करावे लागेल, ते महत्कार्य तूर्तास होईल असे वाटत नाही. प्रत्यक्ष कर खात्याच्या सचिवपदी असलेली व्यक्ती ‘भारतीय महसूल सेवे’तली नसल्याने, फार अपेक्षा करता येत नाहीत. पण करप्रशासन बदलण्याच्या दृष्टीने सुरुवात तरी आजपासून झाली, इतकेच मानता येईल. अशाच सकारात्मक बाबी म्हणजे अतिमहत्त्वाची इलेक्ट्रॉनिक साधने उत्पादित करणार्‍यांना २०३२ पर्यंत जाहीर केलेली जंगी करसवलत आणि २०४७ पर्यंत भारतातूनच विदामेघ (क्लाउड) सेवा कार्यरत होण्यासाठी विदा-केंद्रे (डेटा सेंटर्स) उभारण्यास वाव देण्याची घोषणा. नवधोरणाची दिशा शोधण्याचा प्रयत्नही हा अर्थसंकल्प करत नाही. अर्थसंकल्पीय भाषणात विकास परिवर्तनाला गती देण्यासाठी किंवा काळाच्या तीन महत्त्वाच्या समस्या- महागाईपायी स्थिरच राहणारे वेतन, कुशल व अकुशल तरुणांची बेरोजगारी आणि बहुतेक आर्थिक क्षेत्रांमध्ये कमी उत्पादकता- सोडवण्यासाठी कोणतीही सुसंगत रणनीती किंवा दृष्टिकोन सादर केला गेलेला नाही. राजकोषीय उत्तरदायित्व विधेयक तसेच मध्यम मुदतीचे राजकोषीय धोरण यांतून खरे तर मध्यम मुदतीच्या समष्टी वित्तीय धोरणांचा अंदाज देता येऊ शकतो- तसे काही यंदाही झालेले नाही. गोम अशी की, कोणतीही अधिकृत भारतीय संस्था पुढल्या पाच-सहा वर्षांसाठीसुद्धा (२०३२ पर्यंत) आपल्या अर्थव्यवस्थेतल्या महत्त्वाच्या निर्देशकांचे विश्वसनीय अंदाज देत नाही. पण २०४७ नंतर भारतीय अर्थव्यवस्था कशी असेल, याबद्दल सारे नुसते बोलतात. भविष्याची जाणीवच या अर्थसंकल्पाला नाही, असे नव्हे- ती आहे, त्यावर उपाय असावेत याचे भानही आहे; पण ते कसे याचे धोरण स्पष्ट नाही. म्हणजेच अर्थसंकल्पीय आकांक्षेला पुरेसे बळ नसून ती क्षीण आहे- एकंदरीत, आर्थिक विकास प्रत्यक्ष होत नसला तरीसुद्धा सत्ता आपलीच, याची खात्री असल्याचे हे लक्षण मानावे लागेल.-राथिन रॉय‘ओव्हरसीज डेव्हलपमेंट इ्स्टिटट्यूट’चे प्रमुख
44 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Feb 2, 2026, 11:48 AM
स्पर्धा वाढवण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा वाढवण्याचा भारताचा विचार

स्पर्धा वाढवण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा वाढवण्याचा भारताचा विचार

Banking Sector Reforms :देशातील सार्वजनिक क्षेत्रातीलबँकांचीआर्थिक स्थिती अधिक मजबूत करण्यासाठी केंद्र सरकार एक मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. सरकारीबँकांमधीलप्रत्यक्ष परकीय गुंतवणुकीची सध्याची २० टक्क्यांची मर्यादा वाढवून ती ४९ टक्क्यांपर्यंत नेण्यावर वित्त मंत्रालय गांभीर्याने विचार करत आहे. या निर्णयामुळे सरकारी बँकांना भांडवल उभारणीसाठी जागतिक बाजारपेठेचे दरवाजे उघडले जाणार असून,बँकिंग क्षेत्रातमोठी स्पर्धा पाहायला मिळू शकते. मंत्रालयांतर्गत चर्चा सुरूवित्तीय सेवा सचिव एम. नागराजू यांनी या प्रस्तावाबाबत माहिती देताना सांगितले की, "सरकारी बँकांमधील एफडीआय मर्यादा ४९ टक्क्यांपर्यंत वाढवण्यासाठी विविध मंत्रालयांमध्ये चर्चा सुरू आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा वाढता विस्तार पाहता, देशाला किमान ३ ते ४ मोठ्या आणि जागतिक दर्जाच्या बँकांची गरज आहे. त्या दृष्टीने बँकांचे भांडवल वाढवणे आवश्यक आहे." सध्याची स्थिती आणि प्रस्तावित बदलसध्या सरकारी आणि खासगी बँकांमधील परकीय गुंतवणुकीच्या नियमात मोठी तफावत आहे. FDI वाढल्यास काय बदलणार?एफडीआय मर्यादा वाढवणे म्हणजे परदेशी गुंतवणूकदारांना बँकेत जास्त शेअर्स खरेदी करण्याची मुभा देणे. बँकांना सरकारवर अवलंबून न राहता परदेशी कंपन्या किंवा बँकांकडून मोठी गुंतवणूक मिळवता येईल. परदेशी गुंतवणूकदारांच्या सहभागामुळेबँकिंग क्षेत्रातनवीन तंत्रज्ञान आणि जागतिक बँकिंग कार्यपद्धती येण्यास मदत होईल. आयडीबीआय बँकेच्या धोरणात्मक निर्गुंतवणुकीसाठी या महिनाअखेर किंवा पुढच्या महिन्यात निविदा मागवल्या जाऊ शकतात, असेही नागराजू यांनी स्पष्ट केले. वाचा -शेवटच्या ३० मिनिटांत वातावरण फिरलं! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये उसळी; टाटा, पॉवर ग्रिडच्या शेअर्सची 'दिवाळी' सरकारची हिस्सेदारी कमी होणार का?नागराजू यांनी स्पष्ट केले की, २०२० नंतर सरकारी बँकांमधील सरकारच्या शेअरची संख्या कमी झालेली नाही. मात्र, बँकांनी भांडवल उभारणीसाठी नवीन शेअर्स जारी केल्यामुळे टक्केवारीच्या हिशोबात सरकारचा वाटा काही बँकांमध्ये कमी झाला आहे.
4 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Feb 2, 2026, 10:43 AM
भारतीय अर्थसंकल्प 2026: पगारदार वर्गाला कर सवलतीतून दिलासा

