चोप्रा शहरातील इंधनाच्या टंचाईचा वाहनचालकांना फटकाः लाईव्ह अपडेट्स
महाराष्ट्रासहदेश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स... LIVE चोपडा शहरातील पेट्रोल पंपांवर डिझेल आणि पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या वाहनधारकांना इंधन टंचाईचा सामना करावा लागत आहे. चोपडा शहरातील काही पेट्रोल पंपांवर पेट्रोल उपलब्ध आहे, मात्र डिझेल उपलब्ध नाही. तर काही ठिकाणी डिझेल उपलब्ध आहे, पण पेट्रोल उपलब्ध नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे ज्या पेट्रोल पंपावर पेट्रोल उपलब्ध आहे, त्या ठिकाणी पेट्रोल भरण्यासाठी वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे, ज्या पेट्रोल पंपावर डिझेल उपलब्ध आहे, त्या ठिकाणी डिझेल भरण्यासाठी वाहनांची मोठी गर्दी होत आहे. डिझेल आणि पेट्रोल टंचाईमुळे वाहनधारक आवश्यकतेपेक्षा अधिक इंधन भरून घेताना दिसत आहेत. जालन्यातील मोतीराम अग्रवाल को-ऑपरेटिव्ह बँक तसेच पूर्णवादी नागरी सहकारी बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी रायचंद कुरंगळ याची मालमत्ता जप्त करण्याच्या हालचाली आर्थिक गुन्हे शाखेने सुरू केल्या आहेत. याबाबतची माहिती पोलिसांनी दिली आहे. कुरंगळ हा वेअरहाऊसचा मालक असून मोतीराम अग्रवाल जालना मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक तसेच पूर्णवादी नागरी सहकारी बँकेकडून शेतमाल तारण ठेवून कर्ज देण्याची योजना होती. मात्र, कुरंगळ याने आपल्या दलालामार्फत गरजू नागरिकांची कागदपत्रे गोळा करून बँकेकडे शेतमाल तारण कर्जासाठी अर्ज सादर केले. या प्रक्रियेदरम्यान वेअरहाऊसमध्ये प्रत्यक्ष शेतमाल नसतानाही शेतमाल तारण ठेवलेला असल्याच्या बनावट पावत्या देऊन मर्चंट बँकेची २३ कोटी ३३ लाख रुपये तर पूर्णवादी बँकेची ८ कोटी १२ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी आधीच मर्चंट बँक घोटाळ्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या कुरंगळसह पाच जणांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. चोपडा तालुक्यात ज्या प्रमाणात केळीची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते, त्याचप्रमाणे कापूस लागवडही शेतकरी मोठ्या प्रमाणावर करत होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून कापूस पिकासमोरील विविध अडचणींमुळे आता कापूस क्षेत्रात घट होताना दिसत आहे. अनियमित पाऊस, कापसाच्या जुन्या वाणांचा वापर, तसेच लाल्या आणि बुरशीजन्य रोगांसह अळीच्या प्रादुर्भावामुळे कापसाच्या उत्पादनात सातत्याने घट होत आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक फटक्याला सामोरे जावे लागत आहे. कापूस लागवडीपासून ते वेचणीपर्यंत मोठ्या प्रमाणावर खर्च, मजूर टंचाई आणि उत्पादन खर्चात वाढ यामुळे शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी निर्माण होत आहेत. त्यातच कापूस वेचणीनंतर बाजारात अपेक्षित भाव मिळत नसल्याने कापूस उत्पादक शेतकरी अधिकच संकटात सापडत आहेत. या सर्व कारणांमुळे चोपडा तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकरी आता हळूहळू कापूस लागवडीपासून दूर जाताना दिसत आहेत. यंदा चोपडा तालुक्यात कापूस लागवडीखालील क्षेत्र सुमारे 35 ते 40 टक्क्यांनी घटण्याची शक्यता असून, त्याऐवजी पपई आणि केळी पिकांच्या क्षेत्रात वाढ होणार असल्याची माहिती शेतकरी देत आहेत. बदलापूरहून दादरकडे जाणाऱ्या एसी लोकलच्या टपावर मनोरुग्ण तरुण चढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विठ्ठलवाडी ते कल्याण दरम्यान दुपारी सुमारे २:०३ वाजण्याच्या सुमारास एसी लोकल ट्रेनच्या छतावर एक तरुण चढल्याने प्रवाशांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली. विठ्ठलवाडी स्थानकावर पोलिसांनी संबंधित तरुणाला खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. तो काही वेळ खाली उतरला; मात्र काही वेळाने पुन्हा लोकलच्या टपावर चढला, अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. यानंतर ट्रेन पुढे कल्याण स्थानकाकडे रवाना करण्यात आली. कल्याण स्थानकावर ट्रेन पोहोचल्यानंतर हमाल, रेल्वे पोलीस आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी संयुक्त प्रयत्न करत सुमारे २:५० वाजता त्या तरुणाला खाली उतरवण्यात यश मिळवले. यानंतर त्याला तात्काळ रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या संपूर्ण प्रकारामुळे सुमारे अर्धा ते पाऊण तास प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला. - तौसिफ अत्तार, दानिश