Achira News Logo
Achira News
Lokmat logo
Lokmat
May 5, 2026, 09:48 AM
महाराष्ट्र सरकारने शैक्षणिक सुधारणा आणि नवीन अभियांत्रिकी अभ्यासक्रमांची घोषणा केली

महाराष्ट्र सरकारने शैक्षणिक सुधारणा आणि नवीन अभियांत्रिकी अभ्यासक्रमांची घोषणा केली

महाराष्ट्रासहदेश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स... LIVE आदिवासी बांधवांच्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी महत्वपूर्ण निर्णय. स्वयंसेवी संस्थाच्या पाच प्राथमिक व 19 माध्यमिक अनुदानित आश्रमाशाळांची श्रेणीवाढ. प्राथमिकमधून माध्यमिक आणि माध्यमिकमधून कनिष्ठ महाविद्यालय अशी श्रेणीवाढ, त्यासाठी आवश्यक पदनिर्मिती व आवश्यक खर्चाच्या तरतूदीस मंजुरी. डोंगराळ, दुर्गम भागातील आदिवासी बांधवांच्या मुलांचे शिक्षण गतीमान होणार. सोलापूरसाठी महत्वाचा निर्णय सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये या शैक्षणिक वर्षापासून (सन २०२६-२७) पदवीस्तराचे तीन अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरु करण्यास मंजुरी. सोलापूर आणि आजुबाजुच्या परिसरातील अभियांत्रिकी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या होतकरूंच्या दृष्टीने हिताचा निर्णय. प्रत्येकी साठ प्रवेश क्षमतेचे एआय अँण्ड मशिन लर्निंग, कॉम्प्युटर सायन्स अँण्ड इंजिनियरींग, इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड टेलिकम्युनिकेशन असे तीन नवे अभियांत्रिकी अभ्यासक्रम. अभियांत्रिकी विद्यालय महाराष्ट्र शासनास हस्तांतरीत धाराशिव जिल्हयातील तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या माध्यमातून चालविण्यात येणारे श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय महाराष्ट्र शासनास हस्तांतरित करण्याचा निर्णय. महाविद्यालयाचे सक्षमीकरण होणार, अद्ययावत शैक्षणिक सोयी-सुविधांमुळे या परिसरातील होतकरूंना दर्जेदार अभियांत्रिकी शिक्षण उपलब्ध होण्याची संधी. नसरापूर प्रकरणानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गुन्हेगारांवर लगाम घालण्यासाठी मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीसयांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला असून, लैंगिक शोषणातील आरोपींना पॅरोल न देण्याबाबत नवीन कायदा करण्याचे आदेश विधी व न्याय विभागाला दिले आहेत. चीनमधीलएका फटाक्याच्या फॅक्ट्रीत झालेल्या भीषणस्फोटात२१ जणांचामृत्यूझाला असून ६१ जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनंतरचीनचेराष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.वाचा सविस्तर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही या निकालाबद्दल शंका उपस्थित केल्या आहेत. "जी दिल्ली आणि पश्चिम बंगाल भाजपाला मोदी लाट शिखरावर असताना जिंकता आले नाही. २०१५ साली दिल्लीमध्ये आणि २०१६ साली बंगालमध्ये प्रत्येकी तीन जागा मिळाल्या. त्या दिल्ली आणि बंगालमध्ये भाजपाने अशा काळात विजय मिळवला, जेव्हा मोदींची लोकप्रियता संपूर्ण देशात रसातळाला चालली आहे, असे कसे?", असा सवाल केजरीवालांनी उपस्थित केला आहे. जनतेने पंतप्रधान मोदी आणि देशाच्या विकासावर आपला विश्वास व्यक्त केला आहे. पश्चिम बंगालच्या लोकांनी भाजपाला मतदान केले, कारण ते ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील सरकारवर असमाधानी होते अशी प्रतिक्रिया शिंदेसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली आहे. #WATCH| Delhi | On the BJP-NDA's performance in the Assembly elections in 4 states and 1 UT, Shiv Sena MP Shrirang Barne says, "...The public has bestowed its trust on PM Modi and development...The public of West Bengal voted for the BJP as they were dissatisfied with the Mamata…pic.twitter.com/sWGGTVYYVT इराणने संयुक्त अरब अमिरातीमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात तीन भारतीय नागरिक जखमी झाले आहेत. यूएईतील फुजैराहमध्ये इराणने मिसाईल डागली. त्यात तीन भारतीय जखमी झाले. या घटनेबद्दल भारताने तीव्र संताप व्यक्त केला. भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जायस्वाल म्हणाले की, "फुजैराहमध्ये झालेल्या हल्ल्यात तीन भारतीय जखमी झाले आहेत. हे अजिबात खपवून घेण्यासारखं नाहीये. हे हल्ले ताबडतोब थांबण्यात यावे आणि सर्वसामान्य लोकांना, तसेच अत्यावश्यक सेवांना लक्ष्य करणे बंद करण्यात यावे." सर्वात आधी विजय यांना त्यांची भूमिका स्पष्टपणे मांडू द्या, त्यांच्या भूमिकेनंतर आम्ही कुणाला पाठिंबा द्यायचा हे ठरवू. आम्ही DMK आघाडीसोबत आहोत. यात शंका नाही असं विधान सीपीआयचे सचिव पी. षण्मुगम यांनी म्हटलं. Chennai | Tamil Nadu CPI(M) Secretary P Shanmugam says, "First, let Vijay clearly state his position. Once he does, we will decide whom to support. There is no doubt that we are with the DMK alliance"pic.twitter.com/sG3Y1l6qQN जनतेने पंतप्रधान मोदी आणि देशाच्या विकासावर आपला विश्वास व्यक्त केला आहे. पश्चिम बंगालच्या लोकांनी भाजपाला मतदान केले, कारण ते ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील सरकारवर असमाधानी होते अशी प्रतिक्रिया शिंदेसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली आहे. #WATCH| Delhi | On the BJP-NDA's performance in the Assembly elections in 4 states and 1 UT, Shiv Sena MP Shrirang Barne says, "...The public has bestowed its trust on PM Modi and development...The public of West Bengal voted for the BJP as they were dissatisfied with the Mamata…pic.twitter.com/sWGGTVYYVT राज्यसभा सदस्य आणि भाजप नेते राघव चड्ढा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीसाठी राष्ट्रपती भवनात दाखल #WATCH| Delhi: Rajya Sabha MP and BJP leader Raghav Chadha reaches Rashtrapati Bhavan to meet President Droupadi Murmu.pic.twitter.com/XTISlAVpLi नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या मुलानेही वडिलांच्या कृत्याचा तीव्र निषेध करत कठोर शब्दांत संताप व्यक्त केला. "तो माझा बाप आहे हीच माझी चूक आहे. त्याला लवकरात लवकर फाशी द्या", अशी मागणी त्याने केली आहे. त्या चिमुरडीला जितक्या वेदना झाल्या, तशाच वेदना त्यालाही झाल्या पाहिजेत, असेही तो म्हणाला
8 shares
😐
Maharashtra Times logo
Maharashtra Times
May 5, 2026, 09:27 AM
सोलापूर शासकीय पॉलिटेक्निकने नवीन अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरू केले, महाविद्यालय महाराष्ट्र सरकारकडे हस्तांतरित केले

सोलापूर शासकीय पॉलिटेक्निकने नवीन अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरू केले, महाविद्यालय महाराष्ट्र सरकारकडे हस्तांतरित केले

Solapur Government Polytechnic New Engineering Courses:आज, मंगळवारी (५ मे) रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शिक्षणविषयक आणि आदिवासी विकास विभाग अंतर्गत असे एकूण तीन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामध्ये आदिवासी मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठीचा महत्त्वाचा निर्णय, तसेच सोलापूर शासकीय तंत्रनिकेतनमध्ये नवीन तीन अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरू करणे, श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय महाराष्ट्र शासनास हस्तांतरित करण्याचा निर्णय झाला आहे. चला तर हे महत्त्वाचे निर्णय सविस्तरपणे जाणून घेऊयात.आश्रमाशाळांची श्रेणीवाढआदिवासी बांधवांच्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. स्वयंसेवी संस्थाच्या पाच प्राथमिक व १९ माध्यमिक अनुदानित आश्रमाशाळांची श्रेणीवाढ करण्यात आली आहे. प्राथमिकमधून माध्यमिक आणि माध्यमिकमधून कनिष्ठ महाविद्यालय अशी श्रेणीवाढ करण्यात आली आहे. त्यासाठी आवश्यक पदनिर्मिती व आवश्यक खर्चाच्या तरतूदीस मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे डोंगराळ, दुर्गम भागातील आदिवासी बांधवांच्या मुलांचे शिक्षण गतीमान होण्याची आशा व्यक्त केली जात आहे. हा निर्णय आदिवासी विकास विभाग अंतर्गत घेण्यात आला आहे.सोलापुरकरांसाठी आनंदाची बातमी!सोलापुरच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये या शैक्षणिक वर्षापासून (सन २०२६-२७) पदवीस्तराचे तीन अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरु करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. सोलापूर आणि आजुबाजुच्या परिसरातील अभियांत्रिकी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या होतकरूंच्या दृष्टीने हिताचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येकी साठ प्रवेश क्षमतेचे एआय अँण्ड मशिन लर्निंग, कॉम्प्युटर सायन्स अँण्ड इंजिनियरींग, इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड टेलिकम्युनिकेशन असे तीन नवे अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. हा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभाग अंतर्गत घेण्यात आला आहे.पोलीस भरतीत 'कॉपी-पेस्ट'चा कळस! सराव संचातील ८५ प्रश्न जसेच्या तसे; पेपर फुटल्याचाही संशयधाराशिव जिल्ह्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे हस्तांतरणधाराशिव जिल्हयातील तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या माध्यमातून चालविण्यात येणारे श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय महाराष्ट्र शासनास हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. हस्तांतरण केल्यानंतर महाविद्यालयाचे सक्षमीकरण होणार आहे. तसेच महाविद्यालयातील अद्ययावत शैक्षणिक सोयी-सुविधांमुळे या परिसरातील होतकरूंना दर्जेदार अभियांत्रिकी शिक्षण उपलब्ध होण्याची संधी उपलब्ध होणार आहे. हा निर्णय महाराष्ट्र सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभाग अंतर्गत घेण्यात आला आहे.
66 shares
😐
Maharashtra Times logo
Maharashtra Times
May 5, 2026, 05:07 AM
एन. ई. ई. टी. यू. जी. परीक्षेतील फसवणूक प्रकरणः उत्तरांची नक्कल करण्यासाठी विद्यार्थी ए. आय. द्वारे चालणारे फोन वापरतात

एन. ई. ई. टी. यू. जी. परीक्षेतील फसवणूक प्रकरणः उत्तरांची नक्कल करण्यासाठी विद्यार्थी ए. आय. द्वारे चालणारे फोन वापरतात

NEET UG 2026 Cheating :गडचिरोलीत 'नीट' परीक्षेदरम्यान हायटेक कॉपीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कडक तपासणी असतानाही दोन विद्यार्थ्यांनी चक्क मोबाइल परीक्षा केंद्रात नेले आणि 'AI' च्या मदतीने उत्तरे मिळवली. शिवाजी महाविद्यालय आणि गोकुळनगर केंद्रावरील या प्रकारामुळे खळबळ उडाली असून, पोलिसांनी 'सार्वजनिक परीक्षा कायदा २०२४' अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरिता रविवारी झालेल्या ‘नीट’ परीक्षेसाठी कडक तपासणी, बंदोबस्त आणि नियमांची जाळी असतानाही गडचिरोली येथील दोन केंद्रांवर विद्यार्थ्यांनी मोबाइल आत नेऊन एआयच्या मदतीने उत्तरे मिळवल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली.सुरक्षेला छेद कसा?‘नीट’सारख्या परीक्षेत अगदी चप्पल, पिना, दागिने यांनाही मनाई असताना मोबाइल आत कसा गेला, हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. या घटनेमुळे केंद्रावरील तपासणी प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.कचऱ्याच्या गाड्या ढकलणाऱ्या हातांच्या लेकरांनी गाठलं आभाळ! पुण्याच्या झोपडपट्टीतून उमलली बारावीच्या यशाची 'फुले'शहरातील धानोरा मार्गावरील शिवाजी महाविद्यालय केंद्रावर दुपारच्या सत्रात खोली क्रमांक ६ मध्ये बसलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथील एका विद्यार्थिनीच्या हालचालींनी पर्यवेक्षकांचे लक्ष वेधले. तपासणी केली असता तिच्याकडे लपवून ठेवलेला मोबाइल सापडला. एवढेच नाही, तर नवीन प्रश्नपत्रिका लपवून जुना पेपर जोडून कॉपी करण्याची योजना तिने आखल्याचे समोर आले.गोकुळनगर येथील दुसऱ्या केंद्रावर आणखी एक धक्कादायक प्रकार उघड झाला. आष्टी येथील १७ वर्षीय परीक्षार्थी मोबाइलसह परीक्षेला बसल्याचे आढळले. पर्यवेक्षकांनी त्याला पकडल्यानंतर मोबाइल तपासला असता, प्रश्नपत्रिकेचे फोटो आणि त्यावरून एआयकडून मिळवलेली उत्तरे स्पष्ट दिसली. चॅट हिस्ट्रीनेच ‘डिजिटल कॉपी’चा पर्दाफाश केला.Maharashtra Board Digital Exam Plan: कागद नाही, आता फक्त स्क्रीन! दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षा होणार पेपरलेस! कधीपासून होणार अंमलबजावणी?या दोन्ही प्रकरणांत केंद्रप्रमुखांनी तक्रार दिल्यानंतर गडचिरोली पोलिसांनी ‘सार्वजनिक परीक्षा कायदा २०२४’ अंतर्गत गुन्हे नोंदवले आहेत. जप्त मोबाइल आणि संबंधित डिजिटल पुरावे तपासासाठी ताब्यात घेण्यात आले असून, या प्रकरणामागे मोठे रॅकेट आहे का, याचा शोध सुरू आहे.
28 shares
😢
Lokmat logo
Lokmat
May 5, 2026, 04:18 AM
भारतीय नोकरी बाजारात भरतीत 6 टक्के वार्षिक वाढ, विमा क्षेत्र आघाडीवर

भारतीय नोकरी बाजारात भरतीत 6 टक्के वार्षिक वाढ, विमा क्षेत्र आघाडीवर

नवी दिल्ली :देशातील नोकरीच्या बाजारपेठेत चालू आर्थिक वर्षाची सुरुवात सकारात्मक झाली असून, एप्रिल महिन्यात नोकरभरतीमध्ये वार्षिक सहा टक्क्यांची वाढ नोंदविॉण्यात आली आहे. ‘नोकरी जॉबस्पीक इंडेक्स’च्या ताज्या अहवालानुसार, विमा क्षेत्रातील नियुक्त्यांमध्ये तब्बल २१ टक्क्यांची वाढ झाल्याने हे क्षेत्र रोजगाराच्या बाबतीत अव्वल ठरले आहे. मात्र, महानगरांच्या तुलनेत मुंबईत भरती प्रक्रियेत तीन टक्क्यांची घट झाल्याचे समोर आले आहे. सर्वाधिक भरती ही हैदराबाद, बेंगळुरू येथे झाली आहे. KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल क्षेत्र वाढ/घट विमा २१% बीपीओ/आयटीईएस १५% रिअल इस्टेट १२% आरोग्य सेवा ११% शिक्षण ९% दूरसंचार -११% बँकिंग -१०% विमा आणि रिअल इस्टेटमध्ये ‘बूम’ अहवालानुसार, विमा क्षेत्रानंतर बीपीओ (१५%), रिअल इस्टेट (१२%), आरोग्य सेवा (११%) आणि शिक्षण (९%) या क्षेत्रांमध्ये सर्वाधिक नवीन संधी निर्माण झाल्या आहेत. टेलिकॉम आणि बँकिंग क्षेत्रात घसरण कायम आहे. आयटी, वाहन क्षेत्रातील स्थिती स्थिर राहिली आहे. छोट्या शहरांकडे कल : मोठ्या महानगरांपेक्षा जयपूर (१२%), कोईम्बतूर (११%) व अहमदाबाद (७%) यांसारख्या टियर-२ शहरांमध्ये कंपन्यांनी नोकरभरतीवर अधिक भर दिल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
17 shares
😐
Lokmat logo
Lokmat
May 4, 2026, 04:25 PM
जनगणनेच्या गणनेच्या कामासाठी शिक्षकांच्या समन्सना मुंबई उच्च न्यायालयाची अंतरिम स्थगिती

जनगणनेच्या गणनेच्या कामासाठी शिक्षकांच्या समन्सना मुंबई उच्च न्यायालयाची अंतरिम स्थगिती

