Achira News Logo
Achira News
Lokmat logo
Lokmat
May 5, 2026, 03:48 PM
अंबेगाव तालुक्यातील परगावमध्ये स्वतःच्या वडिलांनी आणि सहकाऱ्यांनी विवाहित महिलेचे केले अपहरण

अंबेगाव तालुक्यातील परगावमध्ये स्वतःच्या वडिलांनी आणि सहकाऱ्यांनी विवाहित महिलेचे केले अपहरण

लोकमत न्यूज नेटवर्क, अवसरी -आंबेगाव तालुक्यातील पारगाव परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून विवाहित मुलीचे तिच्याच वडिलांनी इतर साथीदारांसह अपहरण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी तातडीने कारवाई करत अवघ्या चार तासांत सर्व ७ आरोपींना अटक केली आहे. दि. ०४ मे २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास सौ. साक्षी विशाल भागवत (रा. पारगाव, लबडे मळा, ता. आंबेगाव, जि. पुणे) या त्यांच्या सासरच्या व्यक्तीसोबत असताना ही घटना घडली. पीडितेच्या वडिलांसह अन्य सहा जणांनी तिला मारहाण करत, शिवीगाळ व दमदाटी करून जबरदस्तीने एका वाहनात टाकून अपहरण केले. या अपहरणामागील उद्देश फिर्यादीस जबरदस्तीने दुसरे लग्न लावून देण्याचा असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच पारगाव कारखाना पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तात्काळ हालचाल सुरू केली. पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी शोधमोहीम राबवत अवघ्या ४ तासांच्या आत सर्व आरोपींना अटक करण्यात यश मिळवले. या प्रकरणी पारगाव कारखाना पोलीस ठाण्यात शिवाजी भाऊ खाटेकर (वय ४५, रा. पारगाव, ता. आंबेगाव,) अमोल चांगदेव रोडे (वय ३३), सचिन रावसाहेब रोडे (वय २९), अक्षय विश्वनाथ वाडगे (वय २९), अभिजीत बारकू रोडे (वय २६), नंदकिशोर विलास तितर (वय ३२, सर्व रा. नांदूर खंदरमाळ, ता. संगमनेर, जि. अहमदनगर), जयश्री अशोक कुदनर (वय ३५, रा. साकोर, ता. संगमनेर, जि. अहील्यानगर) यांना अटक करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पारगाव पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक सचिन कांडगे, पोलीस उपनिरीक्षक भाउसाहेब लोकरे, पोलीस हवालदार अविनाश कालेकर, सचिन डामसे, पोलीस अंमलदार संजय साळवे, मंगेश अंभग, चंद्रकांत गव्हाणे, प्रशांत जगताप व महिला पोलीस अंमलदार काजल फलके यांनी केली.
58 shares
😢
P
Pudhari
May 5, 2026, 03:09 PM
खंडणीच्या वादावरून पतीने पत्नीला बेदम मारहाण केली

खंडणीच्या वादावरून पतीने पत्नीला बेदम मारहाण केली

दि. ३ मे रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास आरोपींनी “माहेरून २ लाख रुपये आण” या कारणावरून महिलेशी वाद घालत शिवीगाळ केली. त्यानंतर पतीने स्वयंपाकघरातील चाकूने तिच्या उजव्या गालावर वार करून जखमी केले. तर इतर आरोपींनीही मारहाण करत तिला घराबाहेर काढण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
38 shares
😢
Lokmat logo
Lokmat
May 5, 2026, 02:38 PM
अमरावती पोलिसांनी बनावट वस्तूंच्या कारखान्याचा पर्दाफाश केला, 71 लाख रुपयांच्या वस्तू जप्त केल्या

अमरावती पोलिसांनी बनावट वस्तूंच्या कारखान्याचा पर्दाफाश केला, 71 लाख रुपयांच्या वस्तू जप्त केल्या

प्रदीप भाकरे ​अमरावती:नाव मोठ्या कंपन्यांचे, पण आतला माल मात्र बनावट!अमरावतीशहर गुन्हे शाखेने वलगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू असलेल्या एका मोठ्या 'फेक फॅक्टरी'चा पर्दाफाश केला आहे. मंगळवारी नया अकोला परिसरातील दोन कारखान्यांवर पोलिसांनी धाड टाकून तब्बल ७१ लाख २० हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, या कारवाईने बनावट वस्तू बनवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. पोलीस आयुक्त यांच्या आदेशानुसार अवैध धंद्यांविरुद्ध मोहीम सुरू असतानाच, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांना एका गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली. चांदुरबाजार रोडवरील नया अकोला येथे ब्रँडेड कंपन्यांच्या नावाखाली बनावट साबण आणि निरमा पावडर तयार केली जात होती. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून दोन कारखान्यांवर एकाच वेळी छापा टाकला. ​जप्त केलेला मुद्देमाल (किंमत ७१.२० लाख रुपये): ​इलेक्ट्रिक वजन काटा आणि सतीननगर येथील गोदामातील मोठ्या प्रमाणावर असलेला कच्चा मालाचा समावेश आहे. या बेकायदेशीर कारखान्याशी संबंधित असलेल्या चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामध्ये जुनेद खान यासीन खान (२८, पाकिजा कॉलनी), प्रफुल विष्णुपंत डोईफोडे (४८, न्यु म्हाडा कॉलनी), शेख भुरु शेख मुनीर (५०, झेंडा चौक) आणि शेख कलीम शेख माजीद (४०, बिस्मीला नगर) यांचा समावेश आहे. या आरोपींकडे कारखाना चालवण्याचा कोणताही अधिकृत परवाना नव्हता. हा बनावट माल नेमका कुठून आणला जात होता आणि कुठे विकला जाणार होता, याचा तपास आता पोलीस करत आहेत. ही मोठी कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, उपायुक्त गणेश शिंदे, सागर घुगे, आणि पोलीस उपायुक्त (गुन्हे) रमेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण, सपोनि मनिष वाकोडे, पोलीस अंमलदार सतिश देशमुख, मंगेश लोखंडे, गजानन ढेवले आणि इतर सहकाऱ्यांचा समावेश होता.
19 shares
😢
M
Maharashtra Times
May 5, 2026, 02:26 PM
बारामती पोलिसांनी सोन्याचे आणि चांदीचे दागिने लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला

बारामती पोलिसांनी सोन्याचे आणि चांदीचे दागिने लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला

दीपक पडकर, बारामती :बारामती एमआयडीसी येथे गहू देण्याच्या बहाण्याने बोलावून फिर्यादीला पिस्तूलाचा धाक दाखवून मारहाणं करत अंगावरील सोन्या, चांदीचे दागिने पळवून नेणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. बारामती तालुका पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत पिस्तूल, जिवंत काडतुसे, दागिने, रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली कार असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.रवी संजय माने (वंजारवाडी, बारामती), श्रीकांत अर्जुन घुले (ढेकळवाडी, बारामती), अभिषेक भाऊसो ठोंबरे (ढेकळवाडी, बारामती), अतुल मोहन भोलणकर (वंजारवाडी, बारामती) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी सूरज सरजेराव गावडे (वय २७) यांनी फिर्याद दिली आहे.नेमकं काय झालं?याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सूरज सरजेराव गावडे (वय २७) (रा. तासगाव, जि. सांगली) यांना ४ मे २०२६ रोजी बारामती एमआयडीसी येथे गहू नेण्यासाठी बोलावून त्यांना पिस्तूलाचा धाक दाखवत मारहाण केली व त्यांच्या अंगावरील सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि वाहन हिसकावून घेतले. या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.Raigad Beach Tar Balls Pollution: रायगडच्या समुद्रकिनारी डांबराचा खच; मासोळीवर विषबाधेचे सावट, मानवी आरोग्यालाही मोठा धोकापोलिस कारवाईगुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि माहितीदारांच्या मदतीने आरोपींचा माग काढण्यात आला. विविध ठिकाणी पाठलाग करत अखेर सापळा रचून आरोपींना ताब्यात घेण्यात आले. अटकेतील आरोपींमध्येरवी संजय माने, श्रीकांत अर्जुन घुले,अभिषेक भाऊसो ठोंबरे अतुल मोहन भोलणकर यांचा समावेश आहे.टोळीने यापूर्वीही केले आहेत गुन्हेआरोपींकडून दोन बनावट पिस्तुले, तीन जिवंत काडतुसे, सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेली वेगनार कार आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले. पोलिसांच्या चौकशीत या टोळीने यापूर्वीही अशा प्रकारचे गुन्हे केल्याचे समोर येत असून, पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव व त्यांच्या पथकाने केली.Pune Crime : किरकोळ वाद, भररस्त्यात गाठलं; जुन्या रागातून तरुणाला संपवलं; 4 अल्पवयीन मुलांचं कृत्यथरारक पाठलाग करून अटकसिन्नरमास कंपनी जवळ समोरून भिगवण पोलिस आणि मागून वालचंदनगर व बारामती पोलिसांनी घेराव घालत पाठलाग तीव्र केला. अखेर रात्री सुमारे ८.५० वाजता तीन आरोपींना गाडीसह ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर चौथा आरोपी अतुल भोलणकर याला त्याच्या घरातून अटक करण्यात आली. या कारवाईदरम्यान आरोपींकडून ७,५०,००० रु चे सोन्या चांदीचे दागिने, घड्याळ, जिवंत काडतूस सह दोन पिस्तूल, ६५,००० रु रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.गाडी न थांबवता पळ काढलापोलीस निरीक्षक यादव यांच्याकडून इंदापूर, भिगवण, वालचंदनगर पोलिसांना सतर्क करून रस्त्यावर नाकाबंदी लावण्यात आली. पोलिसांनी आरोपींची गाडी पाहिली; मात्र त्यांनी गाडी न थांबवता पळ काढला. पोलिसांचा पाठलाग सुरू असल्याचे लक्षात येताच आरोपींनी आरोपींनी गाडीचा वेग आणखी वाढविला. त्यानंतरही पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपींच्या मुसक्या आवळल्या.Pune Crime : मार्कशीटवर खाडाखोड अन् बापाचं डोकं फिरलं; 9 वर्षांच्या पोटच्या मुलीला निर्घृणपणे संपवून घराला आग लावलीकारवाईत या पथकाचा सहभागही धडाकेबाज कारवाईत पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, API विक्रम पवार, PSI धनश्री भगत, HC भारत खारतोडे, नितीन ढवण, जितेंद्र शिंदे, शशिकांत दळवी, दादा दराडे, सुरेंद्र वाघ, संतोष कांबळे, आफ्रिन शेख, वालचंद नगर पोलीस स्टेशनचे API राजकुमार डूणगे, HC गणेश काटकर, किसान बेलदार, अभिजित कळसकर, विक्रम मोरे, भिगवन पोलीस ठाण्याचे PSI अमित पाटील, HC महेश उगले, अपर पोलीस अधीक्षक कार्यालयातील ASI गोरख पवार आदींचाकारवाईसहभाग होता.
55 shares
😢
Lokmat logo
Lokmat
May 5, 2026, 02:03 PM
अहिल्यानगर गुन्हेगारीः सासरच्या 12 लाख रुपयांच्या मागणीवरून डॉक्टरची आत्महत्या

अहिल्यानगर गुन्हेगारीः सासरच्या 12 लाख रुपयांच्या मागणीवरून डॉक्टरची आत्महत्या

Ahilyanagar Crime : फ्लॅट घेण्यासाठी माहेराहून १२ लाख रुपये आणण्यासाठी सासरी होणाऱ्या छळाला कंटाळून २६ वर्षीय महिला डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केली.अहिल्यानगरच्यापारनेर तालुक्यातील गोरेगाव येथे शनिवारी ही घटना घडली. डॉ. गौरी अमित दळवी-चौरे असे मृत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी तिच्या वडिलांच्या तक्रारीवरून पती अमित बाबासाहेब दळवी, सासू संगीता बाबासाहेब दळवी, सासरा बाबासाहेब हरिभाऊ दळवी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुनील जबाजी चौरे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार गौरीचे लग्न २३ नोव्हेंबर २०२४ रोजी अमित बाबासाहेब दळवी याच्याशी झाले. मुंबईला गेल्यानंतर पती अमित दळवी याने फ्लॅट घेण्यासाठी माहेराहून १२ लाख रुपये आणण्यासाठी गौरीला त्रास देण्यास सुरुवात केली. 'तुम्ही साधे लग्न केले भाड्याच्या घरात राहण्यापेक्षा पैसे आण', असे म्हणून तिचा छळ केला. गौरी ही खासगी रुग्णालयात कार्यरत होती. तिचा पगारही काढून घेतला. लग्नातील दागिनेही बळकावल्याचे गौरीने आई-वडिलांना फोनवर सांगितले होते. पती अमित हा दारूच्या आहारी गेला होता. पैशांसाठी तो सतत तिला मारहाण करीत होता. तसेच त्याचे इतर मुलींशी अनैतिक संबंध असल्याचेही गौरीने फेब्रुवारी २०२६मध्ये माहेरी सांगितले होते. त्यानंतर तिची आई मुंबईला जाऊन वाद मिटवून आली. मात्र, त्यानंतरही छळ सुरू होता. दरम्यान, २७ एप्रिल रोजी गौरी, तिचा पती अमित आणि सासरे बाबासाहेब हे गोरेगाव येथे आले. त्यावेळी अमितने 'तू इथेच थांब, मी पप्पांना नगरला सोडून तुला घ्यायला येतो', असे सांगून निघून गेला. त्यानंतर तो परत आलाच नाही. फोनही घेत नव्हता. २८ एप्रिल रोजी गौरी व तिची आईअहिल्यानगरव मुंबई येथे गेली असता, दोन्ही ठिकाणी घरांना कुलूप लावले होते. त्यानंतर शनिवारी सकाळी गोरेगाव येथील घरात एकटी असताना गौरीने दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. आई शेतातून परत आल्यावर हा प्रकार समोर आला. तिला तातडीने पारनेर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
80 shares
😢
Lokmat logo
Lokmat
May 5, 2026, 01:45 PM
जमिनीच्या वादातून घरगुती हिंसाचाराच्या घटनेत आई-मुलीची जोडी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली

जमिनीच्या वादातून घरगुती हिंसाचाराच्या घटनेत आई-मुलीची जोडी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर:सासू व पत्नीच्या नावे असलेली जमीन आपल्या नावे करण्यासाठी पत्नीला मारहाण करीत असल्यामुळेच व्यंकटेशनगरातील आई व मुलीने गळफास घेतल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली असून नंदनवन पोलिसांनी आरोपी पती, सासू, सासरा, नणंद व भासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पती लोकेश सुधाकर ब्रहो (३०), सासरा सुधाकर ब्रहो (६०), सासू अनसूया सुधाकर ब्रहो (४८) सर्व रा. ओमनगर, सक्करदरा, नणंद प्राची अमोल डफ, अमोल डफ दोन्ही रा. अंबर अपार्टमेंट, मदन रतन सिटी, नंदनवन अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी १ मे २०२६ रोजी संगीता श्रीराम ढबाले (५२, रा. केडिके कॉलेजजवळ, व्यंकटेशनगर नंदनवन) आणि त्यांची मुलगी आकांक्षा लोकेश ब्रहो (२९, रा. ओमनगर, सक्करदरा) यांनी व्यंकटेशनगर येथील आपल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी नंदनवन पोलिसांनी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. तपासात आकांक्षाचा पती लोकेश, सासू, सासरा, नणंद व भासरा यांनी लग्न झाल्यापासून आकांक्षाला माहेरून पैसे आणण्यासाठी तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. त्यानंतर आकांक्षाला दोन महिन्यांपूर्वी मुलगा न होता मुलगी झाली व ती जन्मानंतर लगेच मरण पावल्यामुळे या छळात आणखी भर पडली. त्यानंतर आरोपींनी आकांक्षा व तिची आई संगीता यांच्या नावे असलेली जमीन पती लोकेशच्या नावाने करण्यासाठी तिला क्रूर वागणूक देणे सुरू केले. त्यामुळे या छळाला कंटाळून आकांक्षाने व्यंकटेशनगर येथे आईसोबत गळफास घेऊन आत्महत्या केली होती. दाखल करून तपास सुरू केला आहे.
79 shares
😢
Pudhari logo
Pudhari
May 5, 2026, 01:43 PM
खोट्या पॉक्सो प्रकरणावरून पुणे महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिकेकडून 7 लाखांची खंडणी

खोट्या पॉक्सो प्रकरणावरून पुणे महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिकेकडून 7 लाखांची खंडणी

पुण्यातही एका नामांकित कॉलेजच्या प्राचार्यांना पॉक्सोच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत सात लाख रुपयांची खंडणी उकळण्यात आली होती. तक्रारदार प्राचार्य हे धनकवडीत राहतात. जुलै 2025 मध्ये हे तिघे पोलीस तक्रारदार काम करत असलेल्या कॉलेजमध्ये गेले. एका विद्यार्थीनीला तुम्ही मेट्रो स्टेशनवरती बंदुकीचा धाक दाखवून तिला गाडीमध्ये ओढले असल्याची तुमच्या विरोधात तक्रार आलेली आहे. ती मुलगी वयाने 18 वर्षाच्या आतील असल्याने पोक्सो कायद्यांन्वये तुमच्यावर कारवाई होवू शकते असे धमकावत पोलिसांनी प्राचार्यांकडून पैसे उकळले.
15 shares
😢
Maharashtra Times logo
Maharashtra Times
May 5, 2026, 12:55 PM
संगीतकार पलाश मुच्छलवर फसवणूक आणि अत्याचाराचा गुन्हा दाखल

संगीतकार पलाश मुच्छलवर फसवणूक आणि अत्याचाराचा गुन्हा दाखल

सांगली: बॉलिवूड सिनेइंडस्ट्रीतला संगीतकार पलाश मुच्छल गेल्या काही महिन्यांपासून या ना त्या कारणामुळं चर्चेत आहे. आता त्याच्या कायदेशीर अडचणी आणखी वाढण्याच्या शक्यता आहेत.सांगली शहर पोलीस स्टेशनमध्ये पलाश मुच्छल याच्यावर ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सांगली पोलिसात संगीतकार पलाश मुच्छलविरुद्ध फसवणुकीचा आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच अभिनेता-निर्माता विज्ञान माने याने अनुसूचित जाती-जमाती (SC/ST) कायद्यांतर्गतही फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोलिस तपास सुरू आहे.काय आहे नेमकं प्रकरण?तक्रारदार विज्ञान माने हा सांगलीतील अभिनेता व निर्माता आहे. तरपलाश मुच्छलने चित्रपट “नजरिया” साठी गुंतवणुकीचे आश्वासन देऊन लाखो रुपये घेतले आहेत असा आरोप विज्ञान माने याने केला आहे. प्रकल्प पूर्ण न झाल्याने व पैसे परत न मिळाल्याने माने याने पोलिसांकडे धाव घेतली. तर विज्ञान माने याने सांगली शहर पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गतही फिर्याद दाखल केली होती. हा प्रकार 22 नोव्हेंबर 2025 रोजी सांगली ते आष्टा रस्त्यावरील टोल नाका परिसरात घडल्याचंही तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Riteish Deshmukh : 'राजा शिवाजी सिनेमाचं बजेट दाखवलं जातंय ते खोटं'; बॉलिवूड कलाकारांच्या मानधनाबद्दलबही स्पष्टच बोलला रितेश देशमुखपलाश मुच्छलचे प्रत्युत्तरविज्ञान मानेयाचे हे सर्व आरोप फेटाळून लावत पलाशने कायदेशीर पाऊल उचललं आहे. विज्ञान माने याने केलेले आरोप पूर्णपणे खोटे आणि निराधार आहेत. माझी आणि माझ्या कुटुंबाची सामाजिक प्रतिष्ठा मलीन करण्यासाठी हे जाणीवपूर्वक केलं गेलं आहे, असं पलाशनं म्हटलं होतं. पलाशने त्याचे वकील श्रेयांश मिठारे यांच्यामार्फत विज्ञानला १० कोटी रुपयांची कायदेशीर नोटीस पाठवली होती.उच्च न्यायालयाचा अंतरिम दिलासाया प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयानं पलाश मुच्छलला मोठा दिलासा दिला होता. न्यायालयाने विज्ञान माने याला पलाशविरुद्ध कोणतीही बदनामीकारक विधानं किंवा टिप्पणी करण्यास मनाई केली होती. "दोघांमध्ये व्यावसायिक वाद असू शकतो, मात्र अशा प्रकारचे वैयक्तिक आरोप करणं चुकीचे आहे," असे ताशेरे न्यायालयानं ओढले होते.The Maharashtra Files: 'तेव्हा संपूर्ण व्यवस्था हादरते', मंगेश देसाईंच्या 'द महाराष्ट्र फाईल' सिनेमाची चर्चा, पोस्टर व्हायरलदरम्यान, पलाशचं स्टार महिला क्रिकेटपटूसोबत मोडलेल्या लग्नानंतर विज्ञान माने चर्चेत आला. त्यानं या स्टार क्रिकेटपटूचा मित्र असल्याचाही दावा केला होता.
66 shares
😢
Lokmat logo
Lokmat
May 5, 2026, 12:49 PM
पुणे पोलीस घोटाळाः खंडणी प्रकरणातील तीन आरोपींची प्राथमिक चौकशीनंतर हकालपट्टी

पुणे पोलीस घोटाळाः खंडणी प्रकरणातील तीन आरोपींची प्राथमिक चौकशीनंतर हकालपट्टी

पुणे-शहरातील पोलिस दलावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ५५ वर्षीय प्राचार्यांना गुन्ह्यात अडकवून अटक करण्याची धमकी देत तब्बल ७ लाख रुपये उकळल्याचा आरोपपुणेपोलिस दलातील तिघांवर करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे पोलिस विभागात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.माहितीनुसार, पोलिस उपनिरीक्षक अजित बडे, दामिनी मार्शल सोनाली हिंगे आणि कर्मचारी सुदाम तायडे यांनी संबंधित प्राचार्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवली. अटकेची कारवाई होईल, अशी धमकी देत त्यांनी टप्प्याटप्प्याने लाखो रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. भीतीपोटी प्राचार्यांनी सुमारे ७ लाख रुपये दिल्याचे समोर आले आहे.घटनेची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्यानंतर या प्रकरणाची तातडीने चौकशी सुरू करण्यात आली. प्राथमिक तपासात आरोपांमध्ये तथ्य आढळल्याने संबंधित तिन्ही कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. पोलिस प्रशासनाने त्यांना सेवेतून बडतर्फ केल्याची माहिती सूत्रांनी दिली.दरम्यान, बंडगार्डन पोलीस स्टेशन हद्दीत या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तपासादरम्यान आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.या घटनेमुळे पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत असून, कायद्याचे रक्षकच जर अशा प्रकारे नागरिकांना धमकावून पैसे उकळत असतील तर सर्वसामान्यांनी न्यायासाठी कुणाकडे पाहायचे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. दोषींवर कठोर कारवाई करून पोलिस दलातील भ्रष्ट प्रवृत्तींना आळा घालण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
38 shares
😢
Lokmat logo
Lokmat
May 5, 2026, 12:45 PM
जमीन व्यवहार प्रकरणात लाच घेतल्याप्रकरणी पुणे पोलीस उपनिरीक्षकाचे निलंबन

जमीन व्यवहार प्रकरणात लाच घेतल्याप्रकरणी पुणे पोलीस उपनिरीक्षकाचे निलंबन

पुणे :अदखलपात्र गुन्ह्यात मदत करण्यासाठी ८० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या लोहगाव पोलिस ठाण्यातील फौजदार (पोलिस उपनिरीक्षक) मनोज मधुकर बरुटे यांना पोलिस खात्यातून निलंबित करण्यात आले आहे. अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. एका ३९ वर्षीय तक्रारदाराच्या जमिनीच्या व्यवहाराशी संबंधित अदखलपात्र गुन्ह्यात मदत करण्यासाठी आणि भविष्यात त्रास न देण्यासाठी त्यांनी १ लाख रुपयांची मागणी केली होती, जी तडजोडीअंती ८० हजार रुपये ठरली. ३० एप्रिल रोजी आलेल्या तक्रार पडताळणीनंतर, १ मे रोजी लोहगाव पोलिस ठाण्यात सापळा रचून त्यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी बरुरे याच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार, लोहगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. बरुटे कर्तव्यावर असताना केलेले वर्तन हे अत्यंत गंभीर, भ्रष्टाचारी व नैतिक अधःपतनाने पोलिस खात्याची प्रतिमा मलीन करणारे आहे, असा ठपका ठेवत त्याला खात्यातून निलंबित करण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे.
50 shares
😢
L
Lokmat
May 5, 2026, 12:40 PM
दुचाकीस्वाराची गाडी अचानक थांबल्याने हल्ल्याचा गुन्हा दाखल

दुचाकीस्वाराची गाडी अचानक थांबल्याने हल्ल्याचा गुन्हा दाखल

पिंपरी -देहूरोड परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूप मारहाणीत बदलल्याची घटना समोर आली आहे. रस्त्यावर अचानक कार आडवी घालून वाहतुकीत अडथळा निर्माण केल्याचा जाब विचारल्याच्या रागातून दोन जणांनी एका दुचाकीस्वाराला बेदम मारहाण केली. या हल्ल्यात दुचाकीस्वाराच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.ही घटना शुक्रवारी रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या दरम्यान जुन्यापुणे-मुंबई महामार्गावर देहूरोड येथे घडली. याप्रकरणी रोहिदास शांताराम जाधव (वय ४८, रा. शेलारवाडी, ता. मावळ) यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधव हे आपल्या दुचाकीवरून देहूरोडहून शेलारवाडीकडे जात होते. त्यावेळी एका कारचालकाने अचानक डिव्हायडर ओलांडत कार महामार्गावर आणली. त्यामुळे जाधव यांनी संबंधित चालकाला कार आडवी का घातली, असा जाब विचारला. याच कारणावरून आरोपी संतप्त झाले.वाद वाढल्यानंतर आरोपींनी जाधव यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत त्यांच्या नाकाला गंभीर दुखापत झाली असून डॉक्टरांनी नाकाचे हाड फ्रॅक्चर झाल्याचे स्पष्ट केले आहे. या प्रकरणी नरेंद्र अशोक मुरुडकर आणि त्याच्या एका साथीदाराविरोधात देहूरोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
32 shares
😢
L
Lokmat
May 5, 2026, 12:26 PM
पिंपरी-पिंपरी हॉटेलमध्ये प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघांना अटक

पिंपरी-पिंपरी हॉटेलमध्ये प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघांना अटक

पिंपरी -पिंपरीतील साई चौक परिसरात एका हॉटेलमध्ये जेवणाची ऑर्डर घेण्यास नकार दिल्याच्या कारणावरून झालेला वाद हिंसक वळणावर गेला. या घटनेत एका ग्राहकावर झाऱ्याने आणि इतर वस्तूंनी जीवघेणा हल्ला करण्यात आला. या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. ही घटना सोमवारी (४ मे) मध्यरात्रीनंतर सुमारे दोनच्या सुमारास घडली. अशिष जगन्नाथ वाळुंज (वय ३०, रा. नेहरुनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी अब्बास असादून शेख (वय ३०), मोहंमद अजिज आशान शेख (वय २१) आणि पंकज ऊर्फ बंटी शंकर भुमकर (वय ३०) यांना अटक केली आहे. तिघेही पिंपरी परिसरातील रहिवासी आहेत.पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचा मित्र रात्री उशिरा हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. त्यावेळी हॉटेल बंद झाल्याचे वेटरने मोठ्या आवाजात सांगितले. यानंतर फिर्यादीने वेटरला शांतपणे बोलण्यास सांगितल्याने दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला.वाद वाढल्यानंतर संशयितांनी स्वयंपाकघरातील झारा आणि इतर वस्तूंचा वापर करून फिर्यादीवर हल्ला केला. या मारहाणीत फिर्यादी गंभीर जखमी झाले. तसेच आरोपींपैकी एकाने हातातील झारा हवेत फिरवत परिसरात दहशत निर्माण केल्याचेही पोलिसांनी सांगितले. घटनेनंतर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पिंपरी पोलिस पुढील तपास करत आहेत.
27 shares
😢
L
Lokmat
May 5, 2026, 11:41 AM
पॅरोल आणि फर्लो लीव्हः भारतातील कैद्यांच्या सुटकेच्या धोरणांचा आढावा