शेख, शाहरुख कुरेशी आणि रजा मेमन यांना नाशिक सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते- आयटी कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांवर लैंगिक अत्याचार मानसिक छळ आणि धर्मांतराच्या आरोपाखाली करण्यात आले आहेत आरोपींवर गुन्हे दाखल- आज न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिल्यानंतर पुढील पुण्यात ताबा घेण्यासाठी एसआयटी कडून करण्यात आला आहे न्यायालयात अर्ज- येत्या एक ते दोन दिवसात पुन्हा एसआयटी घेणार संशयित आरोपींचा ताबा भिवंडी शहर गुटखा व अमली पदार्थांच्या विक्री व वितरणाचे मुख्य केंद्र बनले असून पोलीस यंत्रणा सोयीस्करपणे दुर्लक्ष करत असल्यामुळे शहर नशेच्या विळख्यात अडकत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे शहराध्यक्ष प्रवीण पाटील यांनी केला आहे. भिवंडीत गुटखा व अमली पदार्थ बंदीचा केवळ दिखावा केला जात असल्याचा आरोप करत प्रवीण पाटील यांच्या नेतृत्वाखाली आसबीबी येथील पक्ष कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली. यावेळी गुटखा व प्रतीकात्मक अमली पदार्थांची होळी करून निषेध व्यक्त करण्यात आला. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणलेला गहू अवकाळी पावसामुळे भिजल्याची घटना घडली आहे. अंदाजे 1200 ते 1500 क्विंटल गहू पावसात भिजल्याची माहिती समोर आली आहे. हवामान विभागाने यवतमाळ जिल्ह्यासाठी तीन दिवसांचा येलो अलर्ट जारी केला होता. मात्र, अचानक गव्हाची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने साठवण व्यवस्थेवर ताण आला आणि पावसामुळे मोठे नुकसान झाले. हवामान विभागाच्या वतीने गोंदिया जिल्ह्याला आज पावसाचा अलर्ट देण्यात आला होता. हवामान विभागाचा हा अंदाज खरा ठरला असून दुपारनंतर गोंदिया जिल्ह्यात ढगाळ वातावरण झाले व त्यानंतर अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. वादळी वारा आल्याने कापणीला आलेला धानपिक तसेच आंबा पिक व भाजीपाल्याच्या शेतीला याचा फटका बसण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे गोंदिया जिल्ह्याचा पारा 41 अंशांवर गेला असताना अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना असह्य उकाड्यापासून मात्र दिलासा मिळाला आहे. - चर्चगेट–बोरिवली ५:३९ महिला लोकलमधील प्रवाशांना महिला टीसींकडून गुलाब फुलांचे वितरण- महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या या विशेष सेवेला आज ३४ वर्षे पूर्ण होत असून, या निमित्ताने रेल्वे प्रशासनाने प्रवाशांप्रती आपली कृतज्ञता आणि जिव्हाळा व्यक्त केला- लोकलमधील प्रवाशांना महिला तिकीट तपासनीस कर्मचाऱ्यांनी गुलाब फुले देत आनंदाचा क्षण साजरा केला सोलापूर : शेतीच्या वादातून एकाचा खून, दक्षिण सोलापूर तालुक्यातील इंगळगी गावातील घटना, शासकीय रूग्णालयात ग्रामस्थांची मोठी गर्दी नसरापूर बलात्कार-हत्या प्रकरणाच्या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून पोलिसांकडून तीन नावांची शिफारस करण्यात आली आहे. उज्ज्वल निकम, अजय मिसर किंवा अनिकेत निकम या नावांची सध्या चर्चा आहे. आदिवासी बांधवांच्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी महत्वपूर्ण निर्णय. स्वयंसेवी संस्थाच्या पाच प्राथमिक व 19 माध्यमिक अनुदानित आश्रमाशाळांची श्रेणीवाढ. प्राथमिकमधून माध्यमिक आणि माध्यमिकमधून कनिष्ठ महाविद्यालय अशी श्रेणीवाढ, त्यासाठी आवश्यक पदनिर्मिती व आवश्यक खर्चाच्या तरतूदीस मंजुरी. डोंगराळ, दुर्गम भागातील आदिवासी बांधवांच्या मुलांचे शिक्षण गतीमान होणार. सोलापूरसाठी महत्वाचा निर्णय सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये या शैक्षणिक वर्षापासून (सन २०२६-२७) पदवीस्तराचे तीन अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरु करण्यास मंजुरी. सोलापूर आणि आजुबाजुच्या परिसरातील अभियांत्रिकी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या होतकरूंच्या दृष्टीने हिताचा निर्णय. प्रत्येकी साठ प्रवेश क्षमतेचे एआय अँण्ड मशिन लर्निंग, कॉम्प्युटर सायन्स अँण्ड इंजिनियरींग, इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड टेलिकम्युनिकेशन असे तीन नवे अभियांत्रिकी अभ्यासक्रम. अभियांत्रिकी विद्यालय महाराष्ट्र शासनास हस्तांतरीत धाराशिव जिल्हयातील तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या माध्यमातून चालविण्यात येणारे श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय महाराष्ट्र शासनास हस्तांतरित करण्याचा निर्णय. महाविद्यालयाचे सक्षमीकरण