नागपूर :सीबीएसई व विनाअनुदानित धार्मिक अल्पसंख्यांक शाळांमधील सुमारे १५०शिक्षकांनाजनगणनेच्या कामासाठी बोलावणाऱ्या आदेशांना मुंबई उच्चन्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने सोमवारी विविध कायदेशीर बाबी लक्षात घेता अंतरिम स्थगिती दिली. तसेच, केंद्रीय गृह विभागाचे सचिव, जनगणना संचालक, महानगरपालिकेचे प्रधान जनगणना अधिकारी व प्रभारी जनगणना अधिकारी यांना नोटीस बजावून यावर दोन आठवड्यांत स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले. वादग्रस्त आदेशांविरोधात सीबीएसई स्कूल्स स्टाफ वेलफेयर असोसिएशन, सिख एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित श्री गुरू हरकिशन पब्लिक स्कूल आणिशिक्षकांनीउच्चन्यायालयामध्येतीन याचिका दाखल केल्या आहेत. त्यापैकी दोन याचिकांवर न्यायमूर्तिद्वय अनिल किलोर व राज वाकोडे आणि एक याचिकेवर न्यायमूर्तिद्वय उर्मिला जोशी-फलके व निवेदिता मेहता यांच्यापुढे सुनावणी झाली. दरम्यान, याचिकाकर्त्यांचे वकील ॲड. पुरुषोत्तम पाटील यांनी जनगणना कायदा व नियमातील तरतुदी आणि 'गोकुल मुंढे व इतर' प्रकरणामधील उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष वेधून वादग्रस्त आदेश अवैध, मनमानी व अधिकारांचा दुरुपयोग करणारा आहे, असा दावा केला. जनगणना दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे या शाळांच्या कर्मचाऱ्यांना जनगणनेच्या कामात गुंतवता येणार नाही. हे कर्मचारी शैक्षणिक कर्तव्यावर गैरहजर राहिल्यास विद्यार्थ्यांच्या भविष्यावर वाईट परिणाम पडेल, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
12 shares
😐
Maharashtra Times logo
Maharashtra Times
May 4, 2026, 03:21 PM
मुंबई विद्यापीठाने शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश वेळापत्रक जाहीर केले 2026-2027

मुंबई विद्यापीठाने शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश वेळापत्रक जाहीर केले 2026-2027

Mumbai University Admission 2026 Schedule:राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये, मान्यताप्राप्त शिक्षण संस्था आणि विद्यापीठातील शैक्षणिक विभागामध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२०२७ साठी पदवीच्या ३ आणि ४ वर्षीय अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाची प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात आले आहे.राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार व महाराष्ट्र शासनाच्या २० एप्रिल २०२३ च्या शासन निर्णयानुसार ३ वर्षीय पदवी अभ्यासक्रम, ४ वर्षीय ऑनर्स/ ऑनर्स विथ रिसर्च, ५ वर्षीय इंटिग्रेटेड प्रोग्राम्स विथ मल्टीपल एन्ट्री अँड मल्टीपल एक्जिट या अनुषंगाने ही प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे. मुंबई विद्यापीठाच्याhttps://muugadmission.samarth.edu.in/या संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थ्यांना प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणी करायची आहे.बिगर व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाकडे प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी मुंबई विद्यापीठाने प्रथमवर्ष बी.ए, बी.एस्सी, बी.कॉम, बीए.एमएमसी, बी.एसडब्ल्यू, बीए (फिल्म टेलेव्हिजन अँड न्यू मीडिया प्रोडक्शन), बीए (फ्रेंच स्टडीज), बीए (जर्मन स्टडी), बॅचलर ऑफ कलिनरी आर्ट, बीए-एमए ( इंटिग्रेटेड कोर्स इन जर्मन स्टडीज), बीए-एमए ( इंटिग्रेटेड कोर्स इन पाली) बीएमएस-एमबीए (पाच वर्षीय एकात्मिक अभ्यासक्रम), बीकॉम (फायनान्शिअल मार्केट), बीकॉम ( अकॉउन्टींग अँड फायनान्स), बीकॉम ( बँकिंग अँड इन्शुअरन्स), बीकॉम ( फायनान्शिअल मॅनेजमेंट), बीकॉम ( इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट), बीकॉम ( ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट), बीकॉम ( मॅनेजमेंट स्टडीज), बीएस्सी ( इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी), बीएस्सी (कम्प्युटर सायन्स), बीएस्सी (हॉस्पीटॅलिटी स्टडी), बीएस्सी (मायक्रोबायोलॉजी), बीएस्सी ( बायो-केमेस्ट्री), बीएस्सी (बायो-टेक्नॉलॉजी), बीएस्सी ( मेरिटाईम), बीएस्सी (नॉटीकल सायन्स), बीएस्सी (फॉरेन्सिक सायन्स), बीएस्सी (होम सायन्स), बीएस्सी ( एरॉनॉटिक्स), बीएस्सी ( डेटा सायन्स), बीएस्सी (एव्हीएशन), बीएस्सी (ह्युमन सायन्स), बी.व्होक (टी अँड एचएम, आरएम, एफएम अँड एस, आरईएम, एमपी, एमएलटी, ग्रीन हाऊस मॅनेजमेंट, फार्मा एनेलिटिकल सायन्स, टूरिझम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट, एफ. वाय. बी व्हॉक (सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट), एफवाय बी. लायब्ररी सायन्स, बी. म्युझिक, बीपीए (म्युझिक), बीपीए (डान्स) एफवाय.बीएस्सी ( बायोएनॅलिटिकल सायन्स- पाच वर्षीय एकात्मिक अभ्यासक्रम) यासह अशा अनुदानित आणि विनाअनुदानित अभ्यासक्रमांसाठी प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी अनिवार्य आहे.प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक :अर्ज विक्री (संबधित महाविद्यालयाद्वारे ऑनलाईन/ऑफलाईन) – ६ मे ते २१ मे, २०२६ (दुपारी १.०० वाजेपर्यंत)प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया (विद्यापीठाच्या संकेतस्थळावर) – ६ मे ते २१ मे, २०२६ (दुपारी १.०० वाजेपर्यंत)ऑनलाईन/ऑफलाईन एडमिशन फॉर्म सादर करण्याची तारीख – ६ मे ते २१ मे, २०२६ (१.०० वाजेपर्यंत) (प्रवेशपूर्व नोंदणी फॉर्म आवश्यक) इन हाऊस एडमिशन आणि अल्पसंख्याक कोटा प्रवेश या कालावधीत करता येईल.पहिली मेरीट लिस्ट – २६ मे, २०२६ (सकाळी ११.०० वाजता)ऑनलाईन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे (हमीपत्र फॉर्मसह) – २७ ते २९ मे, २०२६ (दुपारी.३.०० वाजेपर्यंत)द्वितीय मेरीट लिस्ट – ३० मे, २०२६ (संध्याकाळी ७.०० वाजता)ऑनलाईन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे – १ जून ते ३ जून, २०२६ (दुपारी.३.०० वाजे पर्यंत)तृतीय मेरीट लिस्ट - ४ जून, २०२६ (संध्याकाळी ७.०० वाजता)ऑनलाईन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे – ५ ते ९ जून, २०२६कमेंसमेंट ऑफ क्लासेस/ ओरिएंटेशन- १३ जून २०२६आई-वडील नाहीत, वसतिगृहात झाडू मारला अन् बागकाम केलं; संभाजीनगरच्या 'दत्तू'ची बारावीत दैदीप्यमान झेप!NEP नुसार सर्व प्रवेश होणारपदवीच्या प्रथम वर्षासाठी होणारे सर्व प्रवेश आणि त्यांचे शैक्षणिक उपक्रम हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० च्या अनुषंगाने महाराष्ट्र शासन, मुंबई विद्यापीठ आणि विद्यापीठ अनुदान आयोग यांनी वेळोवेळी घालून दिलेल्या तरतूदी आणि मार्गदर्शक तत्वानुसार होतील. मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालये आणि स्वायत्त महाविद्यालयांनी निर्गमित केलेल्या या वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रिया राबवावी. तसेच महाविद्यालयांकडे असलेल्या प्रवेश क्षमतेनुसार, आरक्षणाचे नियम व तरतूद आणि अभ्यासक्रमांच्या पात्रतेनुसार प्रवेश प्रक्रिया राबवावी असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदळे यांनी सांगितले आहे. एआयसीटी अंतर्गत असलेल्या बीएमएस अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया ही सीईटी सेल मार्फत घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेच्या निकालानंतर राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीची लिंक ही ६ मे २०२६ रोजी सकाळी ११. ०० वाजेनंतर उपलब्ध होईल.
35 shares
😐
Pudhari logo
Pudhari
May 4, 2026, 09:00 AM
राज्य संचालित शाळांमध्ये मातृभाषेच्या शिक्षणावर महाराष्ट्र सरकारचा भर

राज्य संचालित शाळांमध्ये मातृभाषेच्या शिक्षणावर महाराष्ट्र सरकारचा भर

प्रत्येक शाळेला मिळणार इंग््राजी-मराठी शब्दसंग््राह सिंह म्हणाले, नीट, जेईई यांसह अन्य परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी तसेच भविष्यात नोकरीच्या संधी यांचा विचार करून मुलांना इंग््राजी शाळांमध्ये प्रवेशित करण्याकडे पालकांचा ओढा आहे. परंतु राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मातृभाषेतील शिक्षणावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे राज्य मंडळाच्या शाळांमध्येच दर्जेदार शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. त्यासाठीच ‌‘बालभारती‌’ने तयार केलेला इंग््राजी-मराठी शब्दसंग््राह प्रत्येक शाळेला देण्यात येणार आहे.
94 shares
😐
Sakal logo
Sakal
May 4, 2026, 08:36 AM
नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम जाणून घेण्यासाठी बिहारच्या शिक्षण अधिकाऱ्यांनी सातारा जिल्ह्याला भेट दिली

नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम जाणून घेण्यासाठी बिहारच्या शिक्षण अधिकाऱ्यांनी सातारा जिल्ह्याला भेट दिली

नागठाणे :सातारा जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या नावीन्यपूर्ण उपक्रमांची राबवणूक आता बिहार राज्यात होणार आहे. त्या अनुषंगाने बिहारच्या उच्चपदस्थ अधिकारी पथकाने शाळांना भेटी दिल्या.सध्या जिल्ह्यातील शाळांतून गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी वाचन, लेखन, आकलन, गणितीय क्रिया, इंग्रजी सुधार, आनंददायी अभ्यासक्रम, ‘गुढीपाडवा पट वाढवा’ यासारखे उपक्रम प्रभावीपणे राबविले जात आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाच्या शिक्षण विभागाने बिहारच्या शिक्षण विभागाला सातारा पॅटर्नची माहिती घेण्यास सांगितले होते.त्या दृष्टीने बिहारच्या शिक्षण विभागाचे अतिरिक्त सचिव रविशंकर सिंग, उपसंचालक अब्दुल कलाम अन्सारी, पाटण्याचे शिक्षणाधिकारी तन्वीर आलम, कार्यक्रमाधिकारी चंदन प्रताप, प्रथम संस्थेचे मच्छिंद्र पटरा यांनी जिल्ह्यातील शाळांना भेटी दिल्या. जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे, उपाध्यक्ष राजू भोसले, शिक्षण सभापती तेजस्विनी कदम, मुख्‍य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन आदींनी पथकाचे स्वागत केले. शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी यांनी उपक्रमांची माहिती दिली.
12 shares
😐
M
Maharashtra Times
May 4, 2026, 07:54 AM
महाराष्ट्रातील बाराव्या इयत्तेच्या परीक्षांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण आणि उच्च गुणांमध्ये घट

महाराष्ट्रातील बाराव्या इयत्तेच्या परीक्षांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण आणि उच्च गुणांमध्ये घट

पुणे :राज्यात गेल्या पाच वर्षांत बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्याची संख्या सुमारे ७० हजारांनी कमी झाली आहे, तर ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येतही साधारण अडीच हजारांची घट झाली आहे. त्या तुलनेत पाच वर्षांत सरकारी विद्यापीठे आणि संलग्न महाविद्यालयांमध्ये पारंपरिक अभ्यासक्रमांच्या उपलब्ध जागा जैसे-थे असून, त्यात खासगी विद्यापीठांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा प्रवेशासाठी चुरस कमी राहणार असून, इच्छित अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी-पालकांना धावपळ करावी लागणार नाही, असे चित्र आहे.राज्य मंडळाने इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर केला. यामध्ये उत्तीर्णांचे प्रमाण ८९.७९ टक्के (१२,८६,८४३) असून, ते गेल्या वर्षीच्या तुलनेत दोन टक्क्यांनी घटले आहे. मंडळाने २०२२ मध्ये घेतलेल्या परीक्षेच्या निकालात उत्तीर्णांचे प्रमाण ९४.२२ टक्के (१३,५६,६०४) होते. त्यामुळे २०२२ ते २०२६ अशा पाच वर्षांचा कालावधी घेतल्यास, उत्तीर्णांचे प्रमाण ४.४३ टक्क्यांनी घटले आहे. त्यामुळे उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या ६९ हजार ७६१ विद्यार्थ्यांनी कमी आहे. या निकालाचा अभ्यास केल्यास ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्यांची संख्या १० हजार ४७हून सात हजार ५१०पर्यंत घसरली आहे. या तुलनेत राज्यातील सरकारी विद्यापीठे आणि संलग्न महाविद्यालयांमध्ये विविध पदवी अभ्यासक्रमांसाठी मोठ्या प्रमाणावर जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. खासगी विद्यापीठांची संख्या वाढल्याने, त्यांच्याकडे मुबलक प्रमाणात जागा उपलब्ध आहेत.निकालात प्राविण्यसह उत्तीर्ण; तसेच प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होणाऱ्यांच्या संख्येतही कमालीची घट झाली आहे. त्यामुळे नामांकीत कॉलेजांमध्येही कला, विज्ञान, वाणिज्य शाखेच्या विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी फार चुरस राहणार नाही, असे चित्र आहे. दरम्यान, गेल्या काही वर्षात नव्याने सुरू झालेल्या महाविद्यालयांमध्ये यंदा विद्यार्थ्यांचे प्रवेश होणे अवघड असल्याचे चित्र आहे.UGC NET June 2026 Exam: यूजीसी नेट परीक्षेची घोषणा! अर्ज प्रक्रिया सुरू, 'हे' दोन नवीन विषय समाविष्ट; जाणून घ्या पात्रता आणि महत्त्वाच्या तारखायंदाच्या निकालात उत्तीर्णांची संख्या घटल्याने दर वर्षीपेक्षा चुरस कमी राहील. या निकालात प्रावीण्यासह उत्तीर्ण किंवा प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे. विद्यापीठे आणि संलग्न महाविद्यालयांतील अभ्यासक्रमांसाठी पुरेशा प्रमाणात जागा उपलब्ध आहेत.- डॉ. संजय खरात, प्राचार्य, मॉडर्न कॉलेज, गणेशखिंडराज्यात पारंपरिक अभ्यासक्रमांच्या कॉलेजांमध्ये प्रवेशक्षमता पुरेशा प्रमाणात आहे. पारंपरिक अभ्यासक्रम असले तरी नामांकित कॉलेजांना प्रवेशांना फारशी अडचण नाही. यंदा निकाल घटल्याने उत्तीर्ण विद्यार्थ्यांना चांगल्या कॉलेजांमध्ये प्रवेश मिळू शकतो.- डॉ. नितीन घोरपडे, प्राचार्य, अण्णासाहेब मगर महाविद्यालय
87 shares
😐
Pudhari logo
Pudhari
May 4, 2026, 07:48 AM
पालघर जिल्हा संकटात, कंत्राटी शिक्षकांच्या मानधनास विलंब झाल्याने विद्यार्थी शिक्षण थांबवतात आणि शिक्षकांची कमतरता भासते

पालघर जिल्हा संकटात, कंत्राटी शिक्षकांच्या मानधनास विलंब झाल्याने विद्यार्थी शिक्षण थांबवतात आणि शिक्षकांची कमतरता भासते

यामुळे अनेक विद्यार्थी शाळाबाह्य व यासाठी नियुक्त शिक्षक बेकार होण्याची चिन्हे जिल्ह्यात निर्माण झाली आहेत. पालघर जि. प.ने काढलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे की, या शिक्षकांचे मानधन व इतर खर्च आदिवासी उपाय योजनेतून नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत उपलब्ध निधीतून करावा, असे 2017 च्या शासन निर्णयात नमूद होते तसा निधी मागण्यासाठीचा अर्ज जिल्हाधिकारी तथा सचिव जिल्हा नियोजन समिती पालघरमार्फत अप्पर मुख्य सचिव आदिवासी विकास विभाग यांच्याकडे देण्यात आला; परंतु मानधन तत्त्वावरील कार्यरत कंत्राटी शिक्षकांना मानधन उपलब्ध झाले नाही.
8 shares
😐
Lokmat logo
Lokmat
May 4, 2026, 06:58 AM
रेडिओलॉजी परिषदेद्वारे आरोग्य शिक्षण आणि सेवांचे नेतृत्व करण्याचा गोव्याचा प्रयत्न

