Achira News Logo
Achira News
Lokmat logo
Lokmat
May 5, 2026, 02:57 PM
नागपूरमध्ये तापमानात घट, उष्णतेची लाट आटोक्यात

नागपूरमध्ये तापमानात घट, उष्णतेची लाट आटोक्यात

नागपूर:प्रचंड उकाड्याने त्रस्त झालेल्याविदर्भाच्याबहुतेक जिल्ह्यातील नागरिकांना मंगळवारी अखेर काहीसा दिलासा मिळाला. तापमान १ ते २.५ अंशापर्यंत घसरल्याने उष्णतेचा त्रास बऱ्यापैकी कमी झाला. यादरम्यान गाेंदिया जिल्ह्यात वादळासह आणि भंडारा जिल्ह्यात तुरळकपाऊसझाला. ब्रम्हपुरीतही तुरळक पावसाने हजेरी लावली. हवामान विभागाने ३ ते ५ मे दरम्यानविदर्भातीलसर्व जिल्ह्यात वादळासह पावसाचा अंदाज वर्तवला हाेता. मात्र दाेन दिवस ढगांची उपस्थिती राहूनही उन्हाचे चटके व उकाड्याने छळले आहे. अखेर मंगळवारी सूर्याचा ताप घटला.नागपूरलासकाळपासून उन पडले हाेते, पण दुपारनंतर वातावरण बदलले व आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली हाेती.पाऊसहाेईल, अशी स्थिती हाेती, पण ढगांमधून सरी बरसल्या नाही. मात्र उन्हाची तीव्रता बऱ्यापैकी कमी झाली. कमाल तापमान २.४ अंशाने खाली घसरत ४०.८ अंशाची नाेंद झाली. अनेक दिवसानंतर तापमान सरासरीपेक्षा १.९ अंशाने खाली आल्याने उष्णतेचा त्रास कमी झाला. सायंकाळचे वातावरणही आल्हाददायक झाले. रात्रीचे तापमान २.४ अंशाने खाली आले. गाेंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी जाेराचे वादळ आले. काही ठिकाणी पाऊस झाल्याचीही माहिती आहे. मात्र शहरात पावसाची नाेंद झाली नाही. तापमान मात्र २.५ अंशाने घसरत ४० अंशाच्या खाली ३८ अंशावर पाेहचले. भंडारा जिल्ह्यात तुरळक पाऊस झाल्याची माहिती आहे. येथे तापमान २ अंशाने खाली घसरत ३९ अंशावर पाेहचले आहे. ब्रम्हपुरीला ०.६ मिमी पावसाची नाेंद झाली. साेमवारी देशात सर्वाधिक उष्ण असलेल्या ब्रम्हपुरीचे तापमान २ अंशाने घसरून ४२.२ अंशावर आले. इतर जिल्ह्यातही अंशत: घट झाली आहे. हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार अवकाळीचे ढग आणखी एक दिवस आकाशात असतील. त्यामुळे एक दाेन दिवस उकाड्याचा त्रास कमी जाणवेल. त्यानंतर मात्र पारा ३ ते ५ अंशाने उसळण्याची शक्यता असून उन्हाची तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे.
75 shares
😢
Lokmat logo
Lokmat
May 5, 2026, 02:21 PM
पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी पुणे तात्पुरत्या उपाययोजना करत आहे

पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी पुणे तात्पुरत्या उपाययोजना करत आहे

पुणे:शहरातील पावसाचे पाणी साचणाऱ्या ५६ ठिकाणी कायमस्वरूपी उपाय योजना करणे खर्चीक आणि वेळ खाणारे असल्याने या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाच्या उपाययोजना करण्याचे आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले आहेत. त्यामुळे या ५६ ठिकाणी पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिका आयुक्तांनी सोमवारी विभाग प्रमुखांच्या बैठकीत पावसाळापूर्व कामांचा आढावा घेतला. शहरात पावसाळ्यात पाणी साचणारी सुमारे १२० ठिकाणे निश्चित करण्यात आली असून, त्या ठिकाणी सुरू असलेल्या कामांची स्थिती तपासण्यात आली. यावेळी प्रशासनाने सादर केलेल्या अहवालानुसार, १२० पैकी ५६ ठिकाणी नवीन पावसाळी वाहिन्या टाकणे, चेंबर बांधणे, जुन्या वाहिन्या बदलणे आणि पावसाच्या पाण्याच्या निचऱ्यासाठी जाळे विकसित करणे, अशी मोठ्या स्वरूपाची कामे करणे आवश्यक आहे. या कामांसाठी मोठ्या निधीसह किमान सहा ते आठ महिन्यांचा कालावधी लागणार असल्याने ती यंदाच्या पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे शक्य नाही. त्यामुळे या ५६ ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाच्या उपाययोजना करण्याचे आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले आहेत. संबंधित क्षेत्रीय कार्यालयांना तातडीने पाणी निचरा करण्यासाठी आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. पूरस्थिती उद्भवल्यास त्वरित प्रतिसाद देता यावा, यासाठी मनुष्यबळ, यंत्रसामुग्री आणि अन्य उपाययोजना उपलब्ध ठेवण्यासह उर्वरित ६४ ठिकाणांवरील कामे पुढील महिन्याभरात पूर्ण करण्याचे आदेश आयुक्तांनी यावेळी दिले.
42 shares
😐
M
Maharashtra Times
May 5, 2026, 01:43 PM
तारगोलांच्या प्रदूषणामुळे रायगडच्या समुद्रकिनाऱ्यावरील परिसंस्थेला धोका

तारगोलांच्या प्रदूषणामुळे रायगडच्या समुद्रकिनाऱ्यावरील परिसंस्थेला धोका

अमुलकुमार जैन, रायगड:पावसाळ्याची चाहूल लागली असतानाच समुद्रकिनाऱ्यावर चिंताजनक चित्र समोर आले आहे. समुद्रातून वाहून आलेले लहान-लहान डांबराचे गोळे ( टार बॉल्स ) मोठ्या प्रमाणात किनाऱ्यावर साचत असून, यामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. किनाऱ्यावर ठिकठिकाणी दिसणारे हे काळे डाग सागरी प्रदूषणाचे स्पष्ट संकेत देत आहेत. भरतीसोबत येणारे हे डांबराचे गोळे वाळूत पसरत असून, काही ठिकाणी त्यांचे थरही साचलेले दिसून येतात. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही दिवसांत या प्रकारात वाढ झाली असून, किनारपट्टीवर प्रदूषणाचा विळखा अधिक घट्ट होत चालला आहे. वाढत्या दुर्गंधीमुळे पर्यटकांनी पाठ फिरवली असून, किनाऱ्याचे नैसर्गिक सौंदर्य पूर्णपणे धोक्यात आले आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे स्थानिक रहिवासी आणि निसर्गप्रेमींमध्ये आता तीव्र संतापाची लाट उसळली आहे.टार बॉल्स कसे तयार होतात?तज्ज्ञांच्या मते, टार बॉल्स साधारणपणे समुद्रातील तेलगळती (oil spill), जहाजांमधून सोडलेले इंधन व कचरा, तसेच औद्योगिक सांडपाणी यामुळे तयार होतात. समुद्रातील तेल लाटांमुळे घट्ट होऊन लहान गोळ्यांमध्ये रूपांतरित होते आणि भरती-ओहोटीच्या प्रक्रियेमुळे हे गोळे किनाऱ्यावर येऊन साचतात. या प्रदूषणाचा थेट परिणाम सागरी जीवसृष्टीवर होत असून, मासे, खेकडे तसेच इतर समुद्री जीवांना धोका निर्माण होतो. तसेचमच्छिमारांच्या उपजीविकेवरहीयाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. किनाऱ्यावर फिरणाऱ्या पर्यटकांसाठीही हे डांबराचे गोळे त्रासदायक ठरत असून, त्वचेला चिकटणे किंवा आरोग्याच्या तक्रारी निर्माण होण्याचा धोका नाकारता येत नाही.प्रदूषणाबाबत चिंतास्थानिक नागरिकांनी या वाढत्या प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त करत प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. किनारपट्टी स्वच्छ ठेवण्यासाठी विशेष मोहीम राबविणे, प्रदूषणाच्या मूळ कारणांचा शोध घेणे आणि संबंधितांवर कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. समुद्राची ही ‘काळी भेट’ भविष्यात मोठ्या संकटाचे रूप धारण करू नये, यासाठी वेळीचउपाययोजनाकरणे अत्यावश्यक असल्याचे मत सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.
61 shares
😢
Lokmat logo
Lokmat
May 5, 2026, 12:56 PM
वातानुकूलन यंत्रणेतील बिघाडामुळे लागलेली आगः दुर्घटना रोखण्यासाठी धोक्याची चिन्हे ओळखा

वातानुकूलन यंत्रणेतील बिघाडामुळे लागलेली आगः दुर्घटना रोखण्यासाठी धोक्याची चिन्हे ओळखा

वाढत्या उन्हामुळे सध्या घराघरांत एसीचा वापर वाढला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत एसीमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दिल्लीत नुकत्याच झालेल्या एका भीषण दुर्घटनेत ९ जणांना आपला जीव गमवावा लागला. उन्हाळ्यात तापमान ५० अंशांच्या जवळ जात असल्याने एसीवर ताण येतो आणि तांत्रिक बिघाडामुळे त्याचे रूपांतर मोठ्या स्फोटात होऊ शकते. त्यामुळेच, तुमचा एसी ब्लास्ट होण्यापूर्वी काही विशिष्ट वॉर्निंग सिग्नल' देतो, ते ओळखणे अत्यंत गरजेचे आहे. जळल्याचा वास येणे: जर तुम्हाला एसी सुरू केल्यानंतर किंवा इनडोअर युनिटच्या आसपास काहीतरी जळाल्यासारखा वास येत असेल, तर लगेच सावध व्हा. ओव्हरहीटिंग किंवा अंतर्गत वायरिंगमध्ये बिघाड झाल्यामुळे असा वास येतो. अशा वेळी एसी तत्काळ बंद करा. धूर निघताना दिसणे: एसीमधून धूर निघणे ही धोक्याची सर्वात मोठी घंटा आहे. जर तुम्हाला थोडा जरी धूर दिसला, तर स्विच बंद करून मेन पॉवर सप्लाय खंडित करा. जोपर्यंत तंत्रज्ञ येऊन तपासणी करत नाही, तोपर्यंत एसी पुन्हा सुरू करू नका. विचित्र आवाज येणे: एसीमधून काहीतरी तुटल्याचा किंवा आदळल्याचा आवाज येत असेल, तर याचा अर्थ आतील एखादा भाग ढिला झाला आहे किंवा बिघडला आहे. सामान्य आवाजापेक्षा जास्त आवाज येणारा एसी वापरणे धोकादायक ठरू शकते. वारंवार ट्रिप होणे: जर तुमचा एसी आपोआप वारंवार सुरू आणि बंद होत असेल, तर हे ओव्हरहीटिंगचे लक्षण आहे. कॉम्प्रेसरवर जास्त ताण आल्यास असे घडते आणि यामुळे शॉर्ट सर्किटचा धोका वाढतो. गरम हवा किंवा कुलिंग न होणे: खूप वेळ चालूनही एसी ठंडी हवा देत नसेल, तर गॅस गळती असू शकते. तसेच एसीमधून गरम हवा येणे हे मशीन ओव्हरहीट झाल्याचे लक्षण आहे. हे वेळीच दुरुस्त न केल्यास स्फोट होऊ शकतो. पाणी गळती आणि ठिणग्या: एसीमधून पाणी गळत असल्यास आतील इलेक्ट्रॉनिक भागांमध्ये ओलावा जाऊन शॉर्ट सर्किट होऊ शकते. तसेच जर तुम्हाला स्विच बोर्ड किंवा एसी युनिटमध्ये ठिणग्या दिसल्या, तर तो गंभीर तांत्रिक बिघाड आहे. - उन्हाळा सुरू होण्यापूर्वी आणि सुरू असताना एसीची रेग्युलर सर्व्हिसिंग करून घ्या. - एसीचे फिल्टर्स वेळोवेळी स्वच्छ करा. - एसीसाठी दर्जेदार वायरिंग आणि स्टेबलायझरचा वापर करा. - खूप जास्त वेळ सतत एसी सुरू ठेवणे टाळा, मधूनच त्याला विश्रांती द्या. तुमची थोडीशी सतर्कता एका मोठ्या अपघातापासून तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे रक्षण करू शकते.
56 shares
😢
L
Lokmat
May 5, 2026, 12:00 PM
तापमान 44 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने विदर्भातील पाणीटंचाई वाढली