भारतीय अर्थसंकल्प 2026: पगारदार वर्गाला कर सवलतीतून दिलासा

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२६ चा अर्थसंकल्प सादर केल्यानंतरपगारदारवर्गामध्ये आपल्या 'टेक-होम' सॅलरीबाबत (हातात येणारापगार) मोठी उत्सुकता आहे. या बजेटमध्ये नवीन कर प्रणालीमध्ये पगारदारांना दिलासा देणारे काही महत्त्वाचे बदल कायम ठेवण्यात आले आहेत. विशेषतः १२.७५ लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना आता कोणताही कर भरावा लागणार नाही. तुमच्या पगाराचे गणित असे मोजापगार मोजताना दोन महत्त्वाच्या सवलती तुमचा टॅक्स वाचवण्यासाठी मोलाची भूमिका बजावतात:Standard Deduction: सर्व पगारदारांना सरसकट ७५,००० रुपयांची सूट मिळते.Section 87A Rebate: जर तुमचे सर्व वजावटींनंतरचे करपात्र उत्पन्न १२ लाख रुपयांच्या आत असेल, तर ८७-ए अंतर्गत मिळणाऱ्या रिबेटमुळे तुमचा टॅक्स पूर्णपणे 'झिरो' होतो. १० लाख रुपये सीटीसी असेल तर...ज्यांचे उत्पन्न १० लाख रुपये आहे, त्यांना ७५,००० रुपयांचे स्टँडर्ड डिडक्शन मिळाल्यावर त्यांचे करपात्र उत्पन्न ९,२५,००० रुपये उरते. हे उत्पन्न १२ लाखांच्या मर्यादेत असल्याने त्यांना शून्य रुपये टॅक्स भरावा लागेल. यामुळे त्यांच्या हातात महिन्याला अंदाजे ८३,३३३ रुपये (पीएफ वजा न करता) पगार येईल. तर या सीटीसीच्या पगारदारांना नवीन बेसिक पे (५०% नियम) नुसार वार्षिक ५,००,००० रुपये म्हणजेच महिन्याला ४१,६६७ रुपये पीएफसाठी धरले जाणार आहेत. यामध्ये मालकाचा पीएफ वाटा वार्षिक ६०,००० रुपये आणि कर्मचाऱ्याचा पीएफ वाटा महिन्याला ५००० रुपये असे महिन्याला १०००० रुपये कापले जाणार आहेत. म्हणजेच ज्याचा १० लाख पगार आहे त्याच्या हातात 73,333 रुपये पगार मिळणार आहे. तर वर्षाला तुमच्या खात्यात दरवर्षी १,२०,००० रुपये जमा होणार आहेत. १२ लाख रुपये सीटीसी असेल तर... जर एखाद्या कर्मचाऱ्याची वार्षिक सीटीसी १२ लाख रुपये असेल, नवीन बेसिक पे (किमान ५०%) ६,००,००० रुपये म्हणजे महिन्याला ५०,००० रुपये असणार आहे. तर तेवढीच रक्कम भत्ते आणि पीएफ, बोनस आदीसाठी असणार आहे. नवीन नियमानुसार, पीएफ हा मूळ वेतनाच्या १२% कापला जातो. म्हणजेच ५०००० च्या १२ टक्के म्हणजे महिन्याला ६००० रुपये असणार आहे. कर्मचाऱ्याचे ६००० हजार आणि कंपनीचे ६००० असे वर्षाला १,४४,००० एवढे रुपये पीएफसाठी जाणार आहेत. ग्रॅच्युटी तरतूद असेल तर २८,८४८ रुपये वर्षाला जाणार आहेत. जुन्या नियमानुसार तुमच्या हातात ९१,३५७ रुपये येत होते, तर नव्या नियमानुसार तुमच्या हातात ८५,५९६ रुपये पगार येणार आहे. हा फरक जवळपास ५,७६१ रुपयांचा असणार आहे. या सॅलरीला देखील शून्य टक्के टॅक्स लागणार आहे.
46 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Feb 2, 2026, 10:43 AM
अर्थसंकल्पीय दिवसाच्या घसरणीनंतर भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी

अर्थसंकल्पीय दिवसाच्या घसरणीनंतर भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी

Stock Market :अर्थसंकल्पाच्या दिवशी झालेल्या प्रचंड पडझडीनंतर, आठवड्याच्या पहिल्याच दिवशीशेअर बाजारानेफिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतली आहे. सुरुवातीच्या सत्रात असलेल्या अस्थिरतेनंतरगुंतवणूकदारांनीदाखवलेल्या विश्वासामुळे बाजाराने दिवसाच्या उच्चांकी पातळीवर बंद होत दमदार पुनरागमन केले. सेन्सेक्स ९४४ अंकांनी वधारून ८१,६६७ वर, तरनिफ्टी२६३ अंकांच्या तेजीसह २५,०८८ वर स्थिरावला. विशेष म्हणजे, आयटी क्षेत्र वगळता इतर सर्वच क्षेत्रांत सोमवारी मोठी खरेदी पाहायला मिळाली. सोमवारी बाजार अचानक का सावरला?१. 'व्हॅल्यू बायिंग'ची संधीबजेटनंतरच्या घसरणीमुळे अनेक दर्जेदार शेअर्स स्वस्त भावात उपलब्ध झाले होते.गुंतवणूकदारांनीया घसरणीला भीती म्हणून न पाहता 'संधी' म्हणून पाहिले आणि पॉवर ग्रिड, टाटा मोटर्स यांसारख्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी केली. २. कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरणजागतिक बाजारात ब्रेंट क्रूडचे भाव ४.१४ टक्क्यांनी कोसळून ६६.४५ डॉलर प्रति बॅरलवर आले. भारत हा तेल आयात करणारा मोठा देश असल्याने कच्चे तेल स्वस्त होणे हे महागाई कमी करण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक मानले जाते. यामुळे इक्विटी मार्केटला मोठा आधार मिळाला. ३. अर्थसंकल्पातील 'लॉन्ग टर्म' व्हिजनगुंतवणूकदारांना आता अर्थसंकल्पातील दीर्घकालीन सकारात्मक पैलू समजू लागले आहेत. ५३.५ लाख कोटींच्या या बजेटमध्ये मॅन्युफॅक्चरिंग, डेटा सेंटर्स, सेमीकंडक्टर आणि पायाभूत सुविधांवरील खर्चावर दिलेला भर बाजाराला भविष्यातील वाढीची शाश्वती देणारा ठरला आहे. ४. रुपयाची 'दौड' कायमकच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्याचा फायदा भारतीय रुपयालाही झाला. डॉलरच्या तुलनेत रुपया ३७ पैशांनी मजबूत होऊन ९१.५६ वर बंद झाला. रुपयातील या मजबुतीमुळे विदेशी गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली. तज्ज्ञ काय म्हणतात?एसबीआय सिक्युरिटीजच्या एमडी आणि सीईओ भुवनेश्वरी ए. यांच्या मते, "हा अर्थसंकल्प विकास आणि स्थैर्य यांचा सुवर्णमध्य आहे. राजकोषीय तूट ४.४ टक्क्यांवरून ४.३ टक्क्यांपर्यंत खाली आणण्याचे लक्ष्य गुंतवणूकदारांना दिलासा देणारे आहे. तसेच, 'फ्युचर्स अँड ऑप्शन्स'मधील करातील वाढ ही सट्टेबाजीला आळा घालून रोख बाजारातील सहभाग वाढवण्यासाठी उचललेले योग्य पाऊल आहे." वाचा -चाळीशीत आहात? मग 'या' ७ चुका टाळा! निवृत्तीनंतरच्या सुखी आयुष्यासाठी आजच लावा आर्थिक 'फिल्डिंग' तांत्रिक विश्लेषणएचडीएफसी सिक्युरिटीजचे देवर्ष वकील यांच्या मते,निफ्टीने२५ हजार पार केले असले तरी तो अजूनही २००-डे ईएमएच्या खाली आहे. जोपर्यंत बाजार या स्तराच्या वर सातत्याने टिकत नाही, तोपर्यंत सावध राहणे गरजेचे आहे. निफ्टीसाठी आता २५,१५० हा अडथळा असून २४,५७१ ही महत्त्वाची आधारभूत पातळी असेल.
86 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Feb 2, 2026, 10:32 AM
पायाभरणीः वयाच्या चाळीसव्या वर्षी निवृत्ती नियोजनाचे महत्त्व