पॅरोल आणि फर्लो लीव्हः भारतातील कैद्यांच्या सुटकेच्या धोरणांचा आढावा

अनेकदा आपल्या पाहण्यात, वाचण्यात येते की, तुरुंगात असलेल्या अमूक एका व्यक्तीला पॅरोल मिळाला. अशा व्यक्ती पॅरोल तुरुंगातून बाहेर येता आणि सुट्टी संपल्यानंतर परत जातात. यात अनेक आरोपी पॅरोलवर सुटल्यानंतर फरार होतात. तर काहीजण दुसरा गुन्हा करतात. पण, कैद्यांसाठी असलेला पॅरोल किंवा फर्लो रजा काय असते? दखलपात्र गुन्ह्यात एकदा का आरोपी कारागृहात गेला की अर्धे अधिक आयुष्य तिथेच खिचपत पडून राहावे लागते; परंतु शिक्षेदरम्यानही कैद्यांना काराबाहेर बाहेर रजेवर येण्याची मुभा असते. पॅरोल किंवा फर्लो कुणाला मिळते? शिक्षा भोगताना कैद्यांना अभिवचन रजा म्हणजेच पॅरोल आणि दुसरी संचित म्हणजे फर्लो रजेसाठी विनंती करण्याचा अधिकार असतो. या दोन्ही रजा केवळ पक्का बंदी म्हणजेच गुन्हा सिद्ध होऊन शिक्षा लागलेल्या कैद्यांना लागू असतात. रजा कधी व कशी मिळते ? कारागृह प्रशासन कैद्याचा अर्ज विभागीय आयुक्तांकडे पाठवतात. अर्जाचे गांभीर्य पाहून संबंधित कैदी जिल्ह्याचा रहिवासी असलेल्या गुन्हे शाखेकडे अभिप्रायासाठी पाठवला जातो. तिथे अर्जातील कारणाची शहानिशा केली जाते. संचित रजेचा १५, तर पॅरोल रजेचा कालावधी १ महिन्याचा असतो. विनंतीवरून पॅरोल तीन महिन्यांपर्यंत वाढवता येतो. जवळचे नातेवाईक मृत झाल्यास दहा दिवसांची पॅरोल कारागृह अधीक्षक मंजूर करू शकतात. या रजेचा कालावधी शिक्षेत गणला जात नाही. कैदी जितके दिवस रजेवर राहतो, तेवढे शिक्षेचे दिवस वाढतात. यादरम्यान त्याने गुन्हे केल्यास परत कोणतीच रजा मिळत नाही.
94 shares
😢
P
Pudhari
May 5, 2026, 10:32 AM
पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि अज्ञात घटनेचा तपास सुरू केला

पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि अज्ञात घटनेचा तपास सुरू केला

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. अल्पवयीन मुलाने इतक्या गंभीर प्रकाराचा गुन्हा केल्यामुळे या प्रकरणाची चौकशी अधिक संवेदनशीलपणे केली जात आहे. आरोपीच्या कुटुंबीयांची पार्श्वभूमी, त्याच्या वागणुकीमागची कारणे आणि गुन्ह्याच्या परिस्थितीचा तपशील पोलिस तपासत आहेत.
77 shares
😐
Pudhari logo
Pudhari
May 5, 2026, 10:29 AM
खडकोझर येथील पूर्वजांच्या शेतजमिनीबाबत न्यायालयीन वादः अधिकाऱ्याची लाच मागण्याची मागणी

खडकोझर येथील पूर्वजांच्या शेतजमिनीबाबत न्यायालयीन वादः अधिकाऱ्याची लाच मागण्याची मागणी

तक्रारदार यांच्या खडकओझर येथील वडिलोपार्जित शेतजमिनीच्या ताब्याबाबत न्यायालयीन वाद सुरू होता. न्यायालयाने संबंधित जमीन तक्रारदारांच्या ताब्यात देण्याचे आदेश महसूल विभागाला दिले होते. या प्रक्रियेसाठी आवश्यक नोंदी पूर्ण करून जमीन ताब्यात देण्यासाठी मंडळ अधिकारी योगिता भोंये यांनी तक्रारदाराकडे स्वतःसाठी तसेच तलाठी यांच्या नावाने ६० हजार रुपयांची लाच मागितली होती. नंतर तडजोड होऊन ही रक्कम ५० हजार रुपयांवर निश्चित करण्यात आली.
56 shares
😐
Lokmat logo
Lokmat
May 5, 2026, 10:08 AM
मनी लाँड्रिंगच्या चौकशीदरम्यान कोलकाताच्या उपायुक्तांविरोधात लुकआऊट नोटीस जारी

मनी लाँड्रिंगच्या चौकशीदरम्यान कोलकाताच्या उपायुक्तांविरोधात लुकआऊट नोटीस जारी

पश्चिम बंगालमधीलसत्ता परिवर्तनाच्या धामधुमीत आता प्रशासकीय वर्तुळातही मोठी खळबळ उडाली आहे.अंमलबजावणी संचालनालयानेकोलकाता पोलीस दलाचे उपायुक्त शांतनु सिन्हा बिस्वास यांच्याविरोधात 'लुकआउट' नोटीस जारी केली आहे. दक्षिण कोलकात्याच्या बालीगंज भागातील गाजलेल्या 'सोना पप्पू सिंडिकेट' प्रकरणातील मनी लाँड्रिंगच्या तपासासाठी ही कारवाई करण्यात आली आहे.कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा... शांतनु सिन्हा बिस्वास हे यापूर्वी कालीघाट पोलीस ठाण्याचे प्रभारी म्हणून कार्यरत होते. हा परिसर भवानीपूर विधानसभा मतदारसंघात येतो, जिथून ममता बॅनर्जी प्रतिनिधित्व करत होत्या. विशेष म्हणजे, ४ मे रोजी लागलेल्या निकालात भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांचा याच भवानीपूर मतदारसंघातून पराभव केला आहे. सत्तेच्या बदलासोबतच आता या हाय-प्रोफाईल पोलीस अधिकाऱ्यांभोवती तपास यंत्रणांचा पाश आवळला गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. छापेमारी आणि समन्स: १९ एप्रिल: पहाटे ७ वाजता ईडीच्या पथकाने बिस्वास यांच्या बालीगंज येथील 'फर्न रोड' वरील घरावर धाड टाकली होती. २० एप्रिल: ईडीने शांतनु सिन्हा बिस्वास आणि त्यांच्या दोन मुलांना चौकशीसाठी हजर राहण्याबाबत समन्स बजावले होते. वारंवार चौकशीला उपस्थित न राहिल्याने किंवा देश सोडून जाण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांच्याविरोधात आता 'लुकआउट' नोटीस जारी करण्यात आली आहे. यामुळे त्यांना आता देशाबाहेर प्रवास करता येणार नाही आणि विमानतळावर दिसताच त्यांना ताब्यात घेतले जाऊ शकते.
90 shares
😢
L
Lokmat
May 5, 2026, 09:57 AM
अराजकता आणि महिलांवरील अत्याचाराच्या आरोपावरून राजकारणाची मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

अराजकता आणि महिलांवरील अत्याचाराच्या आरोपावरून राजकारणाची मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

आप्पासाहेब पाटील, सोलापूर: नसरापूर घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र शोक संतप्त असताना मुख्यमंत्री मात्र राजकारणातील विजयाचा उत्सव पेढे वाटून साजरा करत आहेत. संवेदना संपल्या आहेत का ? असा सवाल करीत खा.प्रणिती शिंदेयांनी मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीसयांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. "उभा महाराष्ट्र नसरापूरच्या मुलीच्या कुटुंबाच्या बाजूने उभा असताना यांना पश्चिम बंगालच्या आसुरी विजयाचा आनंद सुचतो. फटाके उडविले जातात. पेढे वाटले जातात. भाजप सरकारच्या काळात सर्वसामान्य लोकांना न्याय मिळत नाही. त्यामुळे सामान्य जनता आता रस्त्यावर उतरत आहे," असेप्रणिती शिंदेम्हणाल्या. "महाराष्ट्रात गृहखातं अस्तित्वात आहे का? महिला अत्याचार वाढले तसे अवैध धंद्यातून खून, मारामाऱ्या, गुन्हेगारी वाढली आहे. दररोज अनेक गुन्हे घडत आहेत. कायदा सुव्यवस्था अस्तित्वात नाही. पंतप्रधान असोत किंवा मुख्यमंत्री आणि त्यांच्या कार्यकर्ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत केवळ निवडणूका आणि राजकारण यात व्यस्त आहेत. राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती पूर्णपणे ढासळली असून महाराष्ट्रात गुन्हेगारांच्या मनातून पोलिसांचा धाक संपला आहे," असा आरोप त्यांनी केला. "नरसापूरमध्ये एका निष्पाप चिमुकलीवर बलात्कार करून अत्यंत क्रूर पद्धतीने तिची हत्या करण्यात आली. ही घटना केवळ संतापजनक नाही, तर संपूर्ण समाजाला हादरवणारी आहे. त्या चिमुकलीचे फोटो पाहिल्यानंतर अंगावर शहारे येतात, मनात प्रखर चीड निर्माण होते. अशा वासनेने पिसाळलेल्या नराधमाला तात्काळ फाशीची शिक्षा झालीच पाहिजे," अशी मागणी त्यांनी केली.
70 shares
😢
Pudhari logo
Pudhari
May 5, 2026, 09:54 AM
चोरीच्या संशयावरून व्यक्तीवर निर्घृण हल्ला

चोरीच्या संशयावरून व्यक्तीवर निर्घृण हल्ला

बोरिंगचे सामान चोरी केल्याच्या संशया वरून आरोपींनी त्यांच्यावर अचानक हल्ला करत लोखंडी रॉडने बेदम मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात शेख यांचे दोन्ही हात पाय फ्रॅक्चर झाले असून गंभीर दुखापत झाली आहे.
75 shares
😢
P
Pudhari
May 5, 2026, 09:48 AM
पोलिसांनी तात्काळ केली अटकेची कारवाई, तपास सुरू

पोलिसांनी तात्काळ केली अटकेची कारवाई, तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अवघ्या दोन तासात अटक केली आरोपीला ५ मे रोजी पहाटे च्या सुमारास ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास कासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमर पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.
88 shares
😐
Lokmat logo
Lokmat
May 5, 2026, 09:00 AM
भारतात लैंगिक अत्याचार आणि तीन वर्षांच्या मुलाच्या हत्येचा 16 वर्षीय आरोपी

भारतात लैंगिक अत्याचार आणि तीन वर्षांच्या मुलाच्या हत्येचा 16 वर्षीय आरोपी

पिंपरी :तीन वर्षीय मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करून खून केल्याच्या प्रकरणातील संशयित अल्पवयीन मुलाच्या घर मालकावर पोलिसांनी तीन दिवसांनी सोमवारी (दि. ४) गुन्हा दाखल केला आहे. खेड तालुक्यातील चाकण एमआयडीसीतील खालुंब्रे येथे शुक्रवारी रोजी ही घटना घडली होती.सर्जेराव बबन बोत्रे (वय ६०, रा. खालुंब्रे) याच्या विरोधात दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस अंमलदार अर्जुन भास्कर कराड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३चे कलम २२३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खालुंब्रे येथे १ मे रोजी तीन वर्षीय चिमुरडा खेळत असताना एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने त्याला खोलीत घेतले. अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करून चिमुरड्याचा खून केला. त्यानंतर १६ वर्षीय मुलगा पसार झाला. पोलिसांनी २ मे रोजी पुणे रेल्वेस्थानकावरून त्याला ताब्यात घेतले.भाडेकराराबाबत पोलिसांना माहिती न दिल्याचे उघडदरम्यान, हा संशयित १६ वर्षीय मुलगा सर्जेराव बोत्रे याच्या खोलीमध्ये भाडेतत्त्वावर राहत असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. तसेच बोत्रे याने त्याच्या मालकीच्या पाच खोल्यांमध्ये सहा महिन्यांपासून भाडेकरू ठेवले असून, भाडेकरार करून त्याबाबत पोलिसांना माहिती दिली नाही. भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३चे कलम १६३ अन्वये दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केले. त्यामुळे बोत्रे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.कोणाला काही सांगू नये म्हणून केला खूनसंशयित १६ वर्षीय मुलगा १ मे रोजी नशेत होता. त्यावेळी दुपारी त्याने तीन वर्षीय चिमुरड्याला खोलीत घेऊन अत्याचार केला. त्यावेळी चिमुरडा मोठ्याने रडू लागल्याने संशयित १६ वर्षीय मुलगा घाबरला. चिमुरडा या प्रकाराबाबत कोणालाही सांगू शकतो, असे वाटले. त्यामुळे रडणाऱ्या चिमुरड्याचे ताेंड दाबत गळ्यावर वार करून त्याचा खून केला, असे १६ वर्षीय संशयित मुलाने चौकशीत पोलिसांना सांगितले.
38 shares
😐
Lokmat logo
Lokmat
May 5, 2026, 08:28 AM
पवई हिट अँड रनः भरधाव कार त्यांच्यावर आदळल्याने चार जण जखमी