तापमान 44 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने विदर्भातील पाणीटंचाई वाढली

- मोहन भोयरभंडारा:मे महिन्याची सुरुवात होताच सूर्याने आग ओकायला सुरुवात केली असून, त्याचा थेट फटका जलप्रकल्पांना बसू लागला आहे. पूर्व विदर्भातील महत्त्वाचा मानला जाणाऱ्या आंतरराज्यीय बावनथडी (राजीव सागर) प्रकल्पातील जलसाठ्याने आता तळ गाठायला सुरुवात केली आहे. सध्या या प्रकल्पात केवळ २५ टक्केच उपयुक्त जलसाठा शिल्लक असून, बाष्पीभवनाचा वेग वाढल्याने संकट गडद होताना दिसत आहे. प्रखर उन्हाचा फटका आता सिंचन प्रकल्पांनाही बसत आहे. जिल्ह्याचा पारा ४४ अंशांच्या पार गेल्याने प्रकल्पातील पाणी वेगाने कमी होत आहे. प्रकल्पाच्या तांत्रिक वाटणीनुसार, शिल्लक असलेल्या २५ टक्के साठ्यापैकी अर्धे पाणी मध्य प्रदेशच्या वाट्याला जाणार आहे. तहान भागवायची की, उभ्या पिकांना जीवदान द्यायचे!शिल्लक असलेल्या १२ टक्के पाण्यातून लोकांची तहान भागवायची की, उभ्या पिकांना जीवदान द्यायचे, अशा कात्रीत जलसंपदा विभाग अडकला आहे. जर पावसाळा लांबणीवर पडला, तर जून अखेरपर्यंत हे पाणी पुरवणे अशक्य असल्याचे चित्र दिसत आहे. तुमसर आणि मोहाडी तालुक्यांतील शेती पूर्णपणे या प्रकल्पावर अवलंबून असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. यावर आता प्रकल्प विभाग काय निर्णय घेते, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. परिणामीमहाराष्ट्राच्या(भंडाराजिल्हा) वाट्याला जेमतेम १२ ते १२.५ टक्केच पाणी येणार आहे. या अत्यल्प साठ्यामुळे सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. सध्या प्रकल्पात केवळ २५ टक्के जिवंत साठा असून, सिंचन अंतिम टप्प्यात आहे. उपलब्ध पाण्यातमहाराष्ट्रव मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांचा वाटा आहे. कडाक्याचे ऊन पाहता नागरिकांनी व शेतकऱ्यांनी पाण्याचा अत्यंत जपून वापर करणे गरजेचे आहे.- आर. आर. बडोले, अभियंता, बावनथडी प्रकल्प 100 टक्के अनुदानावर बियाणे मिळणार, 'महाडीबीटी' पोर्टलवर अर्ज केला का? असा करा अर्ज
60 shares
😢
L
Lokmat
May 5, 2026, 11:37 AM
निसर्ग चिन्हे ग्रामीण भागात 10-20 दिवसांच्या आत पाऊस सूचित करतात

निसर्ग चिन्हे ग्रामीण भागात 10-20 दिवसांच्या आत पाऊस सूचित करतात

मच्छिंद्र देशमुखकोतुळ : अलीकडे डिजिटल माध्यमे, हवामान तज्ज्ञ, सॅटेलाईट ही साधने पावसाचा अंदाज सांगतात. मात्र, गेल्या शेकडो वर्षांची परंपरा असलेल्यापाऊसयेण्याच्या खुणा आता दिसू लागल्या आहेत. पुढील २० दिवसांतपाऊसहोण्याचे संकेतनिसर्गघटक असलेल्या जीवांनी द्यायला सुरुवात केली आहे. सध्या उष्णता वाढली आहे. मात्र, १ मेपासून हवामान तज्ज्ञांचे अंदाज मोडीत काढून अचानक उष्णता कमी झाली आहे. दरम्यान,निसर्गातपावसाचे संकेत देणाऱ्या 'नेचर इंडिकेटर्स'ने आता २० दिवसांत पाऊस येणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. पावशाचे ओरडणे, पालीची अंडी, वाळवीचे वारूळ बंद करण्याची क्रिया, सापांची वीण, मुंग्यांची हालचाल वाढली आहे. लवकरच पाऊस येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत. ग्रामीण भागातीलशेतकरीहे संकेत पाहून शेतीकामाला लागले आहेत. असे आहेत निसर्ग संकेत◼️ सध्या पाली अंडी घालत आहेत. काही ठिकाणी पिलं बाहेर आली. (१० ते २० दिवसांत पाऊस येणार)◼️ वाळवीने रस्ता, शेत, बांधावरील वारूळ बंद करण्याची सुरुवात केली. (८ ते १० दिवसांत पाऊस)◼️ सापांची वीण सुरू झाली. (१५ ते २० दिवसांत पाऊस)◼️मुंग्यांची रांग लागली, अंडी वहायला सुरुवात. (३ ते ८ दिवसांत पाऊस)◼️पावश्या पक्ष्याचे ओरडणे. (१५ ते २० दिवसांत पाऊस) अधिक वाचा:शेतकरी बांधवांनो कर्जमाफीचा लाभ हवा! तर 'या' कागदपत्राचे आजच प्रमाणीकरण करा
52 shares
😐
Pudhari logo
Pudhari
May 5, 2026, 11:09 AM
वृषभ राशीचे लोक चांगले भाग्य आणि नवीन संधींसाठी सज्ज

वृषभ राशीचे लोक चांगले भाग्य आणि नवीन संधींसाठी सज्ज

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ नशिबाची साथ देणारा ठरेल. कामात येणारे अडथळे आता दूर होतील. प्रवासातून लाभ मिळण्याची शक्यता आहे किंवा एखाद्या नवीन संधीशी तुमची नाळ जुळेल. जर एखादे न्यायालयीन प्रकरण किंवा कागदोपत्री काम अडकले असेल, तर त्यात दिलासा मिळू शकतो. व्यवसायात मोठी डील फायनल होऊ शकते, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल.
3 shares
😊
Pudhari logo
Pudhari
May 5, 2026, 09:51 AM
बांबू बाजार क्षेत्रातील पर्यायी जागेसाठी भाडेपट्टी कराराला विपणन संचालकांचे अडथळे

बांबू बाजार क्षेत्रातील पर्यायी जागेसाठी भाडेपट्टी कराराला विपणन संचालकांचे अडथळे

पुढे बांबू मार्केट परिसरात पर्यायी जागेवर भाडेकरार करण्याचाही प्रयत्न झाला. मात्र, तत्कालीन पणन संचालकांनी त्यास स्थगिती देत याबाबत काही कार्यवाही न करण्याची आदेश दिले होते. आता संचालक मंडळ आल्यावर पुन्हा या डाळिंब यार्डचा विषय समोर आला असून, त्यामध्येही आर्थिक देवघेव करणाऱ्या तसेच मर्जीतील अडतदारांना जागा देण्याच्या विचार सुरू असल्याची चर्चा आहे.
9 shares
😐
Maharashtra Times logo
Maharashtra Times
May 5, 2026, 09:45 AM
नैसर्गिक पाणी पिण्याचे फायदेः फ्रीजचे पाणी आणि मातीचे पाणी यांच्यातील तुलना

नैसर्गिक पाणी पिण्याचे फायदेः फ्रीजचे पाणी आणि मातीचे पाणी यांच्यातील तुलना

पाणी हे केवळ तहान भागवण्यासाठी नसून शरीरातील चयापचय क्रिया आणि तापमानाचे संतुलन राखण्यासाठी महत्त्वाचे असते. फ्रिजमधील पाणी हे कृत्रिमरित्या खूप कमी तापमानाला (सुमारे ४°C ते १०°C) थंड केले जाते, जे शरीराच्या नैसर्गिक तापमानापेक्षा (३७°C) खूपच कमी असते. याउलट, मातीच्या माठातील पाणी 'बाष्पीभवन' (Evaporation) या नैसर्गिक प्रक्रियेने थंड होते, ज्यामुळे त्याचे तापमान साधारणपणे १४°C ते २४°C दरम्यान राहते.'क्लेव्हलँड क्लिनिक'च्या संशोधनानुसार,अतिशय थंड पाणी प्यायल्याने पचनसंस्थेच्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ज्यामुळे अन्नाचे पचन मंदावते. मातीमध्ये निसर्गतः 'अल्कलाईन' (Alkaline) गुणधर्म असतात, जे पाण्याचा pH संतुलित ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे, फ्रिजमधील पाणी केवळ तात्पुरता थंडावा देते, तर माठातील पाणी शरीराला अंतर्गत पोषण आणि नैसर्गिक थंडावा दोन्ही प्रदान करते.पचनसंस्थेवर होणारा परिणाम (Digestion)पचनसंस्थेवर होणारा परिणामफ्रिजमधील अतिशय थंड पाणी पचनक्रियेत अडथळा निर्माण करते.प्रक्रिया :नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रसिद्ध एका अहवालानुसार,थंड पाणी प्यायल्याने पोटात अन्नाचे पचन करण्यासाठी लागणारी उष्णता (जठराग्नी) मंदावते. यामुळे अन्नातील चरबी घट्ट होते आणि पचन कठीण होते.माठाचा फायदा :माठातील पाणी नैसर्गिक तापमानाचे असल्याने पचनक्रिया सुरळीत राहते आणि चयापचय क्रिया (Metabolism) सुधारते.घसा आणि श्वसनसंस्थेच्या समस्या (Throat & Respiratory Health)घसा आणि श्वसनसंस्थेच्या समस्यामेडिकल न्यूजच्या रिपोर्टनुसार,फ्रिजमधील पाणी पिणाऱ्यांना उन्हाळ्यात घसा खवखवणे किंवा सर्दी होण्याचा त्रास जास्त होतो.कारण :अतिथंड पाण्यामुळे श्वसनमार्गात 'म्युक्स' (Mucus) किंवा कफ तयार होतो, ज्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो.माठाचा फायदा :माठातील पाणी घशासाठी सौम्य असते. ज्यांना सायनस किंवा दमा (Asthma) आहे, त्यांच्यासाठी माठातील पाणी हा सर्वोत्तम पर्याय आहे.नैसर्गिक शुद्धीकरण आणि pH संतुलन (Alkaline Nature)नैसर्गिक शुद्धीकरण आणि pH संतुलनमातीमध्ये अनेक खनिजे आणि अल्कलाईन गुणधर्म असतात.pH संतुलन :मेयो क्लिनिकच्याअहवालानुसार ’,आपले शरीर आणि बहुतेक आहार ॲसिडिक असतो. मातीचे अल्कलाईन स्वरूप पाण्याचा pH संतुलित करते, ज्यामुळे ॲसिडिटी आणि गॅसची समस्या कमी होते.शुद्धीकरण :मातीमध्ये सूक्ष्म छिद्रे असतात, जी पाण्यातून काही प्रमाणात अशुद्धी शोषून घेतात आणि पाणी शुद्ध ठेवण्यास मदत करतात.चयापचय क्रिया आणि ऊर्जा (Metabolism Boost)चयापचय क्रिया आणि ऊर्जायुएएमएसच्या रिपोर्टनुसार,फ्रिजमधील पाणी प्यायल्याने शरीराला ते पाणी शरीराच्या तापमानाला (३७°C) आणण्यासाठी अतिरिक्त ऊर्जा खर्च करावी लागते, ज्यामुळे थकवा जाणवू शकतो.माठाचा फायदा :माठातील पाण्यातून शरीराला आवश्यक खनिजे मिळतात आणि ते प्लास्टिकच्या बाटल्यांमधील 'BPA' (Bisphenol A) सारख्या घातक रसायनांपासून मुक्त असते. यामुळे शरीरातील टेस्टोस्टेरॉनची पातळी संतुलित राहण्यास मदत होते.'सन स्ट्रोक' किंवा उष्माघातापासून संरक्षण'सन स्ट्रोक' किंवा उष्माघातापासून संरक्षणउन्हाळ्यात बाहेरून आल्यावर लगेच फ्रिजमधील पाणी पिणे धोक्याचे ठरू शकते.धोका :बाहेरचे तापमान जास्त असताना अचानक अतिथंड पाणी प्यायल्याने शरीराला 'थर्मल शॉक' बसू शकतो, ज्यामुळे चक्कर येणे किंवा हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका असतो.पर्याय :माठातील पाणी शरीराच्या तापमानाशी लवकर जुळवून घेते, त्यामुळे उन्हाळ्यात उष्माघाताचा (Sunstroke) धोका कमी होतो.आरोग्याच्या दृष्टीनेमाठातील पाणीहे फ्रिजमधील पाण्यापेक्षा कित्येक पटीने सरस आणि नैसर्गिक आहे. प्लास्टिकच्या बाटल्यांमधील पाण्याचा वापर कमी करून मातीच्या भांड्यांचा वापर करणे हे पर्यावरणासाठी आणि वैयक्तिक आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
99 shares
😐
P
Pudhari
May 5, 2026, 09:22 AM
वसई-विरार शहरातील पूर रोखण्यासाठी गाळ काढण्याची महापौरांची मागणी

