Achira News Logo
Achira News
P
Pudhari
May 5, 2026, 11:27 AM
विक्रम भट्टच्या नवीनतम भयपट टीझरमध्ये मिमोह आणि चेतना स्टार

विक्रम भट्टच्या नवीनतम भयपट टीझरमध्ये मिमोह आणि चेतना स्टार

विक्रम भट्ट यांना हॉरर चित्रपटांसाठी खास ओळखले जाते. त्यांनी याआधीही अनेक यशस्वी हॉरर चित्रपट दिले आहेत. टीजरची सुरुवात कारमध्ये बसलेल्या मिमोहपासून होते. काही तरी मिळवण्यासाठी तो एका महलकडे जातो. तो महलमध्ये पोहोचताच अजीब घटना सुरू होते. तेव्हा चेतना यांची एंट्री होते. चेतना मुख्य अभिनेत्री आहे.
93 shares
😊
Pudhari logo
Pudhari
May 5, 2026, 09:03 AM
संघर्षाची पार्श्वभूमी असूनही'राजा शिवाजी'मध्ये अभिनेत्रीची महत्त्वाची भूमिका

संघर्षाची पार्श्वभूमी असूनही'राजा शिवाजी'मध्ये अभिनेत्रीची महत्त्वाची भूमिका

संघर्षाची अशी पार्श्वभूमी असताना ‘राजा शिवाजी’सारख्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये तिला संधी मिळणं हे तिच्यासाठी मोठं यश मानलं जात आहे. ‘बडी बेगम’ ही भूमिका कथानकात अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे या भूमिकेसाठी योग्य अभिनेत्रीची निवड करणं निर्मात्यांसाठी मोठं आव्हान होतं.
29 shares
😊
Maharashtra Times logo
Maharashtra Times
May 5, 2026, 07:43 AM
भारतीय कॉमेडियन सुनील पाल आणि समय रैना सार्वजनिक भांडणात गुंतले

भारतीय कॉमेडियन सुनील पाल आणि समय रैना सार्वजनिक भांडणात गुंतले

मुंबई: लोकप्रिय कॉमेडियन सुनील पाल आणि आजच्या पिढीचा लोकप्रिय स्टॅन्डअप कॉमेडियन समय रैना या दोघांमध्ये गेल्या काही काळापासून सुरू असलेला शाब्दिक वाद सर्वश्रुत आहे. हे दोघे'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या नवीन एपिसोडमध्ये आमनेसामने आले मात्र, कपिल शर्मा शोच्या मंचावर ज्या प्रकारे समय रैनानं सुनील पाल यांची फिरकी घेतली, ते पाहून सोशल मीडियावर "सुनील पाल यांचा अपमान झाला" अशी चर्चा रंगली होती. आता या संपूर्ण प्रकरणावर खुद्द सुनील पाल यांनी भाष्य केलं आहे.नेमकं प्रकरण काय?'वर्ल्ड लाफ्टर डे'निमित्त आयोजित विशेष भागात समय रैना आणि रणवीर अल्लाहबादिया पाहुणे म्हणून आले होते. याच भागात सुनील पाल यांनी अचानक एन्ट्री घेतली. शो दरम्यान, समय रैनानं सुनील पाल यांच्यावर एकामागून एक उपरोधिक टोले लगावले, त्यांची खिल्लीही उडवली."सुनील भाई, तुमचं सर्व काही ठीक आहे, पण तुम्ही दात का घास नाही?" किंवा "ते नेहमी चप्पल का घालतात? कारण बूट तर त्यांच्यावर लोक फेकतच असतात," अशा तिखट कमेंट्स समयनं शोमध्ये केल्या होत्या.हे पाहून अनेक प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती की, एका ज्येष्ठ कलाकाराला शोमध्ये बोलवायचं आणि मग त्यांचा अशा प्रकारे 'अपमान' करणं चुकीचं आहे.सुनील पाल यांचं उत्तरया 'अपमानस्पद' एपिसोडबद्दल बोलतानाMardini First look:श्रेयस तळपदे , प्रार्थना बेहेरे, मायरा पुन्हा एकत्र; सिनेमाचा फर्स्ट लुक व्हायरलम्हणाले की, मी याला अपमान मानत नाही. तो एक कॉमेडी शो आहे आणि अशा शोजमध्ये एकमेकांची टांग खेचणं ही सामान्य बाब आहे. जर हा एखादा गंभीर विषय असता, तर मी नक्कीच तक्रार केली असती. पण तिथं आम्ही एकमेकांवर जोक्स मारत होतो. मी सुद्धा त्याच्यावर पंचलाईन्स मारल्या. तसंच मला आधीच माहित होतं की समय तिथं असणार आहे. मला माझे विचार मांडण्यासाठी बोलावलं होतं आणि मी ते मांडले.माझं कोणाशीही वैयक्तिक भांडण नाही. माझा विरोध फक्त शिवराळ भाषेला आहे, जी आजची 'जेन-जी' पिढी कॉमेडीच्या नावाखाली वापरते. तसंच कॉमेडी मंचावर शाहरुख खानसारख्या मोठ्या स्टार्सचीही थट्टा उडवली जाते, मग मी तर एक छोटा कलाकार आहे," असंही त्यांनी नमूद केलं.दरम्यान, द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शोमध्ये समयनं सुनील पाल यांच्या जुन्या विधानाचा समाचार घेतला, ज्यात पाल यांनी समयला 'कॉमेडीचा दहशतवादी' म्हटलं होतं. समय म्हणाला की, "जेव्हा आपल्याच क्षेत्रातील लोक संकटाच्या काळात पाठिंबा देण्याऐवजी टीका करतात, तेव्हा वाईट वाटतं.
80 shares
😐
Lokmat logo
Lokmat
May 5, 2026, 06:50 AM
शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांनी केप टाऊनमध्ये'किंग'चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे.

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांनी केप टाऊनमध्ये'किंग'चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे.

शाहरुख खानआणिदीपिका पादुकोण'किंग' सिनेमामुळे सध्या चर्चेत आहेत. प्रेग्नंट असतानाही दीपिका सिनेमाचं शूटिंग करत आहे. या सिनेमातील एका गाण्याच्या शूटिंगचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये शाहरुख आणि दीपिका रोमान्स करताना दिसत आहेत. 'किंग' सिनेमाच्या शूटिंगचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 'किंग' सिनेमाच्या शूटिंगसाठी शाहरुख आणि दीपिका सध्या केपटाऊनमध्ये आहेत. तेथीलच एका बीचवर सिनेमातील रोमँटिक गाण्याचं शूटिंग झालं. ज्यामध्ये पुन्हा एकदा शाहरुख आणि दीपिका रोमान्स करताना दिसणार आहेत. या व्हिडीओत समुद्रकिनारी ते दोघे पोझ देताना दिसत आहेत. दोन-तीन वेळा ते गाण्याची सेमच स्टेप करत असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. 'किंग' सिनेमातील गाण्याच्या या शूटिंगचा व्हिडीओ पाहून चाहत्यांना 'बेशरम रंग'ची आठवण झाली आहे. याआधी पठाण सिनेमातील 'बेशरम रंग' गाण्यात दीपिका-शाहरुखची केमिस्ट्री पाहायला मिळाला होता. ज्याची खूप चर्चाही झाली होती. #Kingchartbuster song loading ⏳pic.twitter.com/VpiatxdbBG 'किंग' सिनेमाच्या सेटवरील शाहरुखचे सीन शूट करतानाचे काही फोटोही व्हायरल झाले आहेत. शाहरुख-दीपिकाचा 'किंग' हा सिनेमा २०२६च्या शेवटी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २४ डिसेंबर रोजी हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित केला जाणार आहे. सिद्धार्थ आनंद यांनी सिनेमाची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं आहे.
63 shares
😐
Lokmat logo
Lokmat
May 5, 2026, 04:17 AM
सलमान खान आणि करीना कपूर'खन्नेया'मध्ये पाचव्यांदा एकत्र काम करत आहेत.

सलमान खान आणि करीना कपूर'खन्नेया'मध्ये पाचव्यांदा एकत्र काम करत आहेत.

बॉलिवूडचा'भाईजान'सलमान खानआणि 'बेबो' करीना कपूर ही जोडी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र येण्याची शक्यता आहे. 'बॉडीगार्ड' आणि 'बजरंगी भाईजान' सारख्या सुपरहिट चित्रपटांनंतर, तब्बल ११ वर्षांनी हे दोन सुपरस्टार्स एकत्र झळकणार असल्याची चर्चा आहे.सलमान खाननेया चित्रपटासाठी स्वतः करीनाशी संपर्क साधला असून तिनेही या भूमिकेत रस दाखवला आहे. सलमानसाठीही हा महत्वाचा प्रोजेक्ट आहे कारण 'द फॅमिली मॅन' फेम दिग्दर्शक जोडी राज आणि डीके या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. सलमान-करीनाची पाचवी इनिंगसलमान खानच्या या आगामी सिनेमासाठी याआधी साऊथ सुपरस्टार समंथा रुथ प्रभूच्या नावाची चर्चा होती. मात्र आता करीना कपूरचे नाव आघाडीवर आहे. जर सिनेमात करीनाची एन्ट्री झाली तर सलमान आणि करीना पाचव्यांदा स्क्रीन शेअर करतील. यापूर्वी त्यांनी 'क्यों की...', 'मैं और मिसेस खन्ना', 'बॉडीगार्ड' आणि २०१५ मध्ये 'बजरंगी भाईजान' या चित्रपटांमध्ये काम केले आहे. २०१५ नंतर ही जोडी परत दिसली नव्हती. ११ वर्षांनी त्यांना पुन्हा एकत्र पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. सलमान खान साकारणार 'सुपरहीरो'या चित्रपटाचे कथानक अतिशय रंजक असून सलमान खान यात एका वयस्कर सुपरहीरोची भूमिका साकारताना दिसणार आहे. अनपेक्षित परिस्थितीमुळे त्याला पुन्हा एकदा ॲक्शनमध्ये परतावे लागते आणि तो एका मोठ्या संघर्षात अडकतो, अशी या चित्रपटाची ढोबळ कथा असेल. अतुल अग्निहोत्री आणि मैत्री मुव्ही मेकर्स या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. या नव्या प्रयोगात सलमानला सुपरहीरोच्या अवतारात पाहणे प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरणार आहे. राज आणि डीके यांचे पुनरागमन'द फॅमिली मॅन', 'फर्जी' आणि 'गन्स अँड गुलाब्स' सारख्या सुपरहिट ओटीटी सीरिज देणारी राज आणि डीके ही जोडी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. २०१७ मधील 'ए जेंटलमैन' नंतर या दिग्दर्शक जोडीचा हा मोठा सिनेमॅटिक कमबॅक असेल. ओटीटीवर यश मिळवल्यानंतर राज आणि डीके आता सलमान खानसोबत मोठ्या पडद्यावर काय जादू करतात, याकडे संपूर्ण चित्रपटसृष्टीचे लक्ष लागले आहे.
50 shares
😐
Pudhari logo
Pudhari
May 5, 2026, 04:02 AM
सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांच्या यादीत राजा शिवाजीचा समावेश

सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांच्या यादीत राजा शिवाजीचा समावेश

दरम्यान, ‘राजा शिवाजी’ने अवघ्या चार दिवसांत मराठीचित्रपटांच्यासर्वाधिक कमाईच्या यादीत आपले स्थान निर्माण केले आहे. आता येत्या काही दिवसांत हा चित्रपट किती कमाई करतो आणि बॉक्स ऑफिसवर आपली पकड कायम ठेवतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
52 shares
😊
Maharashtra Times logo
Maharashtra Times
May 5, 2026, 03:15 AM
विक्रमी सलामीसह राजा शिवाजींनी नवा विक्रम प्रस्थापित केला