पायाभरणीः वयाच्या चाळीसव्या वर्षी निवृत्ती नियोजनाचे महत्त्व

Retirement Planning :वयाची चाळीशी हा माणसाच्या आयुष्यातील असा टप्पा असतो, जिथे कारकीर्द शिखरावर असते पण जबाबदाऱ्यांचा डोंगरही तेवढाच मोठा असतो. मुलांचे शिक्षण, गृहकर्जाचे हप्ते, वृद्ध पालकांचे आरोग्य आणि वाढती महागाई अशा चौफेर आघाड्यांवर लढताना अनेकजण आपल्या 'निवृत्ती' नियोजनाकडे दुर्लक्ष करतात. पण लक्षात ठेवा, निवृत्तीनंतरचे आयुष्य सन्मानाने जगण्यासाठी चाळीशीत केलेलीगुंतवणूकहाच तुमचा खरा आधार ठरणार आहे. १. तुमची आर्थिक स्थिती नेमकी काय?नियोजनाची पहिली पायरी म्हणजे तुमच्या सध्याच्या उत्पन्नाचा आणि खर्चाचा ताळेबंद मांडणे. महागाईचा दर, भविष्यातील वैद्यकीय खर्च आणि तुमची जीवनशैली यांचा विचार करून निवृत्तीनंतर तुम्हाला नेमकी किती रक्कम लागेल, याचा अचूक अंदाज बांधा. २. निवृत्तीला द्या प्रथम प्राधान्यचाळीशीनंतर वेळ कमी आणि उद्दिष्ट मोठे असते. त्यामुळे नॅशनल पेन्शन सिस्ट आणि ईपीएफ सारख्या योजनांमध्येगुंतवणूकवाढवा. तुमच्या एकूण उत्पन्नाच्या किमान १५ ते २५ टक्के हिस्सा केवळ निवृत्तीसाठी बाजूला काढण्याचा प्रयत्न करा. ३. महागड्या कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडाक्रेडिट कार्ड लोन किंवा पर्सनल लोनवर १२ ते २४ टक्के व्याज द्यावे लागते, जे तुमच्या संपत्तीसाठी घातक आहे. ही कर्जे लवकरात लवकर संपवा. गृहकर्ज सुरू असेल तरीही जमेल तसे त्याचे 'प्री-पेमेंट' करून मुद्दल कमी करण्यावर भर द्या. ४. 'इमर्जन्सी फंड' विसरू नकानिवृत्तीच्या बचतीला धक्का लागू नये म्हणून किमान ६ ते ९ महिन्यांच्या खर्चाएवढी रक्कम इमर्जन्सी फंड म्हणून ठेवा. ही रक्कम सेव्हिंग अकाऊंट किंवा लिक्विड फंडमध्ये असावी, जेणेकरून संकटाच्या वेळी ती तत्काळ उपलब्ध होईल. ५. टॅक्स प्लॅनिंग म्हणजे अधिक बचतकलम ८०सी, एनपीएस आणि हेल्थ इन्शुरन्सच्या माध्यमातून कर वाचवा. कराची जेवढी बचत होईल, तेवढी तुमची गुंतवणूक करण्याची क्षमता वाढेल. ६. विमा: सुरक्षेचे कवचपुरेशा रकमेचा 'टर्म लाईफ इन्शुरन्स' आणि 'हेल्थ इन्शुरन्स' असणे अनिवार्य आहे. वाढत्या वयानुसार आरोग्य विमा पॉलिसीची वेळोवेळी समीक्षा करा, जेणेकरून गंभीर आजारांच्या वेळी तुमची आयुष्यभराची पुंजी खर्च होणार नाही. वाचा -सिल्व्हर ईटीएफ २० टक्क्यांनी आपटले, गोल्डमध्येही मोठी घसरण; कमोडिटी बाजारात खळबळ ७. मुलांचे शिक्षण विरुद्ध तुमची निवृत्तीमुलांच्या उच्च शिक्षणासाठी गुंतवणूक करणे गरजेचे आहे, पण आपल्या निवृत्तीच्या निधीला कात्री लावून नव्हे! शिक्षणासाठी कर्ज मिळू शकते, पण निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी कोणीही कर्ज देत नाही. त्यामुळे मुलांचे शिक्षण आणि स्वतःची निवृत्ती यामध्ये सुवर्णमध्य साधा.
79 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Feb 2, 2026, 10:19 AM
डिजिटायझेशन आणि प्रोत्साहनांमुळे पुणे डेटा सेंटर कॅपिटल बनण्याच्या तयारीत

डिजिटायझेशन आणि प्रोत्साहनांमुळे पुणे डेटा सेंटर कॅपिटल बनण्याच्या तयारीत

ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ दीपक शिकारपूर म्हणाले, डिजिटायझेशन आणि डेटा सेंटरला चालना दिली जात अससल्याने डेटा सेंटरची राजधानी होण्याची संधी आपल्याकडे आहे. हार्डवेअर, सेमीकंडक्टर व डिजिटल इन्फ्रासाठी दिलेले प्रोत्साहन आयटी उद्योगाला बळकटी देईल. स्थानिक उत्पादन वाढल्यास आयातीवरील अवलंबित्व कमी होईल तसेच येत्या काळात पुण्यात ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स (जीसीसी) ची संख्या वाढण्यासाठी हा अर्थसंकल्प महत्त्वाची भूमिका बजावेल. करतज्ज्ञ डॉ. दिलीप सातभाई म्हणाले, प्रत्यक्ष करात पन्नासहून अधिक बदल झाले आहेत. व्याजावरील टीडीएस न कापण्याचा निर्णय दिलासादायक आहे. मनुष्यबळ पुरवठा सेवा जॉब कॉन्ट्रॅक्ट म्हणून मान्य झाल्याने गुंतागुंत कमी होईल.
76 shares
😊
Lokmat logo
Lokmat
Feb 2, 2026, 10:17 AM
बॉलीवूडच्या स्टार-ड्राइव्ह बजेट प्रणालीवर इम्रान खानची टीका

बॉलीवूडच्या स्टार-ड्राइव्ह बजेट प्रणालीवर इम्रान खानची टीका

बीटाऊनमध्ये कलाकारांच्या मानधनाची नेहमीच चर्चा असते. आजकाल मोठे स्टार्स तर अव्वाच्या सव्वा मानधन आकारतात. आधी बजेटनुसार कलाकारांचं मानधन ठरायचं. पण आता मानधनावरुन बजेट ठरत आहे. त्यातच मोठा स्टार असेल तर आज तो १०० कोटींच्या घरातही मानधन घेत आहे. नुकतंच एका अभिनेत्याने या सिस्टीमवर नाराजी व्यक्त केली आहे. बऱ्याच वर्षांनी पुन्हा स्क्रीनवर आलेला आमिर खानचा भाचाइमरान खानसध्या चर्चेत आहे. 'हॅपी पटेल' सिनेमात तो दिसत आहे. ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीतइमरान खानम्हणाला, "जर मला दिसतंय की माझा सिनेमा बनवण्यासाठी मला ३० कोटी रुपये लागणार आहे तर ती तुमची प्रोडक्शन कॉस्ट असते. आणि त्यात जर मी म्हटलं की मी ४० कोटी मानधन घेईन तर सिनेमाचं बजेट ७० कोटी होईल." तो पुढे म्हणाला, "आता नफा कमावण्याचा मार्ग कोणता राहिला? मला याची पर्वा आहे का? मी खरं तर याचा विचार करायला हवा. हा माझा सिनेमा आहे. मला वाटतं की या सिनेमात चांगला सिनेमा बनण्याची क्षमता आहे म्हणून सुरुवातीलाच कमी मानधन घ्या. नशीब आजमावून बघा. जर कोणी असं केलं तर तो खरा स्टार." "मामा आमिर खानचीही हीच पद्धत आहे. त्यांनी कधीच अॅडव्हान्स फी नाही घेतली. ते कधीच ६० कोटी किंवा ७५ कोटी मानधन घेत नाहीत. हा वेडेपणा आहे. तुम्ही तुमच्याच सिनेमाला नुकसान पोहोचवता. स्वत:च्याच सिनेमाचा फायदा घेता आणि सिनेमाच्या किंमतीवर स्वत: श्रीमंत होता. याचा अर्थ तुमचा सिनेमावर विश्वासच नाही असाही होतो", असंही तो म्हणाला.
73 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Feb 2, 2026, 10:03 AM
कर कपात आणि पायाभूत सुविधा विकासाद्वारे अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे भारताच्या प्रगतीशील अर्थसंकल्पाचे उद्दिष्ट

कर कपात आणि पायाभूत सुविधा विकासाद्वारे अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे भारताच्या प्रगतीशील अर्थसंकल्पाचे उद्दिष्ट

कॅन्सरसाठीच्या १७ औषधांवरील व ७ गंभीर - दुर्मिळ आजारांसाठीच्या औषधांवरील करात घट केली.प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठीच्या एका नवीन हॉस्टेलची स्थापना होईल. कंटेनर उत्पादन क्षमता वाढवणार. मेगा टेक्सटाईल पार्क्सची स्थापना करण्यात येईल. शहरांमध्ये आर्थिक क्षेत्रे विकसित केली जाणार आहेत. डेटा सेंटर तयार करणाऱ्या कंपन्यांना कर सवलत देण्यात येणार आहे. ज्यामुळे परदेशी गुंतवणूक आकर्षित होईल आणि भारत डिजिटल अर्थव्यवस्थेचा हब बनेल. या सर्व घोषणा पाहता "हा एक प्रगतीशील अर्थसंकल्प असून तो भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रावर लक्ष केंद्रित करतो. स्थानिक पातळीवरील कौशल्य वाढीसाठी, २० ठिकाणी १०,००० मार्गदर्शकांसाठी १२ आठवड्यांच्या हायब्रिड ट्रेनिंग कोर्ससह पायलट योजना राबवली जाईल. पर्यटनासाठी डिजिटल ढांचा तयार करण्यासाठी, सर्व सांस्कृतिक, धार्मिक आणि वारसा स्थळांचे राष्ट्रीय डिजिटल नॉलेज ग्रिड तयार केले जाईल, ज्यामुळे स्थानिक संशोधक, इतिहासकार, कंटेंट क्रिएटर्स आणि तंत्रज्ञान भागीदारांसाठी नोकऱ्या निर्माण होतील.
14 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Feb 2, 2026, 09:55 AM
भारताची निळी अर्थव्यवस्था 2. किनारी बंदरे आणि पर्यटन विकासाला चालना