वसई-विरार शहरातील पूर रोखण्यासाठी गाळ काढण्याची महापौरांची मागणी

या बैठकीत महापौरांनी केंद्रीय जल आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ठाणे, कळवा आणि वसई खाडी पात्रातील साचलेला गाळ उपसून खोली वाढवण्याची आग्रही मागणी केली होती. खाडीतील या गाळामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास मोठा अडथळा निर्माण होतो आणि कळवा खाडीपात्रालगत झालेल्या अनधिकृत अतिक्रमणांमुळे वसई- विरार शहरात पुराचा हा धोका अधिकच वाढत असल्याचे महापौरांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते.
60 shares
😢
Pudhari logo
Pudhari
May 5, 2026, 07:35 AM
काँक्रिटायझेशनच्या प्रस्तावावरून पर्यावरणीय चिंता वाढल्या

काँक्रिटायझेशनच्या प्रस्तावावरून पर्यावरणीय चिंता वाढल्या

सेव्ह फ्लेमिंगो आणि मँग्रोव्ह मंचाच्या रेखा संखला यांनी इशारा दिला की, या क्षेत्राचे काँक्रीटीकरण केल्यास पर्यावरणाचे कधीही भरून न निघणारे नुकसान होईल. 17 एप्रिल 2025 रोजी राज्य वन्यजीव मंडळाने या प्रस्तावाला तत्त्वतः मंजुरी दिली असल्याने, आता अंतिम शासन निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
70 shares
😢
P
Pudhari
May 5, 2026, 07:17 AM
प्रमाणित देखभालीच्या प्रक्रियेसह तीन महिन्यांसाठी बंद ठेवण्याची किनारपट्टीवरील बोटींची तयारी

प्रमाणित देखभालीच्या प्रक्रियेसह तीन महिन्यांसाठी बंद ठेवण्याची किनारपट्टीवरील बोटींची तयारी

बोटीतील इंजिन ऑइल काढण्यात येते कारण पुढील 3 महिने बोट बंद असलयाने इंजिन खराब होऊनये म्हणून प्लस्टिकमध्ये बांधून सुरक्षित करण्यात येते. बोटीचा पंखा काढण्यात येतो. बोटीच्या खालील भागाला ऑइल लाऊन पाण्यापासून सुरक्षित करतात हे किनाऱ्यावरील सर्व मोठी बोटीनं बाबतीत होते.
59 shares
😢
Pudhari logo
Pudhari
May 5, 2026, 06:53 AM
ग्रामीण रिसॉर्ट्स आणि फार्महाऊसेसः शहरी पर्यटकांसाठी एक मोठे आकर्षण

ग्रामीण रिसॉर्ट्स आणि फार्महाऊसेसः शहरी पर्यटकांसाठी एक मोठे आकर्षण

ॲग्रो टुरिझम आणि फार्महाऊसची क्रेझ शहरी पर्यटकांना ग्रामीण भागातील रिसॉर्ट, फार्म हाऊस आणि ऍग्रो टुरिझमचे मोठे आकर्षण आहे. निसर्गरम्य वातावरणात शुद्ध हवा आणि चुलीवरच्या सात्विक जेवणाचा आनंद पर्यटक घेत आहेत. मोबाईल नेटवर्कपासून दूर राहून रिफ्रेश होण्याकडे पर्यटकांचा कल असून, स्विमिंग पूल असलेल्या रिसॉर्ट्सना अधिक मागणी आहे. ट्रेकिंग, कॅम्पिंग आणि टेंटमधील वास्तव्याचा अनुभव युवा वर्गासाठी खास आकर्षण ठरत आहे.
82 shares
😊
Pudhari logo
Pudhari
May 5, 2026, 06:29 AM
महाराष्ट्र सरकारने पक्षी निरीक्षण उपक्रमांसह पर्यावरण संरक्षण उपक्रम सुरू केला

महाराष्ट्र सरकारने पक्षी निरीक्षण उपक्रमांसह पर्यावरण संरक्षण उपक्रम सुरू केला

या उपक्रमाचा मुख्य उद्देश पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करणे हा आहे. आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांना पत्र लिहून हा प्रकल्प लवकरात लवकर नागरिकांसाठी सुरू करण्याची विनंती केली होती. या कांदळवन उद्यानात पक्षीनिरीक्षणासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असून पक्ष्यांच्या विविध प्रजाती पाहण्याची संधीही नागरिकांना मिळणार आहे.
34 shares
😊
Pudhari logo
Pudhari
May 5, 2026, 05:41 AM
मुंबईच्या पश्चिम आणि पूर्व द्रुतगती मार्गावरील पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू

मुंबईच्या पश्चिम आणि पूर्व द्रुतगती मार्गावरील पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू

पुलांच्या डागडुजीची कामे सुरू पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाकोला, आरे, दत्तपाडा, राष्ट्रीय उद्यान व रावळपाडा व पूर्व द्रुतगती महामार्गावरील कुर्ला, छेडा नगर, एससीएलआर, घाटकोपर, विक्रोळी, ऐरोली जंक्शन उड्डाण पुलाच्या पृष्ठभागाची दुरवस्था झाली आहे. या पुलांची मास्टिक वापरून सुधारणा करण्यात येत आहे. त्यामुळे पावसाळ्यात उड्डाणपूलही खड्डेमुक्त होणार आहेत.
65 shares
😐
Pudhari logo
Pudhari
May 5, 2026, 05:20 AM
लोणावळा नगरपरिषदेने पावसाळ्यापूर्वी इंद्रायणी नदी आणि नाल्यांची स्वच्छता सुरू केली

लोणावळा नगरपरिषदेने पावसाळ्यापूर्वी इंद्रायणी नदी आणि नाल्यांची स्वच्छता सुरू केली

गाळ काढण्याच्या कामाला आला वेग पावसाळा जेमतेम एक महिन्यावर आला असल्याने लोणावळा नगर परिषदेने इंद्रायणी नदी तसेच शहरातील नाले सफाईच्या कामाला सुरुवात केली आहे. मात्र, हे काम योग्य प्रकारे होत आहे की नाही यावर लोणावळा नगर परिषदेच्या अधिकारी तसेच नगरसेवकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. इंद्रायणी नदी सफाईच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीला काम अगदीच वरवर सुरू होते. याबाबत नागरिकांनी तक्रार केल्यानंतर पुन्हा जलपर्णी काढलेल्या ठिकाणी गाळ काढण्यास सुरुवात केली आहे. तसेच, वरवर काढलेली जलपर्णी पुन्हा मुळांपासून काढण्यास सुरुवात केली आहे. जलपर्णी काढल्यानंतर ती नदीच्या काठावर न ठेवता ती वाहून नेऊन दुसरीकडे टाकावी; अन्यथा पावसात पुन्हा ती वाहून नदीपात्रात येते, असे नागरिकांनी सांगितले आहे.
50 shares
😐
Lokmat logo
Lokmat
May 5, 2026, 04:11 AM
नवीन वाहन स्क्रॅपेज धोरणामुळे भारतीय वाहन उद्योगाला मोठा आर्थिक फटका

नवीन वाहन स्क्रॅपेज धोरणामुळे भारतीय वाहन उद्योगाला मोठा आर्थिक फटका

नवी दिल्ली :नव्या वाहन भंगार (स्क्रॅप) धोरणामुळे वाहन उद्योगाला आर्थिक धक्का बसणार आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये वाहन उत्पादक कंपन्यांच्या निव्वळ नफ्यात तब्बल २५ हजार कोटी रुपयांची मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जुन्या वाहनांच्या ‘पर्यावरणीय भरपाई’साठी कंपन्यांना मोठी आर्थिक तरतूद करावी लागणार आहे. पर्यावरण आणि वन मंत्रालयाने ‘पर्यावरण संरक्षण नियमावली २०२५’ अधिसूचित केली आहे. KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल वाहनांच्या विल्हेवाटीची जबाबदारी कंपन्यांवर ‘नियम ४(६)’ नुसार, एखादी वाहन कंपनी भविष्यात बंद पडली तरी, तिने भूतकाळात विकलेल्या सर्व वाहनांच्या विल्हेवाटीची जबाबदारी तिलाच पार पाडावी लागेल. या एका नियमामुळे ऑडिटर्सनी कंपन्यांना सावध केले असून, त्याचा थेट परिणाम चालू नफ्यावर होत आहे.
63 shares
😐
Pudhari logo
Pudhari
May 5, 2026, 03:01 AM
31 मजली निवासी इमारतीतील अग्निसुरक्षेची चिंता

31 मजली निवासी इमारतीतील अग्निसुरक्षेची चिंता

त्यानंतर एका काही मजल्यावर अलार्म बसविण्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र, अद्याप संपूर्ण प्रकल्पातील फायर सिस्टिम कार्यान्वित झालेली नाही. ही इमारत तब्बल 31 मजली असून, आग लागल्यास फायर सिस्टीमअभावी मोठी जीवितहानी होऊ शकते, अशी भीती रहिवाशांनी व्यक्त केली आहे.
39 shares
😢
M
Maharashtra Times
May 5, 2026, 01:30 AM
पेपर कचरा कमी करण्यासाठी महाराष्ट्र बोर्डाचा डिजिटल परीक्षांचा विचार

पेपर कचरा कमी करण्यासाठी महाराष्ट्र बोर्डाचा डिजिटल परीक्षांचा विचार

Digital Examinations for SSC and HSC Maharashtra Board:महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी-बारावीच्या परीक्षा भविष्यात डिजिटल पद्धतीने घेण्याचे संकेत दिले आहेत. यंदाच्या बारावी परीक्षेसाठी तब्बल १९०० टन कागद आणि कोट्यवधी पाने वापरण्यात आली, ज्यासाठी हजारो झाडांची कत्तल होते. हे टाळण्यासाठी 'पेपरलेस' परीक्षेचा विचार सुरू असून बारामतीत प्रायोगिक तत्त्वावर राबवलेला 'जीपीएस डिजिटल लॉक' प्रयोग यशस्वी झाला आहे. यामुळे आता बोर्डाच्या परीक्षा हायटेक होणार असून पर्यावरणाचे रक्षण होण्यास मदत होईल.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेतल्या जाणाऱ्या दहावी- बारावीच्या परीक्षा पुढील काळात डिजिटल पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. त्यासाठी आवश्यक तेवढ्याच ठिकाणी कागद वापरून अन्य ठिकाणी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे सूतोवाच राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी केले.कुलकर्णी यांनी इयत्ता बारावीचा निकाल जाहीर करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘बारावी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका छपाईसाठी दहा कोटी ७२ लाख ८०,३६० पाने, नमूना उत्तरपत्रिकांसाठी १९ लाख २९,३८० पाने अशी एकूण दहा कोटी ९२ लाख ९,७४० पानांवर छपाई करण्यात आली. एकूण २२३ टन कागद वापरण्यात आला. एक कोटी सहा लाख ५६ हजार उत्तरपत्रिकांची छपाई केली असून, त्यासाठी १७०० टन कागद वापरला. परीक्षेसाठी लागणारा कागद झाडांपासून तयार होतो. पर्यावरणाचा विचार करता पुढील काळात बोर्डाच्या परीक्षा या डिजिटल पद्धतीने घ्याव्या लागतील. तेव्हाच कागदाचा वापर कमी होईल.’Mumbai University Admission: मुंबई विद्यापीठ पदवी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर! ६ मे पासून नोंदणी सुरू, २६ मे ला पहिली मेरिट लिस्ट; पहा सविस्तर वेळापत्रकप्रश्नपत्रिकांसाठी नवी पद्धतफेब्रुवारी-मार्च २०२६ परीक्षेसाठी बारामती तालुक्यामध्ये दहावी-बारावी परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका सुरक्षितरित्या पोहचविण्यासाठी ‘जीपीएस इनबिल्ट डिजिटल लॉक विथ ट्रंक’चा वापर प्रायोगिक तत्त्वावर यशस्वीरीत्या करण्यात आला. त्याचा वापर राज्यभरात करता येईल किंवा कसे, या दृष्टीने निर्णय घेतला जाईल, असेही सांगण्यात आले.
88 shares
😐
P
Pudhari
May 5, 2026, 12:05 AM
किफायतशीर खर्च आणि पर्यावरणीय फायद्यांसह ई-वाहनांना लोकप्रियता मिळाली