रेडिओलॉजी परिषदेद्वारे आरोग्य शिक्षण आणि सेवांचे नेतृत्व करण्याचा गोव्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली:सतत वैद्यकीय शिक्षण (सीएमई) उपक्रमांच्या माध्यमातून डॉक्टर, तंत्रज्ज्ञ आणिआरोग्यक्षेत्रातील व्यावसायिक आपले ज्ञान अद्ययावत ठेवत असल्यानेगोवाआरोग्यशिक्षण व सेवांमध्ये आघाडीवर येईल, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंतयांनी व्यक्त केला. साखळी येथील साई नर्सिंग इन्स्टिट्यूटच्या (एसएनआय) प्रेक्षागृहात पहिले सीएमई अॅकॅडमिक मीट २०२६ उत्साहात पार पडले. या परिषदेत रेडिओलॉजी क्षेत्रातील तज्ज्ञ, व्यावसायिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते. देशातील विविध नामांकित संस्था व तज्ज्ञांच्या सहभागामुळे रेडिओलॉजिकल सायन्सेस क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवरील सहकार्य अधिक दृढ होत असल्याचे या कार्यक्रमातून स्पष्ट झाले. तसेच, रेडिओलॉजी क्षेत्रातील नवा प्रवाह, तांत्रिक प्रगती आणि सर्वोत्तम कार्यपद्धतींवर सखोल चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले की, अशा कार्यक्रमांमुळेगोवासहयोगी आरोग्य शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून विकसित होत आहे. इंडियन सोसायटी ऑफ रेडिओग्राफर्स अँड टेक्नॉलॉजिस्ट्सच्या कार्याचे कौतुक करत त्यांनी सतत वैद्यकीय शिक्षण, व्यावसायिक मानदंड आणि किरणोत्सर्ग सुरक्षिततेच्या दृष्टीने संस्थेच्या योगदानाचे विशेष उल्लेख केले. नॅशनल कमिशन फॉर अलाइड अँड हेल्थकेअर प्रोफेशन्स अॅक्ट, २०२१ या कायद्याचे महत्त्व अधोरेखित करत या कायद्यामुळे सहयोगी आरोग्य क्षेत्र अधिक सक्षम होणार आहे. रुग्ण सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन करत विद्यार्थ्यांनी संशोधन, कौशल्य विकास आणि नैतिक मूल्यांवर भर द्यावा, असेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल मुख्यमंत्र्यांनी आयोजकांचे अभिनंदन केले. या परिषदेमुळे ज्ञानाची देवाणघेवाण, व्यावसायिक संवाद आणि कौशल्य वृद्धी यांना चालना मिळून रेडिओलॉजी व सहयोगी आरोग्य क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाला बळ मिळणार आहे. या कार्यक्रमास साई नसिंग इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष पांडुरंग कुर्डीकर, प्राचार्य चिन्मय पी. गाडगीळ, प्राध्यापकवर्ग, आरोग्य क्षेत्रातील व्यावसायिक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
9 shares
😐
P
Pudhari
May 4, 2026, 06:09 AM
बैठकीत घेण्यात आलेले प्रमुख निर्णयः शिक्षणाला प्राधान्यक्रम निश्चित

बैठकीत घेण्यात आलेले प्रमुख निर्णयः शिक्षणाला प्राधान्यक्रम निश्चित

महत्त्वाचे निर्णय : बैठकीत प्रमुख मुद्द्यांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले. * सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात सर्व प्राथमिक विद्यार्थ्यांना वाचन, लेखन आणि गणितात निपुण करण्याचा संकल्प * शिक्षकांनी वेळेवर शाळेत उपस्थित राहून शिस्तीचे पालन करणे * अप्रगत विद्यार्थ्यांसाठी १६ जूनपासून १०० दिवसांचा विशेष शैक्षणिक उपक्रम राबविणे * जून २०२६ पासून प्राथमिक शिक्षकांसाठी ‘डेसकोड’ प्रणाली लागू करणे * शिक्षकांच्या प्रलंबित प्रशासकीय व आर्थिक समस्या तातडीने सोडविण्यावर भर यामध्ये वरिष्ठ वेतनश्रेणी, निवडश्रेणी प्रस्ताव, उच्च शिक्षण परवानगी, वैद्यकीय बिलांचे निपटारे, सेवा जोड प्रस्ताव तसेच विविध पदोन्नती प्रकरणांचा आढावा घेण्यात आला.
68 shares
😐
M
Maharashtra Times
May 4, 2026, 05:00 AM
भारतीय महिलेने वयाच्या 68 व्या वर्षी शिक्षण पूर्ण करण्याचे आयुष्यभराचे स्वप्न पूर्ण केले

भारतीय महिलेने वयाच्या 68 व्या वर्षी शिक्षण पूर्ण करण्याचे आयुष्यभराचे स्वप्न पूर्ण केले

68-year-old Mangala Thoke from Mumbai passed the HSC 2026:‘लहानपणी शिक्षण पूर्ण करता आले नाही. संसार सुरू झाला, तरी मनात शिक्षण कमी असल्याची बोच होती. अखेर रात्रशाळा आणि रात्र कनिष्ठ महाविद्यालयाच्या मदतीने वयाच्या ६८व्या वर्षी का होईना, पण बारावी उत्तीर्ण झाले आणि कृतकृत्य वाटले...,’ विक्रोळी येथे चहाचे छोटे दुकान चालवणाऱ्या मंगला ठोके अभिमानाने सांगत होत्या. मंगला यांनी थोडेथोडके नाही, तर ६० टक्के गुण मिळवत हे यश संपादन केले. रात्रशाळा आणि रात्र महाविद्यालयाच्या पाठिंब्यामुळेच त्यांना ही मजल मारणे शक्य झाले.विक्रोळी येथे राहणाऱ्या मंगला ठोके जवळच्याच सरस्वती शाळेत शिपाई म्हणून काम करत होत्या. काही वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचे निधन झाले. पाच मुलींची जबाबदारी असल्याने त्यांनी निवृत्तीनंतर चहाचे छोटे दुकान सुरू केले. तरीही शिक्षणाची आस स्वस्थ बसून देत नव्हती. अखेर कांजूरमार्ग येथील एका रात्रशाळेत आठव्या इयत्तेत प्रवेश घेत त्यांनी शिक्षणाचा थांबबलेला प्रवास पुन्हा सुरू केला.‘लहानपणी घरची परिस्थिती बेताची होती. त्यातच कुटुंबाची जबाबदारीही आल्याने शिक्षण खंडित झाले होते. नंतर संसारात गुरफटून गेले. तरीही शिकावे, असे वाटत होते. नोकरीही शाळेतच असल्याने आसपास वावरणाऱ्या विद्यार्थ्यांकडे पाहून आपणही पुन्हा वही-पुस्तक हाती घ्यावे असा विचार यायचा. मात्र पदरी पाच मुली होत्या आणि पतींचेही निधन झाले. त्यामुळे तेव्हा ते शक्य झाले नाही,’ असे मंगलाताई सांगतात."खर्च करू नका, ही वाचणार नाही" म्हणणाऱ्यांना दिलं चोख उत्तर! नागपूरच्या दोन रणरागिणींची बारावीत दैदीप्यमान कामगिरीअखेर निवृत्तीनंतर काही वर्षांनी त्यांनी कांजूरमार्गच्या रात्रशाळेत प्रवेश घेतला. तेथून दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर मंगलाताईंनी विक्रोळीच्या शारदा नाइट हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज येथे प्रवेश घेत स्वप्नाच्या दिशेने आगेकूच केली. घरकाम, जबाबदाऱ्या आणि वयानुरूप येणाऱ्या अडचणी यांवर मात करत त्यांनी ध्येय गाठले. या यशात माझ्या पाचही मुलींचा मोठा वाटा आहे. त्यांच्या पाठिंब्यामुळेच मी ही मजल मारू शकले, असे मंगलाताई यांनी सांगितले.प्रेरणादायी कामगिरी‘शारदा नाइट हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजसारख्या रात्रशाळा संस्थांमुळे अनेक वर्षे शिक्षणात खंड पडलेल्या विद्यार्थ्यांना आधार मिळतो. मंगला ठोके या आपल्या ‘विद्यार्थिनी’ने शिकण्यासाठी वयाची मर्यादा नसते, हे सिद्ध केले आहे. त्यांची ही कृती अनेक महिलांना पुन्हा शिकण्यासाठी प्रोत्साहन देईल,’ अशी अपेक्षा मुख्याध्यापक दत्तात्रय सोनावणे यांनी व्यक्त केली.
20 shares
😐
Pudhari logo
Pudhari
May 4, 2026, 04:08 AM
वैद्यकीय शाळांच्या विलंबित प्रवेशांमुळे भारतात डॉक्टरांची उपलब्धता विलंबित

वैद्यकीय शाळांच्या विलंबित प्रवेशांमुळे भारतात डॉक्टरांची उपलब्धता विलंबित

परिणामी हेच विद्यार्थी पुढे उशिरा डॉक्टर होतात, त्यांच्या पुढील शिक्षणाच्या टप्प्यांमध्ये विलंब होतो आणि प्रशिक्षित डॉक्टर समाजाला उशिरा उपलब्ध होतात. प्रवेश प्रक्रिया लांबली की त्याचा फटका फक्त विद्यार्थ्यांनाच बसतो; व्यवस्थेवर त्याचा कोणताही परिणाम होत नाही, असे डॉ. प्रवीण शिनगारे स्पष्टपणे म्हणाले.
17 shares
😐
Pudhari logo
Pudhari
May 4, 2026, 03:06 AM
मोफत शिक्षण उपक्रमांतर्गत भारतातील सरकारी शाळांमध्ये नावनोंदणीच्या दरात घट

मोफत शिक्षण उपक्रमांतर्गत भारतातील सरकारी शाळांमध्ये नावनोंदणीच्या दरात घट

या आकडेवारीतून मोफत शिक्षण असूनही पालक सरकारी शाळांऐवजी खासगी पर्यायांची निवड करत असल्याचे हे स्पष्ट दिसून आले आहे. अनेक उपक्रम राबवूनही जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्या का घटत आहे, याचे आत्मचिंतन करण्याची वेळ आता आली आहे. वर्गाचा असमतोल... एकापेक्षा जास्त जागी असणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे कमी झाली जन्मदर घटल्यामुळे पहिलीच्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या मुलांची मूळ संख्याच कमी शिक्षण हक्क कायद्यामुळे आठवीपर्यंत विद्यार्थी टिकून राहिल्याने माध्यमिक वर्गात वाढ जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा सोडून खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांना पसंती नववी आणि अकरावीमध्ये नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांमुळे संख्या वाढ शहरांकडे होणाऱ्या स्थलांतरामुळे ग्रामीण भागातील प्राथमिक वर्गांत घट उच्च माध्यमिक शिक्षणापर्यंत शाळेत टिकून राहण्याचे प्रमाण वाढ
7 shares
😢
Pudhari logo
Pudhari
May 4, 2026, 12:30 AM
उत्पादनांच्या वाढत्या मागणीमुळे शिक्षणावर भर

उत्पादनांच्या वाढत्या मागणीमुळे शिक्षणावर भर

स्थानिक बाजारपेठेबरोबरच इतर राज्यांतूनही त्यांच्या उत्पादनांना मागणी वाढत असून दरवर्षी लाखोंची उलाढाल होत आहे. यावेळी भोई बंधूंनी, फक्त नोकरीसाठी शिक्षण न घेता व्यवसाय, शेतीतही शिक्षणाचा मोठ्या प्रमाणात फायदा होता े व शेतीतूनही चांगले उत्पन्न मिळवता येते, असे सांगितले.
64 shares
😊
P
Pudhari
May 3, 2026, 11:54 PM
राष्ट्रव्यापी सहभागाच्या दरम्यान कोल्हापूरमध्ये एन. ई. ई. टी. परीक्षा

राष्ट्रव्यापी सहभागाच्या दरम्यान कोल्हापूरमध्ये एन. ई. ई. टी. परीक्षा

कोल्हापुरात या परीक्षेसाठी 13 केंद्रे होती. सुमारे 6 हजारहून अधिक विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. देशभरात सुमारे 22 लाख 79 हजार विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेसाठी अर्ज केले होते. त्यापैकी सुमारे 22 लाख 9 हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.
6 shares
😐
Lokmat logo
Lokmat
May 3, 2026, 11:43 PM
शाळांमधील तिसरी भाषाः महाराष्ट्र सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही

शाळांमधील तिसरी भाषाः महाराष्ट्र सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही

उमाकांत देशपांडे लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई :राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्नशाळांमध्येपहिलीपासून तिसरी भाषा लागू करण्याचा मुद्दा यंदा बारगळण्याची चिन्हे आहेत. राज्यात हिंदीवरून वादंग टाळण्यासाठी माजी कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव समितीने त्रिभाषा सूत्रासंदर्भात दिलेल्या अहवालावर राज्य सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही.शाळांचेशैक्षणिक वर्ष जूनपासून सुरू होत असताना आता ऐनवेळी पहिलीपासून हिंदी किंवा अन्य तिसरी भाषा अनिवार्य केल्यास मोठा विरोध आणि गोंधळ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी कोणताही बदल न करता सध्याची पाचवीपासून तिसरी भाषा शिकविण्याचीच पद्धत कायम ठेवावी, अशी मागणी होत आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा या सत्रात बारगळण्याची चिन्हे? भाषा म्हणून हिंदी किंवा अन्य भाषा पहिलीपासून लागू करण्याचा निर्णय गेल्यावर्षी राज्य सरकारने घेतल्यावर जोरदार विरोध झाला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा वाद चिघळण्याची शक्यता असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा निर्णय २९ जून २०२५ रोजी रद्द केला आणि डॉ. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली. या समितीने आपला अहवाल ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सादर केला आहे. त्यावर शासनाने अद्याप निर्णय घेतलेला नाही. सीबीएसईच्या निर्णयामुळेही अडचण सीबीएसईने तिसरी भाषा सहावीपासून अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने गेल्या काही वर्षांत केंद्रीय एनसीईआरटीचा अभ्यासक्रम लागू केला असून सीबीएसईच्या धर्तीवर राज्य मंडळांच्या शाळांसाठी निर्णय घेण्यात आले आहेत. राज्यात सध्या पाचवीपासून हिंदी किंवा अन्य भाषा शिकविली जाते. त्यामुळे आता पहिलीपासून तिसरी भाषा सुरू करुन नवीन वादाला आमंत्रण नको, अशी सरकारची भूमिका असल्याचे उच्चपदस्थांनी सांगितले. अन्य राज्यांच्या निवडणुकांमुळे वाद टाळल्याची चर्चा रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी बोलता येत नसल्यास १ मे पासून परवाना रद्द करण्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केल्यावर वाद निर्माण झाला. पाच राज्यांच्या निवडणुकांच्या काळात राज्यात हिंदीविरोधात किंवा मराठी-अमराठी वाद निर्माण होऊ नये, असे सरकारचे प्रयत्न होते. सरनाईक यांनाही सबुरीची सूचना करण्यात आली व परवाना रद्द करण्याचा निर्णय १५ ऑगस्टपर्यंत लांबणीवर टाकण्यात आला. जाधव समितीच्या अहवालावर मंत्रिमंडळात निर्णय घेतला असता, तर नवीन वादाची भर पडली असती, असे सूत्रांनी सांगितले. राज्यातील शाळांमध्ये तिसरी भाषा पाचवीपासून शिकविण्याची सध्याची पद्धतच योग्य असून त्यात आता ऐनवेळी कोणताही बदल करू नये. सरकारने सीबीएसईच्या निर्णयाचाही विचार करुन पहिलीच्या मुलांवर आणखी एका विषयाचा बोजा लादू नये. ज. मो. अभ्यंकर, आमदार व शिक्षणतज्ज्ञ जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू होत असताना पहिलीपासून हिंदी किंवा अन्य भाषा सक्तीची केल्यास विद्यार्थी, पालक व शिक्षकांमध्ये गोंधळ निर्माण होईल. यंदा कोणताही बदल न करता पाचवीपासून तिसरी भाषा शिकविण्याची पद्धत कायम ठेवावी. सुभाष मोरे, आमदार, कार्याध्यक्ष शिक्षक भारती
84 shares
😐
L
Lokmat
May 3, 2026, 10:59 PM
बाराव्या इयत्तेच्या निकालांमध्ये लातूर बोर्डाची खराब कामगिरी स्पर्धात्मक परीक्षांमधील भक्कम कामगिरीच्या तुलनेत वेगळी आहे

बाराव्या इयत्तेच्या निकालांमध्ये लातूर बोर्डाची खराब कामगिरी स्पर्धात्मक परीक्षांमधील भक्कम कामगिरीच्या तुलनेत वेगळी आहे