पवई हिट अँड रनः भरधाव कार त्यांच्यावर आदळल्याने चार जण जखमी

Powai Hit and Run:मुंबईतीलपवईमध्येअपघातांचेसत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. रविवारी संध्याकाळी पवई येथील जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड परिसरात एका भरधाव कारने चौघांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली. याअपघातानंतरपरिसरात एकच खळबळ उडाली असून, आरोपी कारचालकाने घटनास्थळावरून पळ काढला होता. मात्र, काही तासांच्या थरारानंतर आरोपीने पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आयआयटी मार्केट परिसरातील महात्मा फुले नगरजवळ हा अपघात झाला. नवीमुंबईतीलखारघर येथील रहिवासी असलेला विकास दीप सिंधू (१९) हा आपली कार घेऊन वेगाने जात होता. जेव्हीएलआर मार्गावर त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि त्याने आधी एका बाईकला धडक दिली. त्यानंतर ही कार थेट रस्त्यावरून चालणाऱ्या पादचाऱ्यांवर आदळली. धडक इतकी भीषण होती की, पादचारी दूरवर फेकले गेले. अपघातानंतर मदतीसाठी थांबण्याऐवजी आरोपीने कार पळवून नेली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ जखमींना मदत केली आणि पोलिसांना पाचारण केले. या अपघातात मनीषा सावंत, नाथा सोपान पारगावकर, अम्माचार पांडे,धनुष पांडे हे चार जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमींना सुरुवातीला टागोर नगरमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्राथमिक उपचारानंतर तिघांना डिस्चार्ज देण्यात आला, मात्र मनीषा सावंत यांच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सायन रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे समजते. तक्रार, अटक आणि जामीन अपघातानंतर आरोपी विकास सिंधूने विक्रोळी पार्कसाईट पोलीस स्टेशन गाठून शरणागती पत्करली. जमावाच्या रागाला घाबरून आपण पळ काढल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पवई पोलिसांनी विकास विरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम २८१ आणि १३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आरोपीला अंधेरी येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर केले असता, त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. मद्यपान केले होते का? आरोपी हा एक विद्यार्थी असून तो ड्रंक अँड ड्राईव्हचा प्रकार आहे का, याची तपासणी करण्यासाठी पोलिसांनी त्याचे रक्ताचे नमुने घेतले आहेत. वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच तो नशेत होता की नाही, हे स्पष्ट होईल. दरम्यान, जेव्हीएलआर सारख्या अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
11 shares
😐
Lokmat logo
Lokmat
May 5, 2026, 08:20 AM
शिक्षिकेच्या हत्येचे प्रकरण उघडकीस आलेः वर्षानुवर्षे छळ होत असल्याने पतीच्या हत्येसाठी पत्नीने कंत्राट दिले

शिक्षिकेच्या हत्येचे प्रकरण उघडकीस आलेः वर्षानुवर्षे छळ होत असल्याने पतीच्या हत्येसाठी पत्नीने कंत्राट दिले

लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती (चंद्रपूर) :तालुक्यातील घोडपेठ परिसरात शिक्षकाचा संशयास्पद मृतदेह आढळून आल्याच्या प्रकरणाचा भद्रावती पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत उलगडा केला असून, पत्नीनेच पतीच्या हत्येसाठी एक लाख रुपयांची सुपारी दिल्याचे तपासात समोर आले आहे. या धक्कादायक प्रकरणी पत्नीसहित चार जणांना अटक करण्यात आली आहे. मृत रवींद्र तुळशीराम कुळमेथे (वय ४६, रा. मुधोली चेक नं. ०२, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली) हे गडचिरोली येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते. आरोपींमध्ये पत्नी दीपमाला कुळमेथे (वय ४२, रा. कृषीनगर, वरोरा), कथित समाजसेविका वर्षा राजू परचाके (वय ४७, रा. मानेवाडा, नागपूर), सोनू ऊर्फ प्रवीण नरेंद्र काळोकार (वय ३१, रा. दाहोडा, ता. रामटेक) आणि नजीर नसरूल अन्सारी (वय २८, रा. कळमेश्वर फाटा, नागपूर) यांचा समावेश आहे. कौटुंबिक वादातून कटाची निर्मिती पोलिस तपासानुसार, पती-पत्नीमध्ये मागील काही वर्षांपासून सातत्याने वाद सुरू होते. वारंवार होणारा छळ व मारहाणीमुळे दीपमाला त्रस्त होती. अलीकडेच झालेल्या मारहाणीत तिच्या कानाला गंभीर दुखापत झाली होती. त्यासाठी नागपूर येथे शस्त्रक्रिया करण्यात आली होती. नोकरी व पेन्शनच्या लालसेतून सुपारी दरम्यान, दीपमालाच्या संपर्कात वर्षा परचाके आली. त्यानंतर पतीचा काटा काढल्यास त्याची नोकरी व पेन्शनचा लाभ मिळू शकतो, या हेतूने हत्या करण्याचा कट रचण्यात आला. यासाठी दोन आरोपींना एक लाख रुपयांची सुपारी देण्यात आल्याचा आरोप आहे. कारमध्येच गळा आवळून हत्या १ मे २०२६ रोजी आरोपींनी रवींद्र कुळमेथे यांना वरोरा येथून कारमध्ये बसवून घोडपेठ येथील निर्मनुष्य ठिकाणी नेले. तेथे कारमध्येच गळा आवळून त्यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर मृतदेह घटनास्थळी टाकून आरोपी फरार झाले. कारवाईत यांचा सहभाग ठाणेदार योगेश्वर पारधी व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनात वीरेंद्र केदारे, संजय मिश्रा, प्रियांका गेडाम, पो. स्टे. भद्रावती शोध पथकातील महेंद्र बेसरकर, अनुप आस्टूनकर, जगदीश झाडे, विश्वनाथ चुदरी, धर्मराज मुंडे, योगेश घाटोळे, संतोष राठोर, प्रेमकुमार बावनकर, रोहित चिटगिरे, करिश्मा जुनघरी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे बलराम झाडोकर, सर्वेश बेलसरे, संतोष निबोरकर, नितीन कुरेकार, नितीन साळवे, प्रमोद कोटनाके, किशोर वैरागडे, अमोल सावे, गोपी नरोटे, शेखर मातनकर, दिनेश अराडे, ऋषभ वरकिगे यांनी ही कारवाई पार पाडली. तांत्रिक तपासातून गुन्ह्याचा उलगडा मोबाइल लोकेशन, संशयास्पद हालचाली आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी प्रकरणाचा छडा लावला. दीपमाला व वर्षा परचाके यांना वरोरा येथून, तर उर्वरित दोन्ही आरोपींना नागपूर येथून अटक करण्यात आली. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली कार (एमएच. ३१-डीसी. ८९१९) तसेच तीन मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १०३ (२), १४० (२) व ६१ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
70 shares
😢
Pudhari logo
Pudhari
May 5, 2026, 08:14 AM
भारतात कायदा पुन्हा लागू करण्याचे फडणवीस यांचे निर्देश

भारतात कायदा पुन्हा लागू करण्याचे फडणवीस यांचे निर्देश

आता पुन्हा तसा कायदा करा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधी व न्याय विभागाला दिले आहेत. हे निर्देश मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आले आहेत. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि संग्राम थोपटे यांनी देखील मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती.
1 shares
😐
Lokmat logo
Lokmat
May 5, 2026, 07:52 AM
पुणेः पत्नी आणि मुलाला मारहाण केल्यानंतर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पतीला अटक

पुणेः पत्नी आणि मुलाला मारहाण केल्यानंतर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पतीला अटक

पुणे:मोबाइलवरीलचॅटिंगबद्दल विचारणा केल्याने पत्नीचा गळा दाबत, मुलाला बॅटने मारहाण करण्यात आल्याची घटनापुणेस्टेशन परिसरातील क्वीन्स गार्डन येथे घडली. पत्नीचा गळा आवळून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणीपोलिसांनीएकाविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी विजय फुलचंद कारंडे (वय ४०, रा. क्वीन्स गार्डन, पुणे स्टेशनजवळ) असे आरोपीचे नाव आहे. कारंडे याने केलेल्या मारहाणीत पत्नी रूपाली (वय ३०) आणि मुलगा जखमी झाले आहेत. याबाबत पत्नीने कोरेगाव पार्कपोलिसठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० एप्रिल रोजी रात्री आठच्या सुमारास क्वीन्स गार्डन परिसरातील आरोपीच्या घरात ही घटना घडली. आरोपीमोबाइलवरचॅटिंग करत होता. त्यावेळी पत्नीने त्याला जाब विचारला. या कारणावरून त्याने पत्नीला शिवीगाळ केली. पत्नी आणि मुलाला त्याने बॅटने मारहाण केली, तसेच पत्नीचा गळा आवळून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नरेंद्र शिंदे करीत आहेत.
8 shares
😢
Maharashtra Times logo
Maharashtra Times
May 5, 2026, 07:46 AM
म्हाडा जमीन आरक्षण घोटाळ्यात नाशिक पोलिसांनी उपजिल्हाधिकाऱ्यांना अटक केली आहे.

म्हाडा जमीन आरक्षण घोटाळ्यात नाशिक पोलिसांनी उपजिल्हाधिकाऱ्यांना अटक केली आहे.

म. टा. प्रतिनिधी, नाशिक:'म्हाडा' जमीन फसवणूक घोटाळ्यात पोलिस कोठडीत असलेला संशयितनायब तहसीलदार नितीन पाटीलयाच्या कारनाम्यांचा भांडाफोड दोन तलाठ्यांनी केल्याची धक्कादायक माहिती आहे. दोन तलाठ्यांनी पोलिसांत दिलेल्या जबाबानुसार पाटीलविरोधातील पुरावे संकलित झाले आहेत. पाटील याने घोटाळ्यातील ४९ पैकी ३१ प्रकरणांमध्ये बनावट नकाशांद्वारे मंजुरी देण्याची सूचना तलाठ्यांना केली होती. त्यानुसार पाटील याला अटक झाली असून उद्या, बुधवारी (दि. ६) त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येईल.नाशिकमधील 'म्हाडा'च्या जमिनींवरील आरक्षणात झालेल्या बनावटगिरीबाबत दोन महिन्यांपासून नाशिक पोलिस आयुक्तालयाचेविशेष तपास पथक(एसआयटी) तपास करीत आहे. सहाय्यक पोलिस आयुक्त संदीप मिटके आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या पथकाने शनिवारी (दि. २) रात्री उशिराने नायब तहसीलदार नितीन पाटील याला ताब्यात घेतले.Nashik TCS धर्मांतर प्रकरणामागे 'आंतरराष्ट्रीय सिंडिकेट'; निदा खानचा मोठा गेम उघड, तपासात काय आढळलं?या गुन्ह्यात १६ मार्च रोजी दिनेश कन्हैय्यालाल उर्फ सोनू मनवानीला अटक झाली होती. न्यायालयीन कोठडीनंतर मिळालेल्या सशर्त जामीनावर मनवानी काही दिवसांपूर्वीच कारागृहाबाहेर आला. तर २३ एप्रिल रोजी बांधकाम व्यावसायिक दीपक भगवानदास करमचंदानी याला अटक झाली होती. त्यानंतर आता ३ मे रोजी नायब तहसीलदार पाटील याला अटक झाली असून, अजूनही बरेच संशयित अटकपूर्व जामीनासाठी धावधाव करत आहेत.Nashik Crime: क्लासमधील शिक्षिकेचं लाजीरवाणं कृत्य; १० वीतील तरुणीला बेडरुममध्ये पाठवलं, तिथं भाच्याने डाव साधला, घटनेनं संतापअठरा प्रकरणांचाही तपास सुरूनायब तहसीलदार नितीन पाटील हा सन २०२२ पासून नाशिकमध्ये नियुक्त आहे. त्याने तलाठी व इतरांवर दबाव आणत संशयित बांधकाम व्यावसायिक, विकासकांकडे असलेलेजमिनीचे बनावट नकाशे मंजूरकरण्यास भाग पाडले. त्याने ३१ प्रकरणांना या स्वरूपात मंजुरी दिल्याचे तपासात समोर आले आहे. उर्वरित अठरा प्रकरणे कोणामार्फत मंजूर झाली, बनावट नकाशे कोणाकडे तयार व्हायचे, महसूल, भूमी अभिलेख, तलाठी व तहसील कार्यालयांसह दुय्यम निबंधक कार्यालये व महापालिकेतील अधिकाऱ्यांचा त्यामध्ये समावेश आहे का, याबाबत पोलिस तपास करीत आहेत.
8 shares
😢
Lokmat logo
Lokmat
May 5, 2026, 07:45 AM
मुंबई पोलिसांनी बनावट जन्म प्रमाणपत्र रॅकेटचा पर्दाफाश केला

मुंबई पोलिसांनी बनावट जन्म प्रमाणपत्र रॅकेटचा पर्दाफाश केला

मुंबई: खोट्या कागदपत्रांच्या आधारे बनावट जन्म नोंदणी प्रमाणपत्रे लाटणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश मुंबई पोलिसांनी केला असून, या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी आता विशेष तपास पथकाची (SIT) नियुक्ती करण्यात आली आहे. या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याचे लक्षात घेऊनमुंबई पोलीसआयुक्तांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुंबईत बनावट दस्तऐवजांच्या आधारे चुकीची जन्म प्रमाणपत्रे मिळवण्याचे प्रकार घडत असल्याचे गुन्हे शाखेच्या (Crime Branch) तपासात समोर आले होते. प्राप्त तक्रारी आणि प्राथमिक चौकशीनुसार, अशा पद्धतीने मिळवलेल्या प्रमाणपत्रांची संख्या प्रचंड मोठी असल्याचे निदर्शनास आले आहे. हे प्रकरण केवळ फसवणुकीपुरते मर्यादित नसून त्याचे गांभीर्य अधिक असल्याने विशेष पथकामार्फत चौकशी केली जाणार आहे. या गुन्ह्यांचा प्रभावी आणि तांत्रिक तपास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या 'SIT' मध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. पोलीस सह आयुक्त (गुन्हे) हे समितीचे अध्यक्ष असतील. तर अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), अपर पोलीस आयुक्त (विशेष शाखा) आणि पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण - १, गुन्हे) हे समितीतल सदस्य असतील. विशेष तपास पथक केवळ प्रमाणपत्रे मिळवणाऱ्यांचीच नव्हे, तर ही बनावट कागदपत्रे तयार करून देणाऱ्या टोळ्या आणि त्यामागील सूत्रधारांचाही शोध घेणार आहे. या घोटाळ्यात कोणत्याही शासकीय यंत्रणेचा किंवा मध्यस्थांचा सहभाग आहे का, याचाही सखोल तपास केला जाणार आहे. बनावट जन्म दाखला मिळवणे हा गंभीर स्वरूपाचा फौजदारी गुन्हा असून, नागरिकांनी अशा कोणत्याही बेकायदेशीर मार्गाचा अवलंब करू नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
62 shares
😢
Maharashtra Times logo
Maharashtra Times
May 5, 2026, 06:02 AM
भारतात शिक्षिकेच्या पतीची हत्या करण्यासाठी पत्नी मारेकऱ्यांना कामावर ठेवते