किफायतशीर खर्च आणि पर्यावरणीय फायद्यांसह ई-वाहनांना लोकप्रियता मिळाली

ई-वाहनांसाठी देखील खर्च अत्यल्प येत आहे. त्यामुळे दीर्घकालीन बचत होण्यास मदत होत आहे. प्रदूषणमुक्त, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक प्रवास, दुचाकी एकदा चार्जिंग केल्यानंतर सुमारे 100 ते 150 कि.मी. अंतर कापत आहे.
15 shares
😊
Pudhari logo
Pudhari
May 5, 2026, 12:00 AM
संवर्धनाच्या प्रयत्नांवर चर्चा करण्यासाठी वन अधिकाऱ्यांची बैठक

संवर्धनाच्या प्रयत्नांवर चर्चा करण्यासाठी वन अधिकाऱ्यांची बैठक

बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, कोल्हापूर विभागाच्या मुख्य वनसंरक्षक श्रीलक्ष्मी अन्नाबथुला, उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, सह्याद्री व्याघ्रप्रकल्पाचे क्षेत्र संचालक तुषार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव आदी प्रत्यक्ष तर राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) श्रीनिवास रेड्डी, कोयना वन्यजीव विभागाचे उपसंचालक आणि महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक हे ऑनलाईन प्रणालीद्वारे उपस्थित होते.
12 shares
😐
Pudhari logo
Pudhari
May 4, 2026, 11:55 PM
या उन्हाळ्यात थंड रहाः शरीर निर्विषीकरणासाठी धणे चहा आणि कोथिंबीर पाणी

या उन्हाळ्यात थंड रहाः शरीर निर्विषीकरणासाठी धणे चहा आणि कोथिंबीर पाणी

धन्याचा चहा व कोथिंबीर पाणी :शरीरातील उष्णता व हानिकारक विषारी घटक बाहेर काढतो. लघवी साफ होऊन शरीर शुद्ध करते व यामुळे डिटॉक्स होतो. एक चमचा धने कुटून पाण्यात उकळून प्या. साखर कमी :साखरेने शरीरात उष्णता वाढते. गुळ किंवा मधाचा चहा घ्या, तोही कमी असलेला घ्या. दूध चहा टाळा :दुधाचा चहा पचायला जड आणि उष्ण असतो. शक्यतो काळा आणि औषधी वनस्पतींपासून बनवलेले, वनस्पतीजन्य किंवा वनौषधी चहा घ्या. सध्या उन्हाळा तीव्र असून या दिवसात शरीर थंड राहणे
60 shares
😐
P
Pudhari
May 4, 2026, 11:12 PM
सापांच्या रात्रीच्या क्रियाकलापांचे नमुने उघड

सापांच्या रात्रीच्या क्रियाकलापांचे नमुने उघड

तापमान अनुकूल झाल्यावर, उष्णता वाढल्यावर साप सक्रिय होतात. ते दिवसा कमी आणि रात्री जास्त दिसतात. कारण, त्यांना थंड वातावरण आवडते. साप झोपलेला असताना त्याच्या श्वासाची गती आणि लय मंदावते. एखादा आवाज अथवा हालचालीवर ते लागलीच प्रतिक्रिया देत नाहीत. उन्हाळ्यात वातावरण अधिक उष्ण असल्याने साप दिवसा बाहेर पडत नाहीत. 10 ते 12 तास आराम करून ते रात्री बाहेर पडतात. तर पावसाळ्यात पावसामुळे आणि थंडपणामुळे ते दिवसा बाहेर पडत नाहीत. तर रात्री सावज टिपण्यासाठी ते बाहेर पडतात; पण जसे तापमान वाढते तसे साप बिळात लपतात.
40 shares
😐
L
Loksatta
May 4, 2026, 08:01 PM
हवामान बदल आणि खराब हवामानामुळे भारतीय विमान वाहतुकीला मोठा फटका

हवामान बदल आणि खराब हवामानामुळे भारतीय विमान वाहतुकीला मोठा फटका

मुंबई :वातावरणातील बदल, खराब हवामान यांचा मोठा फटका विमान वाहतुकीला बसत असून देशभरात १९.१ टक्के उड्डाणे हवामानाच्या कारणांसाठी रद्द झाल्याचे नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या २०२६च्या पहिल्या तिमाहीच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्याशिवाय वेळेत उड्डाण न झाल्यानेही प्रवाशांना त्रास सहन करावा लागला असून यामध्ये प्रतिक्रियात्मक विलंब हा घटक सर्वाधिक परिणामकारक ठरला आहे. हवामानातील बदलांमुळे विमानांची उड्डाणे उशिरा होणे, रद्द करणे किंवा वळवणे यांसारख्या समस्या उद्भवतात. विमानोड्डाण रद्द होण्यासाठी तांत्रिक कारणे ३८.४ टक्के तर परिचालनात्मक कारणे २७.२ टक्के कारणीभूत ठरतात. देशांतर्गत रद्द झालेल्या उड्डाणांमध्ये मार्च महिन्यात ‘इंडियावन एअर’चे प्रमाण सर्वाधिक होते. त्यामागोमाग ‘अलायन्स एअर’, ‘स्पाइस जेट’, ‘फ्लाय वन’, ‘स्टार एअर’, ‘एअर इंडिया ग्रुप’, ‘इंडिगो’ आणि ‘अकासा एअर’ची विमाने रद्द झाली आहेत. ‘अकासा एअर’ची मार्च महिन्यात ०.०७ टक्के उड्डाणे रद्द झाली. ही उड्डाणे सहा टक्के वेळा व्यावसायिक कारणांसाठी रद्द झाली. विमानतळावर प्रवाशांना विलंबाने होणार्‍या विमानोड्डाणांच्या त्रासाचाही सामना करावा लागला आहे.मुंबईविमानतळावर २७.६ टक्के वेळा विमानांचे उड्डाण विलंबाने झाले, तर वक्तशीरपणामध्ये चेन्नई विमानतळाचा क्रमांक मार्चमध्ये सर्वात वरचा आहे. विमानोड्डाणाच्या विलंबाच्या कारणांमध्ये ६६ टक्के प्रमाण प्रतिक्रियात्मक विलंबाचे आहे, तर १० टक्के परिचालनात्मक समस्या, नऊ टक्के हवाई वाहतूक नियंत्रण समस्या, चार टक्के तांत्रिक, तीन टक्के विमानतळ आणि दोन टक्के प्रवासी अशी कारणे स्पष्ट केली आहेत. विलंबाची नोंद करताना नियोजित वेळेनंतर किमान १५ मिनिटांनी उड्डाणे गृहीत धरण्यात येते. मार्च २०२६ मध्ये देशभरात ०.९२ टक्के विमानांना दोन तासांहून अधिक विलंब झाला. यात ‘स्पाइस जेट’चे प्रमाण सर्वाधिक होते. ’बदलत्या हवामानाचा आणि वाढत्या जागतिक तापमानाचा विमान वाहतूक क्षेत्राला मोठा फटका बसत आहे. यामुळे केवळ उड्डाणांना उशीर होत नाही तर विमान कंपन्यांचे आर्थिक नुकसानही होते. ’हवेतील उष्णता वाढल्यामुळे आणि हवामानाच्या अनिश्चिततेमुळे आता कोणत्याही ऋतूत विमानाला हादरे बसण्याचे प्रमाण वाढले आहे.
10 shares
😢
Pudhari logo
Pudhari
May 4, 2026, 06:30 PM
मान्सूनपूर्वी भारतात अचानक उष्णतेची लाट

मान्सूनपूर्वी भारतात अचानक उष्णतेची लाट

गतवर्षी पाऊसमान चांगला झाल्याने थंडी मोठ्याप्रमाणात सुटली होती. उन्हाळाही त्रासदायक नसतील असा अंदाज होता. परंतु, अंदाज चुकवत एप्रिल पाठोपाठ मे महिनाही तापदायक ठरत आहे. सोमवारी 40.8 अंश सेल्सिअस, तर रविवार, दि. 3 मे रोजी 42.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले होते. येत्या पावसाळ्यावर एल निनोचा सावट असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मे महिन्याचा पहिला आठवडा संपत आला आहे. अजूनही उष्णतेच्या झळात दिवसेंदिवस वाढ होत आहे. पुढील आठवड्यात सोलापूरचे तापमान 44 अंशांवर जाण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
21 shares
😐
Lokmat logo
Lokmat
May 4, 2026, 01:44 PM
अवकाळी उष्णतेनंतरही विदर्भात पावसाची शक्यता

अवकाळी उष्णतेनंतरही विदर्भात पावसाची शक्यता

नागपूर:विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात दाेन दिवस मध्यम ते जाेरदारपाऊसहाेईल, असा वेधशाळेचा अंदाज साेमवारी चुकला. सायंकाळी ढगाळ वातावरण हाेते, पण कुठेही पावसाची नाेंद झाली नाही. उलट पारा वाढून उन्हाच्या चटक्यांनी छळ केला. मात्र २४ तासात अवकाळीचे ढग बरसतील, असा अंदाज कायम आहे. शनिवारपासून असलेल्या काहीशा ढगाळ वातावरणामुळे रविवारीतापमानातघट झाली हाेती.नागपूरचापारा सरासरीच्या खाली येत ४१.८ अंशाची नाेंद झाली हाेती. मात्र साेमवारी त्यात १.४ अंशाची वाढ हाेत पारा ४३.२ अंशावर गेला. चंद्रपूरलातापमानातअंशत: घट हाेत ४३.४ अंशाची नाेंद झाली, पण जिल्ह्यात ब्रम्हपुरीचा पारा चढून ४४.४ अंशावर गेला, जी राज्यात सर्वाधिक नाेंद आहे. वर्धा, गडचिराेली, अकाेल्यात अंशत: वाढ हाेत ४३ च्यावर तापमान गेले आहे. अमरावती, वाशिम ४२ व इतर जिल्ह्यात पारा ४० अंशावर आहे. हवामान विभागाने ३ ते ५ मे दरम्यान विदर्भात ढगाळ वातावरण, वादळासह मध्यम ते जाेरदारपाऊसहाेईल, असा अंदाज वर्तवला हाेता. वेधशाळेचा अंदाज आणखी २४ तासाकरीता कायम आहे. सध्याच्या निरीक्षणानुसार काही दिवस उनसावल्यांचा खेळ कायम राहण्याची शक्यता आहे. त्यानुसार मेच्या पहिल्या आठवड्यात उन्हाचा तीव्र त्रास हाेणार नाही. मात्र सूर्याचे उत्तरायण सुरू असल्याने व हा प्रवास महाराष्ट्रावरून हाेत असल्याने उन्हाचे चटके वाढतील, हे निश्चित मानले जात आहे. गतवर्षी नवतपादरम्यान पावसाळी वातावरणामुळे उन्हाची तीव्रता फारशी जाणवली नाही. यावर्षीचा नवतपा तापवताे की दिलासा देताे, हे वातावरणाच्या बदलावरून दिसून येईल.
41 shares
😐
L
Lokmat
May 4, 2026, 11:55 AM
सूर्यप्रकाशामुळे लोअर दुधना प्रकल्पातील पाणीसाठ्यात घट