विक्रमी सलामीसह राजा शिवाजींनी नवा विक्रम प्रस्थापित केला

रितेश देशमुखचा चित्रपट 'राजा शिवाजी' थिएटरमध्ये प्रदर्शित झाला असून, बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. महाराष्ट्रदिनी 1 मे रोजी हा सिनेमा रिलीज करण्यात आला. तेव्हापासून या सिनेमाने विक्रमी कमाई करायला सुरुवात केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर हा सिनेमा आधारित असल्यामुळे मराठा मावळ्यांची पावलं आपसूकच थिएटरकडे वळताना पाहायला मिळतायत.मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात सर्वाधिक मोठी 'ओपनिंग' मिळवून,'राजा शिवाजी'ने एक नवा मापदंड तयार केला आहे. आमिर खानचा मुलगा जुनेद खान आणि साई पल्लवी यांचा 'एक दिन' हा चित्रपट 'राजा शिवाजी' सोबतच रिलीज झाला होता; मात्र बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची कामगिरी अत्यंत निराशाजनक होत असल्याचे दिसून येत आहे. चौथ्या दिवसापर्यंत, या रोमँटिक ड्रामाची कमाई घटून केवळ काही लाखांवर आली होती. दुसरीकडे, जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनी प्रस्तुत 'राजा शिवाजी'च्या कमाईतही थोडीफार घट नोंदवली गेली असली, तरी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपला जम मात्र अजूनही खंबीरपणे टिकवून आहे. कामाचा दिवस असल्यामुळे ही घट झाली असल्याचे निदर्शनास आले आहे.'Sacnilk' या वेबसाइटवरील माहितीनुसार, जिओ स्टुडिओ प्रस्तुत 'राजा शिवाजी' या चित्रपटाने रिलीजच्या चौथ्या दिवशी म्हणजेच पहिल्या सोमवारी 5.6 कोटींची कमाई केली. सोमवार हा कामाचा दिवस असल्याने, कमाईत घट होण्याची शक्यता आधीच वर्तवण्यात आली होती. या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 11.35 कोटींची कमाई करत अत्यंत दमदार सुरुवात केली होती.वडिलांवर नाराज होत रागाच्या भरात घर सोडून गेलेले Thalapathy Vijay, चिठ्ठीवरुन काढलेलं शोधून, काय झालेलं नेमकं?विशेष म्हणजे, या चित्रपटाने शनिवार-रविवारच्या सुट्टीच्या काळात आपली पकड मजबूत राखली. शनिवारी 10.55 कोटी आणि रविवारी 12 कोटी अशी प्रभावी कमाई या चित्रपटाने केली. एकंदरीत, प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाविषयीची चर्चा आणि उत्साह अजूनही प्रचंड प्रमाणात कायम आहे. भारतीय बॉक्स ऑफिसवर 'राजा शिवाजी'ने आतापर्यंत अत्यंत उत्तम कामगिरी नोंदवली आहे.गेल्या चार दिवसांत, या चित्रपटाचे एकूण 'ग्रॉस कलेक्शन' 46.95 कोटींवर पोहोचले आहे, तर त्याचे 'नेट कलेक्शन' 39.50 कोटी इतके झाले आहे. विशेष म्हणजे, जुनैद खान आणि साई पल्लवी यांच्या एक दिन या चित्रपटाशी एकाच वेळी स्पर्धा होत असूनही, 'राजा शिवाजी'च्या कमाईचा वेग किंचितही मंदावला नाहीये.पहिल्या सोमवारी, साई पल्लवी आणि जुनैद खान यांच्या एक दिन या चित्रपटाची परिस्थिती मात्र आणखीच बिकट झाली. आमिर खानच्या प्रोडक्शन हाऊस अंतर्गत बनलेल्या या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. शिवाय, सिने समीक्षकांकडूनही या चित्रपटाला अत्यंत नकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या आहेत.Tharala Tar Mag : प्रॉपर्टी लंपास करण्याचा डाव फसला, नेमकी कृष्णाच्याच तावडीत सापडली प्रिया, बैल बनवून घेतलं शेत नांगरुन'Sacnilk'च्या अहवालानुसार, जुनैद खान आणि साई पल्लवी यांच्या एक दिन या चित्रपटाला रिलीजच्या चौथ्या दिवशी केवळ 20 लाखांचीच कमाई करता आली. या चित्रपटाने 1.15 कोटींच्या कमाईसह सुरुवात केली होती. दुसऱ्या दिवशी, चित्रपटाची कमाई 1 कोटी इतकी होती, आणि तिसऱ्या दिवशी चित्रपटाने 90 लाख कमावले.आश्चर्याची गोष्ट म्हणजे, अवघ्या चार दिवसांतच, 'एक दिन' हा चित्रपट भारतीय बॉक्स ऑफिसवर 5 कोटींचा टप्पा गाठण्यातही अपयशी ठरला आहे. जुनैद खान आणि साई पल्लवी यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 3.25 कोटींची कमाई केली आहे; यावरून स्पष्ट होते की, हा चित्रपट प्रेक्षकांना प्रभावित करण्यात अपयशी ठरला आहे.रितेश देशमुखच्यासोबतच, 'राजा शिवाजी' या चित्रपटात जिनिलिया देशमुख, अभिषेक बच्चन, संजय दत्त, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी आणि अमोल गुप्ते यांसारख्या दिग्गज कलाकारांचा समावेश आहे. या सिनेमातील सलमान खानची पाहुण्या कलाकाराची भूमिका भरपूर लक्षवेधी ठरतेय. त्याने या सिनेमात शिवरायांचा अंगरक्षक जिवा महाला यांची भूमिका साकारली आहे.
51 shares
😐
P
Pudhari
May 4, 2026, 11:58 PM
बदलत्या मनोरंजनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटनस्थळाचे दृश्य कमी होत आहे

बदलत्या मनोरंजनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटनस्थळाचे दृश्य कमी होत आहे

शहरातील नवीन मनोरंजन साधनांचा उदय, डिजिटल माध्यमांकडे झालेला कल, उष्ण हवामान आणि प्रचंड गर्दी ही या घसरणीमागील काही कारणे सांगितली जात आहेत. पर्यटकांच्या म्हणण्यानुसार, जर नवीन सुविधा, आधुनिक आकर्षणे आणि अधिक उपक्रम सुरू केल तर गर्दी वाढू शकते.
35 shares
😐
Maharashtra Times logo
Maharashtra Times
May 4, 2026, 03:02 PM
'राजा शिवाजी'ला प्रेक्षकांकडून भरघोस प्रतिसादः रितेश देशमुखचा ऐतिहासिक चित्रपट चमकतो

'राजा शिवाजी'ला प्रेक्षकांकडून भरघोस प्रतिसादः रितेश देशमुखचा ऐतिहासिक चित्रपट चमकतो

मुंबई -रितेश देशमुखच्या ' राजा शिवाजी ' या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळतोय. बॉलिवूडकारांसोबतच मराठी कलाकारांनीही या सिनेमाचं भरघोस कौतुक केलंय. अशातच आता मराठी अभिनेता शशांक केतकरनंही सिनेमाचं कौतुक केलंय. त्याचबरोबर हा सिनेमा पाहण्यासाठी अभिनेत्याच्या लेक खास लूकमध्ये सिनेमा बघण्यासाठी गेला होता. त्यासंदर्भात शशांक केतकरनं सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केलाय.राजा शिवाजी चित्रपटाचा पहिला शो लातूरकरांसोबत; रितेश-जेनेलिया यांची धमाकेदार एन्ट्रीशशांक केतकर पोस्टशशांक केतकर शेअर केलेल्याव्हिडिओमध्येम्हणतोय की, 'जय शिवराय! आम्ही आता ‘राजा शिवाजी’ हा सिनेमा पाहायला जात आहोत. अर्थात, ठाण्यात आम्ही या चित्रपटाचा मराठी शो बघायला जातोय. माझा मुलगा ऋग्वेद, महाराजांच्या शौर्यगाथा ऐकून इतका प्रेरित झाला आहे की, सकाळी उठल्यावर ते अगदी रात्री झोपेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी त्याला ऐकायच्या असतात. त्याला महाराजांच्या गड-किल्ल्यांबद्दल जाणून घ्यायचं असतं. त्याच्याकडे खेळणी सुद्धा सगळी अशीच आहेत. दिवसभर खेळण्यातली तलवार, ढाल घेऊन तो खेळत असतो.'Arbaj Shaikh : 'सैराट' फेम अरबाज शेख अडकला लग्नबंधनात; पत्नीसोबत फोटो शेअर करत दिली आनंदाची बातमीअभिनेत्याच्या लेकाच्या लूकनं वेधलं लक्ष'आता त्याला जेव्हा समजलं की, आज आम्ही हासिनेमापाहायला जातोय, त्यावेळी त्याने मला एक विनंती केली. ही विनंती काय आहे तुम्हीच पाहा, हे बघा, आमचा बाळशिवाजी तयार आहे!' असं म्हणत शशांकनं ऋग्वेदचा लूक दाखवला आहे. अभिनेत्याच्या लेकानं सिनेमा बघायला जाण्यासाठी खास छत्रपती शिवाजी महाराजांचा लूक केलेला दिसतोय. या व्हिडिओमध्ये ऋग्वेद, 'जय भवानी, जय शिवाजी' असंही म्हणतोय. हा व्हिडिओ शेअर करत रितेशनं, 'आशा आहे की, रितेश सर तुमच्यापर्यंत हा व्हिडीओ पोहोचेल…आमचे बाल शिवाजी! छत्रपती शिवाजी महाराज की जय!' असं कॅप्शन लिहिलं आहे.View this post on InstagramA post shared by Shashank Ketkar (@shashankketkar)दरम्यान, 'राजा शिवाजी' या सिनेमाबद्दल सांगायचं तर या सिनेमात अभिषेक बच्चन, जिनिलिया देशमुख, संजय दत्त, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी आणि अमोल गुप्ते यांच्याही भूमिका आहेत. सलमान खानचीही या चित्रपटात एक विशेष छोटी भूमिका असून रितेश आणि जिनिलियाचा मुलगा, राहिलनं, या चित्रपटातून अभिनयात पदार्पण केलंय.
88 shares
😊
Lokmat logo
Lokmat
May 4, 2026, 01:44 PM
कनिका मानने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा केला

कनिका मानने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा केला

'गुड्डन तुमसे ना हो पायेगा' फेम लोकप्रिय अभिनेत्री कनिका मान (Kanika Mann) सध्या तिच्या एका विधानामुळे चर्चेत आली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कनिकाने तिच्या खासगी आयुष्यावर भाष्य केलं. ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. आपल्या करिअरसाठी कनिका चक्क घरातून पळून मुंबईला आली होती. कनिकाने 'हॉटरफ्लाई'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ती जेव्हा २२ वर्षांची होती, तेव्हापासून घरच्यांनी तिच्या लग्नासाठी तगादा लावला होता. कनिका म्हणाली, "माझ्या कुटुंबात मुलीचं लग्न २२ व्या वर्षी होणं योग्य मानलं जातं. १० वर्षांची असल्यापासून माझ्यावर लग्नासाठी दबाव होता. पण मला माझं करिअर घडवायचं होतं. घरचे तयार नसल्यामुळे अखेर मी एक चिठ्ठी लिहिली आणि घरातून पळून थेट मुंबई गाठली". कनिकाने खंत व्यक्त करत म्हणाली, "लहानपणापासून अभ्यासासोबतच घरातील कामं करण्यावर जास्त भर देण्यास सांगितले गेले. शाळेत जा, अभ्यास करा, पण जेवण बनवणं आणि साफसफाई करणं हे मुलींना आलंच पाहिजे, असं मला नेहमी शिकवलं गेलं". कनिकाच्या रिलेशनशिप स्टेटसवरही अनेकदा चर्चा होत असतात. मात्र, तिने सर्व अफवांना पूर्णविराम दिला आहे. ती सध्या कोणालाही डेट करत नसून कोणत्याही रिलेशनशिपमध्ये नसल्याचे तिने जाहीर केले आहे. कनिका 'खतरों के खिलाडी' आणि अनेक गाजलेल्या मालिकांनंतर आता 'नागिन ७' मध्ये दिसते आहे. विशेष म्हणजे या मालिकेत ती एका नकारात्मक भूमितेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.
86 shares
😐
Lokmat logo
Lokmat
May 4, 2026, 12:38 PM
आमिर खानच्या'3 इडियट्स'चा सिक्वेल विकी कौशलसोबत काम करत आहे