भारतात शिक्षिकेच्या पतीची हत्या करण्यासाठी पत्नी मारेकऱ्यांना कामावर ठेवते

म. टा. वृत्तसेवा, चंद्रपूर: पत्नीने एक लाख रुपयांची सुपारी देत शिक्षक पतीची हत्या केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. ही घटना भद्रावती तालुक्यातील घोडपेठ येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी पत्नीसह चार आरोपींना अटक केली आहे. रवींद्र तुळशिराम कुळमेथे (वय ४६) रा. गडचिरोली असे मृतकाचे नाव आहे. तर पत्नी दीपमाला कुळमेथे, वर्षा परचाके, सोनू उर्फ प्रवीण कालोकर आणि नाझीर अंसारी असे आरोपींची नावे आहेत.पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृताची ओळख पटवली. प्राथमिक तपासात हा आकस्मिक मृत्यू वाटत असला तरी सखोल चौकशीत धक्कादायक सत्य समोर आले. मृतकाची पत्नी दीपमाला कुळमेथे हिनेच पतीच्या खुनासाठी वर्षा परचाके, सोनू उर्फ प्रवीण कालोकर आणि नाझीर अंसारी यांना १ लाख रुपयांची सुपारी दिल्याचे निष्पन्न झाले.Nashik TCS धर्मांतर प्रकरणामागे 'आंतरराष्ट्रीय सिंडिकेट'; निदा खानचा मोठा गेम उघड, तपासात काय आढळलं?भद्रावती पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत आरोपी दीपमाला कुळमेथे व वर्षा परचाके यांना वरोरा येथून, तर सोनू उर्फ प्रवीण कालोकर व नाझीर अंसारी यांना नागपूर येथून अटक केली. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली कार व तीन मोबाइल जप्त करण्यात आले. चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.Pune Nasrapur Case : मुलीच्या तोंडात पायमोजा कोंबला, नसरापूरमध्ये क्रौर्याची परिसीमा; आरोपीची बायको म्हणते, 11 वर्ष संबंध नाही, शिक्षा करा, बॉडीही देऊ नकाकारमध्ये आवळला गळा १ मे रोजी आरोपींनी मृतकाला१ मे रोजी आरोपींनी मृतकाला कारमध्ये बसवून घोडपेठ येथील सुनसान ठिकाणी नेले. तेथे कारमध्येच त्याचा गळा आवळून खून करण्यात आला आणि मृतदेह घटनास्थळी टाकून आरोपी पसार झाले. रवींद्र हा गडचिरोली येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होता. मात्र मागील दीड वर्षांपासून तो शाळेत जात नव्हता. त्याला दारूचे व्यसन होते व त्यातच तो पत्नीला मारझोड करीत त्रास देत असल्याचे पत्नीने सांगितले. त्यामुळे त्रस्त होऊन तिने हे पाऊल उचलण्याची कबुली दिल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांनी दिली.
38 shares
😐
Maharashtra Times logo
Maharashtra Times
May 5, 2026, 04:47 AM
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात संघटित कट असल्याचा नाशिक न्यायालयाचा निर्णय

लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात संघटित कट असल्याचा नाशिक न्यायालयाचा निर्णय

म. टा. प्रतिनिधी, नाशिक:बहुराष्ट्रीय कंपनीत अविवाहित तरुणीवर लैंगिक अत्याचार, विनयभंग, धर्मांतराचा प्रयत्न आणि जातीवाचक संवाद हे प्रकरण वैयक्तिक वादाचे नसून, एका संघटित कटाचे स्वरूप आहे. ज्याचे धागेदोरे अनेक थरांपर्यंत पोहोचले असून, परकीय निधी आणि ‘आंतरराष्ट्रीय सिंडिकेट’चेही मुद्दे त्यामध्ये आहेत. त्यामुळे संशयितनिदा खानहिची पोलिस कोठडीत चौकशी होणे अत्यावश्यक असल्याचे निरीक्षण नाशिक जिल्हा न्यायालयाने नोंदवले आहे. निदाचा जामीन फेटाळून तीन दिवस उलटूनही ‘ एसआयटी ’ला तिचा माग काढता आलेला नाही.देवळाली कॅम्प पोलिसांत दाखल अत्याचार, विनयभंग व धार्मिक भावना दुखावल्याबाबत संशयित दानिश शेख, तौसिफ अत्तार आणि निदा खान यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद आहे. त्यापैकी दानिश व तौसिफ पोलिस कोठडीत असून, निदा २७ मार्चपासून पसार आहे.Nashik Crime: क्लासमधील शिक्षिकेचं लाजीरवाणं कृत्य; १० वीतील तरुणीला बेडरुममध्ये पाठवलं, तिथं भाच्याने डाव साधला, घटनेनं संतापगुन्ह्याचे स्वरूप आणि गांभीर्य लक्षात घेता न्यायालयाने निदाचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. यासह निदाचा मोबाइल जप्त करणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे, तर पीडितेने केवळ एका व्यक्तीसोबतच्या प्रेमसंबंधातून आणि राजकीय हेतूने ही खोटी तक्रार केली आहे. संशयित तीन महिन्यांची गर्भवती असून, अटकेमुळे तिच्या अपत्याचे नुकसान होईल. यासहधर्मांतरकिंवा जातीवाचक अपमान झाल्याचा कोणताही ठोस पुरावा नसल्याचा दावा निदाच्या वकिलांनी न्यायालयात केला होता.दरम्यान, कंपनीत तरुणाच्या धर्मांतराच्या प्रयत्नात संशयितांनी वारंवार हॉटेलांत नेत तेथे मांसाहार करण्याची बळजबरी केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात संशयित तौसिफ बिलाल अत्तार (वय ३७), दानिश एजाज शेख (३२), शाहरुख हुसेन शौकत कुरेशी (३४) व रझा रफीक मेमन (३५) हे चौघे २९ एप्रिलपासून पोलिस कोठडीत आहेत. त्यांना आज, मंगळवारी (दि. ५) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.Nashik MHADA Scam: 'म्हाडा'त बनावट नकाशांद्वारे मंजुरी; नाशिकचा नायब तहसीलदार अटकेत, अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले-तपासातील मुद्दे...-पीडितेकडील 'बुरखा' पोलिसांनी जप्त केला-निदाने पीडितेच्या मोबाइलमध्ये 'इस्लामिक रिलिजिअस अॅप्लिकेशन' इन्स्टॉल केले होते-दानिशने लग्नाचे आमिष दाखवून पीडितेवर लैंगिक अत्याचार केला-दानिशने पीडितेची शैक्षणिक कागदपत्रे ताब्यात घेतली; जेणेकरून त्याला तिचे नाव बदलणे शक्य होईल-तौसिफने पीडितेला कामाच्या ठिकाणी धमकावून लैंगिक सुखाची मागणी केली-पीडितेने नाव बदलून 'हनिया' असे करण्यात येणार होते-पीडितेला मलेशियातील 'इम्रान' नावाच्या व्यक्तीकडे पाठवण्याचा कट होता-मलेशिया 'कनेक्शन' मध्ये परकीय आर्थिक रसद आहे का याचा शोध सुरूShashikant Shinde: गटबाजी रोखणार! शशिकांत शिंदेंचा सज्जड दम; व्यक्तिकेंद्रित पक्ष न ठेवण्याचाही दिला सल्लान्यायालयाचे निरीक्षण...-हा केवळ वैयक्तिक वाद नसून, हे एका संघटित कटाचे स्वरूप आहे, ज्याचे धागेदोरे अनेक थरांवर पसरलेले आहेत-परकीय निधी,आंतरराष्ट्रीय सिंडिकेटआणि मालेगाव कनेक्शनचा तपास करण्यासाठी संशयितेची कोठडीत चौकशी आवश्यक आहे-कायद्यासमोर सामान्य व्यक्ती आणि गर्भवती महिला यांच्यात गुन्ह्याच्या तपासाच्या बाबतीत फरक होऊ शकत नाही-संशयित उच्च शिक्षित असून, प्रतिष्ठित कंपनीत कामाला होती. तरीही तिने पदाचा वापर पीडितेवर दबाव टाकण्यासाठी केल्याचे प्रथमदर्शनी दिसते
61 shares
😢
Lokmat logo
Lokmat
May 5, 2026, 04:33 AM
बाल हत्या प्रकरणाचा तपास जलदगतीने आणि कठोर भूमिका घेतल्याने महाराष्ट्र शोकसागरात बुडाला

बाल हत्या प्रकरणाचा तपास जलदगतीने आणि कठोर भूमिका घेतल्याने महाराष्ट्र शोकसागरात बुडाला

धायरी: नसरापूर येथील चिमुकलीवर झालेल्या अमानवीय अत्याचाराच्या आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणाच्या तपासाची सद्य:स्थिती आणि कारवाईबाबत माहिती देण्यासाठीपुणेग्रामीणचेपोलिसअधीक्षक संदीपसिंह गिल यांनी धायरी येथे सोमवारी पीडित कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. कुटुंबीयांशी संवाद साधतानापोलिसअधीक्षक गिल यांनी आतापर्यंत झालेल्या तपासाचा आढावा सांगितला. या दुर्दैवी घटनेचा तपास पोलिस यंत्रणा अत्यंत गांभीर्याने आणि प्राधान्याने करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, ‘आम्ही या घटनेची अत्यंत गंभीर दखल घेतली असून, हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. लवकरात लवकर दोषारोपपत्र दाखल करून आरोपीला लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी प्रशासन आणि शासन पूर्णपणे कटिबद्ध आहे. या कायदेशीर प्रक्रियेत आम्हाला निश्चितच यश मिळेल, असा विश्वास ठेवा. शासन आणि पोलिस यंत्रणेने याप्रकरणी अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. आरोपीला कुठलाही थारा दिला जाणार नाही आणि न्याय प्रक्रियेत कोणताही विलंब होणार नाही, याची ग्वाही पोलिस अधीक्षक गिल यांनी दिली. तपासासाठी तज्ज्ञ अधिकाऱ्यांचे विशेष पथक पुणेग्रामीण पोलिसांनी या गुन्ह्याच्या तपासासाठी विशेष पथकाची नेमणूक केली आहे. या पथकात अनुभवी पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तपासात कोणत्याही त्रुटी राहू नयेत आणि पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळावा, या उद्देशाने हे पथक काम करणार आहे.महिलाआणि बालकांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांची संवेदनशीलता लक्षात घेऊन, या विशेष पथकात २महिलापोलिस अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे पीडित कुटुंबाशी संवाद साधणे आणि गुन्ह्यातील तांत्रिक पैलू समजून घेणे सोपे जाणार आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक गुन्ह्याचा सविस्तर पंचनामा, पुराव्यांचे संकलन आणि आरोपीविरुद्ध सबळ पुरावे गोळा करण्याचे काम करील.
69 shares
😢
Maharashtra Times logo
Maharashtra Times
May 5, 2026, 02:46 AM
नरसरपूरमध्ये मुलीवर लैंगिक अत्याचार आणि हत्येचा आरोप

नरसरपूरमध्ये मुलीवर लैंगिक अत्याचार आणि हत्येचा आरोप

म. टा. प्रतिनिधी -भोर :नसरापूर येथील मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून करताना आरोपीने मुलीच्या तोंडात पायमोजा कोंबल्याचे; तसेच छातीवर वळ उमटले असल्याचे शवविच्‍छेदन करताना निदर्शनास आल्याची माहिती सूत्रांनी दिली.ससून रुग्णालय प्रशासनाने शवविच्‍छेदनाचा प्राथमिक अहवाल पोलिसांना दिला आहे. मृत्यूचे कारण शोधण्यासाठी अंतर्गत अवयवांचे नमुने तपासणीसाठी ठेवण्यात आले आहेत. प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेतील तपासणीतूनच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.इन कॅमेरा शवविच्छेदननसरापूरयेथे एक मे रोजी एका ६५ वर्षीय व्यक्तीने घरासमोर खेळणाऱ्या मुलीला गोठ्यात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केल्याची घटना घडली होती. यानंतर ससून रुग्णालयात या मुलीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले होते. ससूनमधील न्यायवैद्यक विभागात शवविच्‍छेदनाची संपूर्ण प्रक्रिया ‘इन कॅमेरा’ करण्यात आली होती. शवविच्‍छेदनादरम्यान घेतलेले अंतर्गत अवयवांचे नमुने तपासण्यासाठी प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. शवविच्‍छेदनावेळी प्रयोगशाळेच्या गुन्हे शाखेतील न्यायवैद्यक तज्ज्ञ उपस्थित होते. या प्रकरणाचा तातडीने तपास सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.Mumbai Police Duty Hours : आठ तास ड्युटीचे 'बारा' वाजले! आता '12 तास काम, 24 तास आराम' संकल्पना आणा, पोलिसांची वाढती मागणीससून रुग्णालयात या प्रकरणातीलआरोपीची सक्षमता तपासणीकरण्यात आली आहे. या प्रकरणाचा जलद गतीने तपास सुरू असल्याने सक्षमता तपासणीचा अहवाल तातडीने सादर करण्याची सूचना पोलिसांनी रुग्णालयाकडे केली आहे. त्यानुसार तातडीने अहवाल देण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.Abhijeet Bichukle | 'छत्री धरणाऱ्या बाईला तुरुंगात टाका'; बिचुकले चाकणकरांवर भडकलेबायको म्हणते, संबंध नाहीआरोपी भीमराव कांबळेयाला कठोरात कठोर शिक्षा देऊन फाशीच द्यावी, अशी मागणी त्याची पत्नी व मुलाने व्यक्त केली आहे. ‘गेल्या अनेक वर्षांपासून त्याचा आमच्या कुटुंबाशी कोणताही संबंध नाही,’ असे स्पष्ट करून पत्नी आणि मुलाने अत्याचाराच्या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला. पत्नीने संतप्त शब्दांत प्रतिक्रिया देताना सांगितले, ‘सन २०१५ पासून तो आमच्यापासून वेगळा राहतो. आम्ही कष्ट करून उदरनिर्वाह करतो. त्याने केलेले कृत्य घृणास्पद असून, त्याच्याशी आमचा कोणताही संबंध नाही. त्याला कठोर शिक्षा व्हावी. त्याचं शवदेखील आमच्या ताब्यात देऊ नये.’Watermelon Deaths : ना पाणी, ना कलिंगड-बिर्याणी; अन्नावाटे विष शरीरात गेलं नाही, चौघांच्या शरीरात मॉर्फिन कसं शिरलं? डॉक्टरांचे थक्क करणारे सवालप्रशासनाकडे निवेदनेया प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर विविध संघटनांनीही आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे. राजगड विकास परिषद व राष्ट्रशक्ती संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर दारवटकर आणि सहकाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना निवेदन देऊन आरोपीला तत्काळ फाशी देण्याची मागणी केली; तसेच भोर व राजगड परिसरातील विविध संस्था व संघटनांनी तहसीलदारांकडे निवेदने सादर करीत चिमुरडीला न्याय देण्यासाठी आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली.
19 shares
😢
Maharashtra Times logo
Maharashtra Times
May 5, 2026, 02:08 AM
कामाचा ताण आणि मानसिक आरोग्याच्या चिंतांच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी 8 तासांच्या कर्तव्य चक्रातून 12 तासांवर नेण्याची मागणी केली