सूर्यप्रकाशामुळे लोअर दुधना प्रकल्पातील पाणीसाठ्यात घट

जालना जिल्ह्याच्या परतूर तालुक्यात वाढत्या उन्हामुळे निम्न दुधना प्रकल्पातीलपाणीसाठाझपाट्याने घटत असून, सध्याधरणात३९.७७ टक्के जिवंत जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळेपाणीटंचाईनिर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ३ मे रोजी सकाळी ६ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार,धरणातीलपाणीसाठा समाधानकारक असला तरी उन्हामुळे पाण्याची पातळी हळूहळू कमी होत आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी याच दिवशी धरणात ३३.५३ टक्के साठा होता. यंदा त्यात सुमारे ६ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. सध्या धरणाची पाणीपातळी ४२३.४४० मीटर असून, एकूण जलसाठा १९८.९३० दशलक्ष घनमीटर आहे. धरणाची साठवण क्षमता ३४४.८०० दशलक्ष घनमीटर असली तरी त्यापैकी उपयुक्त (जिवंत) साठा ९६.३३० दशलक्ष घनमीटर इतकाच उपलब्ध आहे. कालव्यांद्वारे सध्या कोणताही विसर्ग सुरू नसून डावा (एलबीसी) व उजवा (आरबीसी) कालवा शून्य क्युसेक्सवर आहेत. दीड महिन्यात २१.४१ टक्के पाणीसाठा कमी १२ मार्च रोजी प्रक्रल्पात ५५.१८ टक्के तर, ३ मे रोजी ३३.७७ टक्के जलसाठा आहे. दीड महिन्यात २१.४१ टक्के पाणीसाठा कमी झाला आहे. ०.१० दशलक्ष घनमीटर पाण्याचे होते बाष्पीभवन • मात्र, उन्हाळी आवर्तनासाठी उजव्या कालव्याद्वारे ०.०६० दशलक्ष घनमीटर पाण्याचा वापर नोंदविला. पिण्यासाठी व बिगरसिंचन कामांसाठी रोज सरासरी ०.०३१० दशलक्ष घनमीटर पाण्याचा वापर होत आहे. • दरम्यान, तापमानामुळे जलाशयातून रोज अंदाजे ०.१० दशलक्ष घनमीटर पाण्याचे बाष्पीभवन होते. यंदा चांगल्या पावसामुळे धरणात आतापर्यंत ५९५.३२८ दशलक्ष घनमीटर पाण्याची आवक झाली होती. आगामीकाळात पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती • सध्या धरणातूननदीपात्रातकिंवा मुख्य कालव्यांतून मोठा विसर्ग सुरू नसला, तरी उपलब्ध साठा लक्षात घेता आगामी पावसाळ्यापर्यंत पिण्याचे पाणी व नियोजित सिंचनासाठी प्रशासनाने योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. • अन्यथा पुढील काही दिवसांत पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. अतिरिक्त साठ्यामुळे ४८१.५३० दशलक्ष घनमीटर पाणी सांडव्याद्वारे विसर्जित केले होते. हेही वाचा : हिरवळीचे खते देतील साथ; शेतकरी राजांनो, यंदा शेती खर्चात करा मोठी कपात
79 shares
😐
Lokmat logo
Lokmat
May 4, 2026, 11:25 AM
महाराष्ट्रात मे महिन्यात तीव्र सूर्यकिरण आणि शून्य छाया दिवस अनुभवले जातील

महाराष्ट्रात मे महिन्यात तीव्र सूर्यकिरण आणि शून्य छाया दिवस अनुभवले जातील

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर:एप्रिल महिन्यात लोकांची लाहीलाही करणारा सूर्य मे महिन्यातही चांगलाच तळपणार असे चित्र आहे. दक्षिणेकडून सूर्याने उत्तरायणाचा प्रवास सुरू केला असून, अक्षवृत्तीय स्थितीनुसार ३ ते ३१ मे या कालावधीत सूर्य विशेषतः महाराष्ट्राच्या डोक्यावरून जाणार आहे, ज्यामुळे उन्हाचे चटके आणखी तीव्र होण्याची शक्यता अधिक आहे. मे महिन्यात विदर्भातील जिल्ह्यात कमालतापमान४६ अंशांच्या पार जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. राज्याची भौगोलिक स्थिती १५ ते २२ उत्तर अक्षांश असून, सूर्यकिरणे सरळ पडण्याचा कालावधी सुमारे २८ दिवसांचा राहील. त्याची सुरुवात दक्षिणेकडून उत्तरेकडे असेल. या कालावधीत पूर्व-पश्चिम सुमारे एका अंशाच्या १०० किलोमीटर अंतराच्या पट्टयातील ठिकाणी सूर्य किरणे लंब रूपात पडतील, त्या-त्या भागात माध्यान्हाचे वेळी सूर्य नेमका डोक्यावर येईल. या ठिकाणी शून्य सावली दिवस अनुभवता येईल. राज्यात शून्य सावली कधी, कुठे? महाराष्ट्रात ३ मे ते ३१ मेपर्यंत शून्य सावली दिवस येतात. कोल्हापूर जिल्ह्यातील सावंतवाडी येथे ३ मे रोजी, तर धुळे जिल्ह्यात ३१ मे रोजी शून्य सावली दिवस अनुभवता येतो. भारतातून शेवटी मध्य प्रदेशातील भोपाळ जवळून २३.५० अंशांवरून कर्कवृत गेले आहे. त्यामुळे शून्य सावलीचा हा भारतातील शेवटचा भूभाग आहे. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या अक्षवृत्तांवर वेगळे दिवस आणि वेळा आहेत. त्यामुळे सर्व शहरे आणि गावांच्या वेळात काही सेकंदांचा फरक आहे. दुपारी १२:०० ते १२:३५ या वेळात सूर्य निरीक्षण करता येईल. ३ मे - सावंतवाडी, शिरोडा मांगेली, खुशगेवाडी, आंबोली.१८ मे - पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व मुंबई, कोकणचा भाग.१८ मे - विदर्भाच्या प्रदेशात शून्य सावली अनुभवता येईल.१८ मे - पालघर, कसारा, संगमनेर, अंबाड, हिंगोली, मूलचेरा.१९ मे - औरंगाबाद, डहाणू, नाशिक, कोपरगाव, वैजापूर, जालना, पुसद, बल्लारशा, चामोर्शी.२० मे - चंद्रपूर, मेहकर, वाशीम, वणी, मूल.२१ मे - मनमाड, चिखली, गडचिरोली, सिंदेवाही, रोहना.२२ मे-मालेगाव, चाळीसगाव, बुलढाणा, खोपोली, यवतमाळ, आरमोरी.२३ मे - खामगाव, अकोला, देसाईगंज, ब्रम्हपुरी, नागभीड.२४ मे - धुळे, जामनेर, शेगाव, वर्धा, उमरेड, दर्यापूर.२५ मे - जळगाव, भुसावळ, अमरावती, अंमळनेर, तेल्हारा.२६ मे -नागपूर, भंडारा, परतवाडा, चोपडा.२७ मे - नंदुरबार, शिरपूर, बुन्हाणपूर, परतवाडा, चिखलदरा, तुमसर, गोंदिया, सावनेर, काटोल, रामटेक.
17 shares
😐
Pudhari logo
Pudhari
May 4, 2026, 10:40 AM
करमवीर नगरमधील पिंपरी ठाकूरपाडा येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

करमवीर नगरमधील पिंपरी ठाकूरपाडा येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

दरम्यान, कर्मवीर नगरीतील पिंपरी ठाकूरपाडा परिसरात पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. जमिनीत केमिकल असल्याने बोअरवेलमधून दूषित पाणी येत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नळपाणी योजना अपूर्ण आहे. याशिवाय वाहतूक कोंडी, रस्त्यांवरील अतिक्रमण आणि भंगार माफियांचा वाढता त्रास यामुळे नागरिक त्रस्त आहेत.
40 shares
😢
Lokmat logo
Lokmat
May 4, 2026, 09:41 AM
स्पाईस लाउंज फूड वर्क्सच्या शेअर बाजारात तेजी

स्पाईस लाउंज फूड वर्क्सच्या शेअर बाजारात तेजी

शेअर बाजारामध्येअसे अनेक शेअर्स असतात जे कधी तीव्र घसरणीमुळेगुंतवणूकदारांनाघाबरवतात, तर कधी जबरदस्त परतावा देऊन थक्क करतात. असाच एक स्टॉक म्हणजे 'स्पाइस लाउंज फूड वर्क्स' (Spice Lounge Food Works). सोमवारी ५ टक्क्यांच्या अपर सर्किटसह हा शेअर ₹२०.५१ च्या पातळीवर पोहोचला, ज्यामुळे गेल्या ६ दिवसांपासून सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक लागला. विशेष म्हणजे गेल्या १ आठवड्यात हा शेअर २०% पेक्षा जास्त घसरला होता, परंतु अचानक झालेल्या खरेदीमुळे तो सावरला. बाजारातील सकारात्मक वातावरणाचाही याला मोठा पाठिंबा मिळाला. बीएसई (BSE) सेन्सेक्स ७०० अंकांपेक्षा जास्त वधारला आणि निफ्टी-५० १% पेक्षा जास्त वाढून २४,२०० च्या पार पोहोचला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकातील मजबुतीमुळे या स्टॉकला सपोर्ट मिळाला. एकेकाळी काँक्रिटच्या जमिनीवर झोपायचे लक्ष्मी मित्तल; आता ₹२७०००० कोटींची नेटवर्थ, IPL टीमचेही बनले मालक जरी आज शेअर वधारला असला, तरी याच्या अलीकडील कामगिरीवर नजर टाकल्यास चित्र फारसं चांगलं चित्र दिसत नाही. गेल्या एका महिन्यात हा शेअर सुमारे २३% नं घसरलाय. तर तीन महिन्यांत यात २८% ची घसरण झाली आहे. २०२६ च्या सुरुवातीपासून आतापर्यंत या शेअरमध्ये ४६% घसरण नोंदवण्यात आली. गेल्या ६ महिन्यांत हा स्टॉक सुमारे ६३% नं घसरलाय, जे यामधील उच्च अस्थिरता दर्शवते. घसरण होऊनही दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी हा स्टॉक एखाद्या 'मल्टीबॅगर' पेक्षा कमी नाही. गेल्या २ वर्षांत या शेअरनं सुमारे ४००% परतावा दिलाय. ५ वर्षांत हा शेअर १,४००% पेक्षा जास्त वाढला आहे. म्हणजेच एखाद्या गुंतवणूकदारानं ५ वर्षांपूर्वी यात १ लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याचं मूल्य अनेक पटींनी वाढलं असतं. आजच्या कामकाजाच्या सत्रात स्पाइस लाउंज फूड वर्क्स लिमिटेडच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली. स्टॉक सुमारे ५% च्या उसळीसह ₹२०.५१ वर पोहोचला आणि अपर सर्किटला स्पर्श केला. ट्रेडिंग व्हॉल्यूममध्येही वाढ दिसून आली. स्पाइस लाउंज फूड वर्क्स हा एक स्मॉलकॅप स्टॉक आहे, ज्यामध्ये जोखमीसोबतच मोठ्या परताव्याची शक्यता देखील जोडलेली आहे. अशा शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी बाजाराची चाल आणि कंपनीचे फंडामेंटल समजून घेणे आवश्यक आहे, कारण येथे चढ-उतार वेगाने होतात. (टीप- यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
77 shares
😢
Lokmat logo
Lokmat
May 4, 2026, 09:18 AM
महाराष्ट्रातील संभाजीनगर जिल्ह्यात धरण पूर्ण भरलेले असूनही गावांमध्ये पाण्याची टंचाई

महाराष्ट्रातील संभाजीनगर जिल्ह्यात धरण पूर्ण भरलेले असूनही गावांमध्ये पाण्याची टंचाई

प्रवीण निपाणे छत्रपती संभाजीनगरजिल्ह्याच्या कन्नड तालुक्यातील शिवना टाकळी धरण ५४ टक्के भरलेले असतानाही, वैजापूर तालुक्यातील ४० गावांना तीव्रपाणीटंचाईचासामना करावा लागत आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे विहिरींनी तळ गाठल्याने पिके धोक्यात आली असून, पिण्याच्या पाण्यासाठी जनावरांची भटकंती सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, उजव्या कालव्यालापाणीसोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली असून, यासंदर्भात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे साकडे घातले आहे. यंदा धरण १०० टक्के भरल्याने शेतकऱ्यांनी गहू, हरभरा, कांदा, ऊस आणि मक्याची मोठी लागवड केली होती. मात्र, आता विहिरींच्या पाणीपातळीत मोठी घट झाल्याने रब्बीची पिके धोक्यात आली आहेत. पिकांना पुढील ८ ते १० दिवसांत पाणी न मिळाल्यास शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. शेतकऱ्यांनी पाणीपट्टी भरूनही प्रशासन पाणी सोडण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप स्थानिक लोकप्रतिनिधींनी केला आहे. आम्ही पाणी आरक्षणाबाबत ओएसडी साने यांच्याशी चर्चा केली आहे.शेतकरीडिमांड भरण्यास तयार असूनही अधिकारी चालढकल करत असल्याचे भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष अशोक शेळके यांनी सांगितले. तंटामुक्त समितीचे अध्यक्ष किरण सरोवर म्हणाले की, फेब्रुवारीत पहिले आवर्तन मिळाले, तेव्हाच दोन आवर्तनांचे आश्वासन दिले होते. आता केवळ ७ ते ८ टक्के पाणी सोडल्यास धरण ४६ टक्क्यांवर राहील. तरीही पाणी दिले जात नाही. तातडीने पाणी न सोडल्यास आम्ही आंदोलन करू. प्रशासनाची भूमिका याबाबत पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंता अश्फाक शेख यांनी सांगितले की, धरणात सध्या ४६ टक्केच पाणी शिल्लक आहे. पाऊस लांबण्याची शक्यता असल्याने, पिण्यासाठी पाणी राखीव ठेवण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना कळविले आहे. भविष्यातील टंचाई लक्षात घेता दुसरे आवर्तन देणे शक्य नाही. हेही वाचा : तुम्हालाही नैसर्गिक गरजेपेक्षा अधिक घाम येतो का? काळजी घ्या; गंभीर आजरांचा धोका अधिक
21 shares
😢
Pudhari logo
Pudhari
May 4, 2026, 08:33 AM
अल निनो आणि आय. ओ. डी. परिणामांच्या पार्श्वभूमीवर भारत तीव्र पाणीटंचाईच्या संकटाला तोंड देण्यासाठी सज्ज