भारताची निळी अर्थव्यवस्था 2. किनारी बंदरे आणि पर्यटन विकासाला चालना

बंदरांच्या विकासासाठी ब्लू इकॉनॉमी 2.0; पर्यटन विकासाच्या नव्या योजना देशातील जलमार्गांच्या विकासासाठी (इनलॅन्ड वॉटरवेज) एकूण 2,500 कोटींपेक्षा जास्त तरतूद करण्यात आली असून, त्यातील मोठा हिस्सा हा महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीसाठी प्रस्तावित आहे.कोकण किनारपट्टीतील बंदरांच्या विकासासाठी ब्लू इकॉनॉमी 2.0 (ब्ल्यू इकॉनॉमी 2.0) अंतर्गत वैशिष्ठ्यपूर्ण तरतुदी केल्या आहेत. कोकणचा 720 किमीचा समुद्रकिनारा मालवाहतूक आणि पर्यटनासाठी वापरण्यावर सरकारने भर दिला आहे. या अंतर्गत कोस्टल शिपिंगला विशेष चालना देण्यात येणार आहे. रस्ते आणि रेल्वेवरील ताण कमी करण्यासाठी किनारपट्टीवरील जलवाहतुकीला (कोस्टल शिपींग) प्रोत्साहन दिले जाणार आहे. यासाठी विशेष सबसिडी आणि इंधनावरील सवलतींची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. परिणामी किनारपट्टीत आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई ते सिंधुदुर्ग आणि पुढील सागरी मार्गावरील मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक अधिक स्वस्त होवू शकणार आहे. रो-रो आणि रो-पॅक्सचा विस्तार, क्रूझ टर्मिनल्स मुंबईतील भाऊचा धक्का ते रायगड जिल्ह्यातील मांडवा आणि रेवस येथे सागरी प्रवासी सेवा यशस्वी झाल्यानंतर, कोकणातील दाभोळ, जयगड आणि विजयदुर्ग आदी इतर खाड्यांमध्ये नवीन रो-रो आणि रो-पॅक्स फेऱ्या सुरू करण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील. यासाठी सागरमाला प्रकल्पांतर्गत अतिरिक्त निधीची तरतूद केली आहे. जगभरातील पर्यटकांमध्ये अत्यंत लोकप्रिय ठेरलेले क्रुझ पर्यटन कोकणात सुरु करण्यास मोठा वाव असल्याने महत्त्वाच्या किनारपट्टीच्या शहरांमध्ये क्रूझ टर्मिनल्स उभारण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर करताना केली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत पर्यटकांना समुद्रातून कोकण पाहता येईल, आणि त्यायोगे पर्यटन व्यवसाय विकसीत होवून परकीय चलन येथे येण्याचे मार्ग खुले होवू शकणार आहेत. या व्यतिरिक्त हरित ऊर्जा आणि आधुनिक जेट्टी (ग्रीन पोर्ट पॉलीस ) अंतर्गत मल्टिमॉडेल हबची योजना असून त्या योगे कोकणातील लहान बंदरांना रेल्वे आणि रस्त्यांशी जोडण्यासाठी पीएम गतिशक्ती अंतर्गत निधी दिला जाईल, असे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. स्थानिक स्तरावर दळणवळण सोपे करण्यासाठी लहान नद्या आणि खाड्यांमध्ये आधुनिक आणि पर्यावरणपूरक जेट्टी उभारण्यासाठी विशेष पॅकेज देण्यात आले आहे.
39 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Feb 2, 2026, 09:46 AM
भारताचा 2026-27 अर्थसंकल्पः काजू, मत्स्यव्यवसाय आणि नारळ योजनांच्या माध्यमातून कोकण अर्थव्यवस्थेला चालना

भारताचा 2026-27 अर्थसंकल्पः काजू, मत्स्यव्यवसाय आणि नारळ योजनांच्या माध्यमातून कोकण अर्थव्यवस्थेला चालना

महेश सरनाईकसिंधुदुर्ग: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी रविवारी (दि. १) सादर केलेल्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पातकोकणच्यासर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण तरतुदी केल्या आहेत. विशेषताकोकणच्याअर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या काजू आणि मत्स्यव्यवसायाला जागतिक स्तरावर नेण्यासाठी केंद्राने आपली तिजोरी उघडली आहे. तसेच, मुंबई-पुणेदरम्यानहाय-स्पीडरेल्वेकॉरिडॉरची घोषणा करून कोकणच्या प्रवेशद्वारावरच दळणवळणाचे नवे जाळे विणले जाणार आहे. किनारी भागातील शेतकऱ्यांसाठी नारळ संवर्धन योजना प्रस्तावित करण्यात आली असून, त्याअंतर्गत जुनी व अल्पउत्पादक नारळाची झाडे काढून त्याजागी नवीन व अधिक उत्पादक जार्तीची लागवड केली जाणार आहे. सुमारे एक कोटी शेतकरी आणि जवळपास तीन कोटी लोकांची उपजीविका नारळावर अवलंबून आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा नारळ उत्पादक देश आहे. काजू आणि नारळ बागायतदारांची चांदीकोकणातील काजूला जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी अर्थमंत्र्यांनी 'मिशन काजू'अंतर्गत विशेष निधीची तरतूद केली आहे.◼️ जागतिक बॅण्डिंग२०३० पर्यंत भारतीय काजूला 'ग्लोबल ब्रँड' बनवण्याचे उद्दिष्ट◼️ पुनरुज्जीवन योजनाजुन्या आणि कमी उत्पादन देणाऱ्या नारळाच्या झाडांऐवजी नवीन जातींची लागवड करण्यासाठी अनुदान.◼️ प्रक्रिया उद्योगकाजू आणि कोको प्रक्रियेसाठी एमएसएमईच्या (MSME) धर्तीवर कोकणात नवीन क्लस्टर्स विकसित केले जाणार. दळणवळण आणि पर्यटनाला नवे पंखपायाभूत सुविधांच्या बाबतीत कोकणरेल्वेआणि पर्यटन स्थळांसाठी केंद्राचा मोठा प्लॅन आहे◼️ मुंबई-पुणेहायस्पीड कॉरिडॉर७ नवीन हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरमध्ये मुंबई-पुणे मार्गाचा समावेश झाल्याने दक्षिण कोकणाकडे जाणाऱ्या प्रवाशांचा वेळ वाचणार आहे◼️ सी-प्लेन सेवापर्यटनाला चालना देण्यासाठी कोकणच्या समुद्रकिनाऱ्यावर सी-प्लेन (Seaplane) उत्तस्वण्याबाबतच्या पायाभूत सुविधांसाठी विशेष तरतूद◼️ कोकण रेल्वेचे बळकटीकरण'कवच ४.०' आणि रेल्वेच्या आधुनिकीकरणांतर्गत कोकण रेल्वेवरील सुरक्षितता आणि वेग वाढवण्यावर भर. काजू आणि नारळाला मिळालेले हे प्रोत्साहन कोकणच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला कलाटणी देणारे ठरेल. विशेषतः प्रक्रिया उद्योगांना दिलेले बळ कोकणातील तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देईल.- रणजित दळवी, अर्थसंकल्पीय अभ्यासक, कणकवली, सिंधुदुर्ग अधिक वाचा:Budget 2026 : यंदाच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांना काय मिळालं; कोणत्या योजनेला किती निधी?
34 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Feb 2, 2026, 09:39 AM
ई. यू.-भारत मुक्त व्यापार करारः पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला धोका

ई. यू.-भारत मुक्त व्यापार करारः पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला धोका