कामाचा ताण आणि मानसिक आरोग्याच्या चिंतांच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी 8 तासांच्या कर्तव्य चक्रातून 12 तासांवर नेण्याची मागणी केली

दीपेश मोरे, मुंबई :मुंबई पोलिसांसह देशभरातील पोलिस दलांमध्ये सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेल्या आठ तास ड्युटीच्या ऐतिहासिक आणि सर्वोत्कृष्ट प्रयोगाला आज, ५ मे रोजी दहा वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र, या दहा वर्षांच्या कालावधीत आठ तासांचे पुरते बारा वाजले आहेत. करोना काळात २०२० मध्ये कोलमडलेले आठ तासांचे नियोजन अद्यापही सुरळीत झालेले नाही. उलट आता तर आठ तासांऐवजी ‘बारा तास ड्युटी आणि २४ तास आराम’ या संकल्पनेला पोलिसांची पसंती आहे. त्यामुळे आठ तासांऐवजी आता १२ तास ड्युटीची अधिकृत घोषणा करण्यात यावी असे पोलिसांचे म्हणणे असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून यावर विचारविनिमय सुरू असल्याचे समजते.ड्युटीचे तास निश्चित करावेतमुंबईचीलोकसंख्या, कायदा-सुव्यवस्था आणि गुन्हे नियंत्रण करताना अपुऱ्या मनुष्यबळामुळे पोलिसांवर कामाचा प्रचंड ताण येतो. मुंबई पोलिस दलामध्ये अंमलदारांची संख्या सुमारे ३३ हजार इतकी आहे. यामध्ये महिलांची संख्या पाच हजारांहून अधिक आहे. अनियमित वेळांमुळे मानसिक स्वास्थ्य बिघडते आणि कुटुंबीयांनादेखील पुरेसा वेळ देता येत नव्हता. यामुळे मुंबई पोलिस दलामध्ये ड्युटीचे तास निश्चित करावेत, अशी मागणी जोर धरू लागली.Kirit Somaiya : आझाद मैदान पोलीस स्टेशन बाहेर किरीट सोमय्या यांचा ठिय्या; नेमकं काय घडलं?त्यावेळी वाहतूक पोलिस दलात कार्यरत असलेले कॉन्स्टेबल रवी पाटील यांनी आठ तास ड्युटी ची संकल्पना मांडली आणि तसा आराखडा तयार केला. तत्कालीन पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी या आराखड्याला मंजुरी देत ५ मे, २०१६ पासून मुंबई पोलिस दलामध्ये आठ तास ड्युटीचा प्रयोग राबविण्यास सुरुवात झाली. देवनार पोलिस ठाण्यात हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व पोलिस ठाण्यांत पोलिसांना आठ तास ड्युटी करण्यात आली.Pune Nasrapur Case : वीज गेली, सीसीटीव्ही बंद पडले, पण मंदिरासमोरील घरात बॅटरीवरचा CCTV ठरला दुवा; भोरच्या विकृताला 20 वर्षांपूर्वीच झालेली गावबंदीकरोनाने लावला ब्रेकसन २०१६ मध्ये सुरू झालेला आठ तासांचा प्रयोग सुमारे साडेतीन वर्षे सुरळीत चालला. मात्र, मार्च २०२० मध्ये आलेल्या करोनामुळे लागलेल्या लॉकडाउनमध्ये या प्रयोगाला ब्रेक लागला. पोलिस ठाण्यातील अपुऱ्या मनुष्यबळाचे कारण पुढे करून आठ तास ड्युटी शिथिल करण्यात आली. तेव्हापासून मुंबई पोलिसांसाठी पूर्वीप्रमाणेच ड्युटीच्या तासांची अद्यापही निश्चिती नाही.Watermelon Deaths : ना पाणी, ना कलिंगड-बिर्याणी; अन्नावाटे विष शरीरात गेलं नाही, चौघांच्या शरीरात मॉर्फिन कसं शिरलं? डॉक्टरांचे थक्क करणारे सवाल१२ तास काम, २४ तास आरामदहा वर्षांतमुंबई पोलिस दलातबरेच बदल झाले असून, अनेक तांत्रिक बदलही झाले आहेत. असे असले तरी मुंबईचे राहणीमान, पोलिसांची जीवनशैली, उपलब्ध मनुष्यबळ आणि प्रवासात जाणारा वेळ पाहता सध्या सर्वांची पसंती १२ तास ड्युटी आणि २४ तास आराम या संकल्पनेला आहे. अनेक पोलिस ठाण्यांतील स्टेशन हाऊस, पीटर ऑपरेटर, पीटर चालक, सीसीटीएनएस स्टाफ, कॉम्बॅट कर्मचारी हे सर्व १२ तास काम करून २४ तास आराम करतात. या वेळापत्रकानुसार काम केल्यास आराम मिळतोच, शिवाय मनुष्यबळही कमी लागत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही याबाबत आढावा घेण्यास सुरुवात केली असून, नेमकी अंमलबजावणी कशी करावी याबाबत चाचपणी सुरू आहे.
31 shares
😢
P
Pudhari
May 5, 2026, 01:10 AM
समीर पाटील या संशयिताकडून महिलेचे अपहरण; पोलीस तपास सुरू

समीर पाटील या संशयिताकडून महिलेचे अपहरण; पोलीस तपास सुरू

तीन दिवसापूर्वी गावातील एका महिलेला संशयित समीर पाटील याने पळवून नेल्याची तक्रार संबंधित महिलेच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे केली होती. त्यामुळे लव्ह-जिहादचा संशय येऊन नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला होता. याबाबत तीन दिवसानंतरही पोलिसांकडून कारवाई केली नव्हती. त्यामुळे सोमवारी सकाळी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली. संशयिता ला तातडीने अटक करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्यानंतर संबंधित महिला पोलिस ठाण्यात हजर झाली. परंतु समीर पाटील याने पळवून नेल्याचे तिने काही मान्य केले नाही.
95 shares
😢
P
Pudhari
May 5, 2026, 01:03 AM
भारतात ऑनलाइन सट्टेबाजीवर पोलिसांची कारवाई

भारतात ऑनलाइन सट्टेबाजीवर पोलिसांची कारवाई

उपरोक्त संशयित मुरलीधर कॉलनी येथे ऑनलाइन बेटिंग घेत असल्याची माहिती सीसीबीचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक यांना मिळाली. त्यांनी एपीएमसीचे पोलीस निरीक्षक उस्मान आवटी व अन्य सहकाऱ्यांना सोबत घेऊन येथे छापा टाकला. यावेळी संबंधित संशयीताकडे पाच सीपीयू, तीन मॉनिटर, एक मोबाईल, हेडफोन, दोन की-पॅड, दोन माऊस तसेच साठ हजार आठशे रुपयांची रोख रक्कम आढळून आली.
43 shares
😐
L
Lokmat
May 5, 2026, 01:00 AM
निवृत्त पोलीस संचालकावर चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचा आरोप

निवृत्त पोलीस संचालकावर चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचा आरोप

प्रवीण दीक्षित, निवृत्त पोलिस महासंचालक भोर तालुक्यातील नसरापूर येथे पासष्ट वर्षांच्या नराधमाने चार वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिचा खून केला. अत्यंत निंदनीय असेच हे कृत्य आहे. यापूर्वीही अल्पवयीन मुलींसोबत दोनदा त्याने अशीच कृत्ये करूनही न्यायालयाने त्याला दोषमुक्त जाहीर केले होते. त्याच वेळी उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली असती आणि आरोपीला शिक्षा झाली असती तर ही घटना टळू शकली असती. पोलिसांनीही महिलांविरुद्धच्या प्रत्येक गुन्ह्यात आरोपीला शिक्षा होईपर्यंत, वेळ पडल्यास सर्वोच्च न्यायालयापर्यंत खटला लढवणे गरजेचे आहे. समाजातील ही विकृती कशी रोखायची हा शासन, पोलिस तसेच संपूर्ण समाजापुढे मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. मुंबईतील साकीनाका येथे नुकत्याच एका तरुणीवर अत्यंत क्रूरपणे बलात्कार करून एका निर्जन ठिकाणी टाकण्यात आले व थोड्याच वेळाने बेशुद्धावस्थेतच तिचा मृत्यू झाला. ठाण्यात एका अल्पवयीन मुलीवर गेले अनेक महिने ३०-३२ तरुणांनी सातत्याने बलात्कार केले; ज्यात काही अल्पवयीन मुलेही होती. अत्यंत उद्वेग निर्माण करणाऱ्या या अशा घटना केवळ पुणे, मुंबई, ठाण्यापर्यंतच मर्यादित नसून सर्वच शहरांमध्ये, गावांमध्ये वारंवार घडत असल्याचे नजरेस येते. यातील अनेक पीडिता अल्पवयीन मुली असतात. फेसबुक, व्हॉट्सॲप यांसारख्या समाजमाध्यमांच्या मदतीने विश्वास निर्माण करणे, प्रत्यक्ष भेटीसाठी बोलावणे, त्यानंतर शारीरिक संबंध प्रस्थापित करणे, त्याचा व्हिडीओ तयार करणे, शस्त्रांचा धाक दाखवणे, ब्लॅकमेल करणे व अत्याचार चालू ठेवणे असे प्रकार उघडकीस येत आहेत. शारीरिक छळ करणे, वर्दळीच्या ठिकाणी छेड काढणे याशिवाय मोबाइल, ई-मेल या माध्यमातून सायबर छळाचेही प्रमाण बरेच वाढताना दिसते आहे. बहुतेक घटनांमध्ये लैंगिक अत्याचार करण्यात ओळखीचे लोक, नातेवाईक, शेजारी हेच जास्तीत जास्त आरोपी म्हणून निष्पन्न झाले आहेत. अशा ‘परिचित’ व्यक्तींविरुद्ध तक्रार करायला पीडिता तयार होत नाहीत, मुलीने तक्रार करू नये, यासाठी पालक दबाव आणतात, पीडिता हीच जणू काही दोषी आहे, अशी वागणूक समाजातून दिली जाते. हे ओळखून अल्पवयीन मुलींनी ओळख असलेल्या किंवा विश्वासू वाटणाऱ्या कोणत्याही पुरुषांबरोबर एकट्याने राहताना जास्तीत जास्त खबरदारी घेणे व शरीरसंबंध ठेवण्यास विरोध करणे आवश्यक आहे. अशा प्रसंगात ११२ या भारत सरकारने आपत्कालीन मदतीसाठी सुरू केलेल्या ॲपच्या माध्यमातून तत्काळ पोलिस मदत मिळवावी. याशिवाय सायबर पोलिसांची टोलमुक्त हेल्पलाइन १५५२६० वर संपर्क करावा.शासनाने बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये २ महिन्यांत दोषारोपपत्र ठेवणे बंधनकारक केले आहे व यासाठी जलदगती न्यायालये स्थापन केलेली आहेत. छेडछाडीच्या घटनांमध्ये पीडितेचा जबाब व अन्य पुरावा एकत्र करून पोलिसांनी चोवीस तासांत दोषारोपपत्र तयार करणे बंधनकारक करणे आवश्यक आहे. त्यामुळे समाजात विश्वास उत्पन्न होईल. महिला पोलिसांनी आपल्या हद्दीतील महिला बचतगट सदस्या, महिलांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था यांच्या मदतीने शाळा व महाविद्यालयांतील मुलींसाठी ठिकठिकाणी प्रत्यक्ष अथवा ‘झूम’सारख्या ॲपची मदत घेऊन जनजागृती करणे, महिलांमध्ये व अल्पवयीन मुलींमध्ये पोलिसांबद्दल विश्वास निर्माण करणे आवश्यक आहे. अत्याचाराचे बळी असणाऱ्या पीडितांशी संवाद साधून त्यांना पोलिस स्टेशनमधे तक्रार करण्यास प्रोत्साहित करणे, न्यायालयात त्यांना खंबीर आधार देऊन सत्य सांगण्यास पाठिंबा देणे आवश्यक आहे. पोलिसांनीही ‘महिला पोलिस मित्र’ ही संकल्पना राबवून, ज्या ठिकाणी पोलिस उपलब्ध नाहीत त्या ठिकाणी महिला पोलिस मित्रांच्या मदतीने अल्पवयीन मुलींशी संवाद स्थापन करणे जरूरीचे आहे. समाजानेही या पीडितांच्या बाबतीत आपला दृष्टिकोन बदलून त्यांना सतत मानसिक आधार मिळेल, याची खात्री करावी. महिलांची, मुलींची सुरक्षा ही आपली स्वतःची सुरक्षा आहे, हे समजून समाजातील प्रत्येक जबाबदार घटकाने त्यासाठी क्रियाशील राहणे गरजेचे आहे. अल्पवयीन मुलांना एकटे न सोडता त्यांच्या सुरक्षेची खबरदारी घेणे प्रत्येक पालकाचेही कर्तव्य आहे. त्याकडेही दुर्लक्ष होता कामा नये.
21 shares
😢
P
Pudhari
May 5, 2026, 12:50 AM
चालू तपासात संशयितांची ओळख पटली

चालू तपासात संशयितांची ओळख पटली

चिंतामणी चंद्रकांत कांबळे (रा. यशवंतनगर, कुपवाड), समीर मोहब्बत पठाण (रा. हनुमाननगर कवलापूर, सध्या रा. कुपवाड), बाबासाहेब ऊर्फ बाब्या संपत दुधाळ, अमीर बाबाजी मगदूम, शकील सरदार मगदूम, सुशांत सुनील आवळे, ज्ञानेश्वर गणपती पाटील, प्रशांत सुनील आवळे, रोहन गणपती पाटील (सर्व रा. दत्तनगर, बामणोली, ता. मिरज), उमर समीर शेख (रा. बजरंगनगर, कुपवाड) अशी कारवाई केलेल्या संशयितांची नावे आहेत.
70 shares
😐
P
Pudhari
May 5, 2026, 12:48 AM
अश्लील ऑडिओ क्लिप्सद्वारे महिलेचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपाखाली भारतीय पुरुषांना अटक