अल निनो आणि आय. ओ. डी. परिणामांच्या पार्श्वभूमीवर भारत तीव्र पाणीटंचाईच्या संकटाला तोंड देण्यासाठी सज्ज

अलनिनो/आयओडीमुळे पाणी टंचाईचे संकटप्रशांत महासागरातील अल निनो आणि हिंदी महासागरातील आयओडी या दोन हवामान घटकांमुळे यंदा महाराष्ट्रासह संपूर्ण देशात पाणी टंचाईचे गंभीर संकट उभे राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. प्रशांत महासागर तापल्याने भारतात मान्सून कमजोर होतो. २०२३ च्या अल निनोमुळे महाराष्ट्रात सरासरीपेक्षा १४ टक्के कमी पाऊस झाला. त्याचे परिणाम २०२४ आणि २०२५ मध्ये धरणांतील कमी पाणी साठ्याच्या रूपाने दिसले होते.
70 shares
😢
Lokmat logo
Lokmat
May 4, 2026, 08:10 AM
उष्णतेच्या लाटेचा भारतातील शेतीवर परिणाम, मिरचीच्या पिकांची कापणी सुरूच

उष्णतेच्या लाटेचा भारतातील शेतीवर परिणाम, मिरचीच्या पिकांची कापणी सुरूच

Agriculture News :उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून, त्याचा परिणामशेतीच्याकामांवर मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. वाढत्या उन्हामुळे शेतात काम करणाऱ्या मजुरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा कठीण परिस्थितीत नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वावीहर्ष गावातीलशेतकरीनिवृत्ती बुधा ढोले यांच्या शेतातमिरचीपिकाची काढणी जोरात सुरू आहे. कडक उन्हापासून संरक्षण मिळावे, म्हणून मजूर छत्र्यांचा वापर करूनमिरचीकाढणीचे काम करताना दिसत आहेत. दुसरीकडे राज्यातील तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. अशा परिस्थितीत बाहेर निघणे देखील कठीण झाले आहेत. त्यामुळे उन्हात काम करण्यासाठी मज्जाव करण्यात येत आहे. मात्र एवढं ऊन असूनहीशेतकरीशेतात काम करीत आहेत. सध्या मिरची काढणी सुरु ढोले यांनी मजुरांना सावलीत काम करण्यासाठी भन्नाट जुगाड लावले आहे. मिरची काढणीसाठी आलेल्या मजुरांना सावलीसाठी मोठं मोठ्या छत्र्या शेतात ठेवल्या आहेत. जेणेकरून सावलीत बसून मिरची काढणी करता येईल. यामुळे थोड्याफार प्रमाणात का होईना, मजुरांना उन्हापासून दिलासा मिळाला आहे. अनेक ठिकाणी शेतमजूर डोक्यावर कापड, टोपी किंवा छत्री घेऊन काम करत आहेत. उन्हाच्या झळांमुळे दुपारच्या वेळेत शेतात उभे राहणेही कठीण होत असताना, शेतकरी आणि मजूर मेहनतीने काम करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यंदा मिरचीचे पीक चांगलेवावी हर्ष परिसरात यंदा मिरचीचे पीक चांगले आले असून, उत्पादनही समाधानकारक मिळत आहे. शेतकरी निवृत्ती बुधा ढोले यांनी मिरची लागवड केली होती. योग्य पाणी व्यवस्थापन, वेळेवर फवारणी आणि सातत्याने केलेली निगा यामुळे पिकाची गुणवत्ता उत्तम राहिली आहे. आता काढणीच्या टप्प्यावर आलेल्या या पिकामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. बाजारात मिरचीला चांगला दर मिळेल, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे. PM Kisan Scheme : नवीन शेती घेतली आहे तर, आता पीएम किसान योजनेचा लाभ घेता येईल का? काय आहेत नियम
73 shares
😢
Pudhari logo
Pudhari
May 4, 2026, 07:56 AM
कोकणातील सचित्र मंदिर संकुलः पेशवा युगाचा एक करार

कोकणातील सचित्र मंदिर संकुलः पेशवा युगाचा एक करार

मंदिरासमोरचा नंदी पेशवेकालीन मंदिराची साक्ष पटवतो. मंदिर पूर्वाभिमुख असून समोरच मोठं तळं आहे. मंदिराची आतली बाजू लाकडी खांबांवर आधारलेली आहे. कोकणात सहसा सर्रास दिसतो तसा इथेही गाभारा स्वतंत्र आहे. त्याचं छत घुमटीसारखं असून आत शिवलिंग आहे. गावाबाहेर स्थान असलेल्या या मंदिराचा परिसर अतिशय रम्य आहे.
5 shares
😐
L
Lokmat
May 4, 2026, 07:05 AM
मांडोवी आणि झुआरी नद्यांच्या काठावरील डोंगराळ जमिनीच्या संरक्षणासाठी गोवा सरकारने केंद्राकडे मंजुरी मागितली

मांडोवी आणि झुआरी नद्यांच्या काठावरील डोंगराळ जमिनीच्या संरक्षणासाठी गोवा सरकारने केंद्राकडे मंजुरी मागितली

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी :मांडवी आणि जुवारी या दोन्ही नद्यांच्या एकूण ५ कोटी ७२ लाख चौ.मी. एवढी डोंगराळ जमीन इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून संरक्षित करण्याचा विषय काल मंत्री विश्वजित राणे यांनी केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाला सविस्तरपणे कळवला आहे. वन व टीसीपी मंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले की, केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाला आपण सर्व तपशील पाठवला आहे. एकदा ५ कोटी ७२ लाख चौ.मी. डोंगराळ भाग किंवा ग्रीन भाग संरक्षित झाला की आपण प्रत्येक जमिनीचा सर्व्हे क्रमांक जाहीर करणार आहे. मांडवी व जुवारी या दोन्ही नद्यांच्या बाजूला किंवा किनाऱ्यावर ५ कोटी ७२ लाख चौ. मी. एवढा डोंगराळ हरितपट्टा आहे. हा पठार नव्हे तर टेकड्या व डोंगरांचा भाग आहे. मांडवीकडे उभे राहिले की पर्वरीच्या दिशेने; पण कोर्ट इमारतीकडे हरितपट्टा दिसून येतो. तसे भाग इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून संरक्षित केले जातील. वन खात्याने पत्र लिहून टीसीपीला कल्पना दिली आहे. आपण ही सगळी माहिती केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाला माहिती देऊन तत्त्वतः मान्यता घेतली आहे, असे मंत्री राणे म्हणाले. एकदा नद्यांच्या बाजूला असलेली पावणेसहा कोटी जमीन क्षेत्र संरक्षित झाले की, मग त्या क्षेत्राला कुणी हात लावू शकणार नाही. तिथे जमीन रूपांतरणे करताच येणार नाही, असा दावा मंत्री राणे यांनी केला. दरम्यान, यापूर्वी खारफुटी क्षेत्र संरक्षित करण्यात आले आहे. एकूण १३ हजार सर्व्हे क्रमांकांमधील खारफुटीचे क्षेत्र संरक्षित झाले आहे, असे मंत्री राणे यांचे म्हणणे आहे.
94 shares
😐
Lokmat logo
Lokmat
May 4, 2026, 06:44 AM
अकोला जिल्ह्यात उष्णतेची लाट, बाष्पीभवनाचे प्रमाण वाढले

अकोला जिल्ह्यात उष्णतेची लाट, बाष्पीभवनाचे प्रमाण वाढले

हवामानातील बदलत्या परिस्थितीत कडक उन्हामुळे बाष्पीभवनाचा दर वाढल्याचे समोर आले आहे. वेधशाळेच्या नोंदींनुसार शनिवारी पाण्याचे बाष्पीभवन लक्षणीय १५,५ मि.मी. या प्रमाणात झाले असून, यामुळे वातावरणातील कोरडेपणा अधिकच वाढला आहे. सध्याअकोला जिल्ह्यातउष्णतेची लाटकायम असून, नागरिकांसह शेतकऱ्यांनाही त्याचा मोठा फटका बसत आहे. दिवसभर कडक उन्हासोबत स्वच्छ आकाशाची नोंद झाली. आकाश निरभ्र असल्यामुळे सूर्यप्रकाशाचा प्रभाव अधिक जाणवला, तर वाऱ्याचा वेगही मध्यम स्वरूपात होता. मात्र, हवेत आर्द्रतेचे प्रमाण घटल्याने उकाड्याची तीव्रता अधिकच वाढली आहे. परिणामी, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे, थकवा आणि उष्माघाताचा धोका वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, पावसाचा पूर्णतः अभाव असल्यामुळे बाष्पीभवनाची प्रक्रिया अधिक वेगाने होत आहे. याचा थेट परिणाम जमिनीतील ओलाव्यावर होत असून, मातीतील आर्द्रता झपाट्याने कमी होत आहे. विशेषतः उन्हाळी पिकांसाठी ही परिस्थिती चिंताजनक ठरत आहे. पाण्याची उपलब्धता कमी होत असल्याने पिकांच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांनोपाणीवापराचे योग्य नियोजन करा! • हंगामाच्या सुरुवातीपासूनच पावसातील तूट कायम असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. त्यामुळे जलसाठ्यांवरही ताण वाढत असून, सिंचनासाठी पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनीपाणीव्यवस्थापनाचे योग्य नियोजन करणे अत्यंत गरजेचे असल्याचे आवाहन करण्यात येत आहे. • तज्ज्ञांच्या मते, सध्याच्या परिस्थितीत ठिबक व तुषार सिंचनासारख्या पाणी बचतीच्या पद्धतींचा अवलंब करणे, पिकांना आवश्यकतेनुसारच पाणी देणे तसेच मृदा आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी आच्छादन (मल्चिंग) वापरणे आवश्यक आहे. तसेच नागरिकांनीही उष्णतेपासून बचावासाठी योग्य काळजी घेणे गरजेचे असल्याचे सांगितले जात आहे. काही दिवस स्थिती कायम राहणार! एकूणच,अकोलाजिल्ह्यातील वाढती उष्णता, कमी आर्द्रता आणि पावसाचा अभाव यामुळे कोरड्या हवामानाची तीव्रता वाढली असून, येत्या काही दिवसांतही ही स्थिती कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे खरीपपूर्व पेरणी करताना शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. हेही वाचा : तुम्हालाही नैसर्गिक गरजेपेक्षा अधिक घाम येतो का? काळजी घ्या; गंभीर आजरांचा धोका अधिक
78 shares
😢
P
Pudhari
May 4, 2026, 05:02 AM
वरच्या मजल्यावरील सदनिका धारकांसाठी आवश्यक असलेल्या पात्रतेचा पुरावा

वरच्या मजल्यावरील सदनिका धारकांसाठी आवश्यक असलेल्या पात्रतेचा पुरावा

वरच्या मजल्यावरील सदनिकाधारकांना पात्रता सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेले दस्तऐवज आणि त्यांचा प्राधान्यक्रम प्राधान्यक्रम-1 : वरच्या मजल्यावरील कुटुंबप्रमुखाच्या नावे असलेले विजेचे बिल. कट ऑफ डेट पूर्वीचे आणि अलीकडचे वीजबिल आवश्यक. प्राधान्यक्रम-2 : वरच्या मजल्याचा पत्ता नमूद असलेला नोंदणीकृत भाडेकरार. कट ऑफ डेट पूर्वीचा आणि अलीकडचा भाडेकरार आवश्यक.
38 shares
😐
Lokmat logo
Lokmat
May 4, 2026, 04:54 AM
अनपेक्षित गोष्टींसाठी तयारी करणेः आर्थिक आणि ओळख दस्तऐवजांचे आयोजन करणे