राज्य शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल यंदाही नेहमीप्रमाणे मुलींची गुणवत्ता सिद्ध करणारा ठरला, तर राज्याच्या निकालात मराठवाड्यातील लातूर बोर्ड पुन्हा एकदा इतर विभागीय मंडळांच्या तुलनेत तळाला राहिले. जोवर बोर्डाच्या गुणांवर वैद्यकीय, अभियांत्रिकीसह व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश निश्चित होत होते, तोवर निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले? तीन जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या बोर्डात लातूरचा निकाल सुमारे ९० टक्के आहे. परंतु इतर दोन जिल्ह्यांच्या निकालाची टक्केवारी मागे पडल्याने बोर्डाचा सरासरी निकाल घसरला. त्याहून अधिक महत्त्वाचा मुद्दा, विद्यार्थ्यांचा प्राधान्यक्रम, पॅटर्न बदलला आहे. तळ गाठणारे बोर्डाचे क्षेत्र नीट, जेईईमध्ये मात्र शिखरावर आहे. हीच सध्याच्या निकालाची दुसरी बाजू आहे. एमबीबीएस, बीएएमएस आणि बीडीएस अभ्यासक्रमासाठी शासकीय जागांवर गुणवत्तेवर प्रवेश निश्चित होणाऱ्या यावर्षीच्या राज्यातील एकूण २० हजार ९६३ गुणवंतांमध्ये मराठवाड्यात शिक्षण घेतलेले ७ हजार ९९२विद्यार्थीआहेत. स्पर्धा परीक्षा, व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांकडे ओढा आहे. त्यामुळे मूलभूत शिक्षण आणि त्याचे शिक्षणक्रम, अभ्यासक्रम, उपक्रम हे कौशल्याच्या दिशेने जाणे गरजेचे आहे. नवे शैक्षणिक धोरण तेच सांगते. परंतु बदलाची गती आणखी वाढवावी लागेल. गुणवत्तेची अपेक्षा ठेवताना, दर्जेदार आणि एका दिशेने जाणारी शिक्षणव्यवस्था उभी करण्याचे प्रयत्न, प्रयोग सतत करत राहावे लागतील. जे खासगी शिकवण्यांमध्ये मिळते ते शाळा, महाविद्यालयांत का मिळत नाही, हा प्रश्न विचारणारा पालक खासगी शिकवणी वर्गाच्या दारात का उभा राहतो? शाळा, महाविद्यालये कमी पडतात, की विद्यार्थ्यांच्या आधी पालकांना स्पर्धा जिंकायची आहे? प्रश्न असंख्य आहेत, मात्र वास्तव हेच आहे की खासगी, समांतर शिक्षणव्यवस्था उभी आहे. बहुतांश पालकांना ती गरजेची वाटते. यावर अनेक बाजूंनी मत-मतांतरे होतील, परंतु शाळा, महाविद्यालयांतील शिक्षण अबाधित ठेवून पुढे जाणे हिताचे आहे. अन्यथा महाविद्यालयांतील प्रवेश नॉमिनल की बोर्डच ‘नॉमिनल’ (नावापुरते) या प्रश्नाचा अभ्यास शिक्षण खात्याला करावा लागेल. एकंदर बारावी बोर्डात किमान गुण मिळवूनविद्यार्थीप्रवेशपूर्व परीक्षांकडेच लक्ष केंद्रित करताना दिसत आहेत. त्याचवेळी बोर्ड आणि प्रवेश परीक्षा हे दुहेरी ओझे विद्यार्थ्यांच्या पाठीवर आहे. नव्या शैक्षणिक धोरणाच्या मार्गाने आपण जात असताना विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित करता आले पाहिजे. महाराष्ट्रात वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश हवा असेल, तर बारावी बोर्ड परीक्षेत खुल्या जागेवर किमान ५० आणि मागास प्रवर्गासाठी ४० टक्के गुण असावेत, असा निकष आहे. जेईईसाठी मात्र ७५ आणि ६५ टक्के निकष आहे, तर अन्य अभियांत्रिकी व तंत्रशिक्षण प्रवेशासाठी ४४.५ आणि ३९.५ टक्के इतकेच गुण हवे आहेत. खरी स्पर्धा सुरू होते ती इथेच ! बारावी उत्तीर्ण होऊन पुढील शिक्षणासाठी प्रवेश परीक्षेतील गुणच महत्त्वाचे असल्याने स्वाभाविकच विद्यार्थ्यांचे लक्ष प्रवेशपूर्व परीक्षांकडे वळले आहे. कमी-अधिक फरकाने कला, वाणिज्य क्षेत्रातील व्यावसायिक उच्चशिक्षणासाठी तीच स्थिती आहे. एक परीक्षा-एक अभ्यासक्रम असावा, मग बोर्ड कोणतेही असो. त्याही पुढे जाऊन सर्व प्रवेश परीक्षांचे मार्ग दहावी आणि बारावीच्या अभ्यासक्रमातूनच पुढे गेले पाहिजेत. तरच बोर्डाच्या पुस्तकांना आणि वर्गांना किमान महत्त्व राहील. तसे करायचे नसेल तर किमान जशा परीक्षा तसा दहावी-बारावीचा अभ्यासक्रम, असे स्वरूप असेल तरच विद्यार्थी वर्गात बसतील. ‘नॉमिनल ॲडमिशन’ आहे, हे सांगताना कोणालाही संकोच वाटत नाही, पुढेही वाटणार नाही. जिथे स्पर्धा तिथे अभ्यास आणि जिथे अभ्यास तिथे गुणवत्ता, हे सरळ सूत्र आहे. दहावीनंतर अकरावीसाठी नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी ज्या शहरांमध्ये स्पर्धा आहे तिथे दहावी बोर्डाचे महत्त्व अजूनही आहे. शिवाय दहावीनंतर तंत्रशिक्षण आणि अनेक अभ्यासक्रमांचे प्रवेश अवलंबून असल्याने दहावी बोर्ड गुणांची मोजदाद काहीअंशी अजून शिल्लक आहे. आता तिथेही ‘फाउंडेशन कोर्स’ अशी व्यवस्था उभी राहत आहे. दहावीनंतर मात्र कला शाखेचा काही बाबतीत अपवादवगळता विज्ञान आणि वाणिज्य शाखेसाठी बारावी बोर्ड जवळपास नाममात्र ठरले आहे. या साऱ्या प्रश्नांचा अभ्यास करुन पुढे जावे लागणार आहे.
60 shares
😐
Sakal logo
Sakal
May 3, 2026, 09:42 AM
प्रश्नपत्रिका फुटणे आणि सामूहिक नक्कल घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर बाराव्या इयत्तेचा निकाल जाहीर

प्रश्नपत्रिका फुटणे आणि सामूहिक नक्कल घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर बाराव्या इयत्तेचा निकाल जाहीर

नागपूर:राज्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या निकालाची घोषणा करण्यात आली. मात्र, बारावीच्या परीक्षेदरम्यान तीन पेपरही फुटले होते. दरम्यान गोंदिया आणि वर्ध्यातील समुद्रपूर तालुक्यात जीवशास्त्राच्या पेपरदरम्यान ‘मास कॉपी’ केल्याचे २४३ विद्यार्थ्यांच्या पेपर तपासणीत उघडकीस आले.या विद्यार्थ्यांवर अनुशासनात्मक कारवाई करण्यात आली. अशी माहिती विभागीय शिक्षण मंडळ अध्यक्ष डॉ. शिवलिंग पटवे यांनी पत्रकार परिषदेत दिली.बारावीची परीक्षा १० फेब्रुवारी ते ११ मार्च यादरम्यान झाली.तेव्हा सेंट उर्सुला येथे शिक्षकांच्या समयसुचकतेने केमेस्ट्रीचा व त्यानंतर गणित आणि फिजिक्सच पेपरही फुटल्याचे समोर आले.याप्रकरणी शिकवणी वर्ग संचालकांसह जयताळ्यातील एका शाळेचा संचालक आणि साथीदार अशा आठ जणांना अटक झाल्याने चांगलीच खळबळ उडाली होती.मात्र, वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील वाशी गावातील जे. डी. चौधरी कॉलेजमध्ये ११८ विद्यार्थ्यांनी तर गोंदिया जिल्ह्यातील कातुली येथील माऊली कनिष्ठ महाविद्यालयात १२५ विद्यार्थ्यांनी जीवशास्त्र विषयाच्या पेपरमध्ये कॉपी केल्याची पेपर तपासणीत उघड झाले. या विद्यार्थ्यांवर कारवाई करीत अनुत्तीर्ण करण्यात आल्याचे डॉ. पटवे यांनी सांगितले.विभागीय शिक्षण मंडळाकडून जीवशास्त्राचा पेपर तपासल्यावर त्यांना दोन केद्रांवरील २४३ विद्यार्थ्यांच्या पेपरमध्ये एकसारखे उत्तर लिहिले असल्याचे आढळले. ही माहिती मॉडरेटरला देण्यात आल्यावर त्यांनी बोर्डाला कळविले. त्यातून चौकशी समिती लावून या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. त्या विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान या केंद्रावरील सर्वच शिक्षकांची चौकशीचे आदेश व ही केंद्रे तत्काळ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
10 shares
😐
Sakal logo
Sakal
May 3, 2026, 09:28 AM
भूमी कोनेः चिकाटी आणि प्रतिकूलतेवर विजय मिळवण्याची कथा

भूमी कोनेः चिकाटी आणि प्रतिकूलतेवर विजय मिळवण्याची कथा

नागपूर:अत्यंत प्रतिकूल परिस्थिती, बालवयात झालेला जीवघेणा आजार आणि शिक्षणातील खंड या सर्व अडथळ्यांवर मात करत भूमी कोने या विद्यार्थिनीने लेडी अमृतबाई डागा महाविद्यालयातून बारावी आर्ट्समध्ये ७५ टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे, भूमी थिएटर आर्टिस्ट असून नाटकांच्या माध्यमातून कॅन्सरविषयी जनजागृती करते.भूमी पाच वर्षांची असताना तिला ब्लड कॅन्सर झाला. २०११ मध्ये हा आजार गंभीर अवस्थेत पोहोचल्याने दीर्घकाळ उपचार सुरू होते. त्यामुळे शालेय शिक्षणात खंड पडला. पहिलीत प्रवेश घेतल्यानंतर तिला थेट पाचवीत प्रवेश देण्यात आला, ज्यामुळे अभ्यासात मोठी तफावत निर्माण झाली. आईने एकटीने खंबीरपणे संसार सांभाळत मुलींना शिक्षण दिले. मुलीच्या आजारानंतर आईने कॅन्सर रुग्णांसाठी समाजकार्य सुरू केले आणि आज ती सोशल वर्कर म्हणून कार्यरत आहे.दहावीच्या काळात अभ्यास करताना बेसिक कमकुवत असल्याने भूमीला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, हार न मानता तिने सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले. बारावीच्या अभ्यासात एका प्रश्नासाठी पूर्ण दिवस लागत असतानाही तिने चिकाटी सोडली नाही. वर्षभर सातत्याने अभ्यास करत भूमीने आपली तयारी पूर्ण केली. परीक्षेच्या आदल्या दिवशीही ती तापाने त्रस्त होती, तरीही तिने परीक्षा दिली.कोणतीही ट्युशन न लावता, स्वअभ्यास आणि वेळेचे नियोजन यावर भर देत तिने ७५ टक्के गुण मिळवले. माझ्या परिस्थितीनुसार हे यश समाधानकारक आहे, असे ती नम्रपणे सांगते.
17 shares
😢
Pudhari logo
Pudhari
May 3, 2026, 09:22 AM
संवर्धनाचे प्रयत्न ठळकपणेः जंगल आणि वन्यजीव यांचे संरक्षण करण्याचे नागरिकांना आवाहन

संवर्धनाचे प्रयत्न ठळकपणेः जंगल आणि वन्यजीव यांचे संरक्षण करण्याचे नागरिकांना आवाहन

यावेळी जंगल संवर्धन, वन्यजीवांचे संरक्षण आणि पर्यावरण संतुलन याबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच नागरिकांनी जंगल परिसरात प्लास्टिक टाकू नये, प्राण्यांना त्रास देऊ नये असे आवाहन करण्यात आले.
8 shares
😐
Lokmat logo
Lokmat
May 3, 2026, 07:28 AM
शेतकऱ्याच्या मुलापासून पोलीस उपनिरीक्षकापर्यंतः देवीदास बापुराव शिंदे यांचा प्रेरणादायी प्रवास

शेतकऱ्याच्या मुलापासून पोलीस उपनिरीक्षकापर्यंतः देवीदास बापुराव शिंदे यांचा प्रेरणादायी प्रवास

गोविंद शिंदे नांदेड जिल्ह्यातील दहिकळंबा या छोट्याशा गावातून सुरू झालेला प्रवास अखेर पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदापर्यंत पोहोचला आणि हा प्रवास सोपा नव्हता.(Success Story) शेतकरीकुटुंबात जन्मलेल्या देविदास बापूराव शिंदे यांनी प्रतिकूल परिस्थिती, आर्थिक अडचणी आणि सततच्या संघर्षावर मात करत आपले स्वप्न साकार केले आहे.(Success Story) लहानपणापासूनच संघर्षाची सुरुवात देविदास यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा, दहिकळंबा येथे झाले. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने लहान वयातचशेतीचीजबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. 'शाळा कमी आणि काम जास्त' अशा परिस्थितीतही त्यांनी शिक्षणाची ओढ कायम ठेवली. माध्यमिक शिक्षणासाठी त्यांना दररोज पाच किलोमीटर अंतर पायी चालत चिखली येथे जावे लागायचे. सायकलसारखी साधी सुविधा देखील उपलब्ध नव्हती पण जिद्द मात्र प्रचंड होती. शिक्षणासोबत संघर्ष पुढे त्यांनी मुक्त विद्यापीठातून पदवी पूर्ण केली. २०१६ मध्ये पोलीस भरतीची आवड निर्माण झाली, पण आर्थिक परिस्थितीमुळे २०१७ मध्ये हॉस्पिटलमध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून नोकरी स्वीकारावी लागली. रात्रपाळी अन् दिवसभर अभ्यास रात्रभर नोकरी आणि दिवसभर अभ्यास हा त्यांचा रोजचा दिनक्रम बनला. ट्युशन, लायब्ररी आणि स्वतः चा अभ्यास असा तगडा शेड्यूल त्यांनी पाळला. पहिल्या प्रयत्नात अपयश आले, पण त्यांनी हार मानली नाही. प्रवास आणि चिकाटी गावाहून नांदेडपर्यंत दररोज दीड तासाचा प्रवास करून त्यांनी अभ्यास सुरू ठेवला. या अथक मेहनतीचे फळ २०१८ मध्ये मिळाले. ते नागपूर येथे पोलीस कॉन्स्टेबल म्हणून जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने निवडले गेले. 'अधिकारी व्हायचे' स्वप्न कायम कॉन्स्टेबल पदावर कार्यरत असतानाही त्यांनी मोठे स्वप्न पाहणे थांबवले नाही. 'अधिकारी व्हायचे' हे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून २०२१ मध्ये त्यांनी एमपीएससी (MPSC) ची तयारी सुरू केली. वैयक्तिक आयुष्य आणि साथ २०२२ मध्ये त्यांचा विवाह झाला. पण वैयक्तिक जबाबदाऱ्यांमुळे अभ्यासात खंड पडू दिला नाही. त्यांच्या या यशामध्ये पत्नी अंकिता यांचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले आहे. अखेर पीएसआय पदावर निवड अखंड मेहनत, त्याग, जिद्द आणि कुटुंबाचा पाठिंबा या सगळ्यांच्या जोरावर ३० एप्रिल २०२६ रोजी देविदास शिंदे यांची पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर निवड झाली. ग्रामीण तरुणांसाठी प्रेरणा देविदास शिंदे यांची ही यशोगाथा ग्रामीण भागातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.'परिस्थिती कशीही असो, जिद्द आणि मेहनत असेल तर कोणतेही स्वप्न पूर्ण होऊ शकते,' हे त्यांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवले आहे. ही कथा केवळ यशाची नाही, तर संघर्ष, सातत्य आणि आत्मविश्वासाची आहे. जी प्रत्येक स्वप्न पाहणाऱ्या तरुणाला नवी उर्जा देणारी आहे. हे ही वाचा सविस्तर :Farmer Success Story : १० गुंठ्यातून लाखोंची कमाई; युवा शेतकरी दाम्पत्याचा टोमॅटो सीड्सचा यशस्वी प्रयोग अधिक वाचा :Jalna Jeevika success : 'जालना जीविका'ची धडाकेबाज एंट्री; गावातील महिला झाल्या बिझनेसवुमन!
55 shares
😐
Maharashtra Times logo
Maharashtra Times
May 3, 2026, 07:03 AM
महाराष्ट्र बाराव्या इयत्तेच्या निकालात पुणे विभागाने 91.25% उत्तीर्ण टक्केवारी नोंदवली

महाराष्ट्र बाराव्या इयत्तेच्या निकालात पुणे विभागाने 91.25% उत्तीर्ण टक्केवारी नोंदवली