भारत आणि युरोपियन युनियन यांच्यात नुकत्याच झालेल्या ऐतिहासिक 'मुक्त व्यापार करारा'मुळे दक्षिण आशियातील भू-राजकीय आणि आर्थिक समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. भारतासाठी हा करार 'मदर ऑफ ऑल डील्स' ठरत असतानाच,पाकिस्तानच्याअर्थव्यवस्थेवर मात्र याचे अत्यंत भीषण परिणाम होताना दिसत आहेत. या करारामुळेपाकिस्तानलादरवर्षी अब्जावधी डॉलर्सचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आतापर्यंत भारतीय कापड आणि तयार कपड्यांवर युरोपीय बाजारपेठेत १२% आयात शुल्क लावले जात होते. मात्र, नवीन करारानुसार हे शुल्क आता शून्य होणार आहे. यामुळे भारतीय उत्पादने युरोपमध्ये स्वस्त होतील आणि त्यांची मागणी प्रचंड वाढेल. पाकिस्तानला का बसलाय धक्का?पाकिस्तानची जवळपास ९ अब्ज डॉलरची निर्यात युरोपला होते. यात सर्वाधिक वाटा कापड उद्योगाचा आहे. भारताला शुल्क माफी मिळाल्याने आता पाकिस्तानी कापडाला युरोपमध्ये कोणीही विचारणार नाही. पाकिस्तानच्या कापड उद्योगावर सुमारे १ कोटी लोकांचे उदरनिर्वाह अवलंबून आहेत. निर्यात घटल्यास या सर्वांच्या नोकऱ्यांवर गदा येणार असल्याचे मत पाकिस्तानचे माजी वाणिज्य मंत्री डॉ. गोहर इजाज यांनी व्यक्त केले आहे. तसेच पाकिस्तानला आतापर्यंत 'GSP Plus' अंतर्गत युरोपमध्ये विशेष सवलत मिळत होती, जी भारताला मिळत नव्हती. आता भारतालाही तीच सवलत मिळाल्याने पाकिस्तानची मक्तेदारी संपुष्टात आली आहे. पाकिस्तानमध्ये 'पॅनिक मोड'या निर्णयामुळे पाकिस्तान सरकारमध्ये खळबळ माजली आहे. उपपंतप्रधान इशाक डार यांनी तातडीची बैठक बोलावून परिस्थितीचा आढावा घेतला आहे. "भारताचा हा आर्थिक विजय आमच्यासाठी धोक्याची घंटा आहे," अशी कबुली पाकिस्तानी माध्यमांकडून दिली जात आहे.
31 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Feb 2, 2026, 09:29 AM
वाढीव निधी आणि नवीन उपक्रमांद्वारे भारताने इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आणि ए. व्ही. जी. सी. क्षेत्राला चालना दिली

वाढीव निधी आणि नवीन उपक्रमांद्वारे भारताने इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आणि ए. व्ही. जी. सी. क्षेत्राला चालना दिली

इलेक्ट्रॉनिक्स घटक उत्पादन (ईसीएमएस): वाढीव निधी: इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट मॅन्युफॅक्चरिंग स्कीमसाठीचा निधी वाढवून 40 हजार कोटी करण्यात आला आहे. यामुळे मोबाईल, लॅपटॉप आणि इतर उपकरणांचे सुटे भाग भारतातच तयार होण्यास मोठी चालना मिळेल. रेअर अर्थ कॉरिडॉर:पाच राज्यांमध्ये विस्तार: ओडिशा, केरळ, आंध प्रदेश आणि तामिळनाडू यांसारख्या खनिजसमृद्ध राज्यांमध्ये ‌‘डेडिकेटेड रेअर अर्थ कॉरिडॉर‌’ स्थापन केले जातील. यामुळे सेमीकंडक्टरसाठी लागणाऱ्या दुर्मीळ खनिजांच्या पुरवठ्यासाठी आपण चीनसारख्या देशांवरील अवलंबित्व कमी करू शकू. ऑरेंज इकॉनॉमी आणि नवीन तंत्रज्ञान: ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्‌‍स, गेमिंग आणि कॉमिक्स (एव्हीजीसी) क्षेत्रासाठी विशेष प्रोत्साहन दिले जाईल. 2030 पर्यंत या क्षेत्रात 20 लाख व्यावसायिकांची गरज लक्षात घेता 15 हजार माध्यमिक शाळांमध्ये ‌‘कंटेंट क्रिएटर लॅब्स‌’ सुरू केल्या जातील.
28 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Feb 2, 2026, 09:27 AM
सोने-चांदीच्या दरांत घसरण, एका दिवसात विक्रमी घसरण

सोने-चांदीच्या दरांत घसरण, एका दिवसात विक्रमी घसरण

Gold-Silver Price Crash :अर्थसंकल्पाच्या धक्क्यातून सावरण्यापूर्वीच कमोडिटी मार्केटमध्ये सोन्या-चांदीच्याकिमतींना मोठी गळती लागली आहे. अर्थसंकल्पाच्या दिवशी सुरू झालेला हा घसरणीचा सिलसिला सोमवारीही कायम राहिला.चांदीच्यादरात एकाच दिवसात तब्बल १५,९४३ रुपयांची विक्रमी घसरण झाली असून सोन्याचे भावही प्रति १० ग्रॅम ४,४३२ रुपयांनी स्वस्त झाले आहेत. या पडझडीचा सर्वाधिक फटका 'सिल्वर ईटीएफ' धारकांना बसला असून अनेक फंड २० टक्क्यांच्या जवळ कोसळले आहेत. कमोडिटी मार्केटमध्ये दरांचे 'कलेक्शन' सिल्व्हर ईटीएफमध्ये २० टक्क्यांची 'त्सुनामी'सोन्या-चांदीच्या वायदा भावातील घसरणीचा थेट परिणाम ईटीएफवर झाला आहे. विशेषतः चांदीच्या फंड्समध्ये मोठी विक्री पाहायला मिळाली. गोल्ड ईटीएफमध्येही अस्थिरता : सिल्व्हर ईटीएफच्या तुलनेत गोल्ड ईटीएफमधील घसरण मर्यादित असली तरी बीएसएल गोल्ड ईटीएफ (७.८१%) आणि मोतीलाल ओसवाल गोल्ड ईटीएफ (७.१५%) मध्ये मोठी पडझड नोंदवण्यात आली. वाचा -भारताच्या अर्थव्यवस्थेत 'स्थैर्य' कायम, पण सुधारणांची गती हवी! 'फिच रेटिंग्स'चे बजेट २०२६ वर मोठे विधान का कोसळले बाजार?रविवारी सादर झालेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी 'सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स'मध्ये वाढ करण्याची घोषणा केल्यानेगुंतवणूकदारांचामूड बिघडला आहे.शेअर बाजारकोसळल्यामुळेगुंतवणूकदारांनीसोन्या-चांदीतील आपली गुंतवणूक काढून घेण्यास सुरुवात केली, ज्यामुळे कमोडिटी बाजारात ही मोठी घसरण पाहायला मिळत आहे.
17 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Feb 2, 2026, 09:15 AM
आर्थिक समृद्धीसाठी गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भाजीपाल्याची शेती स्वीकारली

आर्थिक समृद्धीसाठी गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भाजीपाल्याची शेती स्वीकारली