आमिर खानच्या'3 इडियट्स'चा सिक्वेल विकी कौशलसोबत काम करत आहे

बॉलिवूडच्या 'मिस्टर परफेक्शनिस्ट' म्हणजेचआमिर खानच्याअनेक गाजलेल्या चित्रपटांपैकी एक म्हणजे सगळ्यांचा आवडता 'थ्री इडियट्स'.आमिर खानचंनाव घेतलं की, त्याच्या या चित्रपटाचा उल्लेख हमखास केला जातो. 'थ्री इडियट्स'चे अनेक चाहते या चित्रपटाच्या सीक्वेलची वाट पाहत आहेत. काही महिन्यांपूर्वी या चित्रपटाच्या सीक्वेलबद्दलची माहिती देण्यात आली होती. अशातच आता याबद्दल आणखी एक वृत्त समोर आले आहे. या चित्रपटात आता अभिनेताविकी कौशलयाची एन्ट्री होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रिपोर्ट्सनुसार, विक्की कौशल या सिक्वेलमध्ये दिसू शकतो. त्याची निर्मात्यांशी चर्चा यशस्वी ठरली, तर तो आमिर खान, आर. माधवन आणि शर्मन जोशी यांच्या तिकडीमध्ये सामील होतील. हा चित्रपट पुन्हा एकदाराजकुमार हिरानीदिग्दर्शित करणार आहेत. ते आणि लेखक अभिजात जोशी सध्या स्क्रिप्टवर काम करत आहेत. टीमला 'थ्री इडियट्स'च्या यशाला साजेसा सिक्वेल बनवायचा असल्याने पटकथेवर विशेष मेहनत घेतली जात आहे. २०२७ मध्ये सुरू होणार शूटिंग या सिक्वेलचं शूटिंग २०२७ च्या दुसऱ्या सहामाहीत सुरू होण्याची शक्यता आहे.विकी कौशलयांनी याआधी संजू आणि डंकी या चित्रपटांत हिरानींसोबत काम केलं आहे. चित्रपटाची कथा ही जिथे पहिला भाग संपला होता, तेथून १० वर्ष पुढे असणार आहे. यामध्ये प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या पात्रांचं पुढचं आयुष्य आणि नवीन संघर्ष पाहायला मिळणार आहेत. दरम्यान, विक्की कौशल सध्या 'महावतार' या चित्रपटात व्यस्त आहे.
37 shares
😊
M
Maharashtra Times
May 4, 2026, 12:29 PM
'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या हंगामात सहभागी होणार प्राजक्ता शुक्रे

'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या हंगामात सहभागी होणार प्राजक्ता शुक्रे

मुंबई -प्राजक्ता शुक्रे बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वामुळे चर्चेत आली. बिग बॉसच्या घरात प्राजक्ताचा तितकासा गेम दिसला नाही म्हणून गायिका बिग बॉसच्या नवव्या आठवड्यात एलिमिनेट झाली. बिग बॉसच्या घरात असताना प्राजक्ता आणि करण सोनावणेची चांगली मैत्री झालेली. मात्र, एकदा या कथेत ट्विस्टही आलेला. राजेश बापटनं प्राजक्ताला थेट लग्नाची मागणी घातलेली. अशातच आता नुकत्याच एका मुलाखतीमध्ये प्राजक्ता शुक्रेनं यावर भाष्य केलं असून नेमकं काय घडलेलं? याबद्दल सांगितलं आहे.राकेश बापटनं प्राजक्ताला घातलेली लग्नाची मागणी?प्राजक्ता शुक्रेनंसिद्धार्थ कन्ननला मुलाखत दिली. यादरम्यान प्राजक्ताला बिग बॉस मराठीमध्ये राकेश बापटनं तुला प्रपोज केलेलं का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर प्राजक्ता शुक्रे म्हणाली की, 'हो केलेलं...पण ते मस्करीमध्ये. राकेश आला आणि मी जिथे बसलेले तिथे बसला. राकेश म्हणाला, 'मला लहानपणापासून गाणं गाणाऱ्या मुली खूप आवडतात. मी विचार केलेला की, माझी जोडीदार गायिका असली पाहिजे. म्हणजे, ती सकाळी उठून रियाज करेल आणि मी फक्त तिलाच बघत राहीन.' त्यानंतर तो मला म्हणाला, 'चल मी तुला लग्नाची मागणी घालतो. लग्न कर माझ्यासोबत' मी म्हटलं असं थोडी असतं. फक्त १० दिवसच झाले होते. त्यानंतर मग यावर आमचं काहीच बोलणं नाही झालं.'Ruchita Jamdar : विशालच्या माझ्या साठीच्या फिलिंग खऱ्या ! रुचिताला विश्वास'मीबिग बॉसमध्येजाण्यापूर्वी त्यांच्या टीमला सांगितलेलं की, हे रिलेशनशिप, लव्ह अँगल मला बिग बॉसच्या घरात करायचे नाहीत. मी त्या घरात बिग बॉसचा गेम खेळायला जातेय.' असंही प्राजक्ता म्हणाली.करण सोनावणेसोबतच्या नात्याबद्दल काय म्हणाली प्राजक्ता शुक्रे?याच मुलाखतीदरम्यान प्राजक्ता करण सोनावणेसोबतच्यानात्याबद्दलविचारलं असता त्यावर प्राजक्ता म्हणाली की, 'कोणीही कोणाच्याच प्रेमात नव्हतं. शोचं एडिटिंग आमच्या हातात नव्हतं. कोणाला कसं दाखवायचं हे त्यांच्या हातात असतं. त्यामुळे ते सर्वांना तसं वाटलं. मी आणि करण आम्ही चांगले मित्र होतो फक्त.'
76 shares
😐
Maharashtra Times logo
Maharashtra Times
May 4, 2026, 11:29 AM
आमिर खानचा मुलगा जुनैद खानच्या'एक दिन'चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर निराशाजनक प्रतिसाद

आमिर खानचा मुलगा जुनैद खानच्या'एक दिन'चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर निराशाजनक प्रतिसाद

मुंबई: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खानचा मुलगा जुनैद खान आणि दाक्षिणात्य सुपरस्टार साई पल्लवी यांचा बहुचर्चित चित्रपट 'एक दिन' नुकताच प्रदर्शित झाला. शुक्रवारी , १ मे रोजी हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. मोठ्या बॅनरचा चित्रपट आणि फ्रेश जोडी असूनही, या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळवताना मोठी कसरत करावी लागत आहे. तिसऱ्या दिवसाच्या आकडेवारीनुसार, चित्रपटाच्या कमाईत थोडी वाढ झाली असली तरी एकूण कामगिरी निराशाजनक मानली जात आहे. त्यामुळं आमिरच्या लेकाचा तिसरा सिनेमाही डिजास्टर ठरला आहे.तिसऱ्या दिवसाचं कलेक्शन किती?मिळालेल्या माहितीनुसार, 'एक दिन'नं प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी देशभरात अंदाजे १.७० कोटी रुपयांची कमाई केली आहे. पहिल्या दोन दिवसांच्या तुलनेत रविवारी सुट्टीचा फायदा चित्रपटाला मिळाला असून कमाईत किंचित अशी सुधारणा झाली आहे. मात्र, मोठ्या बजेटच्या आणि आमिर खान प्रॉडक्शनच्या चित्रपटासाठी हा आकडा अत्यंत कमी असल्याचं म्हटलं जातंय.'एक दिन' सिनेमाची तीन दिवसांत किती कमाई?दिवस १ (शुक्रवार): ₹१.१५ कोटीदिवस २ (शनिवार): ₹१.०० कोटीदिवस ३ (रविवार): ₹१.७० कोटी (अंदाजे)एकूण भारतीय नेट कलेक्शन: ₹३.८५ कोटीHuma Qureshi Wedding: वयाच्या ३९ व्या वर्षी हुमा कुरेशी करणार आयुष्याची नवीन सुरुवात,बॉयफ्रेंड रचित सिंग आहे तरी कोण?'राजा शिवाजी'शी मोठी टक्करमहाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' या चित्रपटाकडून मोठं आव्हान मिळताना आहे. 'राजा शिवाजी'नं तिसऱ्या दिवशी तब्बल १२ कोटींची कमाई करत बॉक्स ऑफिसवर आपली पकड मजबूत केली आहे, ज्याचा थेट परिणाम 'एक दिन'च्या स्क्रीन संख्या आणि प्रेक्षक संख्येवर झाला आहे.Ajinkya Raut Interview : मी गौतम बुद्धांच्या भूमिकेत, अभिनेता अजिंक्य राऊतला पडायचं स्वप्नApurva Nemlekar: 'ती परत आलीये', लग्नानंतर अपूर्वा नेमळेकर बॅक टू वर्क, हॉरर सीरिजच्या प्रोमोची जोरदार चर्चाकथानक आणि प्रतिसाद'एक दिन' हा २०१६ मधील प्रसिद्ध थाई चित्रपट 'वन डे'चा अधिकृत रिमेक आहे. एका दिवसासाठी आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत वेळ घालवण्याची संधी मिळणाऱ्या एका आयटी कर्मचाऱ्याची ही भावनिक कथा आहे. समीक्षकांनी सई पल्लवीच्या अभिनयाचे कौतुक केलं आहे, तर जुनैद खानच्या अभिनयाबद्दल संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
24 shares
😢
L
Lokmat
May 4, 2026, 09:24 AM
कृत्रिम बुद्धिमत्तेची शक्ती उघडणेः डिजिटल बोटांचे ठसे आपल्या ऑनलाइन ओळखीला कसे आकार देतात

कृत्रिम बुद्धिमत्तेची शक्ती उघडणेः डिजिटल बोटांचे ठसे आपल्या ऑनलाइन ओळखीला कसे आकार देतात