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या बारावीच्या निकालात पुणे विभागातील उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण ९१.२५ टक्के आहे. निकालाच्या टक्केवारीमध्ये पुणे विभाग राज्यात द्वितीय स्थानी असून, पुणे जिल्हा ९२.३२ टक्क्यांसह विभागात अग्रणी ठरला.पुणे विभागीय मंडळाचे अध्यक्ष औदुंबर उकिरडे, सचिव डॉ. मीनाक्षी राऊत यांनी निकालाची माहिती दिली. पुणे विभागातून दोन लाख ४४ हजार १९१ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्ष परीक्षा दिलेल्या दोन लाख ४१ हजार ८२६ विद्यार्थ्यांपैकी दोन लाख २० हजार ६८० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गेल्या वर्षी पुणे विभागातील उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण ९१.८८ टक्के होते. यंदा राज्यातील उत्तीर्ण होणाऱ्यांच्या प्रमाणात घट झाल्यामुळे विभागातही उत्तीर्ण होणाऱ्यांच्या प्रमाणात ०.६२ टक्क्यांनी घट झाली आहे. परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या ७६४४ पुनर्परीक्षार्थ्यांपैकी ७४७१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, त्यापैकी ५७७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामुळे पुनर्परीक्षार्थ्यांच्या उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण ७७.३५ टक्के आहे.मुलींची बाजीपुणे जिल्ह्यातून नोंदणी केलेल्या एकूण एक लाख ३० हजार ८९९ विद्यार्थ्यांपैकी ६७ हजार ३०४ मुले, तर ६३ हजार ५९५ मुली होत्या. यातील एकूण एक लाख २१ हजार ९४१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. उत्तीर्ण झालेल्या एक लाख २१ हजार २६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण ४.५२ टक्के जास्त आहे. जिल्ह्यातील विज्ञान शाखेचे ९८.१४ टक्के, कला शाखेचे ८३.३७ टक्के आणि वाणिज्य शाखेचे ८९.०२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.धक्कादायक! परीक्षा दिली पण खातेही उघडता आले नाही; बारावी निकालात 'या' १० कॉलेजांवर ओढवली नामुष्कीअहिल्यानगर जिल्ह्यातून ३२ हजार २६३ मुले, तर २७ हजार ३०२ मुलींनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. ३१ हजार ९२४ मुले, २६ हजार ९७१ मुलींनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यापैकी ५२ हजार १९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण ८.७१ टक्क्यांनी जास्त आहे. जिल्ह्यातील विज्ञान शाखेचे ९६.५५ टक्के, कला शाखेचे ७५.५९ टक्के, वाणिज्य शाखेचे ८५.२६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.सोलापूर जिल्ह्यातून २९ हजार ५९५ मुले व २४ हजार १३२ मुलींनी नोंदणी केली होती. परीक्षा दिलेल्या ५२ हजार ९९० विद्यार्थ्यांपैकी मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ११.१४ टक्क्यांनी जास्त आहे. विज्ञान शाखेचे ९५.५२ टक्के, कला शाखेचे ७२.८५ टक्के, वाणिज्य शाखेचे ८३.६६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
91 shares
😐
Pudhari logo
Pudhari
May 3, 2026, 06:22 AM
एट्रे महाविद्यालयातील विद्यार्थ्याने वैयक्तिक आव्हानांमध्ये यश मिळवले

एट्रे महाविद्यालयातील विद्यार्थ्याने वैयक्तिक आव्हानांमध्ये यश मिळवले

आबासाहेब अत्रे रात्र प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीच्या परीक्षेचा निकाल 76. 92 टक्के लागला आहे. महाविद्यालयातील आकांक्षा केळकर हिने 58 टक्के, फरिदा तांबोळी हिने 56.83 टक्के आणि चेतन सपकाळे याने 56 टक्के गुण मिळवत यश मिळवले आहे.आकांक्षा हिला लग्नानंतर कुटुंबाची, मुलांच्या जबाबदारीमुळे शिक्षण घेता आले नाही. पण, तिने शिक्षणाच्या जिद्दीने पुढे अत्रे महाविद्यालयात प्रवेश घेतला, मेहनत घेतली आणि बारावीत यश मिळवले आहे.
12 shares
😐
P
Pudhari
May 3, 2026, 06:15 AM
पहिल्यांदाच यशस्वीः दीपाली माने हिने बाराव्या इयत्तेत यश मिळवून कुटुंबात इतिहास रचला

पहिल्यांदाच यशस्वीः दीपाली माने हिने बाराव्या इयत्तेत यश मिळवून कुटुंबात इतिहास रचला

कुटुंबात बारावी उत्तीर्ण करणारी पहिली व्यक्ती दीपाली माने हिने (वाणिज्य शाखा) 85.67 टक्के गुण मिळवत आपल्या कुटुंबात इतिहास रचला. पिंपरी-चिंचवडमध्ये घंटागाडीवर काम करणाऱ्या वडिलांची मुलगी असलेल्या दीपालीवर शिक्षण सोडण्याची वेळ आली होती. मात्र, तिच्या जिद्दीने आणि संस्थेच्या मदतीने ती पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आली. त्यानंतर दीपालीने अकरावीत प्रवेश घेतला आणि मेहनत घेऊन यश मिळवले आहे. आपल्या कुटुंबातील बारावी उत्तीर्ण करणारी दीपाली पहिली व्यक्ती आहे.
57 shares
😊
Sakal logo
Sakal
May 3, 2026, 05:48 AM
बाराव्या इयत्तेच्या निकालात पुणे विभाग महाराष्ट्र राज्यात आघाडीवर, उत्तीर्णांची टक्केवारी घटली

बाराव्या इयत्तेच्या निकालात पुणे विभाग महाराष्ट्र राज्यात आघाडीवर, उत्तीर्णांची टक्केवारी घटली

पुणे:महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या बारावीच्या निकालात पुणे विभागीय मंडळातील ९१.२५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थी उत्तीर्णतेच्या टक्केवारीत पुणे विभाग राज्यात द्वितीय स्थानावर आहे. तर पुणे विभागीय मंडळात पुणे जिल्ह्याने ९२.३२ टक्क्यांसह आघाडीचे स्थान पटकाविले आहे.पुणे विभागातून दोन लाख ४४ हजार १९१ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील दोन लाख ४१ हजार ८२६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि त्यातील ९१.२५ टक्के म्हणजेच दोन लाख २० हजार ६८० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदा राज्याचाच एकूण निकाल घटल्यामुळे विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेचा टक्का ०.६३ ने घसरला आहे.पुणे विभागीय मंडळाचे अध्यक्ष औदुंबर उकिरडे, सचिव डॉ. मीनाक्षी राऊत यांनी निकालाची माहिती दिली. या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या सात हजार ६४४ पुनर्परीक्षार्थ्यांपैकी सात हजार ४७१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, त्यापैकी पाच हजार ७७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पुनर्परीक्षार्थ्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ७७.३५ इतकी आहे.
42 shares
😐
M
Maharashtra Times
May 3, 2026, 04:55 AM
महाराष्ट्र एच. एस. सी. निकाल 2026:10 कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल शून्य टक्के

महाराष्ट्र एच. एस. सी. निकाल 2026:10 कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल शून्य टक्के

Maharashtra HSC Result 2026:बारावीच्या निकालामध्ये १०० टक्के यशाची पताका फडकवणाऱ्या महाविद्यालयांची चर्चा सुरू असताना मुंबई विभागातील १० कनिष्ठ महाविद्यालयांवर 'शून्य टक्के' निकालाची नामुष्की ओढवली आहे. यामध्ये तीन महाविद्यालयांचा संपूर्ण निकाल शून्य टक्के लागला असून सात महाविद्यालयांतील विशिष्ट शाखांमधून एकही विद्यार्थी उत्तीर्ण न झाल्याचे वास्तव समोर आले आहे. शून्य टक्के निकाल लागणाऱ्या १० संस्थांपैकी सर्वाधिक चार शिक्षणसंस्था ठाणे जिल्ह्यातील आहेत. मात्र रायगड जिल्ह्याने चांगली कामगिरी केली आहे.महाविद्यालयांचा निकाल किती टक्के लागतो, यावर त्यांच्या शैक्षणिक दर्जाची परीक्षा होते. प्रवेश घेतानाही संबंधित विद्यार्थी महाविद्यालयाचा निकाल किती टक्के लागला आहे, यावरून त्याचा दर्जा ठरवतात. त्यामुळे अशा शून्य निकालामुळे संबंधित संस्थांच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यंदा ठाणे जिल्ह्यात एका महाविद्यालयाचा संपूर्ण निकाल शून्य टक्के लागला, तर चार महाविद्यालयांतील काही शाखांना खाते उघडताही आले नाही. पालघरमध्येही एका महाविद्यालयाचा पूर्ण निकाल शून्य टक्के लागला असून चार महाविद्यालयांतील काही शाखांचा निकाल शून्य टक्के आहे. मुंबई शहरात एका महाविद्यालयाला हा धक्का बसला; मात्र मुंबई उपनगर आणि रायगडमध्ये अशी वेळ कोणत्याही संस्थेवर आली नाही.ठाण्यात 'शाखानिहाय' घसरणठाणे जिल्ह्यातील अंबाडी येथील गुरुकुल विज्ञान आणि वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय येथे वाणिज्य शाखेतून एकमेव विद्यार्थी परीक्षेला बसला. तो अनुत्तीर्ण ठरल्याने शाखेचा निकाल शून्य टक्के लागला. पिंपळास येथील सरस्वती माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय येथे विज्ञान शाखेतून एकच विद्यार्थी बसला आणि तोही अपयशी ठरला, तर वाणिज्य शाखेने मात्र यश मिळवले. न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे वाणिज्य शाखेतील तिन्ही विद्यार्थी अनुत्तीर्ण झाली, तर विज्ञान शाखेतील १० पैकी आठ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कल्याणमधील आर. के. रात्र कनिष्ठ महाविद्यालय येथे वाणिज्य शाखेतील दोन्ही विद्यार्थी अपयशी ठरले, मात्र कला शाखेचा निकाल १०० टक्के लागला. जे. के. पाटील इंग्लिश मीडियम स्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेज येथे विज्ञान व वाणिज्य शाखांनी शंभर टक्के निकाल नोंदवला; मात्र कला शाखेतून एकमेव विद्यार्थी नापास ठरल्याने त्या शाखेचा निकाल शून्य टक्के राहिला.HSC Result Toppers Story: आई-वडील नाहीत, वसतिगृहात झाडू मारला अन् बागकाम केलं; संभाजीनगरच्या 'दत्तू'ची बारावीत दैदीप्यमान झेप!पालघरमध्येही समान चित्रपालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील भगवान बिरसा मुंडा इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट येथे टेक्निकल सायन्समधील एकमेव विद्यार्थी अनुत्तीर्ण ठरल्याने संस्थेचा निकाल शून्य टक्के लागला. शारदा कनिष्ठ महाविद्यालय येथे कला शाखेचा निकाल शून्य टक्के आहे, तर वाणिज्य (६७.९० टक्के) आणि विज्ञान (८५.५० टक्के) शाखांनी समाधानकारक कामगिरी केली. लॉर्ड्स इंग्लिश स्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेज येथे कला शाखेतील चारही विद्यार्थी अपयशी ठरले; विज्ञान (५०.३९ टक्के) आणि वाणिज्य (२७.५२ टक्के) शाखांनी मर्यादित यश मिळवले. श्री गजनंद सिंग हायस्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेज येथेही कला शाखेचा निकाल शून्य टक्के लागला, तर विज्ञान (८९.५९ टक्के), वाणिज्य (७९.६८ टक्के) शाखांनी चांगली कामगिरी नोंदवली.
69 shares
😢
P
Pudhari
May 3, 2026, 03:00 AM
अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी परीक्षेत उत्तीर्ण गुण मिळवले आहेत.

अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी परीक्षेत उत्तीर्ण गुण मिळवले आहेत.

अहिल्यानगर जिल्ह्यातून 32,263 मुले, 27,302 मुली अशा एकूण 59,565 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. 31,924 मुले, 26,971 मुली अशा एकूण 58,895 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यापैकी 52,196 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात 27,694 मुले, 25,502 मुली असे एकूण 53 हजार 196 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 8.71 टक्क्यांनी जास्त आहे. जिल्ह्यातील विज्ञान शाखेचे 96.55 टक्के, कला शाखेचे 75.59 टक्के, वाणिज्य शाखेचे 85.26 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सोलापूर जिल्ह्यातून 29,595 मुले, 24,132 मुली अशा एकूण 53,727 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. परीक्षा दिलेल्या 52,990 विद्यार्थ्यांपैकी 29,165 मुले, 23,825 मुली होत्या. तर उत्तीर्ण झालेल्या 46 हजार 221 विद्यार्थ्यांमध्ये 23,978 मुले, 22,243 मुलींचा समावेश आहे. तर मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 11.14 टक्क्यांनी जास्त असल्याचे दिसून येते. जिल्ह्यातील विज्ञान शाखेचे 95.52 टक्के, कला शाखेचे 72.85 टक्के, वाणिज्य शाखेचे 83.66 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती पुणे विभागीय मंडळाने दिली.
87 shares
😐
Pudhari logo
Pudhari
May 3, 2026, 02:17 AM
जाटबसर्गीमधील विद्यार्थ्यांना पुरेशा पायाभूत सुविधा पुरवण्यात सरकार अपयशी

जाटबसर्गीमधील विद्यार्थ्यांना पुरेशा पायाभूत सुविधा पुरवण्यात सरकार अपयशी

जत :बसर्गी (ता. जत) येथील जिताणी वस्तीवरील जिल्हा परिषद शाळेची पत्र्याच्या शेडमध्ये भरत असल्याबाबत दयनीय अवस्थेचे चित्रण सर्वप्रथम ‌‘दैनिक पुढारी‌’ने केले होते. जागा खरेदीच्या तांत्रिक अडचणीमुळे शासनाला वर्गखोल्या उभारता येत नव्हत्या.
3 shares
😢
P
Pudhari
May 3, 2026, 01:54 AM
कोकण बोर्डाच्या बाराव्या इयत्तेच्या परीक्षेचा निकालः मुलींनी मुलांवर मात केली, तर सिंधुदूर्गचा निकाल घसरला

कोकण बोर्डाच्या बाराव्या इयत्तेच्या परीक्षेचा निकालः मुलींनी मुलांवर मात केली, तर सिंधुदूर्गचा निकाल घसरला

पंधरा वर्षे सातत्याने कोकण बोर्डाची सर्वाधिक निकालाची घोडदौड कायम आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश असलेल्या कोकण बोर्डामध्ये यंदा बारावी परीक्षेसाठी २३ हजार ३३ विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली होती. त्यातील २२,८८८ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेस बसले होते. त्यातून २१,५४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये १०,५२६ मुलगे आणि ११,०२२ मुली असून दरवर्षीप्रमाणे मुलींनी निकालात बाजी मारली आहे. गतवर्षी कोकण बोर्डाचा निकाल ९६.७४ टक्के, तर सिंधुदुर्गचा निकाल ९८.७४ टक्के लागला होता. यंदा सिंधुदुर्गच्या निकालात सुमारे तीन टक्क्यांनी घट झाली आहे.
52 shares
😐
P
Pudhari
May 3, 2026, 01:20 AM
पाच जिल्हा मतदारसंघांमध्ये संविधान भवनाचे बांधकाम सुरू

पाच जिल्हा मतदारसंघांमध्ये संविधान भवनाचे बांधकाम सुरू

संविधान भवन व शैक्षणिक सुविधा जिल्ह्यातील पाच मतदारसंघांत प्रत्येकी 3 कोटी रुपयांचे संविधान भवन उभारले जात असून त्यामध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुरू केले जाणार आहे. तसेच रत्नागिरीत केंद्रीय विद्यालयासाठी नाचणे येथे जागा उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
43 shares
😐
P
Pudhari
May 3, 2026, 12:48 AM
सांगली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी एन. ई. ई. टी. परीक्षा केंद्राची मार्गदर्शक तत्त्वे

सांगली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी एन. ई. ई. टी. परीक्षा केंद्राची मार्गदर्शक तत्त्वे

दीडच्या आत केंद्रात... विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात, त्यांनी नीटचा अर्ज करताना सादर केलेले ओळखपत्र, एक पासपोर्ट साईज फोटो, ॲडमिट कार्ड आणि पारदर्शक पाण्याची छोटी बाटली, एवढेच साहित्य घेऊन जाता येणार आहे. दुपारी 1.30 नंतर कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश दिला जात नाही. सांगली जिल्ह्यात डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय सांगलीवाडी, विलिंग्डन कॉलेज, पटवर्धन हायस्कूल सांगली, पुरोहित कन्या प्रशाला सांगली, आर. एन. पाटील गर्ल्स हायस्कूल, डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालय मिरज, मिरज महाविद्यालय, मिरज हायस्कूल, वालचंद कॉलेज सांगली आणि शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन तासगाव येथे परीक्षा केंद्रे आहेत.
99 shares
😐
L
Lokmat
May 3, 2026, 12:08 AM
महाराष्ट्र राज्य बोर्डाचा बाराव्या इयत्तेचा निकाल जाहीर, मुलींनी मुलांपेक्षा चांगली कामगिरी केली

महाराष्ट्र राज्य बोर्डाचा बाराव्या इयत्तेचा निकाल जाहीर, मुलींनी मुलांपेक्षा चांगली कामगिरी केली