अनपेक्षित गोष्टींसाठी तयारी करणेः आर्थिक आणि ओळख दस्तऐवजांचे आयोजन करणे

आजच्या काळात कुटुंबाची बहुतांश आर्थिक व्यवस्था ऑनलाइन झाली आहे. बँक खाती, गुंतवणूक, बिले आणि डिजिटल पासवर्ड सहसा घरातील एकाच व्यक्तीला माहीत असतात. त्या व्यक्तीच्या निधनानंतर कुटुंबाला या माहितीअभावी अनेक कायदेशीर आणि आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. यावर उपाय म्हणून एक 'डेथ फोल्डर' तयार करणे आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तुमच्या कुटुंबातील विश्वासू व्यक्तीला हे फोल्डर कुठे आहे आणि ते संकटकाळी कसे उघडायचे, याची माहिती नक्की द्या. यामुळे कायदेशीर अडचणी टाळता येतात. सोन्यातून कमाईचे अनेक 'स्मार्ट' मार्ग ! नव्या पिढीची नवी पसंती; दागिन्यांपेक्षा डिजिटल गोल्डलाच महत्त्व वैयक्तिक आणि ओळख संबंधित कागदपत्रे कोणती? यात जन्म दाखला, आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, विवाह नोंदणी प्रमाणपत्र आणि आवश्यक असल्यास नाव बदलल्याचे शपथपत्र यांचा समावेश असावा. ही कागदपत्रे तुमची ओळख आणि कायदेशीर स्थिती सिद्ध करण्यास मदत करतात. आर्थिक आणि संपत्ती तपशीलमध्ये काय द्याल? तुमची सर्व बँक खाती, एफडी, डिमॅट खाते, शेअर्स, म्युच्युअल फंड, विमा पॉलिसी आणि पेन्शनचा तपशील येथे ठेवा. तसेच, नॉमिनीची नावे, कर्जे आणि तुमच्या आर्थिक सल्लागाराचा किंवा सीएचा संपर्क क्रमांकही नमूद करा. कायदेशीर कागदपत्रांमध्ये काय येते? यात तुमचे मृत्युपत्र, पॉवर ऑफ अटर्नी, ट्रस्टची कागदपत्रे आणि उत्तराधिकार प्रमाणपत्र यांचा समावेश असावा. मूळ कागदपत्रे कुठे ठेवली आहेत आणि ती कोणाकडून मिळवता येतील, याची स्पष्ट माहिती तिथे लिहा. रिअल इस्टेट आणिव्यवसायदस्तऐवज तुमच्या घराची किंवा जमिनीची कागदपत्रे, खरेदीखत, प्रॉपर्टी टॅक्सच्या पावत्या, होम लोनची माहिती आणि जर तुमचाव्यवसायअसेल, तर त्यासंबंधीचे ओनरशिप पेपर आणि 'बिझनेस सक्सेशन प्लॅन' यात समाविष्ट करा. हे फोल्डर कुठे ठेवावे? फिजिकल फोल्डर : एका सुरक्षित कपाटात किंवा लॉकरमध्ये ठेवा. डिजिटल फोल्डर : कॉम्प्युटर किंवा पेनड्राइव्हमध्ये एनक्रिप्टेड स्वरूपात ठेवा. अपडेट करा : हे फोल्डर एकदा बनवून सोडून देऊ नका. दर ६ महिने किंवा वर्षभराने त्यात काही बदल झाले असल्यास (उदा. नवीन बँक खाते, नवीन गुंतवणूक) ते अपडेट करा. डिजिटल मालमत्ता आणि ऑनलाइन अकाउंट्स ईमेल, सोशल मीडिया प्रोफाइल्स, क्लाउड स्टोरेज आणि महत्त्वाच्या सबस्क्रिप्शन्सची यादी करा. सुरक्षेसाठी पासवर्ड थेट कागदावर लिहिण्याऐवजी, ते सुरक्षित ठेवण्यासाठी 'पासवर्ड मॅनेजर'चा वापर करा आणि त्याचा मास्टर पासवर्ड किंवा तो मिळवण्याची पद्धत फोल्डरमध्ये नमूद करा. ‘डेथ फोल्डर’ ही नकारात्मक कल्पना नसून जबाबदार आर्थिक नियोजनाचा भाग आहे. यामुळे कुटुंबीयांना कठीण काळात योग्य निर्णय घेणे सोपे जाते आणि कायदेशीर अडचणी टाळता येतात.
100 shares
😐
Pudhari logo
Pudhari
May 4, 2026, 04:53 AM
भारतातील उष्णतेच्या लाटेमुळे फुलांचे दर गगनाला भिडले

भारतातील उष्णतेच्या लाटेमुळे फुलांचे दर गगनाला भिडले

दुसरे म्हणजे, तापमानात झालेली वाढ व पाण्याच्या कमतरतेमुळे दोन दिवसांतच फुले सुकतात. त्याचा फटका फूल विक्रेत्यांना बसत आहे. जर उष्णतेची लाट अशीच राहिली, तर पुढील काळात फुलांच्या दरामध्ये आताच्या दरापेक्षा प्रतिकिलो आणखी 10 रुपये वाढ होण्याची शक्यता आहे.
98 shares
😢
M
Maharashtra Times
May 4, 2026, 04:42 AM
महाराष्ट्र हवामानः राज्यात उष्णतेची लाट आणि मुसळधार पावसाची शक्यता

महाराष्ट्र हवामानः राज्यात उष्णतेची लाट आणि मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई:महाराष्ट्रात मे महिन्यात हवामान सतत बदलत आहे. काही जिल्ह्यात नागरिक उष्णतेची लाट आणि उष्मघाताने त्रासले आहेत. तर इतर जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सोमवारी, 4 मे रोजी, राज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसासाठी 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. राज्यात मेघगर्जनेसह 60 किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. कोकण, पुणे आणि मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती कायम राहणार आहे.कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?हवामान विभागाच्या अंदाजानुसार 4 मे रोजी, 11 जिल्ह्यांनापावसासाठी अलर्टदेण्यात आला आहे. विदर्भात येत्या 24 तासांत वादळी वारे वाहून त्यासह पावसाची शक्यता आहे.आयएमडीच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे, तर चार जिल्हे ऑरेंज अलर्टखाली आहेत. या भागांमध्ये पावसाची सर्वाधिक शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी 50-60 किमी पर्यंत पोहोचण्याची शक्यता असून अनेक भागात वीज आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळसह अमरावती विभागात मेघगर्जनेसहहलका ते मध्यम पाऊसपडण्याची शक्यता आहे. या प्रदेशातील तापमान सर्वाधिक असून कमाल तापमान 41 ते 44 अंश सेल्सिअस दरम्यान असते. दरम्यान, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश असलेल्या नागपूर विभागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये जोरदार वादळ, वारे आणि वीजांसह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे अधिकाऱ्यांनी रहिवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.मुंबईत उष्णता कायमदरम्यान,मुंबई, ठाणे, रायगड,रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासह कोकणात उष्ण आणि दमट वातावरण कायम राहील. कमाल तापमान 33 अंश सेल्सियस ते 35 डिग्री सेल्सिअस दरम्यान राहण्याची अपेक्षा आहे. उत्तर महाराष्ट्रात नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे राहील आणि तापमान 41 अंश सेल्सिअसपर्यंत जाईल. दुपारच्या वेली उष्णता तीव्र राहण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या शहरांमध्ये दिवसाचे तापमान 37 ते 40 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
32 shares
😐
L
Lokmat
May 4, 2026, 04:17 AM
ज्येष्ठ नागरिकांसाठी विमा खरेदी करताना टाळाव्या लागणाऱ्या चुकाः तुमच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी मार्गदर्शक

ज्येष्ठ नागरिकांसाठी विमा खरेदी करताना टाळाव्या लागणाऱ्या चुकाः तुमच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी मार्गदर्शक

जसे वय वाढेल तसे आरोग्याच्या तक्रारी वाढणे नैसर्गिक आहे. आजच्या काळात वाढता वैद्यकीय खर्च पाहता, ज्येष्ठ नागरिकांसाठी योग्य ‘हेल्थ इन्शुरन्स’ असणे ही चैन नसून गरज बनली आहे. मात्र, अनेकदा माहितीच्या अभावामुळे आपण चुकीची पॉलिसी निवडतो आणि ऐनवेळी पदरी निराशा पडते. ज्येष्ठ नागरिकांसाठी विमा घेताना कोणत्या चुका टाळाव्यात, याचा हा आढावा. पूर्वीच्या आजारांकडे दुर्लक्ष महागात : ज्येष्ठ नागरिकांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा हृदयाशी संबंधित आजार असणे सामान्य आहे. अनेकदा प्रीमिअम वाढेल या भीतीने किंवा पॉलिसी नाकारली जाईल या भीतीने हे आजार लपवले जातात. ही सर्वांत मोठी चूक आहे. क्लेमच्या वेळी जर विमा कंपनीला जुन्या आजाराची माहिती मिळाली, तर ते क्लेम नाकारू शकतात. तसेच, या आजारांसाठीचा ‘वेटिंग पीरिएड’ किती आहे, हे तपासून घ्या. Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी' कमी प्रीमिअमच्या मोहात पडू नका : कमी प्रीमिअम असलेल्या पॉलिसीमध्ये सुविधाही कमी असू शकतात. केवळ स्वस्त आहे म्हणून पॉलिसी निवडण्यापेक्षा, त्यामध्ये मिळणारे कव्हरेज किती आहे हे पाहणे महत्त्वाचे आहे. आजारपणात हॉस्पिटलचा खर्च लाखांच्या घरात जातो, अशा वेळी कमी ‘सम इन्शुअर्ड’ असलेली पॉलिसी आर्थिकदृष्ट्या तोट्याची ठरू शकते. ‘को-पेमेंट’ क्लॉज नीट समजून घ्या :विमा योजनांमध्ये ‘को-पेमेंट’ची अट असते. यात खर्चातील ठरावीक हिस्सा विमाधारकाला स्वतः भरावा लागतो. कमीत कमी को-पेमेंट असलेली योजना निवडा. रूम रेंट आणि सब-लिमिट्स तपासा : अनेक विमा कंपन्या हॉस्पिटलच्या खोलीच्या भाड्यावर मर्यादा घालतात. तसेच विशिष्ट शस्त्रक्रियांवर असणारी मर्यादा आधीच तपासावी. हॉस्पिटल नेटवर्क आहे का? :आणीबाणीच्या प्रसंगी ‘कॅशलेस’ उपचार मिळणे आवश्यक असते. तुम्ही घेतलेल्या विमा कंपनीच्या नेटवर्कमध्ये तुमच्या भागातील नामांकित रुग्णालये आहेत का, याची खात्री करा.
28 shares
😢
Pudhari logo
Pudhari
May 4, 2026, 04:09 AM
प्रदूषण नियंत्रणासाठीचे प्रयत्न सुरूच ठेवण्याचा पर्यावरण विभागाचा निर्धार

प्रदूषण नियंत्रणासाठीचे प्रयत्न सुरूच ठेवण्याचा पर्यावरण विभागाचा निर्धार

पर्यावरण विभागाकडून प्रदूषण नियंत्रणासाठी अशा तपासणी मोहिमा पुढेही सुरू राहणार आहेत. शहरातील नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि निरोगी वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका प्रशासन कटिबद्ध असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. नियमांचे पालन न करणाऱ्या प्रकल्पांवर पुढील काळातही कठोर कारवाई सुरू ठेवण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
3 shares
😐
M
Maharashtra Times
May 4, 2026, 03:56 AM
भारतातील दक्षिण सातपुडा पर्वतरांगांमध्ये जंगलातील आग