Lokmat AI ची अद्भूत दुनिया:आजच्या काळात शाळकरी मुलांचा अभ्यास आणि मनोरंजन मोठ्या प्रमाणावर इंटरनेटशी जोडलेले आहे. ऑनलाइन शिकवणी वर्ग, यूट्यूबवरील अभ्यासासंबंधी व्हिडिओ, शैक्षणिक अॅप्स किंवा माहिती शोधण्यासाठी गुगलचा वापर करणे या सर्व गोष्टी आपण सहज करतो; पण तुम्ही कधी विचार केला आहे का की इंटरनेटवर आपण जे काही करतो त्याची नोंद कुठेतरी होत असते? या नोंदींमधून तयार होणाऱ्या आपल्या ऑनलाइन ओळखीला डिजिटल फिंगरप्रिंट असे म्हणतात. जसे प्रत्येक व्यक्तीच्या बोटांचे ठसे वेगळे असतात. तसेच इंटरनेटवर प्रत्येक व्यक्तीची डिजिटल ओळखही वेगळी असते. आज या माहितीचे विश्लेषण करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) मोठ्या प्रमाणावर वापरली जाते आणि त्यामुळे इंटरनेट अधिक स्मार्ट आणि उपयक्त बनत आहे. १) इंटरनेटवर आपण काय करतो ते कसे लक्षात ठेवले जाते? समजा तुम्ही मोबाइलवर बसून एखादा विज्ञानाचा व्हिडिओ पाहिला किंवा एखाद्या शैक्षणिक वेबसाईटवर जाऊन माहिती वाचली. त्यावेळी त्या वेबसाईटला तुमच्या उपकरणाबद्दल थोडीफार सामान्य माहिती मिळते. उदाहरणार्थ, तुम्ही मोबाइल वापरत आहात की संगणक, स्क्रीनचा आकार किती आहे, कोणता इंटरनेट ब्राउझर वापरला जात आहे किंवा तुम्ही साधारण कोणत्या शहरातून इंटरनेट वापरत आहात. ही माहिती हळूहळू जमा होत जाते आणि त्यातून तुमची एक डिजिटल ओळख तयार होते. ही ओळख म्हणजेच डिजिटल फिंगरप्रिंट. २) एआय म्हणजे इंटरनेटचा हुशार मित्र इंटरनेटवर दररोज लाखो लोक माहिती वापरतात, त्यामुळे प्रचंड प्रमाणात डेटा तयार होतो. हा डेटा समजून घेण्यासाठी आर्टिफिशयल इंटेलिजन्स (एआय) वापरली जाते. एआय म्हणजे असा संगणकीय मेंदू जो मोठ्या प्रमाणातील माहिती पाहून त्यातील सवयी आणि पॅटर्न ओळखू शकतो. उदाहरणार्थ, जर एखादा विद्यार्थी सतत विज्ञान, रोबोटिक्स किंवा अवकाशाबद्दलचे व्हिडिओ पाहत असेल तर एआयला कळते की त्याला विज्ञान विषयात रस आहे. त्यामुळे पुढच्या वेळी त्याला त्याच प्रकारची आणखी माहिती किंवा व्हिडिओ सुचवले जातात. ३) एआयमुळे इंटरनेट अधिक उपयुक्त कसे बनते? आज जगातील मोठमोठ्यातंत्रज्ञानकंपन्या जसे की गुगल, मेटा आणि अॅमेझॉन या एआयचा वापर करून वापरकर्त्यांचा अनुभव सुधारण्याचा प्रयत्न करतात. उदाहरणार्थ, तुम्ही जर एखाद्या विषयावर माहिती शोधली तर पुढे त्याच विषयाशी संबंधित व्हिडिओ, लेख किंवा माहिती तुम्हाला सुचवली जाते. त्यामुळे शिकणे अधिक सोपे, जलद आणि मजेशीर बनते. अनेक शैक्षणिक अॅप्सही एआयच्या मदतीने विद्याथ्याँच्या अभ्यासाची पद्धत समजून घेऊन त्यानुसार प्रश्न आणि सराव देतात. ४) एआय आपली सुरक्षा कशी जपते? डिजिटल फिंगरप्रिंट आणि एआयचा उपयोग फक्त माहिती सुचवण्यासाठीच नाही, तर इंटरनेट अधिक सुरक्षित करण्यासाठीही होतो. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीच्या खात्यात अचानक वेगळ्या देशातून लॉगिन करण्याचा प्रयत्न झाला तर एआय प्रणाली लगेच सावध होते. अशा वेळी सुरक्षेची तपासणी केली जाते किंवा वापरकर्त्याला सूचना दिली जाते. त्यामुळे ऑनलाइन बँकिंग, ई-मेल आणि इतर महत्त्वाच्या सेवांची सुरक्षा अधिक मजबूत बनते. ५) इंटरनेट वापरताना विद्यार्थ्यांनी काय लक्षात ठेवावे? इंटरनेट हे ज्ञानाचे खूप मोठे भांडार आहे; पण त्याचा वापर करताना काही नियम पाळणे आवश्यक आहे. अनोळखी लिंकवर क्लिक करू नये. भविष्यातले एआयचे डिजिटल जग कसे असेल? भविष्यात एआय आणि डिजिटलतंत्रज्ञानआणखी प्रगत होणार आहे. शाळांमध्ये स्मार्ट शिक्षण, वैयक्तिक अभ्यास मार्गदर्शन आणि सुरक्षित इंटरनेट सेवा यासाठी एआय मोठी भूमिका निभावेल. त्यामुळे विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या पद्धतीने शिकता येईल आणि ज्ञान मिळवणे अधिक सोपे होईल. मात्र तंत्रज्ञानाचा वापर करताना जबाबदारी आणि जागरुकता तितकीच महत्त्वाची आहे. Moral Story A Digital Fingerprint is the unique identity created by a person's activities on the internet. Artificial Intelligence studies this data to understand user behavior, suggest useful content, and improve online safety. Use technology wisely, because every smart user makes the internet a better place. - इंजि. अविनाश जाधव, एआय आणि टेक एज्युकेटर
36 shares
😐
Lokmat logo
Lokmat
May 4, 2026, 07:06 AM
रोमांचक सामन्यात गुजरात टायटन्सने पंजाब किंग्जचा धुव्वा उडवला.

रोमांचक सामन्यात गुजरात टायटन्सने पंजाब किंग्जचा धुव्वा उडवला.

Shreyas Iyer Upset IPL 2026 GT vs PBKS: यंदाच्या हंगामात विजयावर स्वार असलेल्या पंजाब किंग्जला अखेर थोडेसे अडथळे यायला सुरूवात झाली आहे. रविवारीगुजरात टायटन्सने(GT)पंजाब किंग्सचा(PBKS) ४ गडी राखून पराभव केला. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले आणि फलंदाजांना प्रत्येक धाव काढण्यासाठी संघर्ष करण्यास भाग पाडले. पंजाब किंग्जने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद १६३ या धावसंख्येपर्यंत मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातने शेवटच्या षटकांत चार गडी राखून विजय मिळवला. या पराभवानंतर पंजाबचा कर्णधारश्रेयस अय्यरप्रचंड संतापला आणि त्याने खेळपट्टीवर आपली नाराजी व्यक्त केली. It was a great game,@gujarat_titans! 🤝pic.twitter.com/ee1rxw4SHc हेही वाचा:वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने PBKS ला दिला पराभवाचा धक्का सामन्यानंतरपंजाब किंग्सचाकर्णधारश्रेयस अय्यरनेखेळपट्टीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अय्यर म्हणाला, "पॉवरप्लेमध्ये चार विकेट गमावून १६० धावांपर्यंत पोहोचणे हा खरोखरच एक उत्तम प्रयत्न होता. आम्ही नवीन चेंडूने हवी तितकी अचूक गोलंदाजी करू शकलो नाही. खेळपट्टीवर पुल शॉट खेळणे सोपे नव्हते. कारण बाऊन्स अनियमित होता आणि चेंडू अचानक आतल्या बाजूला येत होता. आमच्या संघाचा प्रयत्न चांगला होता, पण आमच्या गोलंदाजीमध्ये सातत्याचा अभाव होता, ज्यामुळे संघाला लक्ष्याचा बचाव करता आला नाही." We fell short in Ahmedabad!pic.twitter.com/MTotaR3s7Z हेही वाचा:अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी "नव्या चेंडूने गोलंदाजांना मदत मिळत असूनही आमच्या फलंदाजांनी चांगली झुंज दिली. त्यामुळे संघर्षातून आम्ही चांगली धावसंख्या उभारू शकलो. पण गुजरातच्या गोलंदाजांनी मात्र अचूक टप्पा आणि दिशा राखून गोलंदाजी केली, त्यामुळे आम्हाला सुरुवातीला मोकळेपणाने खेळता आले नाही. त्याचाच परिणाम आमच्या एकूण खेळावर झाला आणि आम्ही सामन्यात मागे पडलो. असे असले तरी आम्ही या सामन्यातून अनेक सकारात्मक गोष्टी घेऊ आणि पुढची वाटचाल करू," असे श्रेयस अय्यर म्हणाला. दरम्यान, या पराभवानंतरही ९ पैकी ६ विजयानंतरही,गुजरात टायटन्सगुणतालिकेत पाचव्या स्थानावर कायम आहे. दरम्यान, अव्वल क्रमांकावरील पंजाब किंग्स आपल्या पुढील सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल.
87 shares
😊
Lokmat logo
Lokmat
May 4, 2026, 07:06 AM
मराठी अभिनेता ऋग्वेद फडकेने प्रेयसी विभा पवारशी पारंपरिक समारंभात बांधले नाते

मराठी अभिनेता ऋग्वेद फडकेने प्रेयसी विभा पवारशी पारंपरिक समारंभात बांधले नाते

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता लग्नाच्या बेडीत अडकला आहे. अभिनेता ऋग्वेद फडके याने गर्लफ्रेंड विभा पवार हिच्यासोबत गुपचूप लग्न केलं आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. मोजकी पाहुणीमंडळी आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत त्यांचा विवाहसोहळा पार पडला. पारंपरिक पद्धतीने ऋग्वेद आणि विभा यांनी सप्तपदी घेत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. ऋग्वेद आणि विभा यांनी आयुष्यातील या खास क्षणासाठी पारंपरिक लूकला पसंती दिली. ऋग्वेदने धोतर, अंगरखा आणि टिळक टोपी असा पेहराव केला होता. या पेहरावात तो राजबिंडा दिसत होता. तर विभाने नऊवारी साडीत नववधू लूक केला होता. लग्नानंतर त्यांचा रिसेप्शन सोहळाही पार पडला. यासाठी ऋग्वेदने सूट घातला होता. तर त्याची पत्नी विभाने पैठणी साडी नेसली होती. ऋग्वेद आणि विभा गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात त्यांचा साखरपुडा पार पडला होता. साखरपुड्यानंतर एका वर्षाने ते आता लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. ऋग्वेदने पारू, अबोल प्रितीची अजब कहाणी, थोडं तुझं थोडं माझं या मालिकांमध्ये त्याने काम केलं आहे. एक अभिनेता असण्यासोबतच तो दिग्दर्शकही आहे. मुशाफिरी या त्याच्या नाटकाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. याशिवाय त्याची स्वत:ची निर्मिती संस्थाही आहे.
99 shares
😐
M
Maharashtra Times
May 4, 2026, 05:30 AM
बॉक्स ऑफिसवर'राजा शिवाजी गर्जना', मुंबईत विक्रम मोडले

बॉक्स ऑफिसवर'राजा शिवाजी गर्जना', मुंबईत विक्रम मोडले

मुंबई: रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनित ' राजा शिवाजी ' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसतोय.१ मे रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचून आणण्यात यशस्वी ठरला आहे.पहिल्या तीन दिवसांतच या सिनेमानं मराठी चित्रपटसृष्टीतील कमाईचे अनेक जुने विक्रम मोडीत काढले आहेत.राजा शिवाजी सिनेमाची तिसऱ्या दिवशी जबरदस्त कमाईपहिल्या दिवशी ११.३५ कोटींची दमदार ओपनिंग दिल्यानंतर आणि दुसऱ्या दिवशी कमाईत किंचितशी घट झाल्याचं दिसून आलं होतं. रविवारी म्हणजेच तिसऱ्या दिवशी या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर मोठी झेप घेतली आहे. सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, तिसऱ्या दिवशी या चित्रपटानं भारतात अंदाजे १२ कोटी रुपयांच्या जवळपास कमाई केली आहे.तीन दिवसांचं एकूण कलेक्शन'राजा शिवाजी'नं आपल्या पहिल्या वीकेंडपर्यंत एकूण ३३.९० कोटी रुपयांच्या जवळपास गल्ला जमवला आहे. रविवारच्या कमाईबद्दल बोलायचं झालं कर, मराठीतून ७.७५ कोटी, तर हिंदी आवृत्तीतून ४.२५ कोटी रुपयांची कमाई झाली.का ठरतोय ब्लॉकबस्टर?११०० कोटींच्या भव्य बजेटमध्ये तयार झालेला हा मराठीतील आजवरचा सर्वात महागडा चित्रपट मानला जात आहे. रितेश देशमुखचा अभिनय, शिवरायांच्या इतिहासाची भव्य मांडणी आणि सलमान खान, संजय दत्त, अभिषेक बच्चन यांसारख्या दिग्गज कलाकारांच्या विशेष भूमिकांमुळं हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहांबाहेर रांगा लावत आहेत.अवघ्या तीन दिवसांत 'राजा शिवाजी'नें 'सैराट' आणि 'वेड' सारख्या मोठ्या चित्रपटांचे सुरुवातीचे विक्रम मागे टाकले आहेत. आता या चित्रपटाची नजर ५० कोटींच्या टप्प्याकडे लागली आहे. तसंच हा सिनेमा सैराटचा रेकॉर्ड मोडणार का? याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.Raqesh Bapat : 'कौटुंबिक पाठींबा नव्हता म्हणून आम्ही मुलांचा विचार केला नाही' वैयक्तिक आयुष्याबद्दल राकेश बापटचं वक्तव्यअजय-अतुल यांचं संगीत आणि भव्यताचित्रपटाची गाणी आणि बॅकग्राउंड स्कोअर प्रसिद्ध संगीतकार जोडीअजय-अतुलयांनी दिलं आहे. त्यांचं 'छत्रपती' हे अँथम गाणं आधीच सुपरहिट ठरलं आहे. प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर संतोष सिवन यांनी टिपलेली सह्याद्रीची दृश्ये आणि युद्धाचे प्रसंग चित्रपटाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात.दोन वेगवेगळ्या आवृत्त्याया चित्रपटाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांसाठी रितेशनं वेगवेगळे रनटाइम ठेवले आहेत. मराठी आवृत्ती सुमारे ३ तास १५ मिनिटांची असून, ती अधिक सविस्तर आहे, तर हिंदी आवृत्ती थोडी संक्षिप्त ठेवण्यात आली आहे.Bhau Kadam : ...म्हणून 'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या पर्वात काम नाही केलं; भाऊ कदम यांनी खरं ते सांगितलंपुणे, मुंबई, कोल्हापूर आणि संभाजीनगर यांसारख्या शहरांमध्ये या चित्रपटाची क्रेझ मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे. जाणकारांच्या मते, येणाऱ्या दिवसांत सिनेमाची कमाई आणखी वाढण्याची शक्यता आहे.
12 shares
😐
P
Pudhari
May 4, 2026, 03:49 AM
मराठी चित्रपटसृष्टीला राजा शिवाजीने झोडपून काढले