होणार, अद्ययावत शैक्षणिक सोयी-सुविधांमुळे या परिसरातील होतकरूंना दर्जेदार अभियांत्रिकी शिक्षण उपलब्ध होण्याची संधी. नसरापूर प्रकरणानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गुन्हेगारांवर लगाम घालण्यासाठी मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीसयांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला असून, लैंगिक शोषणातील आरोपींना पॅरोल न देण्याबाबत नवीन कायदा करण्याचे आदेश विधी व न्याय विभागाला दिले आहेत. चीनमधीलएका फटाक्याच्या फॅक्ट्रीत झालेल्या भीषणस्फोटात२१ जणांचामृत्यूझाला असून ६१ जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनंतरचीनचेराष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.वाचा सविस्तर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही या निकालाबद्दल शंका उपस्थित केल्या आहेत. "जी दिल्ली आणि पश्चिम बंगाल भाजपाला मोदी लाट शिखरावर असताना जिंकता आले नाही. २०१५ साली दिल्लीमध्ये आणि २०१६ साली बंगालमध्ये प्रत्येकी तीन जागा मिळाल्या. त्या दिल्ली आणि बंगालमध्ये भाजपाने अशा काळात विजय मिळवला, जेव्हा मोदींची लोकप्रियता संपूर्ण देशात रसातळाला चालली आहे, असे कसे?", असा सवाल केजरीवालांनी उपस्थित केला आहे. जनतेने पंतप्रधान मोदी आणि देशाच्या विकासावर आपला विश्वास व्यक्त केला आहे. पश्चिम बंगालच्या लोकांनी भाजपाला मतदान केले, कारण ते ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील सरकारवर असमाधानी होते अशी प्रतिक्रिया शिंदेसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली आहे. #WATCH| Delhi | On the BJP-NDA's performance in the Assembly elections in 4 states and 1 UT, Shiv Sena MP Shrirang Barne says, "...The public has bestowed its trust on PM Modi and development...The public of West Bengal voted for the BJP as they were dissatisfied with the Mamata…pic.twitter.com/sWGGTVYYVT इराणने संयुक्त अरब अमिरातीमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात तीन भारतीय नागरिक जखमी झाले आहेत. यूएईतील फुजैराहमध्ये इराणने मिसाईल डागली. त्यात तीन भारतीय जखमी झाले. या घटनेबद्दल भारताने तीव्र संताप व्यक्त केला. भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जायस्वाल म्हणाले की, "फुजैराहमध्ये झालेल्या हल्ल्यात तीन भारतीय जखमी झाले आहेत. हे अजिबात खपवून घेण्यासारखं नाहीये. हे हल्ले ताबडतोब थांबण्यात यावे आणि सर्वसामान्य लोकांना, तसेच अत्यावश्यक सेवांना लक्ष्य करणे बंद करण्यात यावे." सर्वात आधी विजय यांना त्यांची भूमिका स्पष्टपणे मांडू द्या, त्यांच्या भूमिकेनंतर आम्ही कुणाला पाठिंबा द्यायचा हे ठरवू. आम्ही DMK आघाडीसोबत आहोत. यात शंका नाही असं विधान सीपीआयचे सचिव पी. षण्मुगम यांनी म्हटलं. Chennai | Tamil Nadu CPI(M) Secretary P Shanmugam says, "First, let Vijay clearly state his position. Once he does, we will decide whom to support. There is no doubt that we are with the DMK alliance"pic.twitter.com/sG3Y1l6qQN जनतेने पंतप्रधान मोदी आणि देशाच्या विकासावर आपला विश्वास व्यक्त केला आहे. पश्चिम बंगालच्या लोकांनी भाजपाला मतदान केले, कारण ते ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील सरकारवर असमाधानी होते अशी प्रतिक्रिया शिंदेसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली आहे. #WATCH| Delhi | On the BJP-NDA's performance in the Assembly elections in 4 states and 1 UT, Shiv Sena MP Shrirang Barne says, "...The public has bestowed its trust on PM Modi and development...The public of West Bengal voted for the BJP as they were dissatisfied with the Mamata…pic.twitter.com/sWGGTVYYVT राज्यसभा सदस्य आणि भाजप नेते राघव चड्ढा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीसाठी राष्ट्रपती भवनात दाखल #WATCH| Delhi: Rajya Sabha MP and BJP leader Raghav Chadha reaches Rashtrapati Bhavan to meet President Droupadi Murmu.pic.twitter.com/XTISlAVpLi नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या मुलानेही वडिलांच्या कृत्याचा तीव्र निषेध करत कठोर शब्दांत संताप व्यक्त केला. "तो माझा बाप आहे हीच माझी चूक आहे. त्याला लवकरात लवकर फाशी द्या", अशी मागणी त्याने केली आहे. त्या चिमुरडीला जितक्या वेदना झाल्या, तशाच वेदना त्यालाही झाल्या पाहिजेत, असेही तो म्हणाला