अश्लील ऑडिओ क्लिप्सद्वारे महिलेचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपाखाली भारतीय पुरुषांना अटक

इचलकरंजी :महिलेच्या घरात घुसून तिच्याशी लगट करून गैरवर्तन करण्याचा प्रयत्न करण्यासह व्हॉटस्अ‍ॅपवर अश्लील संभाषणाची ऑडिओ क्लिप पाठवून विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी गावभाग पोलिसांनी परशुराम बाळू चव्हाण (वय 35) व अजय शामराव वडिंगे (35, दोघे रा. मंगळवार पेठ, इचलकरंजी) या दोघांना अटक केली. याची फिर्याद पीडित महिलेने दिली आहे.
10 shares
😢
P
Pudhari
May 5, 2026, 12:48 AM
राजर्षी शाहू जिल्ह्यात बाल अपहरण आणि गैरवर्तणुकीच्या प्रकरणांमध्ये वाढ दिसून येत आहे

राजर्षी शाहू जिल्ह्यात बाल अपहरण आणि गैरवर्तणुकीच्या प्रकरणांमध्ये वाढ दिसून येत आहे

केवळ लैंगिक अत्याचारच नव्हे, तर जन्मलेल्या निष्पाप जीवांना उघड्यावर सोडून देण्याचे (बालपरित्याग) क्रूर सत्रही जिल्ह्यात सुरूच आहे. गेल्या पाच वर्षांत 9 बालकांना विविध तालुक्यांत उघड्यावर टाकण्यात आले, ज्यात पन्हाळा, शाहूवाडी आणि राधानगरीसारख्या भागांचा समावेश आहे. 2024-25 मध्ये अत्याचाराच्या 135 आणि अपहरणाच्या 254 घटना घडल्या असून, यासोबतच 4 अवैध गर्भपात आणि 4 खुनांच्या घटनांची नोंद आहे. गुन्ह्यांचा हा चढता आलेख पाहता, राजर्षी शाहूंच्या या नगरीत चिमुकले खरोखरच सुरक्षित आहेत का, असा संतप्त सवाल विचारला जात आहे.
95 shares
😢
P
Pudhari
May 5, 2026, 12:45 AM
कुख्यात खंडणीखोर एजाज शेख याला महाराष्ट्रात टोळीसह अटक

कुख्यात खंडणीखोर एजाज शेख याला महाराष्ट्रात टोळीसह अटक

सराईत गुंड एजाज शेख याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न व मारामारी इत्यादी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते. त्यामुळे त्याला सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार केले होते. हद्दपार असतानाही एजाज शेख हा मिरज शहरात वावरत होता. तो त्याच्या टोळीसह मिरज ते कुपवाड रस्त्यावरून जाणार असल्याची माहिती महात्मा गांधी चौक पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या पथकाने कुपवाड रस्त्यावर सापळा रचला होता. यावेळी एजाज शेख याची आलिशान कार आल्यानंतर पोलिसांनी टोळीला अटक केली. त्यावेळी कारमध्ये हत्यार मिळून आले. टोळीकडून कोणावर हल्ला करण्यात येणार होता का, याची चौकशी आता पोलिस करीत आहेत.
58 shares
😢
P
Pudhari
May 5, 2026, 12:36 AM
भारतीय पोलिसांनी सरकारी दूरचित्रवाणी वाहिनीच्या बॅरिकेड्सचा ताबा घेतला

भारतीय पोलिसांनी सरकारी दूरचित्रवाणी वाहिनीच्या बॅरिकेड्सचा ताबा घेतला

दै. ‘पुढारी’चे कार्यकारी संपादक विजय जाधव आणि सरव्यवस्थापक (ऑपरेशन) राजेंद्र मांडवकर यांच्या हस्ते पोलिस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्याकडे बॅरिकेडस् सुपूर्द करण्यात आले. हे बॅरिकेडस् प्रामुख्याने शहरातील गजबजलेले प्रमुख चौक, एकेरी वाहतुकीचे मार्ग आणि सण-उत्सवांच्या काळात गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी वापरले जाणार आहेत.
86 shares
😐
P
Pudhari
May 4, 2026, 11:45 PM
संगोला तालुक्यात अधिकृत आशीर्वादाने अवैध दारूची दुकाने बहरली

संगोला तालुक्यात अधिकृत आशीर्वादाने अवैध दारूची दुकाने बहरली

अनेक ठिकाणी राजरोसपणे उत्पादन केले जाते. याकडे कोणाचेही लक्ष नाही. तर तालुक्यामध्ये गावोगावी एक ते पाच ठिकाणी गल्ली बोळात अवैध देशी-विदेशी दारू विक्रीची दुकाने थाटली आहेत. या दुकानदारांना राजरोसपणे दिवसा व रात्री चारचाकी, दुचाकी गाडीवरून देशी व विदेशी दारूचे बॉक्स पोहोच केले जातात. हा व्यवसाय सध्या राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने मोठ्या धुमधडाक्यात सांगोला तालुक्यात चालू आहे.
18 shares
😢
P
Pudhari
May 4, 2026, 11:35 PM
महाराष्ट्रात डंपर चालकाच्या विरोधात तक्रार दाखल

महाराष्ट्रात डंपर चालकाच्या विरोधात तक्रार दाखल

या घटनेची फिर्याद अक्कलकोटच्या दक्षिण पोलिस ठाण्यात एसी चालक ज्योतिराम दिलीप चव्हाण यांनी दिली. डंपर चालक अजयकुमार अर्जुन यादव (रा. पद्मा, जि. पलामु, राज्य झारखंड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक माने करीत आहेत.
12 shares
😐
P
Pudhari
May 4, 2026, 06:40 PM
संशयितांनी केबल वायर चोरीची कबुली दिली, ज्याची किंमत ₹ 1,13,000 आहे

संशयितांनी केबल वायर चोरीची कबुली दिली, ज्याची किंमत ₹ 1,13,000 आहे

एलसीबी पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता, तिन्ही संशयितांनी चोरीची कबुली दिली. त्यांनी एकूण दोन गुन्हे केले असल्याचे सांगून 260 किलो वजनाची चोरीची केबल वायर पोलिसांना दिली. चोरीची वायर जप्त केली असता, ती 1 लाख 13 हजार रुपयांची असल्याचे समोर आले आहे. संशयितांना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली.
23 shares
😢
Lokmat logo
Lokmat
May 4, 2026, 04:04 PM
पुणेः 3 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी 65 वर्षीय व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणेः 3 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी 65 वर्षीय व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किरण शिंदे, पुणे:नसरापूर येथील चिमुरडीवरील अत्याचार व हत्येच्या संतापजनक प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळलेली असताना, पुणेपोलिसांनीहीया घटनेची गंभीर दखल घेतली आहे. या पार्श्वभूमीवरपोलिसआयुक्त अमितेश कुमार यांनी स्वतः पीडितेच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांना धीर दिला आणि न्याय मिळवून देण्याचा शब्द दिला. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज चिमुकलीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन वडिलांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करत, “आरोपीला फाशीची शिक्षा होईपर्यंत मी तुमच्या सोबत राहणार आहे. तुम्हाला कधीही काही सांगायचे असेल, मदत हवी असेल तर मी स्वतः तुमच्या घरी येईन,” असे आश्वासन दिले. भोर तालुक्यातील नसरापूर येथे १ मे रोजी साडेतीन वर्षीय चिमुरडीवर भिमराव कांबळे (६५) या आरोपीने लैंगिक अत्याचार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या अमानुष कृत्यामुळे संपूर्ण राज्यात संतापाची भावना व्यक्त होत असून, आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे. घटनेनंतर संतप्त नागरिकांनी शनिवारी (२ मे) नवले पूल परिसरात सुमारे साडेचार तास रास्ता रोको आंदोलन करत निषेध नोंदवला. “आरोपीला तात्काळ फाशी द्या” अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली. या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, या प्रकरणाचा जलदगतीने निकाल लागावा यासाठी पोलिस आयुक्तांनी महत्त्वाची घोषणा केली. या खटल्यासाठी लवकरच विशेष सरकारी वकील नियुक्त केला जाणार असून, तपास आणि न्यायप्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. असे अमितेश कुमार यांनी यावेळी मयत चिमुकलीच्या कुटुंबीयांना सांगितले.
12 shares
😢
Lokmat logo
Lokmat
May 4, 2026, 03:57 PM
बालगुन्हेगाराला तातडीने फाशी देण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्धार

बालगुन्हेगाराला तातडीने फाशी देण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्धार

Deputy CM Eknath Shinde News:भोर नसरापूर येथील चिमुकलीवर पाशवी अत्याचार करून तिला जीवे मारणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षाच योग्य असून, त्याला लवकरात फासावर चढवण्याशिवाय सरकार स्वस्थ बसणार नाही, असे उपमुख्यमंत्रीएकनाथ शिंदेयांनी आज सांगितले. नसरापूर ग्रामपंचायत सदस्य आणि इतर ग्रामस्थांनी आमदार दिलीप लांडे यांच्या पुढाकाराने उपमुख्यमंत्रीएकनाथ शिंदेयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सरकार या घटनेला जबाबदार असलेला आरोपी भीमराव कांबळेला फासावर चढवण्याची मागणी करणारे निवेदन त्यांना दिले. ग्रामस्थांनी सदर आरोपीने यापूर्वीही दोन वेळा असेच गुन्हे केले असून यावेळी तिसऱ्यांदा त्याने असे केले असल्याचे सांगितले. त्यामुळे अशा नराधमाला आता सोडल्यास पुन्हा तो कुणाचा तरी घास घेईल, अशी भीती गावात निर्माण झाली असल्याचे सांगितले. दोनदा शिक्षा होऊनही अल्पावधीत सुटका झाल्याने त्याची हिंमत वाढल्याने त्याने पुन्हा असे कृत्य केले. त्यामुळे या आरोपीवर कायमची कारवाई करावी अशी विनंती त्यांनी शिंदे यांना केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली ग्रामस्थांचे निवेदन स्वीकारून त्यांच्याशी बोलल्यानंतर या घटनेबाबत माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली असून तेही या घटनेबाबत अतिशय गंभीर असल्याचे सांगितले. याबाबत आम्ही दोघांनीही पोलीस अधीक्षकांना न्यायवैद्यक पुरावे, इतर सर्व पुरावे अतिशय काटेकोरपणे गोळा करण्यास सांगितले आहे. तसेच लवकरात लवकर त्याच्यावर आरोपपत्र दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याच्यावर सर्व गंभीर कलमे दाखल करून तो कोणत्याही परिस्थितीत वयाचे अथवा मानसिक आजाराचे कारण काढून सुटणार नाही, याची दक्षता घेण्यात येणार असल्याचेही सांगितले. कोणत्याही परिस्थितीत आरोपीला सोडणार नाही या घटनेसाठी पुण्यातील निष्णात वकिलांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली जाणार असून अशा प्रकारचे खटले हाताळण्यात त्यांचा हातखंडा असल्याचे स्पष्ट केले. तसेच मी आणि मुख्यमंत्री मिळून आम्ही पोलीस महासंचालक सदानंद दाते यांचेकडून दर दिवशी या घटनेची माहिती घेत असून कोणत्याही परिस्थितीत आरोपीला सोडणार नाही. पीडितेच्या कुटुंबियांना लवकरात लवकर न्याय मिळावा, यासाठी उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीना विनंती करून या घटनेची दैनंदिन सुनावणी घेण्यासाठी विशेष फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापना करण्याबाबतही सरकार प्रयत्नशील असल्याचे शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. दरम्यान, या घटनेनंतर मी स्वतः पीडितेच्या वडिलांशी फोनवरून बोललो असून त्यांचे सांत्वन केले आहे. या घटनेतील नराधमाला फासावर चढवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. अशा प्रवृत्तींना ठेचून काढणे आणि समाजात योग्य तो संदेश पोहचवणे ही सरकार म्हणून आमची जबाबदारी आहे आणि ती आम्ही नक्की पूर्ण करू. याबाबत योग्य ती कारवाई करणार असून आरोपीला शासन केले जाईल असे सांगून त्यांनी ग्रामस्थांना आश्वस्त केले.
6 shares
😢
L
Lokmat
May 4, 2026, 12:14 PM
उत्तराखंडच्या काशीपूरमध्ये पतीच्या हत्येप्रकरणी पत्नी आणि प्रियकराला अटक

उत्तराखंडच्या काशीपूरमध्ये पतीच्या हत्येप्रकरणी पत्नी आणि प्रियकराला अटक

अनैतिक संबंधांच्या आड येणाऱ्या पतीचा काटा काढण्यासाठी एका पत्नीने क्रूरतेची सीमा ओलांडल्याची घटनाउत्तराखंडच्याकाशीपूरमध्ये उघडकीस आली आहे. १० वर्षांचा सुखाचा संसार मोडून एका वर्षाच्या प्रेमासाठी पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीला विष देऊन संपवले. धक्कादायक म्हणजे, हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह महामार्गावरील एका कालव्यात फेकून दिला. पोलिसांनी ८ दिवसांनंतर मृतदेह शोधून काढत दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. मृत कुलवंत सिंह (३२) हा २५ एप्रिल रोजी पत्नी गुड्डीला भेटण्यासाठी तिच्या फ्लॅटवर गेला होता. गुड्डीने आधीच आपला प्रियकर कपिल मौर्य याच्यासोबत मिळून कुलवंतच्या हत्येचा कट रचला होता. फ्लॅटवर पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. तिथे गुड्डीने दारू आणि बिअर मागवून ठेवली होती. कुलवंत नशेत असताना, संधी साधून गुड्डी आणि कपिलने त्याच्या दारूमध्ये गुपचूप सल्फासच्या गोळ्या मिसळल्या. विषारी दारू पिताच कुलवंतचा तिथेच तडफडूनमृत्यूझाला. पतीचामृत्यूझाल्याची खात्री पटल्यानंतर गुड्डी आणि कपिलने त्याचा मृतदेह कारमध्ये टाकला आणि महामार्गावरील बायपास पुलाजवळ असलेल्या एका कालव्यात फेकून दिला. कुलवंत घरी न परतल्याने त्याच्या आईने १ मे रोजी पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. कुलवंत २५ एप्रिलला पत्नीला भेटायला गेला होता, ही एकमेव माहिती पोलिसांच्या हाती होती. तपास सुरू असताना पोलिसांना गुड्डी आणि कपिल मौर्य यांच्यातील अवैध संबंधांची कुणकुण लागली. संशयाच्या आधारे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन त्यांची कडक चौकशी केली असता, गुड्डीने आपला गुन्हा कबूल केला. "पती नशेत मला मारहाण करायचा, त्यामुळे आम्ही त्याला संपवले," असे तिने पोलिसांना सांगितले. या दोघांच्या प्रेमप्रकरणाची माहिती कुलवंतला मिळाली होती आणि त्यावरून त्यांच्यात वारंवार भांडणे होत होती. याच रागातून कुलवंतची हत्या करण्यात आली. पोलिसांनी एसडीआरएफच्या मदतीने ८ दिवसांनंतर कालव्यातून कुलवंतचा मृतदेह बाहेर काढला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून न्यायालयाने दोन्ही आरोपींची रवानगी तुरुंगात केली आहे.
20 shares
😢
Pudhari logo
Pudhari
May 4, 2026, 12:02 PM
विविध गुन्ह्यांसाठी भारतभर अनेक जणांना अटक