मराठी चित्रपटसृष्टीला राजा शिवाजीने झोडपून काढले

सध्या मराठी चित्रपटसृष्टीत‘राजा शिवाजी’ची जोरदार चर्चा असून येत्या काही दिवसांत हा चित्रपट आणखी मोठे विक्रम करू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
15 shares
😊
Sakal logo
Sakal
May 3, 2026, 12:48 PM
रितेश देशमुखने चित्रपट प्रदर्शनापूर्वी आशीर्वाद मागितले

रितेश देशमुखने चित्रपट प्रदर्शनापूर्वी आशीर्वाद मागितले

RITEISH DESHMUKH SEEKS BLESSINGS AT DAGADUSHETH TEMPLE:रितेश देशमुख याने दिग्दर्शित केलेला राजा शिवाजी सिनेमा १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आहे. या सिनेमाने दोन दिवसात कोट्यवधीची कमाई केली आहे. सध्या हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना पहायला मिळतेय. दरम्यान सिनेमाच्या यशानंतर रितेशनं पुण्याच्या दगडूशेठ गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेतलंय. सध्या त्याचा दर्शन घेतानाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.दर्शन घेतल्यानंतर रितेश देशमुखने प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली की, 'हे खूप पवित्र मंदिर असून मी जितक्या वेळी शक्य होईल तेव्हा मी खाण्याचा प्रयत्न करतो. माझे वडिल विलासराव देशमुख सुद्धा दरवर्षी या मंदिरात येत होते. आम्ही राजा शिवाजी हा सिनेमा श्रद्धेनं बनवला असून छत्रपती महाराजांच्या शौर्यावर आधारित आहे.'दरम्यान सिनेमाच्या यशाबद्दल बोलताना म्हणाले की, 'प्रेक्षकांनी सिनेमाला भरभरून प्रेम दिलय. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी बाप्पाचरणी नतमस्तक होण्यासाठी आलो होती. या सिनेमासाठी १० वर्षांचा संघर्ष झाला. विशेष म्हणजे साडेतीन वर्षांमध्ये सतत काम सुरु होतं. आता आज प्रेक्षकांसमोर आला आणि त्यांना तो खूप आवडतोय याचा खूप आनंद वाटतोय.''राजा शिवाजी' सिनेमा १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आतापर्यंत या सिनेमानं २४ कोटी रुपयांचा कमाई केलीय. या सिनेमात संजय दत्तसह , अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, अनेक मोठे कलाकार सिनेमामध्ये पहायला मिळणार आहे. सध्या सोशल मीडियावर सिनेमातील अनेक सीन व्हायरल होत आहे.
80 shares
😊
Loksatta logo
Loksatta
May 3, 2026, 12:43 PM
नेटफ्लिक्सची सर्वाधिक पाहिली जाणारी मालिकाः गुन्हेगारी, गूढ आणि क्रीडा नाटकाचे रोमांचक संयोजन

नेटफ्लिक्सची सर्वाधिक पाहिली जाणारी मालिकाः गुन्हेगारी, गूढ आणि क्रीडा नाटकाचे रोमांचक संयोजन

This Netflix Series Trending On Ott : जकाल मनोरंजनाचं स्वरूप झपाट्याने बदलत असून नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ आणि इतर ओटीटी प्लॅटफॉर्म्स प्रेक्षकांची पसंती मिळवत आहेत. दर महिन्याला नव्या सिरीज आणि चित्रपटांमुळे प्रेक्षकांना विविध पर्याय उपलब्ध होत आहेत. थिएटरपेक्षा घरबसल्या कंटेंट पाहण्याकडे लोकांचा अधिक कल वाढताना दिसतो. विशेषतः क्राइम, थ्रिलर आणि मिस्ट्री अशा जॉनरला मोठी मागणी आहे. याच वाढत्या लोकप्रियतेमुळे ओटीटी आज मनोरंजन क्षेत्रातील एक महत्त्वाचा भाग बनला आहे. सध्या एक सीरिज मोठ्या प्रमाणात ओटीटीवर पाहिली जात आहे. जिने इतर सीरिजला मागे टाकलं असून ही सीरिज ओटीटीवरील सर्वाधिक पाहिली जात असलेली सीरिज बनली आहे. ही सीरिज नेमकी कशी आहे, कथा काय आहे याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात… जर तुम्ही मिस्ट्री आणि क्राइम थ्रिलर जॉनर पाहण्याचा विचार करत असाल, तर ही सिरीज तुमच्यासाठी योग्य आहे. ही सिरीज क्राइम, रहस्य आणि थ्रिलरचं उत्तम समीकरण आहे. त्यात स्पोर्ट्स ड्रामाही आहे. रिलीज होताच या सीरिजने दोन आठवड्यांपासून ओटीटीवर आघाडीवर असलेल्या ‘If Wishes Could Kill’ या साऊथ कोरियन हॉरर थ्रिलरला मागे टाकलं आहे. या सीरिजचं नाव आहे ‘ग्लोरी’ नेटफ्लिक्सवर आलेली ही नवीन सिरीज ७ भागांची आहे आणि प्रत्येक भाग तुमची उत्सुकता वाढवते. कथा आणि सीन शेवटपर्यंत खिळवून ठेवतात. शेवटचा क्लायमॅक्स इतका धक्कादायक आहे की तुम्ही थक्क व्हाल. ही सिरीज त्याग, बलिदान आणि संघर्षाभोवती फिरते. दोन भाऊ एका मृत्यूच्या रहस्याचा उलगडा करण्यासाठी धोकादायक प्रवास करतात. ‘ग्लोरी’ या सीरिजच्या कथेबद्दल बोलायचं झालं तर ही कथा दोन वेगळे झालेले भाऊ देव (Divyenndu) आणि रवी (Pulkit Samrat) यांची आहे. ते त्यांची बहिणी गुडिया (Jannat Zubair) वर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा आणि तिच्या बॉयफ्रेंड व बॉक्सर निहाल सिंहच्या हत्येचा उलगडा करण्यासाठी घरी परततात. ही कथा ऑलिम्पिकमध्ये जाण्याचं स्वप्न, सूडाची भावना आणि गुंतागुंतीच्या नात्यांभोवती फिरते. A post shared by Netflix India (@netflix_in) १ मे रोजी रिलीज झालेल्या या सीरिजमध्ये दिव्यांदू शर्मा, पुलकीत सम्राट, सुविंदर विकी( Suvinder Vicky), आशुतोष राणा, सयानी गुप्ता, जन्नत जुबेर आणि कुणाल ठाकूर यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसतात. ही सिरीज नेटफ्लिक्सवर पाहण्यासाठी उपलब्ध आहे. रिलीज होताच तिने टॉप ट्रेंडिंग लिस्टमध्ये प्रथम स्थान मिळवलं आहे.
96 shares
😐
Sakal logo
Sakal
May 3, 2026, 12:38 PM
ग्रामीण वारसा साजरा करत वाडामध्ये पहिल्यांदाच बैलगाडी शर्यत आयोजित

ग्रामीण वारसा साजरा करत वाडामध्ये पहिल्यांदाच बैलगाडी शर्यत आयोजित

वाडा :वाडा तालुक्यातील सापरोंडे- मांगाठणे हद्दीतील स्व.कुंदन पाटील मैदानावर आज रविवार (ता.३) रोजी तालुक्यात पहिल्यांदाच बैलगाडा शर्यतींचे भव्य आयोजन करण्यात आले होते.या बैलगाडा शर्यतींचे उद्घाटन खासदार डाॅ.हेमंत सवरा यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.या बैलगाडा स्पर्धेत रायगड,पुणे नाशिक, रत्नागिरी, ठाणे,सातारा पालघर यांच्यासह गुजरात राज्यातील वापी व शेलवासा येथील ४४२ बैलगाडा चालकांनी सहभाग नोंदविला होता.विना काठी,विना लाठी या तत्त्वावर या शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते.राज्यातील ग्रामीण भागाची वेगवेगळी ओळख बैलगाडा शर्यतींमधून दिसून येते. प्रत्येकाचं वेगळेपण फारसं नसलं, तरी आपल्या मातीचा गंध आणि ओळख जपण्याचा प्रयत्न या बैलगाडा शर्यतींमधून करण्यात आला होता. बैलगाडा शर्यत ही प्राचीन संस्कृती आणि पारंपरिक प्रथेचा एक महत्त्वाचा भाग म्हणून ओळखला जातो.तसेच वेग, परंपरा आणि शौर्याचा संगम म्हणजे बैलगाडा शर्यत होय.शेतकऱ्यांची शेतीची कामं संपली की मनोरंजनाचं आणि उत्साह कायम ठेवण्याचं साधन म्हणून ही बैलगाडा शर्यतीकडे पाहिलं जात.या स्पर्धेस खासदार डाॅ.हेमंत सवरा, आमदार शांताराम मोरे, भाजपा पालघर जिल्हाध्यक्ष भरतभाई रजपूत आदी मान्यवरांनी भेटी दिल्या.या स्पर्धेचे आयोजन प्रसिद्ध बैलगाडा मालकीण सोनूताई मुंबईकर यांच्या वतीने करण्यात आले होते. स्पर्धेत प्रवेश शुल्क १५०० रुपये नाममात्र असून प्रथम पारितोषिक १,१८,२०८ द्वितीय पारितोषिक ९८,२०८ तृतीय पारितोषिक ७८,२०८ चतुर्थ पारितोषिक ५८,२०८ ठेवण्यात आले होते.
79 shares
😐
Sakal logo
Sakal
May 3, 2026, 12:06 PM
मराठी निर्मात्याने त्याला ओळखण्यात अपयशी ठरलेल्या अभिनेत्रीबद्दल धक्कादायक सत्य उघड केले

मराठी निर्मात्याने त्याला ओळखण्यात अपयशी ठरलेल्या अभिनेत्रीबद्दल धक्कादायक सत्य उघड केले