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे/मुंबई :महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीचा निकाल शनिवारी दुपारी १२ वाजता ऑनलाइन जाहीर केला. राज्याचा निकाल ८९.७९ टक्के लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत निकालात २.०९ टक्के घट झाली असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी ९३.१५ टक्के असून, मुलांची ८६.८० टक्के इतकी आहे. म्हणजेच, मुली या मुलांपेक्षा ६.३५ टक्क्यांनी पुढे आहेत. विशेष म्हणजे राज्यात दोन विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवत राज्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. विभागनिहाय निकालात कोकण विभाग ९४.१४ टक्क्यांसह अव्वल ठरला आहे, तर लातूर विभागाचा निकाल ८४.१४ टक्के इतका लागला असून सर्वात कमी राहिला आहे. शाखानिहाय निकाल विज्ञान८६.४४%कला७८.०२%वाणिज्य८७.०३%व्यवसाय अभ्यासक्रम८२.७४%आयटीआय८३.७८%२६ विषयांचा निकाल १००% राज्य मंडळाने एकूण १५३ विषयांसाठी परीक्षा घेतली. यापैकी २६ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. बहुतांश शाखांमध्ये थोडी घसरण झाली असून, कला शाखेचा निकाल तुलनेने कमी राहिला आहे. यंदाचा निकाल- ८९.७९%गतवर्षीचा निकाल- ९१.८८%घट२.०९%विभागनिहाय निकालकोकण९४.१४%पुणे९१.२५%अमरावती२०.९२%नाशिक९०.७२%मुंबई९०,०८%कोल्हापूर८९.९७%छत्रपती संभाजीनगर८८.६८%नागपूर८८.६७%लातूर८४.१४%उत्तरपत्रिका तपासणीसाठी ३ मे ते १७ मेपर्यंत मुदत बारावीच्या निकालानंतर गुण पडताळणीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना ३ ते १७ मे या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती राज्य परीक्षा मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला. निकालानंतर नवी मुंबईतील बारावीच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाचा असा जल्लोष केला.
18 shares
😐
M
Maharashtra Times
May 2, 2026, 03:20 PM
रॅग्स-टू-रिच स्टोरीः दत्तू अशोक जाधव यांचा बालगृहापासून शैक्षणिक यशापर्यंतचा प्रवास

रॅग्स-टू-रिच स्टोरीः दत्तू अशोक जाधव यांचा बालगृहापासून शैक्षणिक यशापर्यंतचा प्रवास

आशिष चौधरी, छत्रपती संभाजीनगर:आई-वडिलांचे हरवलेले छत्र, वयाच्या सहाव्या वर्षापासून बालगृहात निवास, निराधार, अनाथांप्रती समाजाचा दृष्टीकोन बदलण्यासाठी त्याने शिक्षणाची कास धरली अन् कठोर परिश्रमाच्या बळावर बारावीत दैदीप्यमान यश मिळविले. ही यशोगाधा आहे छत्रपती संभाजीनगरच्या दत्तू अशोक जाधवची. बेताची परिस्थिती असलेला दत्तू वसतिगृहात हाऊसकीपिंग, बागकामासह खाणावळीत काम करून स्वत:चा खर्च भागवतो. शिक्षणाची जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर दत्तूने कलाशाखेत ९२.१७ टक्के गुण मिळविले. ‘आयएएस अधिकारी’ होण्याचे स्वप्न घेऊन तो मार्गक्रमण करत आहे.बालगृहात राहून दहावीचे शिक्षण पूर्णशहरातील देवगिरी कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी असलेला दत्तू सध्या राजमाता जिजाऊ वसतिगृहात राहतो. लहानपणी भारतीय समाज सेवा केंद्रात संगोपण झाले. त्यानंतर त्याला बालगृहात पाठविण्यात आले. वयाच्या सहाव्यावर्षापासून तो बालगृहात राहत होता. याच दरम्यान त्याच्या वडिलांचेही निधन झाले. बालगृहात राहून त्याने भारतीय विद्यालयातून दहावीचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षणामुळेच परिस्थितीवर मात करून इतरांना न्याय देता येऊ शकतो हे त्याने ओळखले. इयत्ता सातवी-आठवीपासून अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या दत्तुला शिक्षणाची जिद्द स्वस्थ बसू देत नव्हती. तेवढ्याच मेहनतीने त्याने दहावीचे शिक्षण पूर्ण केले.बारावीत नेत्रदीपक यशदहावीला त्याने ८९.८० टक्के गुण मिळविले. पुढे अकरावी, बारावीचे शिक्षणासाठी कोणती शाखा निवडायची याचा विचार त्याने सातवी, आठवीचा करून ठेवला होता. त्यानुसार त्याने कला शाखेत प्रवेश घेतला. दोन वर्ष प्रचंड अभ्यास, मेहनत आणि संकटांवर मात करून शिक्षण पूर्ण करण्याच्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर त्याने बारावीत नेत्रदीपक असे यश मिळवित इतर विद्यार्थ्यांसमोर आदर्श उभा केला. यंदा प्राविण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्येत घट झाली. त्यात कला शाखेतून नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेणे म्हणजे प्रचंड अभ्यास लागतो. त्यात दत्तूने मिळविले हे यश राज्यातील विद्यार्थ्यांसमोर आदर्शवत असे ठरले आहे.मुलींनी मारली बाजी पण... बारावी निकालाची 'ही' ५ मोठी वैशिष्ट्ये; का खालावले निकालाचे प्रमाण?मदतीचे हातशिक्षणाची जिद्द असेल तर आलेली संकटेही गुडघे टेकतात. बालगृहात अठरा वर्षापर्यंतच राहता येते. तेथे असताना त्याला उपाध्यक्ष अवधूत जगताप यांनी मदत केली, शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. येथील कालावधी संपताना त्यांनी बालगृहाचे कार्यकारी अध्यक्ष आणि राजमाता जिजाऊ वसतिगृहाचे प्रमुख मानसिंग पवार यांच्या कनावर ही बाब टाकली आणि दत्तुला या वसतिगृहात राहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची विनंती केली. सध्या दत्तु राजमाता जिजाऊ वसतिगृहात राहतो. कमवा व शिका योजनेत दोन, तीन तास हाऊसकीपिंग, बागकाम तर सायंकाळी तीन तास खाणावळीत काम करतो आणि आपले शिक्षण पूर्ण करतो आहे. त्याला यासाठी महाविद्यालयाच्या शिक्षकांनीही खंबीर पाठबळ दिले.शिकवणी न करता यशदत्तुला बारावीत ६०० पैकी ५५३ गुण आहेत. विषयनिहाय पाहिले तर मानसशास्त्र विषयात ९७ गुण आहेत., समाजशास्त्र ९७, राज्यशास्त्रात ९२, मराठीत ९६, इतिहासात ९३ तर इंग्रजीत ७८ गुण आहेत. नियमित तासिकांना उपस्थिती, अभ्यासातील सातत्य, सरावावर भर दिला. खासगी शिकवणी नाही तर स्वत: नियमित अभ्यासावर हे यश मिळविल्याचे तो सांगतो. अकरावी, बारावीत ‘एनसीईआरटीई’च्या पुस्तकांचाही अभ्यास त्याने केला.बारावी निकालात मोठी खळबळ! राज्यातील ५०० हून अधिक विद्यार्थ्यांचे निकाल रोखले; शिक्षकांवरही गुन्हे दाखलपरिस्थितीमुळे स्वत:ला सिद्ध करण्याशिवाय पर्याय नाही. अनाथ असल्याने आर्थिक, सामाजिक स्तरावरील अनेक अडचणी येतात. अनाथांप्रती समाजात असलेला दृष्टीकोन आपल्याला बदलायचा आहे. समजायला लागले तेंव्हाच अधिकारी होण्याचे स्वप्न मनात ठेवून मी कला शाखा निवडली.- दत्तू अशोक जाधव
50 shares
😢
Lokmat logo
Lokmat
May 2, 2026, 01:40 PM
महाराष्ट्र राज्य बोर्डाचा बाराव्या इयत्तेचा निकाल जाहीर, मुलींनी मुलांपेक्षा चांगली कामगिरी केली

महाराष्ट्र राज्य बोर्डाचा बाराव्या इयत्तेचा निकाल जाहीर, मुलींनी मुलांपेक्षा चांगली कामगिरी केली

पुणे:महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीचा निकाल शनिवारी (दि. २) दुपारी १२ वाजता ऑनलाइन जाहीर केला. त्यानुसार, राज्याचा निकाल ८९.७९ टक्के लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत निकालात २.०९ टक्के घट झाली असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी (९३.१५) बाजी मारली आहे. मुलांची टक्केवारी (८६.८०) तसेच नऊ विभागांपैकी काेकण (९३.१५) अव्वल स्थानी, तर लातूर विभाग (८४.१४) शेवटच्या स्थानावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे राज्यात दाेन विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गुण मिळवत राज्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. राज्य मंडळाने फेब्रुवारी मार्च २०२६ मध्ये राज्यातीलपुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत इयत्ता बारावीची परीक्षा घेतली. यासाठी विज्ञान, कला, वाणिज्य, व्यवसाय अभ्यासक्रम व आयटीआय या शाखांसाठी एकूण १४ लाख ४४ हजार ७१३ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४ लाख ३३ हजार ०५८ विद्यार्थी प्रविष्ट झाले हाेते. त्यापैकी १२ लाख ८६ हजार ८४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. याची टक्केवारी ८९.७९ इतकी आहे.याचबराेबर खासगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या ३७,५५९ हाेती. त्यापैकी ३६,९४१ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून, २९,६३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तसेच एकूण ५०,८७६ पुनर्परीक्षार्थींनी नोंदणी केली होती. त्यातील ५०,३४६ विद्यार्थी प्रविष्ट झाले हाेते. त्यापैकी १८,३४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ------------दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल ९०.५८ टक्के : बारावी परीक्षेसाठी एकूण ८,४४६ दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ८,३६७ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी ७,५७९ दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षेस नोंदणी केलेल्या पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रचलित पद्धतीने सवलतीचे गुण देण्याबाबत कार्यवाही केलेली आहे.------------ मुलींचीच चलती :सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींची उत्तीर्ण टक्केवारी ९३.१५ टक्के, तर मुलांची ८६.८० टक्के आहे. यात मुलांपेक्षा मुली ६.३५ टक्केने आघाडीवर आहेत. ------------२६ विषयांचा निकाल शंभर टक्के राज्य मंडळाने एकूण १५३ विषयांसाठी परीक्षा घेतली. यापैकी २६ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. बहुतांश शाखांमध्ये थोडी घसरण झाली असून, कला शाखेचा निकाल तुलनेने कमी राहिला आहे. गतवर्षी अर्थात फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये बारावीचा एकूण निकाल ९१.८८ टक्के लागला होता. त्यात यंदा २.०९ टक्केने घसरण हाेऊन ८९.७९ टक्के निकाल लागला आहे.----------- शाखानिहाय निकालविज्ञान : ८६.४४ टक्के कला : ७८.०२ टक्केवाणिज्य : ८७.०३ टक्के व्यवसाय अभ्यासक्रम : ८२.७४ टक्केआयटीआय : ८३.७८ टक्के ----- उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा टक्का : ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणारे विद्यार्थी : ७ हजार ५१०८५ ते ९० टक्के : २३ हजार ९६४ ८० ते ८५ टक्के - ४५ हजार २८६७५ ते ८० टक्के - ६७ हजार ४९१ ७० ते ७५ टक्के - ९० हजार १९६६५ ते ७० टक्के - १ लाख १६ हजार ४२८ ६० ते ६५ टक्के - १ लाख ६४ हजार २४७४५ ते ६० टक्के - ६ लाख ०१ हजार ०६१ ४५ टक्केपेक्षा कमी - २ लाख १८ हजार ६४३=====
25 shares
😐
L
Lokmat
May 2, 2026, 12:56 PM
परभणी जिल्ह्यात इयत्ता 12 वीच्या परीक्षेत उत्तीर्णांची टक्केवारी 87.69% नोंदवली

परभणी जिल्ह्यात इयत्ता 12 वीच्या परीक्षेत उत्तीर्णांची टक्केवारी 87.69% नोंदवली

परभणी:फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वी परीक्षेचा निकाल शनिवारी ऑनलाइन जाहीर झाला. यामध्येपरभणीजिल्ह्याचा एकूण निकाल ८७.६९ टक्के लागला असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी उज्ज्वल कामगिरी करत आघाडी कायम राखली आहे. जिल्ह्यातील एकूण २६ हजार ९४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी २५ हजार ५८४ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला बसले. यामधून २२ हजार ४३७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, एकूण उत्तीर्णतेचे प्रमाण ८७.६९ टक्के नोंदवले गेले आहे. काही विद्यार्थ्यांना अपयश आले असले तरी बहुतांश विद्यार्थ्यांनी चांगले यश मिळवले आहे. गुणानुसार निकाल पाहता प्रथम श्रेणीत ६,६५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, ही संख्या लक्षणीय आहे. द्वितीय श्रेणीत १०,४८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, तर उत्तीर्ण श्रेणीत ३,१०१ विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. यावरून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची एकूण गुणवत्ता दिसून येते. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी निकालात आघाडी घेतली आहे. मुलींचा निकाल ९२.३८ टक्के लागला असून, मुलांचा निकाल ८३.८६ टक्के इतका आहे. त्यामुळे मुलींनी पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. शाखानिहाय निकालविज्ञान शाखेने यंदा सर्वाधिक निकाल नोंदवला आहे. या शाखेत १४,५८१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी सुमारे १३,७९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान शाखेचा निकाल ९५.५३ टक्के लागला असून, हा सर्वाधिक आहे. यामध्ये ६,४८२ मुली व ७,३१६ मुले उत्तीर्ण झाली आहेत. कला शाखेत ९,४५० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ६,८९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, निकाल ७५.६२ टक्के लागला आहे. इतर शाखांच्या तुलनेत हा निकाल कमी असला तरी अनेक विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या शाखेत ३,३५८ मुली व ३,५४१ मुले उत्तीर्ण झाली आहेत. वाणिज्य शाखेचा निकाल ८६.७० टक्के लागला आहे. या शाखेत १,८२७ विद्यार्थ्यांपैकी १,५५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये ७४१ मुली व ८११ मुले यांचा समावेश आहे. वाणिज्य शाखेनेही समाधानकारक कामगिरी नोंदवली आहे. एकूण पाहता विज्ञान शाखेने आघाडी घेतली असून, कला शाखेत निकाल तुलनेने कमी असला तरी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत सुधारणा दिसून येत आहे. तालुकानिहाय निकालजिंतूर : ९३.११%पाथरी : ९१.२५%पालम : ९०.२२%गंगाखेड : ८८.४३%सोनपेठ : ८८.३९%परभणी : ८६.७६%मानवत : ८६.४७%सेलू : ८४.३६%पूर्णा : ७८.२६% तीन तालुके ९० टक्क्यांच्या पुढेजिल्ह्याने यंदाही समाधानकारक कामगिरी केली आहे. गेल्या काही वर्षांपासून निकालात सातत्याने सुधारणा होत असल्याचे चित्र असून, विद्यार्थ्यांच्या मेहनतीला यश मिळाले आहे. यंदा जिंतूर, पाथरी आणि पालम तालुक्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त निकाल नोंदवत आघाडी घेतली आहे. तर पूर्णा तालुक्याचा निकाल तुलनेने कमी लागला आहे. गुणानुसार निकाल :प्रथम श्रेणी : ६,६५६ विद्यार्थीद्वितीय श्रेणी : १०,४८२ विद्यार्थीउत्तीर्ण श्रेणी : ३,१०१ विद्यार्थी ३.१६ टक्क्यांनी वाढला बारावीचा निकालफेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला असून, गतवर्षाच्या तुलनेत यंदा निकालात ३.१६ टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली आहे. त्यामुळे जिल्ह्याचा एकूण निकाल ८७.६९ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यावेळी जिल्ह्याचा निकाल ८४.५३ टक्के लागला होता. यामध्ये मुलींचे उत्तीर्ण प्रमाण ९२.१० टक्के, तर मुलांचे ८१.७२ टक्के होते. यंदा मात्र निकालात सुधारणा होत मुलींचे उत्तीर्ण प्रमाण ९२.६८ टक्क्यांवर पोहोचले आहे. तर मुलांचे प्रमाण ८३.८६ टक्के इतके नोंदवले गेले आहे.
37 shares
😐
L
Lokmat
May 2, 2026, 12:46 PM
बाराव्या इयत्तेच्या परीक्षेत सामूहिक नक्कल केल्याबद्दल भारताच्या बी. एस. ई. ने 243 विद्यार्थ्यांविरोधात अभूतपूर्व कारवाई केली

बाराव्या इयत्तेच्या परीक्षेत सामूहिक नक्कल केल्याबद्दल भारताच्या बी. एस. ई. ने 243 विद्यार्थ्यांविरोधात अभूतपूर्व कारवाई केली