- कपिल केकतगोंदिया: धान उत्पादकांचा जिल्हा अशीगोंदियाजिल्ह्याची ओळख आहे. पण हळूहळू धान उत्पादक शेतकरी कृषी तंत्रज्ञानाच्या मदतीने भाजीपाला व इतर पिके घेण्याकडे वळत असल्याने जिल्ह्याची नवी ओळख निर्माण होत आहे. गोंदिया व सडक अर्जुनी तालुक्यात दहा धान उत्पादक गावांमध्ये शेतकरी भाजीपाल्याचे उत्पादन घेऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहे. या दोन्ही तालुक्यातील दहा गावांतील बहुतांश शेतकरी धान या पारंपरिक पिकांवरच अवलंबून होते. शेतीला पूरक असे भाजीपाला उत्पादन मोजकेच शेतकरी घ्यायचे. पण, शेतशिवारात शेततळे, सिमेंट बंधाऱ्यांची निर्मिती होताच भूजल पातळीमध्ये वाढ झाली. कोरडवाहू शेतीला शाश्वत सिंचन मिळाले. परिणामतः गावातीत शंभराहून अधिक शेतकरी भाजीपाला पिकासह अन्य दुबार पिके घेत असून, शेतकऱ्यांच्या आयुष्यात आर्थिक समृद्धी नांदू लागली आहे. पावसाच्या पाण्याशिवाय सिंचनाची दुसरी सुविधा नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांना अन्य पिकेही घेता येत नव्हती. जलयुक्त शिवार अभियानातील शेततळे, बंधाऱ्यांमुळे भाजीपाल्यासारखे उत्पादन घेण्यावर भर दिला जात आहे. आतापर्यंत बाजारटोला, तेवढा, बिरसाटोला, सिंधीपार, चिवटोला, घाटबोरी या गावांमध्ये हजारो हेक्टरवर भाजीपाला पीक घेत आहे. अॅपल बोर, पपई, टरबुजाची लागवडगोंदिया तालुक्यातील बाजारटोला, तेवढा, बिरसीटोला व सडक अर्जुनी तालुक्यातील सिंधीपार, चिचटोला, घाटबोरीसह अन्य गावातील शिवाराचे भाग्यच पालटले. बहुतांश शेतकरी आता भाजीपाला, हरभरा, अॅपल बोर, पपई, टरबूज या पिकाकडे वळले आहेत. जिल्ह्यातील १६० गावांमध्ये पहिल्या व दुसऱ्या शेततळ्यांचे बांधकाम करण्यात आले याची शेतकऱ्यांना मदत होत आहे. गेल्या पाच-दहा वर्षांपासून शेतीत टरबूज, खरबूज, अॅपल बोर, पपई आणि पेरू पीक घेतले जात असून, काही भागात भाजीपालाही लागवड केली जाते. लागवड खर्चाची वजा केल्यास बऱ्यापैकी नफा मिळत आहे. याच आधारावर मी आर्थिक समृद्ध होत आहे. शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती न करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा.- प्रवीण कापगते, शेतकरी, सिंचीटोला शेतकऱ्यांनी परंपरागत शेती न करता शेतीला पूरक असे व्यवसाय करावे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत भाजीपाल्यासारखे क्लस्टर उभारावे. जलयुक्तसारखे अभियान शेतकऱ्यांसाठी मदतपूर्ण आहेत.- नीलेश कानवडे, जिल्हा कृषी अधीक्षक Urea Fertilizer : केंद्र सरकारने युरिया खतासंदर्भात घेतला मोठा निर्णय, अधिसूचना जारी, काय आहे निर्णय
50 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Feb 2, 2026, 09:10 AM
छत्रपती संभाजीनगरला नवीन आर्थिक केंद्र म्हणून विकसित करण्याचे भारत सरकारच्या अर्थसंकल्पाचे उद्दिष्ट

छत्रपती संभाजीनगरला नवीन आर्थिक केंद्र म्हणून विकसित करण्याचे भारत सरकारच्या अर्थसंकल्पाचे उद्दिष्ट

छत्रपती संभाजीनगर:केंद्रशासनाच्या यंदाच्या अर्थसंकल्पात शहरांचा एकात्मिक विकास ही संकल्पना मांडली आहे. त्या योजनेत शहरात नवीन मेडिकल कॉलेजेस आणि एम्ससारख्या संस्था स्थापन करण्यावर केंद्र शासनाचा या याेजनेतून भर आहे. अशा संस्था शहरात येण्यासाठी स्थानिक नेतृत्वांचे प्रयत्न गरजेचे असतील. टू-टीअर शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र शासनाकडून सुविधांसाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.छत्रपती संभाजीनगरआर्थिक वाढीचे नवे केंद्र ग्रोथ इंजिन म्हणून विकसित होण्याची पाऊल यातून उचलले जातील. ई-गव्हर्नन्स, सुरक्षित वाहतूक व्यवस्था, पाणीपुरवठा यांसारख्या सुविधांचा यात समावेश आहे. सांडपाणी व्यवस्थापनासाठीही अर्थसाहाय्य मिळेल. अर्थसंकल्पात शहरांच्या विकासासाठी मोठी तरतूद केलेली असून, त्यात छत्रपती संभाजीनगरचा समावेश होणे शक्य आहे. अर्थसंकल्प २०२६-२७ मध्ये टू-टीअर आणि थ्री-टीअर शहरांसाठी ‘सिटी इकॉनॉमिक रिजन’ विकसित करण्याची घोषणा केंद्र शासनाने केली आहे. यासाठी प्रत्येक सीईआरला पाच वर्षांसाठी ५,००० कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे. यातून काही वाटा छत्रपती संभाजीनगरच्या पदरात पडण्यासाठी स्थानिक नेत्यांना प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागणार आहे. यापूर्वी शहर स्मार्ट सिटीतस्मार्ट सिटी उपक्रमातून शहराला १ हजार कोटींच्या आसपास केंद्र शासनाचे अनुदान मिळाले. आता टू टीअरच्या निकषात शहर पात्र आहे. २०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या १४ लाखांच्या आसपास आहे. ज्या शहरात मध्यम खर्च, उत्तम पायाभूत सुविधा, नोकरीच्या संधी आणि सुधारित जीवनशैली उपलब्ध आहे, त्या शहरांसाठी ही योजना आहे, त्या श्रेणीत छत्रपती संभाजीनगर आहे. टू टीअरच्या श्रेणीत शहर येते...छत्रपती संभाजीनगर हे शहर टू टीअरच्या श्रेणीत येते. त्यामुळे या श्रेणीसाठी केंद्र शासनाने केलेल्या तरतुदींचा लाभ घेण्यासाठी प्रयत्न करता येतील.- जी.श्रीकांत, मनपा प्रशासक.
34 shares
😐
Loksatta logo
Loksatta
Feb 2, 2026, 08:41 AM
भारताच्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा आणि उत्पादन क्षेत्रांवर भर

भारताच्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा आणि उत्पादन क्षेत्रांवर भर