Marathi Entertainment News :मराठी इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक महेश टिळेकर त्यांच्या परखड स्वभावासाठी आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. त्यांचा मराठी तारका हा कार्यक्रम लोकप्रिय आहे. इंडस्ट्रीमध्ये येणाऱ्या विविध अनुभवांवर ते उघडपणे बोलतात. नुकतंच त्यांनी एका अभिनेत्रीवर धक्कादायक खुलासा केला.राजश्री मराठी चॅनेलला नुकतीच त्यांनी मुलाखत दिली. यावेळी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टविषयी प्रश्न विचारण्यात आला होता ज्यात त्यांनी एका मराठी अभिनेत्रीने त्यांना ओळख दाखवली नाही असं लिहीलं होतं. ती अभिनेत्री कोण हे त्यांनी या मुलाखतीत उघड केलं.महेश टिळेकर म्हणाले की,"त्या अभिनेत्रीने आमच्याबरोबर काम केलं होतं. मी मराठी तारका हे पुस्तक प्रकाशित केलं तेव्हासुद्धा त्या आल्या होत्या. त्यानंतर अशोक सराफांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात एक कार्यक्रम केला. आता मी तुमच्यासमोर नावच घेतो अश्विनी भावे.""माझी अशी इच्छा होती की अशोक सराफ यांच्याबरोबर त्यांनी काम केलं आहे तर त्यांनी त्या कार्यक्रमाला यावं. वर्षा उसगांवकरसुद्धा आल्या होत्या. मी अश्विनी यांना मेसेज केला. त्यावर उत्तर नाही, फोन केल्यावरही काहीच प्रतिसाद नाही. दोन दिवसांनी मॅनेजरने फोन केला. तिने म्हटलं "मॅमनी विचारलंय काय काम आहे ?" मी तिला म्हणालो "मी मॅमशी बोलेन. तुझ्याशी का बोलू ?" कारण आम्ही एकत्र काम केलं होतं. त्यात आम्ही एका इंडस्ट्रीत काम करतो. त्यात तुम्ही जर मॅनेजर दाखवणार असाल तर मी सुद्धा रुबाब दाखवू शकतो. तुम्ही मोठे तुमच्या घरी. त्यांच्यापेक्षा दिग्गज लोकांबरोबर माझं काम करून झालंय. हे त्यांना सुद्धा समजायला हवं. कारण मेसेज करताना मी खाली महेश टिळेकर हे नाव सुद्धा लिहिलं होतं."
36 shares
😐
Loksatta logo
Loksatta
May 3, 2026, 11:45 AM
'वीन डोगंताली ही तुतेना': मराठी दूरचित्रवाणी मालिकेने गुंतागुंतीच्या नातेसंबंधांचा शोध लावला

'वीन डोगंताली ही तुतेना': मराठी दूरचित्रवाणी मालिकेने गुंतागुंतीच्या नातेसंबंधांचा शोध लावला

Purva Gokhale on Veen Doghantali Hi Tutena: ‘वीण दोघांतली ही तुटेना’ ही लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेत अभिनेता सुबोध भावे व अभिनेत्री तेजश्री प्रधान प्रमुख भूमिकांत आहेत. सुबोध भावेने या मालिकेत समर ही भूमिका साकारली आहे, तर तेजश्री प्रधानने या मालिकेत स्वानंदी ही भूमिका साकारली आहे. मालिकेत दाखविल्याप्रमाणे स्वानंदी व समर या दोघांनीही त्यांच्या भावंडांच्या सुखासाठी एकमेकांशी लग्न केले आहे. सुरुवातीला त्यांच्या नात्यात अनेक गैरसमज असल्याचे पाहायला मिळत होते. त्यांच्यात सतत भांडणे व्हायची, पण त्यानंतर हळहळू त्यांच्यात मैत्री झाली. त्यांच्यातील गैरसमज कमी झाले आणि एकमेकांवरील विश्वास वाढल्याचे पाहायला मिळाले. एकमेकांना काय वाटते या गोष्टींचीदेखील ते काळजी घेऊ लागले. आता त्यांची मैत्री गाढ होत असताना समरच्या एक्स गर्लफ्रेंडची किमयाची त्यांच्या आयुष्यात एन्ट्री झाली आहे. किमया समरच्या आयुष्यात आल्यानंतर काय बदल होणार, समर व स्वानंदीच्या नात्यात काय बदल होणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. किमया ही भूमिका अभिनेत्री पूर्वा गोखलेने साकारली आहे. नुकतीच पूर्वा गोखले आणि सुबोध भावे यांनी अल्ट्रा मराठी बझला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना विचारले की किमया मालिकेत आली आहे. तर ती स्वानंदीला धडा देऊन जाणार आहे, शिकवून जाणार आहे की समरला धडा शिकवून जाणार आहे? यावर पूर्वा गोखले म्हणाली, “किमया आली आहे तर ती काहीतरी नक्की करून जाईल. काहीतरी किमया करून जाईल. स्वानंदीला काहीतरी शिकवून जाईन. कदाचित वेगळा समर दिसेल, सॅमला थोडीशी बदलून जाईल; तर माहिती नाही त्यासाठी तुम्हाला मालिका पाहावी लागेल.” तर सुबोध भावे म्हणाला की, किमयाच्या येण्याने किमया घडणार आहे. बरंच काही घडणार आहे, त्यामुळेच तिची एन्ट्री झाली आहे. पूर्वा गोखले व सुबोध भावे यांनी याआधी ‘कुलवधू’ मालिकेत एकत्र काम केले आहे. १७ वर्षांनी ते पुन्हा झी मराठी वाहिनीवरील मालिकेत स्क्रीन शेअर करत आहेत. कुलवधूनंतर त्यांनी ‘भयभीत’ नावाच्या सिनेमात काम केले आहे. इतक्या वर्षांनी मराठी मालिकेत काम करण्याबद्दल पूर्वा गोखले म्हणाली, “मराठी मालिकेत मी खूप वर्षांनी काम करत आहे, कारण कुलवधूनंतर एक-दोन अशाच पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. मग मी प्रामुख्याने हिंदी मालिकांमध्ये काम करत होते. डेली सोपच्या रूटिनमुळे एका वेळी एकाच शोमध्ये काम करता येतं. इतकी वर्षे हिंदीत काम सुरू होतं, आता या भूमिकेसाठी मला अचानक विचारलं आणि मला वेळ होता, तर म्हटलं की काम करूया”, असे म्हणत इतकी वर्षे ती झी मराठी किंवा मराठी मालिकांमध्ये का दिसली नाही याबद्दल तिने सांगितले. दरम्यान, आता ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत नेमकं काय घडणार हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.
54 shares
😐
Sakal logo
Sakal
May 3, 2026, 10:49 AM
रितेश देशमुखच्या'राजा शिवाजी'चित्रपटाचे यशः बालकलाकार किमया मेस्ट्रीने शो चोरला

रितेश देशमुखच्या'राजा शिवाजी'चित्रपटाचे यशः बालकलाकार किमया मेस्ट्रीने शो चोरला

Marathi Entertainment News : सध्या सगळीकडे चर्चा आहे ती रितेश देशमुखच्या राजा शिवाजी या सिनेमाची. या सिनेमाने अवघ्या दोन दिवसांतच बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई या सिनेमाने केली आहे. त्यातच या सिनेमात काम करणाऱ्या सगळ्या कलाकारांनी प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत.पण सगळ्यात जास्त चर्चा आहे ती महाराणी सईबाईंची लहानपणीची भूमिका साकारणाऱ्या छोट्या चिमुरडीची. तिचा अभिनय सगळ्यांना भावला आहे. ही चिमुरडी कोण आहे याची चर्चा सध्या सगळीकडे रंगली आहे.तर ही चिमुरडी आहे किमया मेस्त्री. तिचा हा पहिलाच सिनेमा आहे आणि तिच्या अभिनयाने तिने सगळ्यांची मनं जिंकली आहेत. किमयाने या आधी मालिकांमध्ये काम केलं आहे. तर संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा तिचा पहिला सिनेमा होता.किमया फक्त अभिनयच नाही तर कत्थक नृत्यही शिकते आहे. सोशल मीडियावर तिने तिचे कत्थक करतानाचे अनेक व्हिडीओ शेअर केले आहेत. याशिवाय तिने उदे ग अंबे, सावळ्याची जणू सावली, जय जय स्वामी समर्थ या मालिकांमध्ये तिने काम केलं आहे.A post shared by किमया🌙 (@kimayamestry07_official)
26 shares
😊
Loksatta logo
Loksatta
May 3, 2026, 10:31 AM
राकेश बापटने बॉलिवूडमधील त्याच्या संघर्षाच्या दिवसांबद्दल केला खुलासा

राकेश बापटने बॉलिवूडमधील त्याच्या संघर्षाच्या दिवसांबद्दल केला खुलासा

Raqesh Bapat on Bollywood managers politics : राकेश बापट मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. ‘तुम बिन’ या चित्रपटातून पदार्पण केल्यानंतर त्याची सर्वत्र प्रचंड क्रेझ निर्माण झालेली. परंतु, त्यानंतर अभिनेत्याने केलेल्या कामाला तितकासा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. पहिलाच चित्रपट सुपर हिट ठरला परंतु, त्यानंतर बराच संघर्ष त्याला करावा लागला. अशातच आता राकेशने त्याच्या संघर्षकाळाबद्दल सांगितलं आहे. राकेश बापट अलीकडे मराठी ‘बिग बॉस’मध्ये झळकला. ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या पर्वाचा तो उपविजेता ठरला. अशातच आता त्याने घराबाहेर आल्यानंतर व्यावसायिक आणि खासगी आयुष्याबद्दल सांगितलं आहे. यावेळी अभिनेत्याने त्याच्या व्यावसायिक आयुष्यात घडलेला एक प्रसंग सांगितला आहे. ज्याचा त्याच्या करिअरवर परिणाम झाला. त्याच्या हातून चांगले प्रोजेक्ट्स गेले. अभिनेता नेमकं काय म्हणाला याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात… मुलाखतीत राकेशला त्याच्या ‘तुम बिन’नंतरच्या प्रवासाबद्दल विचारल्यानंतर तो म्हणाला, “बाहेरनं बघायला ही दुनिया खूप वेगळी दिसते. तुम बिन मला जेव्हा मिळाला तेव्हा मी नवीन होतो आणि नवीन असताना तुम्ही करारबद्ध असता. तुम्हाला त्यांच्याबरोबरच काम करावं लागतं. खूप काही घडलं होतं. तेव्हा मला मार्गदर्शन करणारं कोणीही नव्हतं आणि तेव्हा मॅनेजर असायचे. मला मोठ मोठ्या मॅनेजरने स्वत: बोलावलं आणि सांगितलं की आम्हाला तुझ्यासाठी काम करायचं आहे. त्यांनी मोठ्या कलाकारांसाठी काम केलं आहे मी नाव नाही घेऊ शकत.” राकेश याबद्दल म्हणाला, “मला असं वाटतं की त्या मॅनेजरमुळे माझं खूप काम गेलं आहे. कारण – तो जे मानधन सांगायचा, मला तर माहीतही नसायचं की कोणत्या ऑफर येत आहेत. तो सरळ म्हणायचा की हा एवढ्या पैशांमध्ये काम करणार. त्यानंतर जेव्हा मी त्या लोकांना भेटलो तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्हाला तुझ्याबरोबर काम करायचं होतं. त्याने तुझ्यापर्यंत पोहचू दिलं नाही आम्हाला. जो प्रोजेक्ट माझ्याकडे येणार होता तो त्याने दुसरीकडे फिरवला. असे एवढे किस्से झाले आहेत. एक नाही तर तीन मॅनेजर होते माझे तेव्हा. त्यावेळी कोणी मार्ग दाखवणारा नव्हता. त्यामुळे खूप काही घडलं.” दरम्यान, राकेश बापटने ‘तुम बिन’, ‘सविता दामोदर परांजपे’, ‘मुंबई आपली आहे’, ‘सात फेरे’, ‘मर्यादा लेकीन कब तक’, ‘बहू हमारी रजनीकांत’, ‘बिग बॉस ओटीटी’, ‘बिग बॉस मराठी’ अशा चित्रपट, मालिका आणि रिअॅलिटी शोमध्ये काम केलं आहे.
3 shares
😢
Sakal logo
Sakal
May 3, 2026, 08:17 AM
थेट ट्रेलर सादरीकरणासह मराठी चित्रपटगृहाने नवा कल प्रस्थापित केला