निशांत वानखेडेनागपूर:बाेर्डाच्या बारावीच्या परीक्षेत सामुहिक काॅपी करणाऱ्या दाेन परीक्षा केंद्रामधील तब्बल २४३ विद्यार्थ्यांवर बाेर्डाने कारवाईचा बडगा उगारला आहे. शनिवारी निकालासोबतच ही माेठी कारवाई केल्याचेही विभागीय बाेर्डाने जाहीर केल्याने खळबळ उडाली आहे. हा सामुहिक काॅपीचा प्रकार पेपर तपासताना लक्षात आल्याचे बाेलले जात आहे. वर्धा व गाेंदिया जिल्ह्यातील या दाेन केंद्रांची मान्यतासुद्धा कायमची रद्द करण्याचे बाेर्डाने जाहीर केले. एवढ्या माेठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांवर कारवाईचे हे अलीकडच्या वर्षातील पहिलेच प्रकरण हाेय. नागपूरविभागीय अध्यक्ष शिवलिंग पटवे यांनी दिलेल्या माहितीनुसार बारावीच्या बायोलॉजी विषयाच्या उत्तरपत्रिकांची तपासणी करताना गंभीर अनियमितता आढळून आली. तपासात गोंदिया जिल्ह्यातील कातुर्ली येथील माऊली आर्ट अँड सायन्स ज्युनिअर कॉलेजमधील १२५ विद्यार्थी आणि वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यात वाशी येथील जे. डी. चौधरी कनिष्ठ महाविद्यालयातील ११८ विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकांमध्ये एकसारखी उत्तरे लिहिल्याचे आढळून आले. पेपर तपासणाऱ्या माॅडरेटरच्या तक्रारीनंतर बोर्डाने सखोल चौकशी समिती स्थापन करून संबंधित विद्यार्थ्यांना चौकशीसाठी पाचारण केले. चौकशीत सामूहिक काॅपी झाल्याचे सिद्ध झाल्यानंतर सर्व २४३ विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी थांबवून त्यांना थेट अनुत्तीर्ण घोषित करण्यात आले. या प्रकरणात सुनावणी घेताना व कारवाई करताना अत्यंत गाेपनीयता बाळगल्याचे पटवे यांनी सांगितले. थेट निकालाच्या दिवशीच हा प्रकार जाहीर करण्यात आला. कठोर प्रशासकीय कारवाई या गंभीर प्रकाराची दखल घेत बोर्डाने विद्यार्थ्यांबरोबरच संबंधित शैक्षणिक संस्थांवरही कडक कारवाई केली आहे. दोषी आढळलेल्या दोन्ही शाळांची परीक्षा केंद्रे कायमस्वरूपी रद्द करण्यात आली आहेत. काॅपीप्रकरणात सहकार्य करणाऱ्या शिक्षक व पर्यवेक्षकांविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करण्यात आली असून त्यांच्यावरही कठोर कारवाई होणार आहे. तसेच शाळेचे मुख्याध्यापक व संबंधित संस्थांविरुद्ध कायदेशीर आणि प्रशासकीय कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचे शिवलिंग पटवे यांनी स्पष्ट केले. ३९ अन्य विद्यार्थ्यांवरही कारवाई सामूहिक नकल प्रकरणांव्यतिरिक्त नागपूर विभागात इतर ३९ विद्यार्थ्यांवर विविध काॅपी प्रकरणांत कारवाई करण्यात आली. त्यांना काॅपी सापडलेल्या विषयात थेट नापास करण्यात आले. याशिवाय सेंट उर्सुला स्कूल येथील सेंटरवर भाैतिकशास्त्र विषयाच्या पेपरमध्ये माेबाईलद्वारे गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थिनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाने खळबळ उडाली हाेती. या प्रकरणाची लिंक नागपूरच्या शाळा आणि भंडारा येथील शिकवणी वर्गापर्यंत पाेहचली हाेती आणि अनेकांना अटकही करण्यात आली हाेती. या प्रकरणात आणखी कारवाई हाेण्याचे संकेत विभागीय अध्यक्ष पटवे यांनी दिले. याशिवाय जिल्ह्यात उमरेड आणि गडचिरोली जिल्ह्यातील एका विद्यार्थ्यासह एकूण दाेन विद्यार्थ्यांवर एफआयआर नोंदवण्यात आली आहे.
38 shares
😊
Pudhari logo
Pudhari
May 2, 2026, 12:40 PM
बोर्डाच्या परीक्षेनंतर विद्यार्थ्यांचा मृत्यू, वाहिली श्रद्धांजली

बोर्डाच्या परीक्षेनंतर विद्यार्थ्यांचा मृत्यू, वाहिली श्रद्धांजली

मृत प्रिया ही बारावीची विद्यार्थिनी होती, तर शिवराज दहावीत शिक्षण घेत होता. दोघांनीही नुकत्याच बोर्डाच्या परीक्षा दिल्या होत्या. एका हसत्या-खेळत्या कुटुंबाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.
18 shares
😐
L
Lokmat
May 2, 2026, 11:46 AM
कल्याण यांनी आर. टी. ई. अंतर्गत मोफत शालेय प्रवेशासाठी मुदतवाढ दिली

कल्याण यांनी आर. टी. ई. अंतर्गत मोफत शालेय प्रवेशासाठी मुदतवाढ दिली

कल्याण : आरटीई २५ टक्के ऑनलाईन मोफत शालेय प्रवेश प्रक्रीया कागदपत्रांच्या पडताळणीस मुदतवाढ ८ मे पर्यंत मुदत वाढ देण्यात आली असल्याची माहिती महापालिकेच्याशिक्षणविभागाने दिली आहे. कल्याण पश्चिमेतील बारदान गल्ली गांधी चौकातील कै. शंकरराव झुंझारराव मनपा शाळा क्रमांक एक या पडताळणी केंद्रामध्ये पडताळणी समितीकडून ८ मे पर्यंत कार्यालयीन आणि शासकीय सुटटीचे दिवस वगळून सकाळी १० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे. शासनाचे निर्देशानुसार पालकांनी जी कागदपत्रे ऑनलाईन अर्ज भरताना अपलोड केलेली आहेत तीच मुळ कागदपत्रे तपासणीसाठी ग्राहय धरण्यात येतील. २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाकरिता ऑनलाईन प्रवेश प्रक्रीया राबविण्यात येत आहे. प्रथम फेरीमध्ये निवड झालेल्या बालकांच्या प्रवेश प्रक्रीयेची सुरुवात१० एप्रिल पासून सुरु आहे. पालकांनी केवळ एसएमएसवर अवलंबून न राहता आरटीईवर बालकाचा अर्ज क्रमांक टाकून अर्जाची स्थिती पाहावी. निवड झालेल्या बालकांच्या प्रवेश निश्चितीसाठी अलॉटमेंट लेटर, हमीपत्र आणि आवश्यक कागदपत्रांची तपासणी करणेसाठी ८ मे पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. निवड झालेल्या बालकांच्या पालकांनी महाराष्ट्र शासन शालेयशिक्षणव क्रीडा विभागाच्या https://rte25admission.maharashtra.gov.in/adm portal/Users/rteindex या RTE PORTAL वर अलॉटमेंट लेटरची प्रिंट काढावी. अलॉटमेंट लेटर आणि प्रवेश प्रक्रीयेकरिता अपलोड केलेली कागदपत्रे मुळ प्रतींसह छायांकित प्रतींचा दोन संच घेऊन पडताळणी केंद्रावर उपस्थित राहून पडताळणी समितीकडून ८ मे पर्यंत मुदतीत कागदपत्रांची तपासणी करुन पात्र बालकांचा प्रवेश निश्चित करावा असे आवाहन शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी भारत बोरनारे यांनी केले आहे.
59 shares
😐
Lokmat logo
Lokmat
May 2, 2026, 10:50 AM
नर-पार-गिरणा नदी जोडणी प्रकल्पाला सरकारची हिरवा कंदील

नर-पार-गिरणा नदी जोडणी प्रकल्पाला सरकारची हिरवा कंदील

मालेगाव :नाशिकव जळगाव जिल्ह्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या नार-पार-गिरणा नदी जोड प्रकल्पाला शासनस्तरावरील समितीने हिरवा कंदील दिला आहे. सुमारे ४,११६.१० कोटी रुपयांच्या या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया यापूर्वीच पूर्ण झाली असून, त्यास आता अधिकृत मान्यता मिळाल्याने पुढील कार्यवाहीला वेग येणार आहे. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून लवकरच कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर) जारी करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातून सुमारे १०.६४ द.ल.घ.फू.पाणीउपलब्ध होणार असून,नाशिकव जळगाव जिल्ह्यांतील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा दिलासा मिळणार आहे. याशिवाय अंदाजे १ लाख २३ हजार ७९० एकर क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. दरम्यान, प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याबाबत जलसंपदा विभागाकडून सविस्तर अभ्यास सुरू असून, या टप्प्यातून आणखी २०.६६ द.ल.घ.फू.पाणीउपलब्ध होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे लवकरच संबंधित मंत्री, स्थानिक नागरिक व शेतकरी यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा पार पडणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. दहावीचा निकाल लवकरच, अकरावी ॲडमिशनसाठी कुठली कागदपत्रे लागतात, 'ही' कागदपत्रे तयार ठेवा!
32 shares
😐
Lokmat logo
Lokmat
May 2, 2026, 10:16 AM
एम. एस. बी. एस. एच. एस. ई. च्या बाराव्या इयत्तेच्या निकालात नागपूर विभागाची निराशाजनक कामगिरी

एम. एस. बी. एस. एच. एस. ई. च्या बाराव्या इयत्तेच्या निकालात नागपूर विभागाची निराशाजनक कामगिरी

नागपूर:महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे शनिवारी जाहीर झालेल्या बारावीच्या निकालात यंदाहीनागपूरविभागाची कामगिरी निराशाजनक ठरली. परीक्षेत नागपूर विभागातून ८८.६७ टक्के विद्यार्थी यशस्वी ठरले असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २ टक्क्यांची घट झाली आहे. यावर्षीसुद्धा विभाग शेवटून दुसऱ्या म्हणजे ८ व्या स्थानी कायम आहे. विशेष म्हणजे नागपूरच्या तुलनेत अमरावती विभागाने उत्तीर्णांचे ९०.९२ टक्के यश प्राप्त करीत तिसऱ्या स्थानी झेप घेतली. काेकण प्रथम व पुणे द्वितीय स्थानी आहे. नागपूर विभागातून फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या बारावी बाेर्डाच्या परीक्षेस ७६,७५३ मुले आणि ७५,४७७ मुली मिळून एकूण १,५२,२३० विद्यार्थी प्रविष्ट झाले हाेते. यामधून १,३४,९८८ म्हणजे ८८.६७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नेहमीप्रमाणे यावर्षीही मुलींनीच निकालात सरशी घेतली आहे. ७५,४७७ पैकी ६९,८२१ मुली बारावीत उत्तीर्ण झाल्या. परीक्षेत बसलेल्या ७६,७५३ मुलांपैेकी ६५,१६७ मुले उततीर्ण झाले. ९२.५० टक्के मुली आणि ८४.९० टक्के मुलांनी यश मिळाविले असून मुलांपैक्षा मुलींचा निकाल ८ टक्क्याने अधिक आहे. विभागात नागपूर जिल्हा अव्वल निकालात नागपूर विभागाचा टक्के घसरला पण नागपूर जिल्हा यंदा अव्वल ठरला आहे. नागपूर जिल्ह्यातून ६२,८६४ विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट झाले हाेते, त्यापैकी ५७,६२२ विद्यार्थी म्हणजे ९१.६६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जिल्हा एकूण प्रविष्ट एकूण उत्तीर्ण मुले मुली टक्के नागपूर - ६२,८६४ - ५७,६२२ - २७,९७७ - २९६४५ - ९१.६६गाेंदिया - १८,०६३ - १६,१८४ - ८०३४ - ८१५० - ८९.५९चंद्रपूर - २६,७५७ - २३,७३९ - ११,३९१ - १२,३४८ - ८८.७२वर्धा - १५,५२१ - १३,५८५ - ६५३३ - ७०५२ - ८७.५२भंडारा - १६,५५५ - १३,९२७ - ६५७६ - ७३५१ - ८४.१२गडचिराेली - १२,५७० - ९९३१ - ४६५६ - ५२७५ - ७९.६३ गुणपडताळणी, छायाप्रतीसाठी १५ मे पर्यंत करा अर्ज ज्या विद्यार्थ्यांना निकालाबद्दल आक्षेप असेल किंवा मिळालेल्या गुणाबद्दल असमाधान असेल, त्यांनी पुन्हा गुणपडताळणीसाठी राज्य शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर ३ मे ते १७ मे २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज करावा. प्रति विषय ५० रुपये ऑनलाईन शुल्क भरावे लागेल. याशिवाय उत्तरपत्रिकेच्या छायाप्रती मागविण्यासाठी विद्यार्थी मंडळाचे संकेतस्थळावर किंवा ई-मेलद्वारे ३ मे ते १७ मे २०२६ या कलावधीत अर्ज करू शकतात. यासाठी प्रति विषय ४०० रुपये शुल्क ऑनलाईन जमा करावे लागेल.
61 shares
😐
Maharashtra Times logo
Maharashtra Times
May 2, 2026, 09:44 AM
फसवणूक प्रकरणामुळे महाराष्ट्रातील शाळांना धक्का, 501 विद्यार्थ्यांसाठी निकाल राखीव

फसवणूक प्रकरणामुळे महाराष्ट्रातील शाळांना धक्का, 501 विद्यार्थ्यांसाठी निकाल राखीव

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर :माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने राज्यभरात चर्चेत राहिलेल्या चौसाळा, कन्नड प्रकरणातील ५०१ मुलाचे निकाल राखीव ठेवले आहेत. सामुदायिक कॉपी प्रकरणात कन्नड तालुक्यातील जैतापूर येथील राष्ट्रीय उच्च माध्यमिक विद्यालयातील १३० तर बीड जिल्ह्यातील चौसाळा कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील ३७१ विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवला आहे. तसेच उत्तरपत्रिका तपासणीत हस्ताक्षर बदल, पान फाडले अशी ४१ प्रकरणे समोर आली. त्या विद्यार्थ्यांचाही निकाल जाहीर करण्यात आला नाही.बारावीच्या इंग्रजीच्या पेपरला बीड तालुक्यातील चौसाळा येथील परीक्षा केंद्राच्या आवारात व वर्गाच्या खिडक्यांच्या असापास लोकांची गर्दी केली असल्याचे ड्रोनने टिपलेले चित्रीकरण राज्यभर गाजले. यानंतर शिक्षण विभागाने गैरप्रकाराची पडताळणी केली असता वर्गामध्ये मास कॉपी करत असल्याचे व त्यांना पर्यवेक्षक, केंद्रसंचालक प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे सहकार्य करत असल्याचे समोर आले होते. मंडळाने आज जाहीर केलेल्या निकालात या परीक्षा केंद्रावर पेपर देणाऱ्या सर्व ३७१ विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवले आहे.तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड तालुक्यातील जैतापूर येथील राष्ट्रीय उच्च माध्यमिक विद्यालयाला शिक्षणाधिकाऱ्यांनी इंग्रजी विषयाच्या पेपरला पहिल्याच दिवशी भेट दिली तेव्हा सामूहिक कॉपीचा प्रकार समोर आला होता. यानंतर मंडळाने समिती नेमत चौकशी केली. यानंतर या केंद्रावरील १३० विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आल्याचे मंडळ अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. या प्रकरणी विद्यार्थ्यांसह शिक्षकांवरही कारवाई करण्यात आली आहे. विभागात पाच जिल्ह्यात ४८ शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मास कॉपीसह इतर प्रकरणात एकूण ५४४ विद्यार्थ्यांचे निकाल राखीव आहेत. मास कॉपी प्रकरणात पाचशेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आल्याचे मागील काही वर्षातील पहिलीच मोठी संख्या असल्याचे सांगण्यात येते.बारावी परीक्षेत कोणाचे वर्चस्व? ९६.४४ टक्क्यांसह 'या' शाखेने मारली बाजी; पाहा पूर्ण निकाल आकडेवारीहस्ताक्षरात बदल..!राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीची परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च दरम्यान घेण्यात आली. कॉपीमुक्त परीक्षेसाठी शिक्षणसह, महसूल, पोलिस विभागाने विविध खबरदारी घेतली. परंतु, विभागात यानंतरही कॉपी झाल्याचे समोर आले. यासह उत्तरपत्रिका तपासणीत अनेक विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत हस्ताक्षरामध्ये बदल तर काहींची उत्तरपत्रिकेची पाने गहाळ असल्याकारणामुळे विभागात ४१ विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आला. परीक्षक, नियामकांनी निदर्शनास आणून दिलेली ही प्रकरणे असल्याचे मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
48 shares
😐
P
Pudhari
May 2, 2026, 08:46 AM
विद्यार्थी फेरपरीक्षेच्या निकालात रायगड जिल्ह्याला चांगले गुण

विद्यार्थी फेरपरीक्षेच्या निकालात रायगड जिल्ह्याला चांगले गुण

पुनर्परिक्षार्थी र्विद्यार्थ्यी निकाल ज्या विद्यार्थ्यांनी पुन्हा परीक्षा दिली होती, त्यामध्ये देखील रायगड जिल्ह्याची कामगिरी समाधानकारक आहे. यामध्ये विज्ञान शाखा निकाल ८२.४०% , कला शाखा ७२.४६% तर वाणिज्य शाखा निकाल ६९.०२% लागला आहे.
62 shares
😊
L
Lokmat
May 2, 2026, 07:17 AM
महाराष्ट्र बोर्डाचा एच. एस. सी. निकाल 2026 ऑनलाईन जाहीरः तुमचे गुण कसे तपासायचे