भारतातील दक्षिण सातपुडा पर्वतरांगांमध्ये जंगलातील आग

म. टा. वृत्तसेवा, अमरावती:गेल्या तीन वर्षांपासून निसर्गाच्या सोबतीने शांत असलेला दक्षिण सातपुडा सध्या वणव्याच्या विळख्यात सापडला आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेलगत असलेल्या या पर्वतरांगांमध्येभीषण आगलागली आहे. गेल्या तीन वर्षांतील वनविभागाची तपश्चर्या अवघ्या काही तासांत खाक झाली आहे. या वणव्यामुळे केवळ वनसंपत्तीच नव्हे, तर सीमावर्ती भागातील मानवी वस्त्यांनाही उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसत आहे.सातपुडा पर्वतरांगांमधील अंबाडोरी, खोकरा, गारगोटी, सालबर्डी आणि गामुख या दुर्गम पट्ट्यात आगीने रौद्ररूप धारण केले आहे. विशेष म्हणजे, मागील तीन वर्षे या भागात एकही वणवा लागला नव्हता. वनविभागाच्या या कामगिरीबद्दल शासनाकडून स्थानिक ग्रामस्थांना प्रोत्साहनपर पुरस्कारही देण्यात आले होते. मात्र, यंदा ही परंपरा खंडित झाली असून आगीच्या संकटामुळे वनविभागाच्या चिंतेत भर पडली आहे. यंदा तापमानाने ४७ अंशांचा टप्पा ओलांडला आहे.Jellyfish Warning Alibaug : उन्हाळी सुट्ट्यांमध्ये समुद्रकिनाऱ्यावर जाताय तर सावधान! निळाशार ‘ब्लू बटन’चा सापळा, अलिबागमध्ये पर्यटकांना सतर्कतेचा इशारायंत्रणेची कसोटीसध्या ही आग शेकडो हेक्टर वनक्षेत्रात पसरली असून, विशेषत: अंबाडोरी आणि सालबर्डी वनपरिक्षेत्रातील वन खंडात मौल्यवान लाकूड धोक्यात आले आहे. आग विझवण्यासाठी दीडशेहून अधिक वनमजूर दुर्गम भागात तैनात आहेत. वीसपेक्षा जास्त ब्लोअर मशीन आणि स्थानिक साहित्याच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी दोन्ही राज्यांचे वनाधिकारी आणि ग्रामीण पोलिस अधीक्षक यांची तातडीची बैठक पार पडली.आंतरराष्ट्रीय तस्करीरोखणे आणि वणवा विझविणे हे दुहेरी आव्हान प्रशासनासमोर असून, लोकप्रतिनिधींनीही या प्रकरणी वनमंत्र्यांकडे तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली आहे.नागरिकांचे हालवणव्याच्या आगीमुळे सीमेवरील गावांमध्ये गरम वारे वाहू लागले आहेत. या वाऱ्यांमुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत असून, जनजीवन विस्कळित झाले आहे. ही आग लवकर आटोक्यात न आल्यास दुर्मीळ वनौषधी आणिवन्यजीवांचे मोठे नुकसानहोण्याची भीती व्यक्त केली जात आहे.वारा, डोंगराळ भाग ठरतोय अडथळाडोंगराचा दुर्गम भाग आणि सातत्याने वाहणारे उष्ण वारे यामुळे आग विझविण्याच्या मोहिमेत मोठा अडथळा येत आहे. एका बाजूला आग विझविली, की वाऱ्याच्या झोतामुळे दुसऱ्या बाजूला ठिणग्या पडून नवीन वणवा पेटत आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांचे वन कर्मचारी, वनरक्षक आणि निसर्गप्रेमी वनमित्र वणवा विझविण्यासाठी झटत आहेत. मध्य प्रदेशातील यंत्रणाही या लढ्यात खांद्याला खांदा लावून काम करीत आहे.
64 shares
😢
Pudhari logo
Pudhari
May 4, 2026, 12:42 AM
भारतातील करवीर तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गावर आंदोलन केले

भारतातील करवीर तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गावर आंदोलन केले

युवराज पाटील शिरोली दुमाला :प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाविरोधात करवीर तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. गावागावांत बैठका घेऊन आंदोलनाची रणनीती आखली जात आहे. जमीन संपादन प्रक्रियेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत कोणत्याही परिस्थितीत जमीन देणार नाही, असा ठाम निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
47 shares
😢
P
Pudhari
May 4, 2026, 12:35 AM
तीव्र उष्णतेची लाट आणि दुष्काळाचा जिल्ह्याला फटका, पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांचा संघर्ष

तीव्र उष्णतेची लाट आणि दुष्काळाचा जिल्ह्याला फटका, पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांचा संघर्ष

जिल्ह्यात दिवसेंदिवस प्रचंड उन्हाळा जाणवत आहे. सूर्य आग ओकतोय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे भूजल पातळीतही कमालीची घट जाणवू लागली आहे. विहीरी, ओढे, नाले, तलावामधील उपलब्ध पाण्यावर शेतकरी आपली पिके जगवताना दिसत आहे. मात्र दुसरीकडे शेतीपंपाना विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे विद्युत ट्रॉन्सफार्मरवर प्रचंड लोड येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी डीपी जळण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. तर काही ठिकाणी प्रचंड दाबामुळे डीपी जळून खाक होत आहेत.
57 shares
😢
P
Pudhari
May 3, 2026, 11:42 PM
तापमानात घसरण होऊनही कोल्हापूरात उष्णतेची लाट कायम

तापमानात घसरण होऊनही कोल्हापूरात उष्णतेची लाट कायम

कोल्हापूर :कोल्हापुरात कमाल तापमानात घट झाली असली तरी उन्हाचा तडाखा कायम आहे. रविवारी दैनंदिन सरासरी कमाल तापमानात किंचित घट होऊन पारा 36.4 अंशांवर स्थिरावला होता; तर किमान तापमान 23 अंशांवर होते. बुधवार (दि. 6) पासून ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. शुक्रवारी (दि. 8) दुपारनंतर पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यामुळे कोल्हापुरातील वातावरणात पुन्हा बदल होण्याची शक्यता आहे.
21 shares
😐
Pudhari logo
Pudhari
May 3, 2026, 11:12 PM
द कॉस्मिक जर्नी ऑफ क्रेमेटेड बॉडीजः अ सेलेस्टियल लेगसी

द कॉस्मिक जर्नी ऑफ क्रेमेटेड बॉडीजः अ सेलेस्टियल लेगसी

अंत्येष्टी/दहन ( ताऱ्यांचा प्रवास) :ज्यांचे दहन केले जाते, त्यांच्या शरीरातील ऊर्जा उष्णतेमध्ये रूपांतरित होते. ही इन्फ्रारेड ऊर्जा प्रकाशाच्या वेगाने अवकाशात प्रवास करते. टायसन म्हणतात की, जर एखाद्या व्यक्तीचे चार वर्षांपूर्वी निधन झाले असेल आणि त्यांचे दहन केले गेले असेल, तर त्यांच्या शरीरातील किरणोत्सर्गी ऊर्जा आतापर्यंत आपल्या सर्वात जवळच्या 'अल्फा सेंटॉरी' या तारासमूहापर्यंत पोहोचली असेल. म्हणजे एका अर्थाने, तुम्ही मृत्यूनंतरही विश्वाचा भाग म्हणून ताऱ्यांमध्ये फिरत असता .
65 shares
😐
P
Pudhari
May 3, 2026, 11:00 PM
ऑक्टोपस बुद्धिमत्ताः समस्या सोडवणे आणि स्वप्न पाहण्याची क्षमता उघड

ऑक्टोपस बुद्धिमत्ताः समस्या सोडवणे आणि स्वप्न पाहण्याची क्षमता उघड

बुद्धिमत्तेचे वेगळे पैलू ऑक्टोपस समस्या सोडवण्यासाठी समुद्रातील विविध वस्तूंचा (उदा. नारळाची करवंटी) वापर करतात. जपानमधील संशोधनानुसार, ऑक्टोपस झोपेत असताना त्यांच्या त्वचेचा रंग झपाट्याने बदलतात, ज्यावरून ते मानवाप्रमाणे स्वप्ने पाहत असावेत, असा अंदाज वर्तवला जात आहे. आपली त्वचा परिसराप्रमाणे बदलण्यासाठी त्यांचा मेंदू अत्यंत क्लिष्ट गणिते सोडवतो.
64 shares
😐
Lokmat logo
Lokmat
May 3, 2026, 12:13 PM
अकोलाच्या उष्णतेच्या लाटेने कापसाच्या शेतीवर परिणाम झाला

अकोलाच्या उष्णतेच्या लाटेने कापसाच्या शेतीवर परिणाम झाला

अकोला :जिल्ह्यातील प्रचंड उष्णतेमुळे यंदाच्या उन्हाळी कपाशी लागवडीवर मोठे संकट निर्माण झाले आहे.(Cotton Farming) एप्रिल महिन्यापासून तापमान सतत ४४ अंश सेल्सिअसच्या आसपास राहिल्याने आणि काही ठिकाणी ४७ अंशांपर्यंत पोहोचल्याने शेतकऱ्यांनी उन्हाळ्यातील कपाशी लागवडीकडे पाठ फिरवण्यास सुरुवात केली आहे.(Cotton Farming) जमिनीतील उष्णता वाढल्यामुळे पेरलेले बियाणे जळण्याची शक्यता निर्माण झाली असून, शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. उष्णतेचा तीव्र तडाखा जिल्ह्यात उष्णतेची लाट अधिक तीव्र झाली असून दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. जमिनीतील तापमानही प्रचंड वाढल्याने पेरलेले कपाशीचे बियाणे उगवण्याआधीच नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळेशेतकरीउन्हाळी लागवडीबाबत सावध झाले आहेत. पाण्याची टंचाई वाढली उष्णतेसोबतच पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. विहिरी, कूपनलिका आणि विंधन विहिरींमधील पाणीपातळी झपाट्याने खाली गेली आहे. सिंचनासाठी आवश्यक पाणी उपलब्ध नसल्यामुळे बागायतदारशेतकरीहीकपाशी लागवडीपासून दूर राहत आहेत. बियाण्यांवर दुहेरी संकट तज्ज्ञांच्या मते, इतक्या उष्णतेत पेरलेले बियाणे जमिनीत टिकणे कठीण ठरते. उगवण कमी होण्याची शक्यता असून, जर अवकाळी पावसाचा फटका बसला तर बियाणे कुजण्याचा धोका वाढतो. त्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी नुकसान सहन करावे लागू शकते. मान्सूनपूर्व पेरणीकडे कल या सर्व परिस्थितीमुळे अनेक शेतकरी आता उन्हाळी कपाशी लागवड टाळून मान्सूनपूर्व पेरणीकडे वळत आहेत. योग्य हवामान आणि पावसाच्या आधारे लागवड केल्यास उत्पादनात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कृषी विभागाचा इशारा कृषी विभागाने शेतकऱ्यांना स्पष्ट इशारा दिला आहे की, तापमान कमी होईपर्यंत कपाशीची पेरणी करू नये. घाईत घेतलेला निर्णय आर्थिकदृष्ट्या नुकसानकारक ठरू शकतो. तसेच उन्हाळ्यात कपाशीची लागवड केल्यास किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याचेही सांगण्यात आले आहे. उत्पादनावर परिणामाची शक्यता उष्णतेचा हा तडाखा कायम राहिला तर यंदाच्या हंगामातील कपाशी उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज आणि तज्ज्ञांचा सल्ला लक्षात घेऊनच लागवडीचे नियोजन करणे गरजेचे आहे. पुढील काळ निर्णायक मे महिन्याच्या अखेरपर्यंत उष्णतेची तीव्रता कायम राहण्याचा अंदाज असल्याने कपाशी लागवडीसाठी पुढील काही आठवडे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. योग्य वेळ साधून पेरणी केल्यास नुकसान टाळता येऊ शकते, अन्यथा मोठा आर्थिक फटका बसण्याची भीती आहे. हे ही वाचा सविस्तर :Humani Pest Control : शेतकऱ्यांसाठी अलर्ट! 'ही' किड पिकं उद्ध्वस्त करतेय अधिक वाचा :Summer Orchard Management : उन्हाळ्यातही फळबाग राहील हिरवीगार; करा 'हे' ५ महत्त्वाचे उपाय
40 shares
😢
Pudhari logo
Pudhari
May 3, 2026, 11:02 AM
विनेश फोगट कुस्तीमध्ये परतली, पाठिंब्याच्या अभावामुळे मानसिक दबावाला सामोरे जावे लागले

विनेश फोगट कुस्तीमध्ये परतली, पाठिंब्याच्या अभावामुळे मानसिक दबावाला सामोरे जावे लागले

सुमारे १८ महिन्यांनंतर पुनरागमन करत असलेल्या ३१ वर्षीय विनेशने सांगितले की, ती ५७ किलो वजनी गटात खेळणार आहे. मात्र, अशा वातावरणात १०० टक्के कामगिरी करणे कठीण असल्याचे म्‍हटलं आहे. "मी कोणतीही सवलत किंवा विशेष वागणूक मागत नाही. माझी इच्छा फक्त इतकीच आहे की निकालांमधून खेळाडूंच्या कष्टाचे प्रतिबिंब दिसावे. अशा वातावरणात खेळणे जिथे उपस्थित असलेले बहुतांश लोक त्यांच्याशी (ब्रिजभूषण) संबंधित असू शकतात, माझ्यावर प्रचंड मानसिक दडपण आणत आहे."
90 shares
😢