थेट ट्रेलर सादरीकरणासह मराठी चित्रपटगृहाने नवा कल प्रस्थापित केला

Marathi Entertainment News : मराठी रंगभूमीवर एक आगळावेगळा आणि धाडसी प्रयोग नुकताच यशस्वीरित्या पार पडला. ‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी!’ या आगामी नाटकाचा ट्रेलर पहिल्यांदाच थेट रंगमंचावर लाईव्ह परफॉर्मन्सच्या स्वरूपात सादर करण्यात आला आणि प्रेक्षकांनी त्याला टाळ्यांच्या कडकडाटात जबरदस्त प्रतिसाद दिला. महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे रोजी माटुंगा पश्चिम येथील यशवंतराव नाट्यगृहात रंगलेल्या ‘जर तर ची गोष्ट’ या गाजलेल्या नाटकाच्या ३५० व्या प्रयोगादरम्यान हा अनोखा लाईव्ह ट्रेलर सादर करण्यात आला. नाटकाच्या मध्यंतरात कलाकारांनी रंगमंचावर येत ‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी!’ची झलक जिवंत अभिनयातून उभी केली. संगीत, प्रकाशयोजना आणि प्रभावी सादरीकरणाच्या माध्यमातून सादर झालेला हा ट्रेलर प्रेक्षकांना नाटकाचा प्रत्यक्ष अनुभव देणारा ठरला.या अभिनव प्रयोगामुळे रंगभूमीवरील ट्रेलर सादरीकरणाची पारंपरिक पद्धत मोडीत निघाली असून, मराठी नाट्यविश्वात एक नवा ट्रेंड सेट झाल्याची चर्चा रंगली आहे. प्रेक्षकांनीही या प्रयोगाला मोठ्या उत्साहाने दाद दिली.‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी!’ हे नाटक एका कुटुंबातील तीन वेगवेगळ्या पिढ्यांच्या जगण्यातील, विचारांतील आणि नात्यांतील मजेशीर प्रवास उलगडणार आहे. हलक्याफुलक्या ढंगात मांडलेली ही कथा हसत-खेळत प्रेक्षकांना विचार करायला लावणारी ठरेल. येत्या ९ मे रोजी या नाटकाचा पहिला प्रयोग रंगभूमीवर सादर होणार आहे.दिग्दर्शक अद्वैत दादरकर म्हणतात, “लाईव्ह ट्रेलर हा आमच्यासाठी एक छोटा नाट्यानुभव होता. काही मिनिटांत प्रेक्षकांना नाटकाच्या जगात घेऊन जाणं, त्यांना हसवणं आणि उत्सुकता निर्माण करणं हे खरं आव्हान होतं. प्रेक्षकांनी दिलेली तात्काळ प्रतिक्रिया पाहून आम्हाला जाणवलं की, हा प्रयोग योग्य दिशेने गेला.”निर्माते नंदू कदम म्हणतात, “नाटकाची ओळख प्रेक्षकांपर्यंत पोहोचवताना काहीतरी वेगळं करायचं होतं. ट्रेलर हा फक्त दाखवण्यापुरता न राहाता तो अनुभवण्यासारखा व्हावा, हा आमचा प्रयत्न होता. रंगमंचावरच ट्रेलर सादर केल्यावर प्रेक्षकांची प्रतिक्रिया थेट समजते आणि ती खूपच उत्साहवर्धक होती. अशा प्रकारचे प्रयोग पुढेही करायला आम्हाला नक्कीच आवडेल.''प्रिया बापट म्हणते, ''हे नाटक प्रेक्षकांना आपलसं वाटणारं आणि मनोरंजन करणारं आहे. त्या नाटकाची झलक ट्रेलरमधून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवताना आम्हाला तीच ऊर्जा आणि मजा जिवंत ठेवायची होती. लाईव्ह ट्रेलरमुळे प्रेक्षकांना नाटकाचा मूड लगेच कळला आणि त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून आम्हाला खूप आनंद होतोय.”
67 shares
😐
Pudhari logo
Pudhari
May 3, 2026, 08:15 AM
खेळकर शोध आणि स्थानिक आनंदाचा दिवस

खेळकर शोध आणि स्थानिक आनंदाचा दिवस

टोळक्यातलं मवाळ धाकटं शोधून त्याला म्हशीच्या पाठीवर बसवून दे, डोंगर तुडवत ‌‘जांबी, करंदा‌’ धुंडाळ, दारातल्या जांभळावर ‌‘झीलग्यांका‌’ चढवून दुपारची सोय कर, कैऱ्या पाडून ‌‘टकू‌’ करून खा, पैज लावून आंबे-फणसावर ताव मार, रस्त्यान जाणाऱ्या आईस्फ्रूट- वाल्याकडची कांडी खा, खडखडे लाडू फस्त कर, नाहीतर मळ्यातल्या शेंगदाण्यावर डल्ला मार अशा अनेक उपद्य्वापांनी दिवस भरलेला असायचा.
37 shares
😐
Sakal logo
Sakal
May 3, 2026, 07:54 AM
राकेश बापटने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि रिद्धी डोगराशी झालेल्या घटस्फोटाबद्दल केला खुलासा

राकेश बापटने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि रिद्धी डोगराशी झालेल्या घटस्फोटाबद्दल केला खुलासा

Marathi Entertainment News : अभिनेता राकेश बापटने मराठीबरोबरच हिंदी इंडस्ट्रीमध्येही नाव कमावलं आहे. बिग बॉस मराठी सीझन 6मुळे हा अभिनेता चर्चेत आला. सहाव्या पर्वाचा उपविजेता ठरलेल्या राकेशने नुकतंच त्याच्या खासगी आयुष्यवर भाष्य केलं. त्याची एक्स पत्नी आणि त्याने मुलं होऊ न देण्याचा निर्णय का घेतला याबाबत सांगितलं.राकेशने रिद्धी डोग्राशी लग्न केलं. त्यानंतर काही काळाने त्यांचा घटस्फोट झाला. बिग बॉस मराठीचाय सहाव्या पर्वात या मुद्द्यावरून त्यांचं भांडण झालं. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याने त्याच्या खासगी आयुष्यावर भाष्य करत अनेक गोष्टींवर खुलासा केला.राकेशने मित्र म्हणे चॅनेलला नुकतीच मुलाखत दिली. यावेळी तो म्हणाला की,"रिद्धी आणि मी एकमेकांचे कायम चांगले मित्र-मैत्रीण राहिलो आहोत. मी माझ्या बेस्ट फ्रेंडबरोबर लग्न केलं होतं. 7-8 वर्षं आम्ही एकत्र राहिलो. आयुष्य खूप सुंदर होतो. आयुष्यात चढउतार येत असतात पण कुठेतरी आपण दुखावले जातो. वैचारिक मतभेदही होतात. पण ते व्हायला लागलं तेव्हाच आम्ही ठरवलं की आपली मैत्री इतकी महत्त्वाची आहे की कुठल्याही गोष्टीमुळे त्यावर परिणाम नको व्हायला. ""आम्ही वेळेत निर्णय घेण्याला प्राधान्य दिलं. जर तुझ्या आयुष्यात एक नवीन व्यक्ती येण्याची किंवा माझ्या आयुष्यात नवीन व्यक्ती येण्याची शक्यता असेल तर त्याला संधी देऊयात. आम्ही 7 वर्षं एकत्र राहिलो. आम्ही खूप समजूतदारपणे हा निर्णय घेतला, एकमेकांना दोष दिला नाही. काही लोक मुलांसाठी वगैरे लग्न टिकवतात पण आमच्या बाबतीत तशी गोष्ट नव्हती. "
27 shares
😐
Sakal logo
Sakal
May 3, 2026, 07:24 AM
'राजा शिवाजी'चा टीझर प्रदर्शित, आगामी चित्रपटाविषयी उत्सुकता

'राजा शिवाजी'चा टीझर प्रदर्शित, आगामी चित्रपटाविषयी उत्सुकता

RAJA SHIVAJI CREATES BUZZ:'राजा शिवाजी' सिनेमा प्रदर्शित होताच सगळीकडे चर्चा रंगताना पहायला मिळतेय. सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून सिनेमा कधी येणार ? याबाबत प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. सिनेमा रिलिज होण्यापूर्वीच या सिनेमानं आधीच बुकिंग झालं होतं. दरम्यान या सिनेमानं पहिल्याच दिवशी कोट्यवधीची कमाई केली होती. सोशल मीडियावर सिनिमातील सीन मोठ्या प्रमाणात व्हायरल होताय.राजा शिवाजी सिनेमाचं दिग्दर्शन रितेश देशमुख याने केलय, तर जेनिलियाने या सिनेमाची निर्मिती केलीय. या सिनेमात सलमान खानसह अभिषेक बच्चन, विद्या बालन, दिशा परदेशी, महेश मांजरेकरसह अनेक कलाकारांनी महत्त्वाची भूमिका केलीय. हा सिनेमा मराठीसह हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित झालाय.हा सिनेमानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. या सिनेमातील अनेक सीनची सोशल मीडियावर चर्चा रंगताना पहायला मिळतेय. आता बॉक्स ऑफिसवर दुसऱ्या दिवशी किती कमाई केली हे जाणून घेऊया... सॅल्कनिकनुसार, प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सिनेमाचे 6 हजार २७५ शो होते. या सिनेमानं दुसऱ्या दिवशी १०.५५ कोटींची कमाई केलीय. मराठी भाषेतील सिनेमानं ७.१५ कोटी आणि हिंदी भाषेत ३.४० कोटींची कमाई केलीय. या सिनेमानं आतापर्यंत २१.९ कोटींचा गल्ला कमावलाय.रितेश देशमुखच्या दोन्ही मुलांनी रियान आणि राहीलने सुद्धा सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलय. तसंच रितेशचा भाऊ धिरज देशमुख सुद्धा सिनेमात पहायला मिळतय. या सिनेमातील सलमान खान याने साकारलेली जीवा महालाची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. सध्या त्यांच्या डायलॉगचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताय.
45 shares
😊
M
Maharashtra Times
May 3, 2026, 06:10 AM
मुलगा अरहान खानसोबतच्या तिच्या नात्यावर मलायका अरोराने केली भन्नाट प्रतिक्रिया