महाराष्ट्र बोर्डाचा एच. एस. सी. निकाल 2026 ऑनलाईन जाहीरः तुमचे गुण कसे तपासायचे

Maharashtra Board HSC Results 2026 on mahresult.nic.in:महाराष्ट्रराज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता 12 वीचा निकाल आज, शनिवारी (दि. २ मे, २०२६) दुपारी १ वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला. विज्ञान, कला, वाणिज्य आणि व्यावसायिक अशा सर्व शाखांचे निकाल एकाच वेळी पोर्टलवर उपलब्ध होतील. निकाल कुठे पाहायचा आणि कसा पाहायचा, याबद्दलची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे आहे: विद्यार्थी खालीलपैकी कोणत्याही अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपला निकाल पाहू शकतात: mahahsscboard.in results.digilocker.gov.in hscresult.mkcl.org results.navneet.com बारावीचा निकाल ऑनलाईन पाहण्यासाठी खालील सोप्या पद्धतीचा अवलंब करा: १)वेबसाईटला भेट द्या:वर दिलेल्या अधिकृत संकेतस्थळांपैकी कोणत्याही एका लिंकवर क्लिक करा. २)HSC Result 2026 निवडा:होमपेजवर 'HSC Examination Result March 2026' या लिंकवर क्लिक करा. ३)तपशील भरा:तुमचा 'Seat Number' (आसन क्रमांक) आणि 'Mother's First Name' (आईच्या नावातील पहिली तीन अक्षरे) प्रविष्ट करा. ४)निकाल पहा:सर्व माहिती भरल्यानंतर 'View Result' या बटणावर क्लिक करा. ५)डाऊनलोड करा:तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल. भविष्यातील संदर्भासाठी निकालाची प्रिंट आउट (Print Out) किंवा डिजिटल प्रत सेव्ह करून ठेवा. Digilocker:विद्यार्थी आपली डिजिटल गुणपत्रिकाDigilocker Appमध्ये देखील संग्रहित करून ठेवू शकतात. गुणपडताळणी (Verification):निकालात काही शंका असल्यास३ मे ते १७ मे २०२६या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने गुणपडताळणी किंवा पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करता येईल. पुनर्मूल्यांकन:उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळवणे अनिवार्य आहे. श्रेणीसुधार:उत्तीर्ण विद्यार्थ्यांना गुण सुधारण्यासाठी 'Class Improvement Scheme' अंतर्गत आगामी तीन परीक्षांच्या संधी उपलब्ध असतील.
49 shares
😐
Maharashtra Times logo
Maharashtra Times
May 2, 2026, 07:16 AM
उत्कृष्ट विद्यार्थ्यांनी शैक्षणिक यश साजरे केलेः कठोर परिश्रम आणि समर्पणाची मान्यता

उत्कृष्ट विद्यार्थ्यांनी शैक्षणिक यश साजरे केलेः कठोर परिश्रम आणि समर्पणाची मान्यता

या यशाचा आनंद फक्त निकालापुरता मर्यादित नसून, तो प्रत्येक विद्यार्थ्याच्या कठोर परिश्रमांची, रात्री जागून केलेल्या अभ्यासाची आणि सततच्या प्रयत्नांची ओळख आहे. बारावीचा टप्पा हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असून, त्यानंतर पुढील शिक्षण आणि करिअरच्या अनेक नव्या वाटा उघडतात.आज अनेक विद्यार्थ्यांनी आपली स्वप्नं पूर्ण करण्याच्या दिशेने पहिलं मोठं पाऊल टाकलं आहे. काहींनी उत्तम गुण मिळवून उज्ज्वल यश संपादन केलं आहे, तर काहींनी आत्मविश्वासाने पुढील प्रयत्नांसाठी स्वतःला तयार केलं आहे.प्रत्येक विद्यार्थ्याचा प्रवास हा वेगळा आणि प्रेरणादायी आहे.शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचा आधार आणि विद्यार्थ्यांची मेहनत यांचा सुंदर संगम म्हणजेच हे यश होय. त्यामुळे हा क्षण केवळ विद्यार्थ्यांचा नाही तर संपूर्ण कुटुंबाचा आणि शाळेचा अभिमानाचा क्षण आहे.या निमित्ताने सर्वउत्तीर्ण विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा! तुमचे भविष्यातील शिक्षण, करिअर आणि आयुष्य यशाने, आनंदाने आणि प्रगतीने भरलेले असो हीच सदिच्छा. जे विद्यार्थी अपेक्षित यश मिळवू शकले नाहीत त्यांनी निराश न होता पुढील संधींसाठी अधिक जोमाने आणि आत्मविश्वासाने प्रयत्न करावेत, कारण अपयश हे यशाच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. (फोटो सौजन्य :- iStock)बारावी निकाल शुभेच्छा संदेश मराठीतहार्दिक अभिनंदन! बोर्ड परीक्षेत मिळवलेल्या यशासाठी मनःपूर्वक शुभेच्छा. पुढील वाटचाल उज्ज्वल असो!अभिनंदन संदेश बोर्ड परीक्षा मराठीतुझ्या मेहनतीचे फळ आज तुला मिळाले आहे. या यशाबद्दल खूप खूप अभिनंदन!बोर्ड परीक्षा उत्तीर्ण शुभेच्छा संदेशअभ्यास, कष्ट आणि जिद्दीचे सुंदर फळ म्हणजे तुझे हे यश. अभिनंदन आणि शुभेच्छा!मराठी शुभेच्छा कोट्स 12वी निकालबारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा. पुढील आयुष्य यशस्वी होवो!​शैक्षणिक यश अभिनंदन संदेश मराठीतुझ्या यशाचा आम्हाला खूप अभिमान आहे. असेच यश मिळवत राहा!शैक्षणिक यश शुभेच्छा कोट्सआजचे यश हे उद्याच्या मोठ्या स्वप्नांची सुरुवात आहे. हार्दिक अभिनंदन!बारावी उत्तीर्ण अभिनंदन संदेशतुझ्या कष्टांना यश मिळाले आहे. पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा!बारावी निकाल शुभेच्छा संदेश मराठीततू हे सिद्ध केलेस की मेहनत कधीच वाया जात नाही. अभिनंदन!
60 shares
😊
L
Lokmat
May 2, 2026, 07:06 AM
जळगावमध्ये अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन प्रक्रिया लवकरच सुरू

जळगावमध्ये अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन प्रक्रिया लवकरच सुरू

जळगाव :बारावीचा निकाल जाहीर झाला असून पुढील आठवड्यात दहावी चा निकाल लागण्याची शक्यता आहे. दहावीनंतर महत्वाची पायरी असलेल्या अकरावीच्या वर्गासाठी प्रवेश घेणे आवश्यक असते. ही अकरावी प्रवेशप्रक्रिया लवकरच सुरू होईल. यासाठी दहावी पास झालेल्या आणि अकरावीसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी विशेष तयारी करावी लागते. त्यामध्ये अकरावी प्रवेशासाठी कागदपत्रांची पूर्तता करणे अनिवार्य असते. त्यामुळे कागदपत्रांची यादी किंवा तयार आधीच करावी लागते, या प्रवेशासाठी काय काय नियोजन करावे हे पाहुयात... राज्य मंडळाशी संलग्न सर्व उच्च माध्यमिक विद्यालये व कनिष्ठ महाविद्यालयात ऑनलाइन पद्धतीनेच प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येणार आहे. अन्य कोणत्याही मार्गाने प्रवेश दिले जाणार नाहीत, असे स्पष्ट सांगण्यात आले. अशी राहणार प्रवेशप्रक्रियाऑनलाइन पोर्टलवर नोंदणी, वैयक्तिक माहिती गुण भरा, पसंतीच्या कनिष्ठ महाविद्यालयांची निवड करावी लागणार आहे. प्रवेशासाठी कॅप आणि विविध कोटा (आरक्षण) अशा दोनच पद्धती आहेत. यात मागासवर्गीय, अल्पसंख्याक, व्यवस्थापन कोटा असेल ही संपूर्ण प्रक्रिया संगणकीकृत आहे. ही कागदपत्रे तयार ठेवादहावीची गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (लागू असल्यास) उत्पन्नाचा दाखला, प्रमाणपत्र, आधार कार्ड, पासपोर्ट फोटो, विशेष आरक्षणासाठी आवश्यक कागदपत्रे. गुणवत्तेनुसार प्रवेशअकरावी प्रवेश ऑनलाइन पद्धतीने होणार असून, गुणवत्तेनुसार व निर्धारित निकषाच्या आधारावर राबविली जाणार आहे. शेवटच्या विद्यार्थ्याला प्रवेश मिळेपर्यंत प्रक्रिया राबविली जाणार आहे. विहिरीत सापडली चौदाव्या शतकातील गधेगळ, गधेगळ म्हणजे काय, त्याच इतिहासात काय महत्व?
99 shares
😐
L
Lokmat
May 2, 2026, 06:29 AM
बाराव्या इयत्तेच्या परीक्षेत 1% पेक्षा कमी उत्तीर्णतेसह कोकण विभाग महाराष्ट्रात अव्वल

बाराव्या इयत्तेच्या परीक्षेत 1% पेक्षा कमी उत्तीर्णतेसह कोकण विभाग महाराष्ट्रात अव्वल

पुणे - राज्यात १२ वी निकाल जाहीर झाला असून यात ९४.१४ टक्क्यांसह कोकण विभाग अव्वल ठरला आहे. यंदाच्या निकालात पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारल्याचे चित्र आहे. बारावीचा एकूण निकाल ८९.७९ टक्के लागला असून त्यात ९३.१५ टक्के मुली तर ८६.८० टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. बारावीच्या निकालात लातूर विभाग सर्वात मागे राहिला आहे. लातूरमध्ये ८४.१४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदाच्या निकालात एकूण १५३ विषयांपैकी २६ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. मागील ३-४ वर्षातील आकडेवारी पाहिली तर २०२३ मध्ये विज्ञान शाखेत ९०.९६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले, २०२४ साली ९७.८२ टक्के, २०२५ साली ९७.३५ टक्के तर यंदा २०२६ मध्ये ९६.४४ टक्के विज्ञान शाखेचे विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. त्याचसोबतच ९८.०२ टक्के कला शाखेचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ८७.०३ टक्के वाणिज्य शाखेचे विद्यार्थी यंदाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. व्यवसाय अभ्यासक्रमासाठी ८२.७४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. आयटीआयसाठी ८१.७८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. मागील वेळच्या तुलनेत यंदा २.०९ टक्के निकालात घसरण झाली आहे. विद्यार्थी निकाल पाहण्यासाठी mahresult.nic.in , hscresult.mkcl.org , mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळवर भेट देऊ शकतात. निकालाची लिंक दुपारी १:०० वाजल्यापासून सक्रिय होईल. निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाइट्सचाच वापर करावा, असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे. १. वरीलपैकी कोणत्याही एका अधिकृत वेबसाइटवर जा.२. होमपेजवरील 'HSC Examination Result 2026' या लिंकवर क्लिक करा.३. तुमचा रोल नंबर/आसन क्रमांक टाका.४. आईचे नाव (पहिले नाव) टाइप करा.५. 'View Result' बटणावर क्लिक करा.६. तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
93 shares
😐
Maharashtra Times logo
Maharashtra Times
May 2, 2026, 06:19 AM
महाराष्ट्र एच. एस. सी. निकाल 2026 जाहीरः 1% पेक्षा कमी गुणांसह मुलींनी मुलांपेक्षा चांगली कामगिरी केली

महाराष्ट्र एच. एस. सी. निकाल 2026 जाहीरः 1% पेक्षा कमी गुणांसह मुलींनी मुलांपेक्षा चांगली कामगिरी केली

Maharashtra HSC Result 2026 Declared :महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच बारावी परीक्षेचा निकाल आज, २ मे २०२६ रोजी जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा एकूण निकाल ८९.७९ टक्के लागला असून, यंदाही मुलींनी मुलांच्या तुलनेत निकालात मोठी आघाडी घेतली आहे.निकालाची सांख्यिकीय माहितीया परीक्षेसाठी राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य, व्यवसाय अभ्यासक्रम आणि आय.टी.आय. शाखांसाठी एकूण १४,४४,७१३ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४,३३,०५८ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेस प्रविष्ट झाले होते आणि १२,८६,८४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मागील वर्षीच्या (फेब्रुवारी-मार्च २०२५) ९१.८८ टक्के निकालाच्या तुलनेत यंदाचा निकाल २.०९ टक्क्यांनी कमी लागला आहे.मुलींचे यश आणि शाखानिहाय निकालनिकालाच्या टक्केवारीत मुलींनी ९३.१५ टक्के मिळवून बाजी मारली आहे, तर मुलांचा निकाल ८६.८० टक्के लागला आहे.म्हणजेच मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा ६.३५ टक्क्यांनी जास्त आहे. शाखानिहाय निकालात विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक ९६.४४ टक्के लागला असून वाणिज्य शाखेचा निकाल ८७.०३ टक्के, व्यवसाय अभ्यासक्रम ८२.७४ टक्के, आय.टी.आय. ८१.७८ टक्के आणि कला शाखेचा निकाल ७८.०२ टक्के इतका आहे.बारावीचा निकाल जाहीर, कोकणची बाजी, लातूर तळाला, राज्याचा निकाल ८९.७९ टक्केविभागीय निकालात कोकण अव्वलराज्यातील नऊ विभागीय मंडळांपैकी कोकण विभागाचा निकाल ९४.१४ टक्के लागून हा विभाग राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. पुणे विभाग ९१.२५ टक्क्यांसह दुसऱ्या, तर अमरावती विभाग ९०.९२ टक्क्यांसह तिसऱ्या स्थानावर आहे.लातूर विभागाचा निकाल ८४.१४ टक्के असून तो सर्वात कमी आहे.याशिवाय एकूण १५३ विषयांपैकी २६ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे.दिव्यांग आणि इतर विद्यार्थ्यांची कामगिरीया परीक्षेस ८,३६७ दिव्यांग विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, त्यापैकी ७,५७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांची टक्केवारी ९०.५८ आहे. खाजगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल ८०.२१ टक्के लागला आहे. तसेच ५०,३४६ पुनर्परिक्षार्थींपैकी १८,३४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांची टक्केवारी ३६.४४ आहे.गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकन सुविधानिकालानंतर गुणपडताळणीसाठी विद्यार्थ्यांना रविवार, ३ मे ते १७ मे २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.यासाठी प्रति विषय ५० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे.उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी याच कालावधीत अर्ज करता येईल आणि त्यासाठी प्रति विषय ४०० रुपये शुल्क असेल. पुनर्मूल्यांकनासाठी प्रथम छायाप्रत घेणे अनिवार्य असून त्यानंतर प्रति विषय ३०० रुपये शुल्कासह ऑनलाईन अर्ज करता येईल. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना श्रेणी सुधारण्यासाठी पुढील तीन परीक्षांची संधी देण्यात आली आहे.
79 shares
😐
M
Maharashtra Times
May 2, 2026, 05:38 AM
महाराष्ट्र सरकारने फेब्रुवारी-मार्च 2026 च्या परीक्षेसाठी 12 वीच्या निकालाची तारीख जाहीर केली

महाराष्ट्र सरकारने फेब्रुवारी-मार्च 2026 च्या परीक्षेसाठी 12 वीच्या निकालाची तारीख जाहीर केली

Official websites to check 12th Result 2026:राज्यभरातील बारावीचे विद्यार्थी गेल्या कित्येक दिवसांपासून निकालाच्या तारखेची वाट पाहत होते. आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावी निकालाच्या तारखेची घोषणा केली आहे. बारावी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या परीक्षेचा निकाल शनिवारी, २ मे २०२६ रोजी जाहीर होणार आहे. गेल्या वर्षी बारावीचा निकाल ५ मे रोजी जाहीर झाला होता. त्यामुळे यंदा बारावीचा निकाल तीन दिवस अगोदर जाहीर होत आहे.बारावीचा निकालपाहण्यासाठी अधिकृत वेबसाईटची यादी या बातमीत देण्यात आली आहे. परीक्षार्थी या वेबसाईटवर जाऊन त्यांचा निकाल पाहू शकतात.HSC Result 2026 date and time: दुपारी एक वाजता निकाल लागणारमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल शनिवार दिनांक ०२ मे २०२६ रोजी दुपारी ०१ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. यासंदर्भात शनिवारी, ०२ मे २०२६ रोजी ११.०० वाजता राज्य मंडळ कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे.Official websites to check 12th Result 2026: बारावीचा निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट्समहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर शनिवार दिनांक ०२ मे, २०२६ रोजी दुपारी ०१.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. अधिकृत संकेतस्थळे पुढीलप्रमाणे-१. https://results.digilocker.gov.in२. https://mahahsscboard.in३. https://hscresult.mkcl.org४. https://results.targetpublications.org५. https://results.navneet.comया निकालाबाबत विद्यार्थ्यांना काही शंका असल्यास विद्यार्थी ३ मे ते १७ मे या कालावधीत गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकांचा छायाप्रतींसाठी ॲानलाईन अर्ज करू शकतात. त्यासाठी विद्यार्थ्यांनाhttps://mahasscboard.inया संकेतस्थळावर जाऊन अर्ज करायचा आहे, असे माध्यमिक व उच्च माध्यमिक संचालनालयाने स्पष्ट केले आहे.परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवर उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. त्याचप्रमाणे Digilocker App मध्ये Digital गुणपत्रिका संग्रहित करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच https://mahahsscboard.in (in college login) या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालयाचा एकत्रित निकाल उपलब्ध होईल.
5 shares
😐