विविध गुन्ह्यांसाठी भारतभर अनेक जणांना अटक

अटक करण्यात आलेले आरोपींची नांवे- हिम्मत सिंग कुंदन सिंग (वय २८, रा .अंबाजोगाई, जि.बीड), मनोज सर्जेराव कुटे (वय ३३, रा.साखरे बोरगांव) , मुन्ना केशवकुमार वर्मा (वय ३०, रा.पंचकुआ जि.खिरी (उ.प्र.), सचिन बुध्दाजी शिर्के (वय ४०, शिरवली जि.रायगड), हरीष तोमर देवळीकर (वय ४४, बजकोली उडपी कर्नाटक), जसपाल सिंग केसरसिंग झाला (वय २५, दरबारमढ, गुजरात), अरूण कुमार राय, नरेश यादव (वय २८), अंजनी महेशगंज (उ.प्र.), हो.रशिद नुरदिन गुज्जर (वय १९, ढोलकी, जि.पुंछ, जम्मू काश्मीर) अशी आहेत. त्यांच्या ताब्यातून १ लाख ८० हजार रुपये रोख, देशी बनावटीची पिस्टल, ४ जिवंत काडतुसे, बोलेरो व इनोव्हा कार, मोबाईल फोन आणि वायफाय डिव्हाइस असा एकूण १२ लाख ४८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
46 shares
😐
Lokmat logo
Lokmat
May 4, 2026, 11:51 AM
अल्पवयीन मुलाच्या हत्येप्रकरणी आरोपीच्या लैंगिक क्षमतेची चाचणी करण्याची पुणे पोलिसांची योजना

अल्पवयीन मुलाच्या हत्येप्रकरणी आरोपीच्या लैंगिक क्षमतेची चाचणी करण्याची पुणे पोलिसांची योजना

पुणे: नसरापूर येथे चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा निर्घृण खून करणाऱ्या नराधमाच्या लैंगिक सक्षमतेची चाचणी केली जाणार असून, आरोपी पीडित मयत मुलीला यापूर्वी कितीवेळा भेटला आहे, इतर कोणत्या ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केला आहे का किंवा अशा प्रकारचे आणखी गुन्हे केले आहेत का, याचा तपास करणार असल्याचे पुणे ग्रामीणपोलिसांनीन्यायालयात सांगितले. या प्रकरणी ६५ वर्षीय आरोपी भीमराव कांबळे याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(खून), ६४(बलात्कार), ७४(विनयभंग करण्याच्या उद्देशाने हल्ला करणे), १३७(२), १४०(१), १४०(३) (अपहरण) यासह लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायद्यांतर्गत (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत चिमुकलीच्या आईने पुणे ग्रामीणपोलिसांकडेतक्रार दिली. ही घटना शुक्रवारी (दि १ ) दुपारी तीन ते रात्री आठ दरम्यान राजगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत नसरापूर गावाजवळ घडली. पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपीलाअटककरून कडेकोट बंदोबस्तात विशेष न्यायाधीश एम. जी. चव्हाण यांच्या न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपीने चिमुकल्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे, त्या अनुषंगाने त्याची वैद्यकीय तपासणी, रासायनिक विश्लेषण तपासणी आणि सक्षमतेची चाचणी करायची आहे. आरोपी चिमुकल्या मुलीला घेऊन जाताना पाहणाऱ्या साक्षीदारांचे जबाब नोंदवायचे आहेत, आरोपीने चिमुकलीला कोणत्या हत्याराने मारले, त्याचा तपास करून पुरावा गोळा करायचा आहे. आरोपीला गुन्ह्यात आणखी कोणी मदत केली आहे का, याची चौकशी करायची आहे, असे तपास अधिकारी विजयमाला पवार आणि विशेष सरकारी वकील अरुंधती ब्रह्मे यांनी केली. न्यायालयाने आरोपीला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. विकृत प्रवृत्तीमुळे २० वर्षांपूर्वीच गावाने काढले होते बाहेर आरोपी भीमराव कांबळे हा सुरुवातीपासूनच अत्यंत घाणेरड्या मानसिकतेचा होता, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. त्याच्या याच विकृत वागण्याला कंटाळून ग्रामस्थांनी त्याला तब्बल २० वर्षांपूर्वीच गावातून हाकलून दिले होते अशी माहिती समोर आली आहे. सध्या त्याच्या घरात त्याची पत्नी आणि मुलगाही राहत नसल्याचे समजते. शेतात जाणाऱ्या अनेकमहिलांवरत्याची नेहमीच वाईट नजर असायची आणि त्याने अनेकदा त्यांच्याशी गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला होता असेही सांगितले जात आहे.
99 shares
😢
L
Lokmat
May 4, 2026, 11:37 AM
पुणे भीतीच्या गर्तेतः मुली आणि महिलांवरील गुन्हे वाढत आहेत

पुणे भीतीच्या गर्तेतः मुली आणि महिलांवरील गुन्हे वाढत आहेत

पुणे: आज प्रत्येक आई-वडिलांच्या मनात एकच भीती घर करून बसली आहे, ‘आपली मुलं खरंच सुरक्षित आहे का? रस्त्यावर, शाळेत, घराजवळ किंवा अगदी सोसायटीच्या परिसरातही मुली आणिमहिलासुरक्षित नाहीत, हे वारंवार घडणाऱ्या आणि गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांमधून सिद्ध होत आहे.’ नसरापूर येथील चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या आणि महाळुंगे येथील चिमुकल्यावरील अत्याचार आणि गळा चिरून केलेल्या हत्येच्या घटनांनी महाराष्ट्र हादरला आहे. याविरोधात प्रचंड जनक्षोभ उसळला असून, आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी होत आहे. स्वारगेट येथील अत्याचाराच्या घटनेनंतरपुणेकरांनीअसाच आक्रोश केला होता. कायदे आहेत, योजना आहेत,पोलिसयंत्रणा आहे. तरीदेखीलमहिलांवरीलअत्याचार रोखण्यातपोलिसप्रशासन आणि यंत्रणा वारंवार अपयशी ठरत आहेत. आरोपींना कायद्याची भीती उरली नाही. पीडितांना न्याय मिळण्यात होणाऱ्या दिरंगाईने आरोपी मोकाटच असल्याचे भीषण वास्तव आहे. भयंकर म्हणजे, शहरात २०२४ मध्ये ५०५ महिलांवर बलात्काराचे गुन्हे नोंदवले गेले, तर ८६४ महिलांचा विनयभंग केल्याच्या घटनांची नोंद झाली. २०२५ मध्ये शहरात ४७३ महिलांवर बलात्काराच्या घटना आणि ८३६ महिलांचा विनयभंग केल्याच्या घटना घडल्या आहेत. राज्यभरात केवळ २०२४-२५ मध्येच ९४ हजार महिला बेपत्ता, त्यात हजारो अल्पवयीन मुलींचा समावेश असल्याचे भीषण वास्तव आहे. यापूर्वी शहरात घडलेल्या महिला अत्याचारांच्या घटना... १) स्वारगेट बसस्थानकात महिलेवर बलात्कार... स्वारगेट बसस्थानकात एका २६ वर्षीय तरुणीवर दत्तात्रय गाडे नामक आरोपीने बसमध्ये बलात्कार केला. ही घटना फेब्रुवारी २०२५ मध्ये घडली होती. गुन्हा घडल्यानंतर ७२ तासांत पोलिसांनी आरोपीला शिरूर तालुक्यातील गुनाट गावातील एका शेतातून ताब्यात घेतले होते. २) मालधक्का चौकात चिमुकलीचा खून... नसरापूरप्रमाणेच पुण्यातील मालधक्का चौक परिसरातही असाच माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार घडला होता. फुटपाथवर आई-वडिलांसोबत झोपलेल्या अडीच वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करून नराधमाने तिला रेल्वेच्या एका बोगीत नेऊन अमानुष मारहाण केली. तिच्या शरीराचे ठिकठिकाणी चावे घेतले. गंभीर दुखापत झालेल्या अवस्थेत सापडलेल्या या बालिकेचा ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ३) दिव्यांग मुलीवर अत्याचार... भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका नराधमाने १५ वर्षांच्या दिव्यांग अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना बेड्या ठोकल्या होत्या. ४) सुरक्षा रक्षकाकडून मुलीवर बलात्कार लक्ष्मीनगर भागातील एका सोसायटीत शैलेश कुमार (वय २५) या सुरक्षारक्षकाने एका १५ वर्षीय मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केले. ‘तुला आणि तुझ्या कुटुंबाला संपवून टाकीन,’ अशी तिला धमकी दिली. प्रकृती बिघडल्याने या मुलीला ससून रुग्णालयात दाखल केल्यानंतर ती पाच महिन्यांची गरोदर असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. ५) अल्पवयीन मुलींना धमकावून बलात्कार... चंदननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मार्च २०२६ मध्ये दोन घटनांमध्ये अल्पवयीन मुलींना धमकावून त्यांच्यावर बलात्कार केल्याच्या घटना घडल्या. याप्रकरणी ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत दोघा आरोपींना अटक केली होती. गुन्हेगारांना शिक्षा का नाही? कायद्याच्या कागदोपत्री तरतुदी असूनही प्रत्यक्षात न्याय प्रक्रिया संथ आहे. पुण्यासारख्या शिक्षणाचे माहेरघर म्हणवल्या जाणाऱ्या शहरात २०२४ मध्ये बलात्कार प्रकरणांमध्ये केवळ १३ ते १८ % शिक्षा दर असल्याचे दिसून येते. या घटनांमध्ये न्यायालयात अनेकदा साक्षीदार फिरतात, तडजोडी होतात, पोलिस तपासात त्रुटी राहतात अथवा राजकीय दबाव परिणामी आरोपी मोकाट फिरतात आणि पीडित कुटुंबे न्यायासाठी भटकत राहतात. पोलिसांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह सरकारकडून महिला सुरक्षेसाठी योजना जाहीर केल्या जातात, पण प्रत्यक्षात पोलिसांची अपुरी गस्त, संवेदनशील भागांवर कमी लक्ष, तक्रारी दाखल करून घेण्यास अनेकदा विलंब यामुळे पोलिसांच्या भूमिकेवरदेखील अनेकदा प्रश्न उपस्थित केले जातात. भोर तालुक्यातील नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या हा फक्त गुन्हा नाही, तर संपूर्ण यंत्रणेचा पराभव आहे. आरोपीवर यापूर्वीही महिला अत्याचाराचे गुन्हे दाखल होते. गावकऱ्यांनी आरोपी भीमराव कांबळे याने प्राण्यांवरदेखील अत्याचार केल्याचे सांगितले. यामुळे अशा आरोपीवर पोलिसांनी योग्य ती प्रतिबंधात्मक कारवाई करणे गरजेचे होते. आकडे काय सांगतात? - २०२२ साली राज्यात २ हजार ९०४ बलात्काराचे गुन्हे दाखल- २०२३ मध्ये राज्यात ७ हजार ५२४ बलात्काराचे गुन्हे दाखल- २०२४ मध्ये राज्यात ७ हजार ९४० बलात्काराचे गुन्हे दाखल- विनयभंग प्रकरणांमध्येदेखील १७ हजार ३२८ वरून १७ हजार ६७१ पर्यंत वाढ- २०२४-२५ मध्ये राज्यात ९४ हजार महिला बेपत्ता, त्यात हजारो अल्पवयीन मुलींचा समावेश
51 shares
😢
Pudhari logo
Pudhari
May 4, 2026, 10:10 AM
भारतीय व्यावसायिकावर लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणुकीचे अनेक आरोप

भारतीय व्यावसायिकावर लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणुकीचे अनेक आरोप

अशोक खरातविरोधात महिलांचे लैंगिक शोषण तसेच आर्थिक फसवणुकीचे नाशिक, पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांत अनेक गुन्हे दाखल आहेत. विविध जिल्ह्यांतील पोलिस यंत्रणा त्याच्या ताब्यासाठी प्रयत्नशील आहेत. या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) देखील तपास सुरू केल्याने भविष्यात खरात ईडीच्या ताब्यात जाण्याची शक्यता आहे. आगामी काही महिन्यांत त्याला विविध तपास यंत्रणांच्या कोठडीत राहावे लागू शकते. खरातला १८ मार्च रोजी अटक करण्यात आली होती.
93 shares
😢
P
Pudhari
May 4, 2026, 09:29 AM
भारतीय महापौरांनी भ्रष्टाचारावर कारवाई केली, अधिकाऱ्यांवर आरोपपत्र दाखल करण्याचे आदेश

भारतीय महापौरांनी भ्रष्टाचारावर कारवाई केली, अधिकाऱ्यांवर आरोपपत्र दाखल करण्याचे आदेश

संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश प्रकरणाचे गांभीर्य आणि मांडण्यात आलेल्या पुराव्यांची सखोलता पाहता महापौर अजीव पाटील यांनी अत्यंत कडक भूमिका घेतली. त्यांनी तात्काळ प्रशासनाला या घोटाळ्यात सामील असलेल्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे कठोर आदेश दिले आहेत.
62 shares
😢