मुलगा अरहान खानसोबतच्या तिच्या नात्यावर मलायका अरोराने केली भन्नाट प्रतिक्रिया

मलायका अरोरा ही अशी अभिनेत्री आहे जी तिच्या करियरमध्ये व्यावसायिक आयुष्यापेक्षा वैय़क्तिक आयुष्यामुळेच जास्त चर्चेत राहिल आहे. आयुष्यात आलेल्या कठिण आव्हानांना देखील तिने खंबीरपण उभे राहत एकटीने तोंड दिले.मलायका अरोराच्या करियरमध्ये एका lifestyle brand चा, एका योगा स्टुडिओचा, एकाफॅशन लेबलचाआणि एका रेस्टॉरंटचाही समावेश आहे. 52 वर्षीय अभिनेत्रीने अनेकदा तिचे आणि लेक अरहान खान यांच्यातील नाते कसे आहे यावर मोकळेपणाने भाष्य केले आहे. अरहानचा जन्म २००२ मध्ये झाला. तो अरबाज खानपासून झालेला मुलगा आहे.Tharala Tar Mag : गोड बोलून प्रतिमाला फसवणाऱ्या प्रियाचं बिंग फुटलं, सायलीच्या मैत्रिणींच्या सापळ्याला यश, अर्जुनशी बोलताना संतोष चुकलाचमुलाच्या वक्तव्यामुळे गोंधळली मलायकानुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत, मलायका अरोराला अरहानसोबतच्या तिच्या नात्याबद्दल आणि विशेषतः, आपल्या मुलासोबत तिचे नाते नेमके कसे आहे याबद्दल विचारण्यात आले. 'टाइम्स एंटरटेनमेंट'शी बोलताना, मलायकाने अरहानशी संबंधित एक किस्सा सांगितला, ज्यामुळे ती काहीशी गोंधळून गेली होती.अरहानसोबतचा किस्सा सांगताना मलायका म्हणाली की, "अरहान मला म्हणाला, 'आई,मी लग्न करणार नाहीये, माहित आहे ना? त्यामुळे कृपया नातवंडांचा विचार करणं थांबव.' आणि मी त्याला विचारलं, 'का?' त्यावर त्याने उत्तर दिलं, 'जेव्हा AQI 500 किंवा 1000 च्या घरात पोहोचलेला असतो, तेव्हा या जगात मुलांना आणण्याची इच्छा मला का होईल? मला तसं का करावंसं वाटेल?'Pravin Tarade On Nasrapur Case : 'नराधामाचा एन्काऊंटर झाला तरच मानू हे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे' नसरापूर अत्याचार घटनेवर प्रवीण तरडेंची पोस्टमलाइकाने आपल्या मुलाची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.मलाइका म्हणाली, "मी त्याला विचारलं, 'तू वेडा झालास का? नाही ना, तुला खरोखरच या सर्व गोष्टींचा अनुभव घेतला पाहिजे.' पण मग मी विचार केला आणि म्हटले, 'तुला जे योग्य वाटेल ते कर; फक्त आनंदी राहा.'" हे नमूद करण्यासारखे आहे की, मलाइका आणि अरहान यांच्यात खूप घट्ट नाते आहे; इतकेच नव्हे, तर 'Gen Z' तरुणाईमध्ये प्रचलित असलेल्या अद्ययावत बोलीभाषेतील शब्द आणि वाक्प्रचारांची माहितीही तो आपल्या आईला देत असतो.मोनिकाच्या नवऱ्यानं 'ठरलं तर मग' मालिकेतील तिच्या नवऱ्याला काय सल्ला दिला?अरहान हा आपले आई आणि वडील दोघांकडेही राहतो. तो कधी आईसोबत वेळ घालवताना दिसतो तर कधी खान कटुंबासोबत मस्ती करताना दिसतो. त्याचे त्याची सावत्र आई म्हणजे अरबाज खानची दुसरी पत्नी शुरा खानशी खूप घट्ट मैत्रीचे नाते आहे. अनेकदा शूरा आपल्या इन्स्टाग्रामवर अरहानसोबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. शूरा खान आणि अरबाजला जेव्हा मुलगी झालेली तेव्हा देखील अरहानने मोठा दादा झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला होता.
39 shares
😐
L
Lokmat
May 3, 2026, 03:27 AM
'राजा शिवाजी'बॉक्स ऑफिसः छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्वलंत इतिहास जिवंत करणारा ऐतिहासिक चित्रपट

'राजा शिवाजी'बॉक्स ऑफिसः छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्वलंत इतिहास जिवंत करणारा ऐतिहासिक चित्रपट

Raja Shivaji Box Office:रितेश देशमुखचंदिग्दर्शन असलेल्या 'राजा शिवाजी' सिनेमाने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. १ मे रोजी प्रदर्शित झालेल्या या ऐतिहासिक सिनेमातून छत्रपती शिवरायांचा धगधगता इतिहास पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर मांडण्यात आला आहे. दोन दिवसांतचरितेश देशमुखच्या'राजा शिवाजी'ने बक्कळ कमाई केली आहे. सिनेमाचं दोन दिवसांचंबॉक्स ऑफिस कलेक्शनसमोर आलं आहे. 'राजा शिवाजी' सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. पहिल्याच दिवशी या सिनेमाने तब्बल १२.४० कोटींचा गल्ला जमवला. या कमाईसह 'राजा शिवाजी' मराठी सिनेमातील आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा ओपनिंग डे ठरला आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही सिनेमाने घसघशीत कमाई केली. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार दुसऱ्या दिवशी १०.५५ कोटींचा बिजनेस 'राजा शिवाजी'ने केला आहे. त्यामुळे दोनचं दिवसांत सिनेमाची कमाई २२.९५ कोटी इतकी झाली आहे. ‘राजा शिवाजी’ या भव्य चित्रपटाविषयी सांगायचं तर, भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक नामांकित आणि अनुभवी कलाकारांचा सहभाग आहे. संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बोमन इराणी, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते, जिनिलीया देशमुख आणि रितेश विलासराव देशमुख यांसारख्या कलाकारांनी या ऐतिहासिक कथानकाला आपला भव्य कलात्मक आधार दिला आहे. विशेष म्हणजे रितेश विलासराव देशमुख यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले असून, त्यांच्या दृष्टीकोनातून हा प्रकल्प अधिक भव्य स्वरूपात साकारला गेला आहे.
6 shares
😊
L
Loksatta
May 3, 2026, 12:52 AM
बॉलीवूडमधील स्टिरिओटाइप तोडलेः नवीन नायक-हिरोईन जोडी उदयास आली

बॉलीवूडमधील स्टिरिओटाइप तोडलेः नवीन नायक-हिरोईन जोडी उदयास आली

गेल्या काही वर्षांत सातत्याने नवनवीन तरुण कलाकारांची फळी बॉलीवूडमध्ये आपला जम बसवू पाहते आहे. मात्र, या नव्या कलाकारांना एकतर तुलनेने व्यावसायिक मोठे चित्रपट मिळत नाहीत किंवा कुठल्या तरी आघाडीच्या कलाकाराबरोबर जोडी जमवत ते प्रेक्षकांसमोर येतात. हिंदी चित्रपटसृष्टीतला नायक-नायिकांचा ठरावीक साचा तोडण्याचा प्रयत्न काही निर्माते – दिग्दर्शक अधूनमधून करत असतात आणि ती समीकरणे यशस्वी ठरली नाही तर गाडी मूळ पदावर येते. मात्र, या वर्षाची सुरुवातच नायक-नायिकांच्या काही नव्या जोड्या आणि नवी समीकरणं जुळवणाऱ्या चित्रपटांनी झाली आहे. विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘ओ रोमिओ’ हा चित्रपट फेब्रुवारीत व्हॅलेंटाइन डेच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात पहिल्यांदाच अभिनेता शाहीद कपूर आणि अभिनेत्री तृप्ती डिमरी ही वेगळी जोडी पडद्यावर एकत्र आली होती. त्याच महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘दो दीवाने सहर में’ या चित्रपटात अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि अभिनेत्री मृणाल ठाकूर अशी हटके जोडी होती. त्याशिवाय, अगदी पूर्णपणे नवीन कलाकारांना एकत्र आणण्याचा प्रयोगही करून पाहिला जातो आहे. अभिनेता आदर्श गौरव आणि अभिनेत्री शनाया कपूर यांचा ‘तू या मैं’ हा चित्रपट त्याचं उत्तम उदाहरण म्हणता येईल. याच आठवड्यात प्रदर्शित झालेल्या ‘एक दिन’ या चित्रपटात आमिर खानचा मुलगा जुनैद खान आणि दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी यांची जोडी पाहायला मिळाली. आता मे महिन्यात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांमध्ये अभिनेत्रीअनन्या पांडेआणि ‘किल’ चित्रपटामुळे लोकप्रिय झालेला अभिनेता लक्ष्य लालवानी यांचा ‘चांद मेरा दिल’ हा चित्रपटही लक्ष वेधून घेतो आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री आणि हिंंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते हेही समीकरण गेल्या दोन-तीन वर्षांत चांगलंच रुळलं आहे. अभिनेत्री रश्मिका मंदानापाठोपाठ आता साई पल्लवी हेही नाव हिंदी चित्रपटसृष्टीत चर्चेत आहे. तिची भूमिका असलेला एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला आहे, तर नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ या बहुचर्चित चित्रपटातही ती अभिनेता रणबीर कपूरबरोबर दिसणार आहे. तेलुगू चित्रपटसृष्टीतून पदार्पण करणारी अभिनेत्री श्रीलीला आणि अभिनेताकार्तिक आर्यनही आणखी एक वेगळी जोडी अनुराग बासू दिग्दर्शित ‘तू मेरी जिंदगी है’ चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. तर दक्षिणेतून येऊन बॉलीवूडमध्ये स्थिरावलेली अभिनेत्री तमन्ना भाटिया आगामी ‘शांताराम’ या प्रसिद्ध दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या आयुष्यावर आधारित चरित्रपटात अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीबरोबर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘वन – द फोर्स ऑफ फॉरेस्ट’ नामक एका चित्रपटातही तमन्ना अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राबरोबर एकत्र काम करते आहे. ‘मुंज्या’ चित्रपटामुळे लोकप्रिय झालेला अभिनेता अभय वर्माचे दोन आगामी चित्रपट सध्या चर्चेत आहेत. ११ जूनला प्रदर्शित होणाऱ्या ‘लाईका लाईका’ या सौरभ गुप्ता दिग्दर्शित चित्रपटात अभय वर्मा आणि अभिनेत्री रवीना टंडन हिची कन्या राशा थडानी यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणच्या बहुचर्चित ‘किंग’ या चित्रपटात अभय वर्मा आणि शाहरुखची कन्या सुहाना खान ही जोडी एकत्र दिसणार असल्याचे सांगितले जाते. जूनमध्ये प्रदर्शित होणारा आणखी एक चित्रपट त्याच्या दिग्दर्शकामुळे आणि नायक-नायिकेच्या जोडीमुळे चर्चेत आहे. प्रेमपटांचा बादशाह असलेल्या इम्तियाज अली दिग्दर्शित ‘मैं वापस आऊंगा’ या आगामी चित्रपटात ‘द आर्चीज’मुळे प्रसिद्ध झालेला अभिनेता वेदांग रैना आणि अभिनेत्री शर्वरी वाघ ही जोडी एकत्र दिसणार आहे. या चित्रपटात गायक-अभिनेता दिलजीत दोसांझ हासुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत आहे. याशिवाय, तरुणाईच्या गळ्यातला ताईत म्हणून ओळखला जाणारा अभिनेता रोहित सराफ त्याच्या आगामी चित्रपटात ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’ या वेबमालिकेमुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री सहर बांबा हिच्याबरोबर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अगदी अलीकडे प्रदर्शित झालेल्या ‘हॅप्पी पटेल खतरनाक जासूस’ याआमिर खानप्रॉडक्शनच्या चित्रपटातून छोटेखानी भूमिका करत अभिनेता इम्रान खानने आपण पुनरागमन करत असल्याची वार्ता दिली होती. आता लवकरच तो नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या ‘अधुरे हम अधुरे तुम’ या आगामी चित्रपटात अभिनेत्री भूमी पेडणेकरबरोबर दिसणार आहे. अभिनेता अक्षय कुमारने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘भूत बंगला’ या चित्रपटात अभिनेत्री वामिका गाबी हिच्याबरोबर काम केले होते. आगामी ‘है जवानी तो इश्क होना है’ या चित्रपटात अभिनेता वरुण धवन पहिल्यांदाच अभिनेत्री पूजा हेगडे आणि अभिनेत्री मृणाल ठाकूरबरोबर दिसणार आहे. तर अभिनेता आयुषमान खुराणा हासुद्धा आगामी ‘पती पत्नी और वोह दो’ या आगामी चित्रपटात अभिनेत्री सारा अली खान, वामिका गाबी आणि रकुल प्रीत सिंग यांच्याबरोबर पहिल्यांदाच काम करताना दिसणार आहे. एप्रिल संपता संपता आणखी एका बातमीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे ते म्हणजे ‘जवान’ चित्रपटात अभिनेता शाहरुख खानबरोबर झळकलेली दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा आणि अभिनेता सलमान खान ही जोडी निर्माते दिल राजू यांच्या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे.
88 shares
😐