डॉ. रुपा रेगेआर्थिक वाढीला प्रोत्साहन देण्यासाठी पायाभूत सुविधांवरील भांडवली खर्च रु. १२.२ लाख कोटींपर्यंत वाढविण्यात आला आहे. यांत इतर सहायक अनुदानांची भर टाकली तर एकूण सकल राष्ट्रीय उत्पादनामधील या खर्चाचे प्रमाण आता ४.४ टक्के एवढे वाढले आहे जे २०१७-१८ मध्ये केवळ २.७ टक्के होते. तर दुसरीकडे ‘संरक्षणा’वरील खर्च एका वर्षात १५.३ टक्क्यांनी वाढवून रु. ७.८४ लाख कोटींपर्यंत नेला आहे. मंदावलेल्या रोजगारनिर्मितीची समस्या लक्षात घेऊन, वस्तूनिर्माण क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचा स्तुत्य प्रयत्न झाला आहे. उदाहरणार्थ बायोफार्मा क्षेत्राची क्षमता वाढवण्यासाठी प्रथमच रु. ५०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे तसेच देशाला चिप निर्मितीचे जागतिक केंद्र बनवण्यासाठी इंडिया सेमीकंडक्टर मिशन २.० सुरू करून त्यासाठी प्रथमच रु. एक हजार कोटी देण्यात आले आहेत. इतरही काही योजना, उदा. एसएमई ग्रोथ फंड (रु ५०० कोटी) , क्रीडा-क्षेत्रातील वस्तू (रु. ५०० कोटी), केमिकल पार्क्स (रु. ६०० कोटी) वगैरेंसाठी प्रथमच यावर्षीच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त इलेक्ट्रॉनिक्स वस्तूनिर्मिती क्षेत्र, मायक्रोफूड प्रोसेसिंग क्षेत्र, नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट ट्रस्ट, न्यूक्लियर पॉवर प्रकल्प, मत्स्यपालन क्षेत्र, वस्त्रोद्योग कार्यक्रम, नॅशनल फायबर योजना इत्यादी उद्योगांना यंदाही मदत सुरू ठेवण्यात आली आहे. पण तरीही या अर्थसंकल्पाचे एकूण सकल राष्ट्रीय उत्पादनाबरोबर गुणोत्तर घेतले तर ते फक्त १३.६ टक्के असून गेल्या वर्षीपेक्षा कमीच आहे. गेल्या वर्षी ते १४.२ टक्के होते. दरवर्षी हे गुणोत्तर कमी होत चालले आहे. कारण आपल्या सार्वजनिक कर्जाचा वाढलेला बोजा. अनेक देश आजमितीला ‘सार्वजनिक कर्जा’च्या वाढीव बोज्याने हैराण झाले आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पातील (२०२६-२७) खर्च भागविण्यासाठी, केंद्रीय सरकारला रु. १७.२ लाख कोटी रुपयांची कर्जे सरकारी रोखे बाजारातून काढावी लागणार आहेत. हा आकडा रोखेबाजारातील व्यापार्‍यांच्या अंदाजापेक्षा कितीतरी अधिक आहे. अनेक राज्य सरकारेही खर्च भागविण्यासाठी सरकारी रोखे बाजारातून कर्जे घेत असतात. सरकारी क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात उचलल्या जाणार्‍या या कर्जामुळे, व्याजाचे दर आणखी वर जाण्याची भीती आहे. एकीकडे केंद्रीय सरकार अर्थव्यवस्थेतील मागणी वाढण्यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष करांचे दर कमी करत आहे ज्यामुळे सरकारचा ‘महसूल’ वाढत नाही. दुसरीकडे प्रोत्साहक खर्च भागविण्यासाठी मोठ्या प्रमाणात कर्जे घेत आहे, ज्यामुळे सरकारी तसेच खासगी क्षेत्राला वाढीव व्याजाच्या दरांचा सामना करावा लागत आहे. याचा विपरीत परिणाम खासगी क्षेत्राच्या गुंतवणुकीवर होताना दिसतो. तसेच खासगी क्षेत्राच्या गुंतवणुकीला चालना मिळण्यासाठी व्याजदर खाली आणण्याचे रिझर्व्ह बँकेचे प्रयत्न सफल होत नाहीत. २०२५ च्या वर्षात परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूक झपाट्याने कमी करत नेली. त्यामुळे त्यांना आकृष्ट करण्याच्या हेतूने ‘ब्रोकरेज’ वरील १८ टक्के जीएसटी काढून घेण्यात आला आहे. तसेच अनिवासी भारतीयांसाठी गुंतवणुकीच्या संधी वाढवण्यावर भर देण्यात आला आहे. वैयक्तिक गुंतवणूक मर्यादा पाच टक्क्यांवरून १० टक्क्यांपर्यंत नेण्यात आली असून, एकूण परकीय होल्डिंगची मर्यादा २४ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यांच्यासाठी मालमत्ता विक्रीवरील टीडीएस नियम सुलभ करण्यात आले आहेत. पण या सगळ्यांमुळे भारतात येणारा परदेशी भांडवलाचा ओघ किती प्रमाणात वाढू शकेल हा प्रश्नच आहे. शेवटी परदेशी गुंतवणूकदार भारतातील उद्योगांची कामगिरी, ते कमावत असलेल्या नफ्यातील सातत्य, सरकारी कर्जाचे व्यवस्थापन या बाबींना सर्वाधिक महत्त्व देतात. नेहमीप्रमाणेच आरोग्य व्यवस्था, ग्रामीण विकास, महिला सक्षमीकरण, शिक्षण, कौशल्य व पर्यटन या क्षेत्रांसाठी भरपूर घोषणा करण्यात आल्या आहेत. पण प्रत्यक्ष आकडे पाहिले की हे खर्च देशाच्या एकूण गरजेच्या तुलनेत किती नगण्य आहेत हे जाणवते. उदाहरणार्थ आरोग्य आणि कुटुंब-कल्याण मंत्रालयाला देणात आलेले वाटप हे एकूण सकल राष्ट्रीय उत्पादनात फक्त ०.२६ टक्के एवढेच आहे तर शिक्षण मंत्रालयाला देणात आलेले वाटप हे एकूण सकल राष्ट्रीय उत्पादनात फक्त ०.३५ टक्के आहे. वर्षानुवर्षे हे गुणोत्तर असेच थंडावलेले आहे. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी नवीन सकल राष्ट्रीय उत्पादन सीरिज प्रकाशित होईल. त्यातून नवीन आकडे, नवीन गुणोत्तरे बघावयास मिळतील. पण वाढलेल्या कर्जाची टांगती तलवार डोक्यावर असेल तर इच्छा असूनही एका मर्यादेपलीकडे धोरणकर्ते विशेष काही करू शकत नाहीत, हेच २०२६-२७ साठीचा अर्थसंकल्प स्पष्टपणे दाखवून देतो.-डॉ. रुपा रेगेप्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस, सिम्बॉयोसिस स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स
10 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Feb 2, 2026, 08:27 AM
फिच रेटिंग्जने भारतीय अर्थसंकल्पाचे केले स्वागत, सार्वभौम कर्जासाठी आश्वासक चिन्हे दिसतात

फिच रेटिंग्जने भारतीय अर्थसंकल्पाचे केले स्वागत, सार्वभौम कर्जासाठी आश्वासक चिन्हे दिसतात

Fitch Ratings on GDP Growth :केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पावर जागतिक स्तरावर सकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहेत. आंतरराष्ट्रीय रेटिंग एजन्सी 'फिच रेटिंग्स'ने या बजेटचे स्वागत केले असून, सरकारी कर्जात क्रमिक घट करून व्यापक आर्थिक स्थिरता राखण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचे कौतुक केले आहे. भारताची विकास क्षमता आणि राजकोषीय शिस्त यांच्यात संतुलन साधण्याचा हा प्रयत्न असल्याचे फिचचे म्हणणे आहे. कर्जस्थितीत सुधारणेची चिन्हेफिचच्या मते, भारताची मजबूत जीडीपी वाढ ही देशाच्या सार्वभौम कर्ज निर्देशकांसाठी आशादायक आहे. जर विकासदराची ही गती कायम राहिली, तर सध्याच्या आव्हानांनंतरही भारताच्या कर्जस्थितीत दीर्घकाळात मोठी सुधारणा होईल. नियमांमधील शिथिलता आणि सुधारणांचा वेग कायम ठेवल्यास देशात खाजगी गुंतवणूक वाढेल आणि भारताचा विकास दर अधिक मजबूत होईल. राजकोषीय तूट : समतोल राखण्याचे आव्हान वाचा -बजेटमुळे गुंतवणूकदारांचे १० लाख कोटी स्वाहा; सर्वाधिक घसरण कोणत्या वर्षी? यंदा मोडले जुने रेकॉर्ड २०२६-२७ मध्ये ६.४% विकासदराचा अंदाजफिच रेटिंग्सचे संचालक जेरेमी जूक यांनी म्हटले आहे की, हे बजेट विकास आणि स्थैर्य यांच्यातील संतुलनाचे उत्तम उदाहरण आहे. फिचच्या अंदाजानुसार, आगामी वित्त वर्षात भारताची आर्थिक विकास दर ६.४ टक्के राहण्याची शक्यता आहे. जरी बजेटमध्ये मोठ्या संरचनात्मक सुधारणांची घोषणा झालेली नसली, तरी भविष्यात नियमन अधिक सुटसुटीत होतील, अशी अपेक्षा एजन्सीने व्यक्त केली आहे.
35 shares
😊
Pudhari logo
Pudhari
Feb 2, 2026, 08:23 AM
केंद्रीय अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष

केंद्रीय अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष

ज्येष्ठ नागरिकांसंदर्भात आम्ही सातत्याने प्रत्यक्ष भेटून, निवेदनाद्वारे विविध मागण्या केल्या आहेत. पण, केंद्रीय अर्थसंकल्पात ज्येष्ठांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. कोरोना काळात ज्येष्ठ नागरिकांसाठीची रेल्वेची सवलत बंद करण्यात आली होती. त्याबाबत आम्ही फेस्कॉमच्या वतीने ही सवलत पुन्हा सुरू करावी, या मागणीसाठी पाठपुरावा करीत आहोत. पण, यंदाच्या अर्थसंकल्पामध्येही त्याविषयी विचार केला गेलेला नाही. ज्येष्ठांसाठी आरोग्य योजनाही जाहीर करण्यात आलेली नाही. एकंदरीत, देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले गेले आहे. अरुण रोडे, माजी अध्यक्ष, महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ, फेस्कॉम) 2026 चे बजेट हे भारताला विकसित भारत करण्यासाठी असून, या बजेटमध्ये मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या योजना आखलेल्या आहेत. तसेच, उद्योगवाढीसाठी अनेक प्रोव्हिजन्स या बजेटमध्ये दिसतात. त्यामुळे औद्योगिक विकास झपाट्याने व त्यातून रोजगारनिर्मिती मोठ्या प्रमाणावर होईल, असे दिसते. हे बजेट उद्योगासाठी चांगले आहे. परंतु, पुणे परिसर फार मोठ्या प्रमाणावर भारत सरकारला रेव्हेन्यू देत असूनसुद्धा पुणे परिसरात पायाभूत सुविधा फार कमी आहेत. पुण्याच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी विशेष पॅकेजची गरज अपेक्षित होती ती या बजेटमध्ये मिळताना दिसत नाही. दुसऱ्या बाजूला कामगार व मध्यम वर्गासाठी या बजेटमुळे निराशा हाती आली आहे. सामान्य माणसासाठी व मध्यमवर्गासाठी कुठलीही टॅक्स रिलीफ या बजेटमधून मिळाली नाही, उलट महागाई वाढून याचा बोजा सामान्य माणसाच्या खिशावर पडणार आहे, मध्यमवर्गाला या बजेटमध्ये काहीच सवलत मिळाली नाही. या बजेटमध्ये अनेक लेबर कोर्ट तयार करण्यासाठी प्रोव्हिजन्स केलेल्या आहेत, याचाच अर्थ भविष्यात खूप मोठ्या प्रमाणावर विवाद वाढणार आहेत, हे याचे द्योतक आहे. त्यामुळे हे बजेट ‌‘थोडी खुशी, थोडा गम‌’ असे आहे. दिलीप बटवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी, फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीज
45 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Feb 2, 2026, 07:55 AM
भारताचा 2026 चा अर्थसंकल्पः आर्थिक भागीदार म्हणून महिलांचे सक्षमीकरण

भारताचा 2026 चा अर्थसंकल्पः आर्थिक भागीदार म्हणून महिलांचे सक्षमीकरण

महेश कुलकर्णीलोकमत न्यूज नेटवर्कयंदाचा अर्थसंकल्पमहिलांसाठीमहत्त्वाचा ठरला आहे. या अर्थसंकल्पामध्ये सरकारनेमहिलांनाकेवळ 'लाभार्थी' म्हणून न पाहता, त्यांना 'आर्थिक भागीदार' म्हणून पाहण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. महिला सक्षमीकरणावर आधारित हा अर्थसंकल्प येणाऱ्या काळात महिलांची स्थिती तळागाळापर्यंत बदलू शकतो. बजेटमधील मोठ्या घोषणांमुळे मोठ्या प्रमाणात महिलांच्या सहभागाने भारताच्या अर्थव्यवस्थेला अधिक शक्तीशाली बनविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सादर केलेल्या अर्थसंकल्पात महिलांसाठी शी मार्टस्‌बरोबर मुलींसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह, लखपती दीदी, शिक्षण आणि सुरक्षितता, चांगल्या आरोग्याची तरतूद, तांत्रिक सक्षमीकरण, वेगवेगळ्या कौशल्याबरोबर एआय ट्रेनिंग, नोकरी करणाऱ्या महिलांसाठी सुरक्षित वाहतूक व्यवस्था अशा अनेक योजना जाहीर केल्या आहेत. २०२६ च्या अर्थसंकल्पात 'सक्षम अंगणवाडी आणि पोषण २.०' या योजनेसाठी २३,१०० कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट कुपोषण निर्मूलन आणि ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था सुधारणे हे आहे. या अंतर्गत अंगणवाड्यांचे आधुनिकीकरण करून त्यांना 'सक्षम' बनवले जाईल, जिथे मुलांच्या शिक्षणासोबतच त्यांच्या आरोग्यावरही भर दिला जाईल. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी ही घोषणा अत्यंत महत्त्वाची आहे, कारण त्यांच्या प्रशिक्षणावर आणि कामाच्या सोयीसुविधांवर मोठा खर्च केला जाणार आहे. याअंतर्गत लहान मुले, किशोरवयीन मुली, गरोदर स्त्रिया आणि स्तनदा माता यांना सकस आहार पुरवला जातो. या निधीमुळे आहाराचा दर्जा सुधारेल आणि तंत्रज्ञानाचा वापर करून (उदा. पोषण ट्रॅकर) प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत मदत पोहोचत आहे की नाही, यावर लक्ष ठेवणे सोपे होईल. थोडक्यात, ही तरतूद महिलांचे आरोग्य आणि बालकांचा पाया मजबूत करणारी आहे. नमो ड्रोन दीदी योजनेत महिलांना ड्रोन उडवणे, डेटा गोळा करणे आणि ड्रोनची दुरुस्ती करण्याचे प्रशिक्षण दिले जाईल. यामुळे कृषी क्षेत्रात महिलांचा तांत्रिक सहभाग वाढेल, विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी विशेष कौशल्य केंद्रे आणि प्रयोगशाळा विकसित केल्या जातील, कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल मार्केटिंग आणि ई-कॉमर्सचे प्रशिक्षण दिले जाईल. - 'शी-मार्ट्स' स्वतःची बाजारपेठ, ग्रामीण महिलांना उत्पादकतेकडून उद्योजकतेकडे नेण्यासाठी योजना.- नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ७५,००० चे स्टँडर्ड डिडक्शन कायम ठेवण्यात आले आहे.- लखपती दीदी योजनेत महिलांना उद्योजक बनवण्यासाठी ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज.
74 shares
😊
Lokmat logo
Lokmat
Feb 2, 2026, 07:40 AM
2026 च्या अर्थसंकल्पात कॉफी यंत्रांवरील सवलती हटवल्यामुळे कॉफी प्रेमींना महागड्या किंमतीला सामोरे जावे लागत आहे

2026 च्या अर्थसंकल्पात कॉफी यंत्रांवरील सवलती हटवल्यामुळे कॉफी प्रेमींना महागड्या किंमतीला सामोरे जावे लागत आहे

Budget 2026: जर तुम्हाला कॉफी पिण्याची आवड असेल, तरअर्थसंकल्प २०२६तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आलेला नाही. या अर्थसंकल्पात कॉफी मशिनवर मिळणारी विशेष सवलत काढून घेण्यात आली आहे. यामुळे मशिनच्या किमती वाढणार असून पर्यायानं तुमची कॉफी देखील महाग होणार आहे. सध्या कॉफी मशिनवर १० टक्के आयात शुल्क लागतं, परंतु सवलतीमुळे ते ७.५ टक्क्यांपर्यंत स्वस्त मिळत होतं. आता ही सवलत रद्द झाल्यामुळे मशिन खरेदीसाठी ग्राहकांना पूर्वीपेक्षा २.५ टक्के अधिक पैसे मोजावे लागतील. तज्ज्ञांच्या मते, रुपयाचे डॉलरच्या तुलनेत कमी झालेलं मूल्य हे देखील यंदाच्या महागाईमागील एक मोठं कारण ठरलं आहे. Crypto बाजारात हाहाकार; Bitcoin ७५ हजार डॉलर्सच्या खाली, घसरणीचं कारण काय? अर्थमंत्रीनिर्मला सीतारामनयांनी रविवारी संसदेत सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात सीमा शुल्कात कपात करण्याची घोषणा केली. यामुळे कर्करोगावरील १७ औषधांसह ७ दुर्मिळ आजारांसाठी लागणारी औषधं आणि विशेष वैद्यकीय अन्नपदार्थ स्वस्त होतील. तसेच 'मायक्रोवेव्ह ओव्हन'मध्ये वापरले जाणारे सुटे भाग देखील स्वस्त होणार आहेत. मात्र, आयात केलेल्या स्वस्त छत्र्या, एटीएम/कॅश डिस्पेंसर, कॉफी बनवण्याचं किंवा 'व्हेंडिंग' मशिन यांसारख्या वस्तू मूळ सीमा शुल्कातील (BCD) वाढीमुळे महाग होणार आहेत. दुसरीकडे, 'सोलर ग्लास'च्या निर्मितीमध्ये वापरल्या जाणाऱ्या 'सोडियम अँटीमोनेट'च्या आयातीवरील कस्टम ड्युटीतून सवलत देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. अणुऊर्जा प्रकल्पांसाठी आवश्यक असलेल्या वस्तूंच्या आयातीवर मिळणारी सध्याची मूळ सीमा शुल्क सवलत २०३५ पर्यंत वाढवण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. ही सवलत सर्व अणुऊर्जा प्रकल्पांना, त्यांच्या क्षमतेचा विचार न करता लागू केली जाणार आहे.
13 shares
😢